आजचं मार्केट – २० नोव्हेंबर २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २० नोव्हेंबर २०२०

आज क्रूड US $ ४४.१४ प्रती बॅरल ते US $ ४४.४१ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७४.११ ते US $१=Rs ७४.२७ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९२.३५ तर VIX १९.६१ आणि PCR १.३२ होता.

भारतातील काही भागात पुन्हा कोविड १९ चा प्रादुर्भाव झाल्यामुळे लॉकडाऊनच्या काळातील काही बंधने पुन्हा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता चांगल्या वेगाने होत असलेल्या आर्थिक पुनरुज्जीवनाला खीळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

इमामीने सांगितले कोविड १९ मुळे लोक आता स्वच्छता आणि आरोग्याविषयी जास्त जागरूक झाले आहेत. त्यामुळे होम हायजिन प्रोडक्टचे Rs ३००० कोटींचे मार्केट आहे ते १०% पेक्षा जास्त वाढण्याची शक्यता आहे. इमामीने या मार्केटमध्ये आपल्या ‘EMASOL’ या होम हायजिन प्रॉडक्टची रेंज लाँच केली. उदा :- डिसइन्फेक्टंट फ्लोअर क्लिनर, टॉयलेट क्लीनर, बाथरूम क्लीनर, अँटीबॅक्टेरियल डिश वॉश जेल, आणि सर्व कामांसाठी उपयोगी सॅनिटायझर लाँच केले. आमचे संशोधन आणि ब्रँडव्हॅल्यू यामुळे आमच्या या नवीन प्रॉडक्टसना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल असे व्यवस्थापनाने सांगितले. या बातमीनंतर इमामीच्या शेअरमध्ये चांगली तेजी आली

MPHASIS या IT क्षेत्रातील मोठ्या कंपनीने DATALYTYX या नेक्स्ट जनरेशन डेटा आणि कन्सल्टन्सी इंजिनीरिंग कंपनीचे Rs १३०.४० कोटींना अक्विझिशन केले. ही कंपनी मास्टर डेटा मॅनेजमेंट सोल्युशन्स प्रोव्हाइड करते.

SYNGENE या बायोकॉन ग्रुपच्या कंपनीने डीअरफिल्ड डिस्कव्हरी ऍण्ड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (थ्री DC) बरोबर ५ वर्षांसाठी ऍडव्हान्स THERAUPTIK डिस्कव्हरी प्रोजेक्टसाठी करार केला. ही कंपनी पोर्टफोलिओ ऑफ MOLECULAR एंटिटीज बनवेल यामुळे पेशंट्सना त्यांच्या आजारावर उपाय सापडेल.यासाठी इनोव्हेशन, स्केल, क्वालिटी आणि स्पीड टू मार्केट यांचा वापर होईल. सिनजींच्या शेअरमध्ये तेजी आली.

BSE त्यांचा STARMF या म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युशन प्लॅटफॉर्ममधील त्यांचा मायनर स्टेक विकणार आहे. जगातील टॉप फाइनटेक कंपन्या, बॅंक्स आणि ग्लोबल गुंतवणूकदार हा स्टेक खरेदी करण्यात स्वारस्य दाखवत आहेत. कोविड १९ च्या काळातील लॉक डाऊन मध्ये या प्लॅटफॉर्मवरून चांगले काम झाले. या बातमीयेनंतर BSE च्या शेअरमध्ये तेजी आली.
टाटा केमिकल्समधील आपला स्टेक LIC ने ५.३% वरून ७.०९%पर्यंत वाढवला. LIC ने कोठल्याही कंपनीमधील स्टेक वाढवला की त्या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी येते.

आज ग्लॅन्ड फार्मा या फार्माक्षेत्रातील कंपनीच्या शेअर्सचे BSE वर Rs १७०१आणि NSE वर Rs १७१०वर लिस्टिंग झाले. कंपनीने IPO मध्ये Rs १५०० प्रती या दराने शेअर्स दिले होते. त्यामुळे ज्यांना शेअर्स अलॉट झाले त्यांना चांगला लिस्टिंग गेन झाला.

सरकारने चीनमधून आयात होणाऱ्या कमी गुणवत्तेच्या सात वस्तूंना कम्पल्सरी रजिस्ट्रेशनमध्ये टाकले. यात डिजिटल कॅमेरा, व्हिडिओ कॅमेरा, वेबकॅम, ब्ल्यू टूथ स्पीकर, यांचा समावेश आहे. या वस्तूंचे रजिस्ट्रेशन केल्याशिवाय त्यांची आयात करता येणार नाही. सरकारने या वस्तूंची यादी WTO पाठवली आहे. या आयातीवरील निर्बंधाचा BPL, स्मार्ट लिंक, D -लिंक यांना फायदा होईल.

प्रायव्हेट ट्रेन चालवण्यासाठी सरकारकडे १२० प्रस्ताव आले. यामध्ये L & T, BHEL, वेलस्पन, IRCTC, IRB इन्फ्रा आणि PNC इंफ्राटेक यांचा समावेश होता.

सोने आणि जडजवाहीर यांना छोट्या शहरातून आणि अर्धशहरी भागातून चांगली मागणी येत आहे. लग्नसमारंभात केला जाणारा खर्च कोविड १९ निर्बंधामुळे कमी झाल्यामुळे आता लोक त्या पैशाचे सोने आणि ज्युवेलरी खरेदी करत आहेत.
यामुळे टायटन, TBZ , थंगामाईल ज्युवेलरी या शेअर्समध्ये तेजी आली.

कोरोनाच्या काळात वर्तमानपत्रांची छपाई तसेच वितरण बंद होते. त्यावेळी सर्व नियतकालिकांनी आपल्या E- पेपर , E -मॅगझीन च्या आवृत्या काढायला सुरुवात केली. या E-पेपर आणि मॅगजीन्सना वाचक आणि जाहिरातदार यांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे या कंपन्यांचे डिजिटल रेव्हेन्यू वाढत आहे. उदा :- जागरण प्रकाशन, H. T. मेडिया, DB कॉर्प, H M व्हेंचर्स,

भारती इंफ्राटेलचे इंडस टॉवरबरोबरचे मर्जर पूर्ण झाले. त्यामुळे आज भारती इंफ्राटेलच्या शेअरमध्ये तेजी होती.

BEL ने सांगितले की आमच्या आकाश मिसाईलसाठी, आणि स्मार्ट सिटी बिझिनेस आणि ईलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टीमसाठी चांगल्या ऑर्डर्स मिळत आहेत. जशी निगेटिव्ह लीस्ट वाढत जाईल तशा या लिस्टमधील वस्तूंसाठी कंपनीला ऑर्डर्स मिळतील. आम्हाला दर दोन वर्षाला ऑर्डर्स मिळत राहतील. आमची भविष्यात १०% वर ग्रोथ, मार्जिन कायम राहील. आमच्याकडे ऑर्डर्स आहेत आणि त्या चांगल्या प्रकारे एक्झिक्युट करण्याची क्षमता आहे असे व्यवस्थापनाने सांगितले.

आज RBI ने बँकांसंबंधीत काही नियम बदलण्यासाठी पेपर जाहीर केला. या पेपरवर १५ जानेवारी २०२१ पर्यंत सूचना मागवल्या आहेत. नवीन युनिव्हर्सल बँकेसाठी RBI ने Rs १००० कोटी भाडवल असण्याची तर नवीन स्मॉल फायनान्स बँकेसाठी Rs ३०० कोटी भांडवल आवश्यक करण्याचा प्रस्ताव केला आहे.खाजगी बँकेच्या कोणत्याही नॉन प्रमोटर शेअरहोल्डरसाठी १५% ही शेअरहोल्डिंगवर कॅप असेल. कायद्यात योग्य ते बदल केल्यावर मोठ्या कंपन्यांना बँकेचे प्रमोटर म्हणून मान्यता द्यावी . खाजगी बँकेत प्रमोटर्ससाठी २६% कॅप दीर्घ मुदतीसाठी असावी. बराच काळ अस्तित्वात असलेल्या आणि यशस्वीपणे कारभार करणाऱ्या NBFC चा बँकिंग लायसेन्स देण्यासाठी विचार करावा. पेमेंट बँकेला स्माल फायनान्स बँक बनवण्यासाठी असलेले नियम सोपे करावे. अस्तित्वात असलेल्या बँका भारताची क्रेडिट आवश्यकता पुरवण्यास कमी पडत असल्यामुळे नवीन बँकांना लायसेन्स देण्याची गरज भासत आहे.

बजाज फायनान्स आणी बजाज फिनसर्व या NBFC यापैकी बऱ्याचशा अटी पुऱ्या करत असल्यामुळे त्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली.

मी आज तुम्हाला भारती एअरटेलचा चार्ट देत आहे. भारती इंफ्राटेल या त्यांच्या सबसिडीअरीबरोबर इंडस टॉवरचे मर्जर पूर्ण झाल्यामुळे भारती एअरटेलचा शेअर तेजीत होता.या शेअर्समधील करेक्शन संपून एंगलफिंग पॅटर्न तयार झाला आहे. ही तेजी अशीच चालू राहिल्यास Rs ५२० पर्यंत शॉर्ट टर्म टार्गेट अचिव्ह होऊ शकेल.


BSE निर्देशांक सेन्सेक्स ४३८८२ NSE निर्देशांक निफ्टी १२८५९ बँक निफ्टी २९२३६ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

7 thoughts on “आजचं मार्केट – २० नोव्हेंबर २०२०

 1. Avdhut Pralhad Ghodake

  नमस्कार मॅडम तुमचा share market मधील अभ्यास खूप मोठा आहे.तुमचा अनुभव व उत्साह हा आम्हा नवं तरुण वर्गाला एक चांगली दिशा देऊ शकतो. Thank you madam!

  Reply
 2. विनायक कुंभार

  अँगलफिंग पेटर्न म्हणजे काय कृपया माहिती मिळेल काय

  Reply
 3. ज्ञानेश्वर पांचाळ

  खूप छान माहिती मिळाली…. शेअर मार्केट नेमके काय आहे ते पूर्ण नाही पण आतापर्यंत काही समजत नव्हते आपला ब्लॉग वाचल्यावर डोक्यातील बरेच प्रश्नाचे उत्तर मिळाले….. धन्यवाद 💐💐

  Reply
 4. विनोदकुमार

  खूप छान माहिती मिळाली आहे…आता शेअर खरेदी करणे किंवा विकणे सोपे होईल. धन्यवाद 🙏

  Reply
 5. प्रसाद गावडे

  मला तुमचा शेअर मार्केट प्रशिक्षण बद्दल माहिती हवी आहे. तसेच जर जॉईन करायचा असल्यास काय करावे लागेल त्याची माहिती मिळाली तर खप बरे होईल.

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.