आजचं मार्केट – २४ नोव्हेंबर २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २४ नोव्हेंबर २०२०

आज क्रूड US $ ४६.४६ प्रती बॅरल ते US $ ४६.६३ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७३.९१ ते US $१=Rs ७४.१२ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९२.२२ होता VIX २१.८३, PCR १.४८ होते.

ट्रम्प यांनी अधिकृतरीत्या आता बिडेन यांना USA चे अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारण्यासाठी आमंत्रण दिले. त्यामुळे आता जो बिडेन यांची USA चे अध्यक्ष म्हणून निवड निर्विवाद झाली. बिडेन यांनी जेनेट येलेन यांची ट्रेजरी सेक्रेटरी तसेच अँटनी ब्लिनकेन यांची सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणून नेमणूक केली. जेनेट येलेन यांची निवड केल्यामुळे USA मध्ये २३१ वर्षांनंतर एक महिला अर्थशास्त्रज्ञाला हे पद सोपवले गेले.

जर्मनीच्या GDP मध्ये ८.५% ने वाढ झाली.

आज कोरोनाच्या व्हॅक्सिनविषयी चौतर्फ़ा बातम्या येत असल्यामुळे सोने आणि चांदी यात मंदी होती. गुंतवणूकदारांच्या मनातील अनिश्चितता आणि काळजी कमी झाल्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यातील पैसा मार्केटमध्ये आणला.

आज भारतीय मार्केटने १३०७० हा निफ्टीचा ऑल टाइम हाय आणि ४४५७१ हा सेन्सेक्सचा ऑल टाइम हाय नोंदवला.
JK टायरने कोरियन ऑटोमेकर KIA मोटर्स इंडिया या कंपनीला कॉम्पॅक्ट SUV SELTOS या मॉडेलसाठी रेडियल टायर पुरवण्यासाठी करार केला. यामुळे आज शेअर ४% वाढला.

AU स्मॉल फायनान्स बँकेने त्यांचा आवास फायनान्सियर्स मधील स्टेक ( ४.४६% स्टेक म्हणजे ३५ लाख शेअर्स विकले). हा स्टेक नोमुरा आणि SBI लाईफ यांनी खरेदी केला. नेहेमी कोणत्याही कंपनीतील स्टेक विकला जातो तेव्हा शेअर पडतो. पण हा स्टेक कोणी विकत घेतला हे बघणे जरुरीचे असते. जर शेअर्स स्ट्रॉंग हॅन्ड्समध्ये जात असतील तर ती चांगली गोष्ट मानली जाते.

आज BOSCH चा शेअर व्हॉल्युम सकट ९% ने वाढला. BOSCH आणि BASF डिजिटल फार्मिंग यांनी एक ५०:५० जॉईंट व्हेंचर केले आहे. ह्या दोन कंपन्या एकत्रितरित्या स्मार्ट फार्मिंग सोल्युशन्सचे मार्केटिंग आणि विक्री जागतिक पातळीवर करणार आहेत. या साठी २०२१ च्या पहिल्या तिमाहीमध्ये COLOGNE येथे नवीन कंपनी स्थापन केली जाईल.

ज्युबिलण्ट इंडस्ट्रीजच्या जवळ एक मद्यार्कासाठी लायसेन्स आहे. हे लायसेन्स कंपनी विकणार आहे.

चीन आणि थायलंड मधून आयात होणाऱ्या यार्नवर अँटी डम्पिंग ड्युटीला मुदतवाढ दिली. DGTR ने US $ ५४७ प्रती टन ऐवढी ड्युटी लावले.

इन्फिबीमला मस्कत बँकेकडून ऑर्डर पेमेंट गेटवे सर्व्हिसेससाठी ऑर्डर मिळाली.

मारुतीच्या व्यवस्थापनाने सांगितले की ऑक्टोबर महिन्यापेक्षा नोव्हेंबर महिन्यात ऑटोविक्री जास्त झाली. कंपनीने विश्वास व्यक्त केला की डिसेम्बरपर्यंत विक्रीतील वाढ टिकून राहील. एंट्री लेव्हल पॅसेंजर वाहनांच्या आणि SUV च्या विक्रीत चांगली वाढ झाली. नवीन लाँच केलेल्या मॉडेल्सच्या विक्रीबाबत गायडन्स देणे कठीण आहे.

नोव्हार्टीस PLC ही कंपनी US $ २ कोटींचा बायबॅक करणार आहे. या बातमीनंतर नोव्हार्टीस इंडियाच्या शेअरमध्ये चांगलीच तेजी आली.

इन्फोसिसला Xac Bank मंगोलिया कडून डिजिटल सोल्युशन्ससाठी ऑर्डर मिळाली.

टाटा आणि ‘बिग बास्केट’ मधील डील आता अंतिम टप्प्यात आहे.

सरकारने नोव्हेंबर २०२० या महिन्यात १.१० लाख कोटी एवढे GST कलेक्शन होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. डिसेम्बरमध्ये मात्र हे कलेक्शन थोडे कमी होईल असा अंदाज व्यक्त केला.

इंगरसॉल रँड या कंपनीचा OFS आज २४ नोव्हेम्बरपासून सुरु झाला. या OFS साठी फ्लोअर प्राईस Rs ५७८.६० आहे. रिटेल इन्व्हेस्टर्सना कटऑफ प्राईसवर १२% डिस्काउंट दिला जाईल. कंपनी हा इशू सेबीचे मिनिमम पब्लिक होल्डिंग नॉर्म्स पुरे करण्यासाठी आणत आहे.

आज BMC ने डेव्हलपर्सला काही सवलती देण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला. त्यामुळे रिअल्टी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली.

सरकारने देशाच्या सुरक्षिततेच्या कारणासाठी ४३ चायनीज अँप वर बंदी घातली. इंडियन सायबर क्राईम एजन्सीने दिलेल्या रिपोर्टनुसार ही बंदी घातली. त्यामध्ये अलीबाबा वर्कबेंच, अली-पे कॅशियर, कॅमकार्ड, WEWORKCHINA, अलिएक्सप्रेस, स्नॅक विडिओ या ऍप्सचा समावेश आहे.

मी तुम्हाला HCL TECH चा मंथली चार्ट पाठवत आहे. HCLटेक ही IT क्षेत्रातील प्रथितयश कंपनी आहे. गेल्या दोन दिवसात ओपन इंटरेस्ट मध्ये लक्षणीय वाढ झाली. शेअरने २० दिवस आणि ५० दिवसांचा DMA पार केला. मंथली चार्टमधे ब्रेकआऊट दिसत आहे.

नॉनकुकींग कोलच्या किमती Rs १० प्रती टन एवढ्या वाढवल्या.

अपोलो ग्लोबल मॅनेजमेंटने सरकारच्या BPCL मधील ५३% स्टेकसाठी EOI दिली आहे. अपोलोकडे US $५ बिलियनचे AUM ( ऍसेट अंडर मॅनेजमेंट) आहेत. यापैकी बहुतांश ऍसेट ऑइल आणि गॅस क्षेत्रातील असून अमेरिकेत आहेत.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४४५२३ NSE निर्देशांक निफ्टी १३०५५ बँक निफ्टी २९७३७ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

2 thoughts on “आजचं मार्केट – २४ नोव्हेंबर २०२०

  1. Shailesh Sharad Naik

    मॅडम, इंगरसॅल रँड ह्या कंपनीच्या OFS साठी फ्लोअर प्राईस ५७८.६० वर १२% डिस्काउंट म्हणजे ५०९.२ अशी प्राईस येणार का रिटेल इन्वेस्टर्स ना ?

    Reply
  2. Sankalp Ankaram

    खूपच सुटसुटीत करून सांगतात आज्जी तुम्ही 🙂🙏

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.