आजचं मार्केट – २3 नोव्हेंबर २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २3 नोव्हेंबर २०२०

आज क्रूड US $ ४५.१४ प्रती बॅरल ते US $ ४५.७३ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७४.०९ ते US $१=Rs ७४.२० या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९२.१७ VIX २०.०५ PCR १.३२ होते.

आज दोन कंपन्यांकडून कोविड १९ च्या लस आणि औषधाच्या बाबतीत २ चांगल्या बातम्या आल्या.

अस्त्राझेनेकाने सांगितले की आमची लस सर्व शास्त्रीय मानकांवर समाधानकारक आहे. कोरोनाशी सामना करण्यासाठीच्या सर्व मापदंडांचे समाधान करते. आम्ही लवकरच इमर्जन्सी वापरासाठी WHO कडे अर्ज करू. आमच्या ट्रायलमध्ये कोणत्याही पेशंटची तब्येत बिघडली नाही किंवा लसीकरण करण्यासाठी हॉस्पिटलायझेशन करण्याची जरुरी नाही. तुमच्या रेफ्रीजरेटरमध्ये तुम्ही आमची लस साठवू शकता. आम्ही २०२१ मध्ये ३०० कोटी व्हॅक्सिन तयार करू. कंबाइंड डोसेस ७०% परिणामकारक आहेत. या त्यांच्या डिक्लरेशननंतर शेअर Rs १२१ ने वाढला. ग्लेनमार्क फार्माने सांगितले की त्यांच्या FAVIPIRAVIR चा क्लिनिकल डेटा उत्साहजनक आहे. फेज ३ ट्रायलमध्ये सकारात्मक परिणाम दिसून आले. USA मध्ये १२ डिसेम्बरपासून लसीकरण सुरु होण्याची शक्यता आहे. यामुळे मार्केटमध्ये एकप्रकारचे सुरक्षित वातावरण तयार झाले. त्यामुळे आज मार्केटमध्ये तेजीचा ट्रेंड अव्याहत चालू राहिला.

रिलायन्स रिटेल आणि फ्युचर ग्रुपमधील कराराला CCI (कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया)ने मंजुरी दिली. त्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीज च्या शेअरमध्ये तेजी आली.

RBI ने प्रसिद्ध केलेल्या पेपर प्रमाणे मोठ्या प्रगतशील आणि आर्थीक स्थिती मजबूत असलेल्या कंपन्यांना तसेच काही अटींवर मोठ्या प्रस्थापित आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या तक्रारी नसलेल्या NBFC चा विचार बँकिंग लायसेन्स देण्याकरता केला जाऊ शकतो. तसेच प्रमोटर्सना बँकांमध्ये २६% स्टेक घ्यायची/ ठेवायची परवानगी देण्याचाही विचार चालू आहे. या पेपरवर RBI ने १५ जानेवारी २०२१ पर्यंत लोकांकडून प्रस्ताव मागवले आहेत. पण मार्केट हे सर्व मंजूर झाल्यासारखे धरून चालले त्यामुळे आज बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व, M &M फायनान्स, चोला इंव्हेजेस्टमेंट, स्पन्दना स्फूर्ती, इक्विटास, श्रीराम सिटी युनियन फायनान्स, सुंदरम फायनान्स, श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स, उज्जीवन फायनान्स, कॅनफिना होम्स, आवास फायनान्सियर्स, क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण, IDFC या शेअर्समध्ये तेजी होती. तसेच कोटक महिंद्रा बँकेत आणि इंडसइंड बॅंकेतही तेजी होती.

जैन इरिगेशनचा रीस्ट्रक्चरिंग प्लॅन SBI च्या नेतृतवाखाली COC ( कमिटी ऑफ क्रेडिटर्स) ने मंजूर केला.एकूण Rs ४००० कोटी कर्जापैकी सस्टेनेबल कर्जावर म्हणजे Rs २८०० कोटींवर बँका ८.५% व्याज आकारतील. राहिलेल्या अनसस्टेनेबल कर्जाचे म्हणजे Rs १२०० कोटींचे ८ वर्ष मुदतीच्या ०.०१% व्याज दराच्या डिबेंचर्समध्ये रूपांतर करण्यात येईल. तसेच या रिस्ट्रक्चरिंग नंतर जैन इरिगेशन या कंपनीत लेंडर्सचा १५% स्टेक असेल.

अडानी पोर्ट या कंपनीचा डाऊ जोन्सच्या सस्टेनॅबिलिटी निर्देशांकात समावेश केला गेला. यामुळे अडानी पोर्टचा शेअर तेजीत होती.

मॅक्स व्हेंचर ही कंपनी नोईडा मध्ये Rs ४०० कोटींचे कमर्शियल प्रोजेक्ट बनवणार आहे. या बातमीनंतर मॅक्स ग्रुपच्या शेअर्समध्ये तेजी आली.

आज टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्यांनी सांगितले की चार्जेसच्या दरात २०% ते २५% वाढ होऊ शकते. कंपन्यांनी AGR ड्यूज देण्यासाठी आणि बिझिनेस एक्स्पान्शन करण्यासाठी हे जरुरी आहे असे सांगितले.

माईंड ट्रीने नॉर्डेक्स या कंपनीबरोबर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी ५ वर्ष मुदतीचा करार केला.

सरकार रिअल इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट आणि इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्टसाठी लॉन्ग टर्म कॅपिटल गेन्स लागू होण्यासाठी होल्डिंग पिरियड ३ वर्षांवरून १ वर्ष करणार आहे तसेच या ट्रस्टना आता बँका थेट कर्ज देऊ शकतील. या ट्रस्टबाबतचे इतरही नियम सोपे केले.

मल्टिमोडल कनेक्टिव्हीटीसाठी लवकरच मास्टर प्लान जाहीर होण्याची शक्यता आहे. २ एक्स्प्रेस ट्रेनची वाहतूक स्थगित ठेवल्यामुळे आज IRCTC च्या शेअरमध्ये मंदी आली.

मी आज तुम्हाला टायटनचा चार्ज देत आहे. टायटन चा शेअर एका चॅनेल मध्ये फिरत आहे. चॅनेलची वरची लाईन रेझीस्टंस आणि खालची लाईन सपोर्ट दाखवते. DAILY चार्ट वर सध्या हा शेअर रेझीस्टंस फेस करत आहे त्यामुळे मार्केटमध्ये तेजी असूनही टायटनमध्ये मंदी दिसली.BSE निर्देशांक सेन्सेक्स ४४०७७ NSE निर्देशांक निफ्टी १२९२६ बँक निफ्टी २९०२४ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

3 thoughts on “आजचं मार्केट – २3 नोव्हेंबर २०२०

  1. Avdhut Pralhad Ghodake

    मॅडम खूप छान तुमचा अभ्यास आहे.तुमच्यामुळे आज आम्हाला करंट बातम्या मिळत आहेत पण माझा एक प्रश्न आहे की आज खरेदी केलेला share 3 ऱ्या दिवशी holdingla दिसून येतो पूर्वी दुसऱ्या दिवशी होल्डिंगला आला की आपण विकत होतो आता तसे दिसत नाही यासाठी काय करता येईल .

    Reply
  2. Abhijit Manohar Pethe

    तुम्ही काल सांगितलेली स्टील मार्केट अनुसरून असलेल्या कंपनी मधील तेजी कायम राहिली.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.