आजचं मार्केट – २५ नोव्हेंबर २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २५ नोव्हेंबर २०२०

आज क्रूड US $ ४८.१३ प्रती बॅरल ते US $ ४८.८८ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७३.९१ ते US $१=Rs ७४.०१ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९२.०६ VIX २३.४८ PCR रेशियो १.२६ होता.

आज क्रुडमध्ये तेजी वाढत आहे. व्हॅक्सिन उपलब्ध होण्याच्या बातमीमुळे अर्थव्यवस्था ओपन होतील तसेच ओपेक+ त्यांच्या उत्पादनात वाढ करणार नाही. क्रूड आज US $ ४८ प्रती बॅरलच्या वर आहे. त्यामुळे ONGC, ऑइल इंडिया, ड्रेजिंग करणाऱ्या कंपन्या, पाईप उत्पादन करणाऱ्या, ड्रिलिंग करणाऱ्या कंपन्या, वेदांता, रिलायन्स, तसेच अल्फाजिओसारख्या ऑइल एक्स्प्लोरेशनसाठी सेइस्मिक सर्व्हिसेस प्रोवाइड करणाऱ्या कंपन्यांचा फायदा होतो. क्रूड वाढू लागले की पेंट इंडस्ट्रीज, टायर इंडस्ट्री, प्लास्टिक तसेच एव्हिएशन इंडस्ट्रीचे शेअर्स मंदीत जातात.

फ्रँकिंग करून ऑइल एक्स्प्लोरेशन करणे हे पर्यावरणाला घातक असते. त्यामुळे USA चे अध्यक्ष बिडेन हे यांच्या विरुद्ध आहेत. ते रिन्यूएबल एनर्जीचे प्रवर्तक आहेत.ते नैसर्गिक गॅसच्या उत्पादनाला /वापराला प्रोत्साहन देतील. इतके दिवस क्रुडमध्ये कोणी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट केलेली नाही. युनायटेड ड्रिलिंग टुल्स ही कंपनी ड्रिलिंगसाठी लागणारी साधने पुरवते. क्रूडचे दर आणि क्रूडसाठी मागणी वाढू लागली की क्रूडचे ड्रिलिंगही वाढेल.

आज व्हॅक्सिनच्या बातमीमुळे, इक्विटी मार्केट्समधील तेजीमुळे, जगात सर्वत्र व्याजाच्या दरात घट झाल्यामुळे, आणि हळू हळू जागतिक अनिश्चितता कमी होत असल्यामुळे सोन्यात चांगलीच मंदी आली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने US $ १७८० पर्यंत खाली येऊ शकते.

तामिळनाडू आणि पुडुचेरीच्या किनारपट्टीवर आज संद्याकाळी किंवा मध्यरात्री ‘निवार’ हे चक्रीवादळ धडकेल. हवामान खात्याने अंदाज दिला आहे की ह्या वादळाची क्षमता वाढत आहे.

IOB ही सार्वजनिक क्षेत्रातील राष्ट्रीयीकृत बँक PCA मधून बाहेर पडेल. या बँकेचे बरेचसे NPA रिकव्हर होण्याची शक्यता आहे.

मुथूट फायनान्सच्या IDBI AMC चे ऍक्विझिशन करण्याच्या प्रस्तावाला RBI ने मंजुरी नाकारली. मंत्रिमंडळाने आजच्या बैठकीत लक्ष्मी विलास बँक आणि DBS बँकेच्या मर्जरला मंजुरी दिली.

मंत्रिमंडळाने ATC आशिया पॅसिफिक PTE LTD ला ATC टेलिकॉम इन्फ्राचा १२.३२% स्टेक Rs २४८० कोटींना खरेदी करायला मंजुरी दिली. ही FDI इन्व्हेस्टमेन्ट असेल.

सरकार NIIF च्या DEBT प्लॅटफॉर्म मध्ये भांडवल घालेल.

IRB इन्फ्राच्या आग्रा इटावा प्रोजेक्टला कंप्लीशन सर्टिफिकेट मिळाले टोलमध्ये ७०% वाढ झाली. IRB इंफ्राच्या शेअरमध्ये तेजी आली.

महाराष्ट्र सीमलेस पाइप्सच्या प्रमोटर्सनी ५०,००० शेअर्स खरेदी केले.

TRF ही टाटा ग्रुपची कंपनी टाटा इंटरनॅशनल DLT मधील पूर्ण स्टेक विकणार आहे.

सरकार कोरियामधून आयात होणाऱ्या ACRYLONITRILE BUTASIENE रबरावरची US $ ४७ ते US $ ३२७ अँटी डम्पिंग ड्युटी चालू ठेवू शकते. त्यामुळे APCOTEX च्या शेअर मध्ये तेजी आली.

ऑरोबिंदो फार्माच्या न्यू जर्सी युनिटला CGMP चे उल्लंघन केले म्हणून USFDA ने वार्निंग लेटर दिले.त्यामुळे ऑरोबिंदो फार्माच्या शेअरमध्ये मंदी आली.

नजीकच्या भविष्यात सूर्योदय स्मॉल फायनान्स , ESAF स्मॉल फायनान्स , नजारा टेक्नॉलॉजी, रेलटेल, बर्गर किंग, कल्याण ज्युवेलर्स, अँटनी वेस्ट मॅनेजमेंट या कंपन्यांचे IPO येऊ शकतात.

BPCL ची LPG सबसिडीची मुदत ३ ते ५ वर्षांसाठी वाढवण्यासाठी पेट्रोलियम मंत्रालयाने मंजुरी मागितली आहे.

LAURUS लॅब ही कंपनी रिच कोअर या कंपनीत ७२% स्टेक Rs २५० कोटीना खरेदी करेल. RENAISSANCE इन्व्हेस्टमेंट सोल्युशन्स ARC या कंपनीत १९.९५% स्टेक HDFC Rs ४९.८ लाखांना घेणार आहे.

श्री सिमेंट या सिमेंट क्षेत्रातील दिग्गज कंपनीच्या व्यवस्थापनाने सांगितले की एप्रिल २०२० ते नोव्हेम्बर २०२० या काळातील मागणी गेल्या वर्षीच्या मागणी एवढीच आहे. सिमेंटच्या किमती दर वर्षी ३% ते ४% ने वाढतात. डिसेंबर २०२० नंतर विक्री वाढेल. FY २१ च्या दुसऱ्या अर्धवर्षांत ७% ते ८% एवढी विक्री वाढेल. आम्ही ६५% ते ७०% क्षमतेवर काम करत आहोत. आम्ही येत्या दीड वर्षात छत्तीसगढ, ओरिसा आणि महाराष्ट्रात नवीन प्लांट सुरु करू. UAE येथील युनिटचे टुरिझम आणि ऑइल या दोन क्षेत्रात मंदी असल्यामुळे ३०% कमी प्रॉफिट झाले. भारतीय अर्थव्यवस्था दोन तीन महिन्यात चांगली सुधारेल आणि त्यामुळे सिमेंटला चांगली मागणी येईल.

आज मी तुम्हाला डेल्टा कॉर्पचा चार्ट देत आहे. डेल्टा कॉर्पचे करेक्शन पूर्ण झाले आहे. ५० DMA, १०० DMA आणि २०० DMA च्यावर ट्रेड करत आहे. करेक्शन संपून आज ब्रेकआऊट झाला आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४३८२८ NSE निर्देशांक निफ्टी १२८५८ बँक निफ्टी २९१९६ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

2 thoughts on “आजचं मार्केट – २५ नोव्हेंबर २०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.