आजचं मार्केट – १९ नोव्हेंबर २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १९ नोव्हेंबर २०२०

आज क्रूड US $ ४४.१० प्रती बॅरल ते US $ ४४.४६ प्रति बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७४.२० ते US $१=Rs ७४.२९ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९२.४९ VIX १९.५७ होते तर PCR १.३५ होते.

आज फायझरने सांगितले की त्यांचे व्हॅक्सिन सर्व वयोगटात ९५% यशस्वी ठरले आहे. या शुक्रवारपर्यंत ते FDA कडे मंजुरीसाठी अर्ज करतील. आज ASTRAZENEKA ने सांगितले की त्यांची लस सुरक्षित आणि यशस्वी असल्याचे आढळून आले आहे. MODERNA ही आपली लस यशस्वी असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता पुढल्या वर्षाच्या मार्चपर्यंत लस मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. US $ निर्देशांक ९२ च्या जवळपास आहे. याचा परिणाम सोन्यात मंदी येण्यात झाला.

वोडाफोन आयडियाने सांगितले की आम्ही फंडिंगसाठी विविध कंपन्यांबरोबर बोलणी करत आहोत. ओकट्री आणि VARDE या कंपन्यांबरोबर US $ २०० कोटी फंडिंगसाठी बोलणी करत आहोत. त्यामुळे वोडाफोनच्या शेअरमध्ये तेजी आली.

सरकार IRFC ( इंडियन रेल्वे फायनान्स कॉरपोरेशन) चा IPO मार्च २०२१ च्या आधी आणण्याची शक्यता आहे.
प्रीकॉल ही कंपनी Rs ३० प्रती राईट्स या दराने २७.१ मिलियन राईट्स इशू करेल. या राईट्सचे प्रमाण आता ७ शेअर्समागे २ राईट्स मिळतील असे आहे. (राईट्स या आणि इतर कॉर्पोरेट एक्शन विषयी माझ्या मार्केट आणि मी या पुस्तकात सविस्तर माहिती दिली आहे) .

टेक महिंद्रा इंटेल, बेल, आणि VMware यांच्या सहकार्याने रिमोट वर्क सोल्युशन लाँच करणार आहे.

टी सी एस ला किंगफिशर PLC या ब्रिटिश कंपनीकडून डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी ऑर्डर मिळाली.

M & M च्या व्यवस्थापनाने सांगितले की ऑटोसाठी मागणी चांगली आहे. ट्रॅक्टरचे उत्पादन ९०% ते ९५% क्षमतेवर चालू आहे. FY २१ मध्ये ‘SSANGYONG’ ची विक्री करण्याची किंवा त्यात गुंतवणूकदार शोधण्याची शक्यता आहे.
टाटा ग्रुपने कोविड टेस्ट किटचा पुरवठा करण्यासाठी अपोलो हॉस्पिटल्सही पार्टनरशिप केली. त्यामुळे अपोलो हॉस्पिटल्सच्या शेअरमध्ये तेजी आली.

GPT इन्फ्रा या कंपनीला पश्चिम बंगाल सरकारकडून हुगळी पुलाच्या दुरुस्तीचे Rs २६३ कोटींचे काम मिळाले.कंपनीच्या साईझचा विचार करता ही ऑर्डर खूप मोठी आहे त्यामुळे शेअरमध्ये तेजी आली.

बिर्ला सॉफ्टवेअर या कंपनीने ESKER या कंपनीबरोबर ऑटोमेशन सोल्युशन साठी करार केला.

सरकारने LNG चे मार्केटिंग आणि वितरण सर्वांसाठी खुले केल्यावर पेट्रोनेट LNG या कंपनीने LNG इंधनाचा वापर वाढवण्यासाठी योजना आखली. LNG ची घनता ही कॉम्प्रेस्ड नैसर्गिक गॅसच्या मानाने जास्त असते. जवळजवळ रिफील करेपर्यंत ९०० KM जाते. यामुळे जास्त माईलेज, डिझेलपेक्षा स्वस्त, मेडीयम आणि हेवी कमर्शियल वाहनांसाठी मुख्य इंधन आहे. या योजनेप्रमाणे पेट्रोनेट LNG ही कंपनी ५ मुख्य हायवेवर, ज्यात उत्तर आणि दक्षिण कॉरिडॉरचा समावेश आहे, २०२१ पर्यंत ५० LNG स्टेशन लावणार आहे.दुसऱ्या टप्प्यात ३०० LNG स्टेशन्स सर्व हायवेज वर लावणार आहे. आणि तिसर्या टप्प्यात १००० LNG स्टेशन्स लावणार आहे. भारतात एकूण ८७ हायवेज असून त्यांची लांबी १३१००० KM आहे. ही LNG स्टेशने बंदरे, खाणी, पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सेस, FMCG उद्योग, यांना सलग असलेल्या हायवेजवर लावण्यात येतील. या सर्व ठिकाणी अवजड वाहनांची खूप मोठी वाहतूक होत असते. ते ही LNG स्टेशने लावण्यासाठी सिटी गॅस डिस्ट्रिब्युटर्स, OMC यांची मदत घेतील. अवजड आणि जड कमर्शियल वाहनांसाठी LNG हे इंधन स्वस्त आणि सोयीचे पडते. त्यामुळे आज पेट्रोनेट LNG या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी होती. पण मार्केटची वेळ संपता संपता आलेल्या विक्रीच्या लाटेमधे तो ही पडला.पेट्रोनेट LNG कंपनीने गुजराथ गॅसबरोबर ५ LNG स्टेशन्स लावण्यासाठी करार केला.

हिरोमोटो या कंपनीने या वर्षी नवरात्र ते दिवाळी या सणासुदीच्या ३२ दिवसांच्या काळात १४ लाख गाड्यांची विक्री केली. डिलरकडे असलेली इन्व्हेन्टरी चार आठवड्यांच्या LOW लेव्हलवर आहे. कंपनी उत्पादन अजून वाढवावे लागेल असे सांगत आहे. ही विक्री २०१८ च्या तुलनेत १०३% तर २०१९ च्या तुलनेत ९८% इतकी झाली. लॉकडाऊनच्या काळांतील PENT अप डिमांड तसेच बंद असलेली पब्लिक ट्रान्स्पोर्ट, सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळायला सोप्या अशा टू व्हिलर्सची विक्री तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात झाली वाढ यामुळे ही विक्री झाली. यामध्ये स्प्लेंडर, HF DELUX, १२५ CC मोटर ग्लॅमर आणि सुपर स्प्लेंडर Xtreme, या प्रीमियम सेगमेंटच्या गाड्यांचा समावेश होता. GLAMOUR BSVI VARIANT ची नवीन मार्केट्समध्ये विक्री वाढली. DESTINI आणि प्लेजर या स्कुटर्स मध्ये डबल डिजट ग्रोथ झाली. यामुळे टू व्हिलर्सला ऍक्सेसरीज पुरवणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समधेही तेजी आली. मुंजाल शोवा ही कंपनी शॉकऍबसॉर्बर्स पुरवते तर मुंजाल ऑटो, TVS श्रीचक्र हया कंपन्या टायर्स पुरवतात. त्यामुळेआज हिरो मोटो आणि त्यांना अँसिलिअरीज पुरवणार्या सर्व कंपन्या तेजीत होत्या

आता आपण थोडा HDFC लाईफचा विचार करू. ही HDFC ग्रुपची लाईफ इन्शुअरन्स कंपनी आहे. याची काही वैशिष्ट्ये

(१) भांडवलाची समाधानकारक उपलब्धता
(२) चांगले प्रॉडक्टमीक्स
(३) चांगली वितरण व्यवस्था
(४) भारताच्या मार्केटमध्ये आयुर्वीमा उद्योगासाठी खूपच असलेला वाव.
(५) कंपनीचा निरनिराळ्या भौगोलिक विभांगांवर आणि ग्राहक समुदायावर असलेला फोकस
(६) कंपनीच्या प्रॉडक्ट्समध्ये सातत्याने करण्यात येणारी सुधारणा
(७) या कंपनीने आता डिजिटल मोडने पॉलिसी उतरवण्यात चांगली प्रगती केली आहे. त्यामुळे कोरोनाच्या आणि लॉकडाउनच्या काळांत लोक आयुर्विम्याची पॉलिसी काढू शकले तसेच प्रीमियमही भरू शकले. कंपनीच्या नवीन प्रीमियम उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअरमध्ये चांगल्या प्रमाणात तेजी आहे.

आता स्पाईस जेट या प्रवासी विमान वाहतूक क्षेत्रातील कंपनीविषयी. कालच्या ब्लॉगमध्ये आपण स्पाईसजेट मध्ये तेजी का आली याचे थोडे विवरण केले होते. आज त्या तेजीत भर पडली कारण बोईंग ७३७ मॅक्स या विमानांच्या उड्डाणाला FAA ( फेडरल एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेशन) या USA मधील ऑथॉरीटीने परवानगी दिली. भारतातील DGCA ने सांगितले की आम्ही अभ्यास करून यावर निर्णय घेऊ. स्पाईस जेटकडे अशी १३ विमाने होती. सदोष विमाने पुरवल्याबद्दल स्पाईस जेटने बोईंगकडे नुकसानभरपाई मागितली होती. यापैकी काही रक्कम मिळाली तर काही बाकी आहे. जर DGCA ने स्पाईस जेटकडे असलेल्या १३ बोईंग ७३७ विमानांच्या उड्डाणाला परवानगी दिली तर स्पाईस जेटला बराच फायदा होईल. त्यामुळे आज शेअर मध्ये तेजी होती.

विप्रोच्या बाय बॅकची रेकॉर्ड डेट ११ डिसेंबर २०२० तर टी सी एस च्या बायबॅकची डेट २८ नोव्हेंबर २०२० ही आहे.
झिंग्याची किंमत खूप वाढली तसेच निर्यातही वाढली. त्यामुळे वॉटरबेस, ऍपेक्स फ्रोझन फूड्स, अवंती फूड्स,या शेअर्स मध्ये तेजी आली.

आज मी तुम्हाला स्पाईस जेटचा चार्ट देत आहे. हा १४ दिवसांचा चार्ट आहे. यामध्ये थ्री व्हाइट सोल्जर्स हा कँडलस्टिक पॅटर्न तयार झाला आहे. हा पॅटर्न जोरदार तेजी दाखवतो. पण या जोरदार तेजीनंतर विक्री येण्याची शक्यता असते. त्यामुळे विक्रि थांबल्यानंतर खरेदी करावी . ( माझ्या फ्युचर्स ऑप्शन्स आणि मी या पुस्तकांत या आणि इतर अशाच कँडल स्टीक पॅटर्नविषयी सविस्तर माहिती दिली आहे.) BSE निर्देशांक सेन्सेक्स ४३५९९ NSE निर्देशांक निफ्टी १२७७१ बँक निफ्टी २८९०३ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

4 thoughts on “आजचं मार्केट – १९ नोव्हेंबर २०२०

 1. दिवाकर शिवदास बडगुजर

  ताईसाहेब नमस्कार
  आपला शेअर मार्केट विषयी असल्यास खुप चांगला आहे, समजावून सागता, ते मला समजतेही, मी मार्केट मध्ये एक वर्षो पासून आहे तुमचा विडीओ ऐकण्या सारखा असतो, कंटाळा येत नाही,
  धन्यवाद…..

  Reply
 2. Amanda paralikar

  Nice work at your age, encourages others. Keep it up.
  I I tend to purchase your books. How I can get the same at aurangabad

  Reply
  1. NANDAN DATAR

   I also wish to buy ur Futures & Options n me book. Kindly convey mode of payment n price of the same.
   Regards,
   Datar

   Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.