आजचं मार्केट – २६ नोव्हेंबर २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २६ नोव्हेंबर २०२०

आज क्रूड US $ ४८.५० प्रती बॅरल ते US $ ४८.९० प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७३.७९ ते US $ १= Rs ७३.८५ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९१.९३ तर VIX २१.२१ होते. PCR १.२९ होते.

कोविदचे लसीकरण आता हाकेच्या अंतरावर आल्यासारखे आहे. डिसेंबर मध्य किंवा ख्रिसमसपर्यंत USA आणि युरोपमध्ये लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.तसेच कोरोनासाठी रिलीफ पॅकेज येण्याची शक्यता आहे. यामुळे आपल्या शेअरमार्केटमध्ये आज नोव्हेंबर २०२० ची मासिक एक्स्पायरी असूनही तेजीचा रोख कायम राहिला.

साखर उत्पादक कंपन्यांच्या अडचणी समजावून घेण्यासाठी साखर उत्पादक कंपन्यांची माननीय मंत्री पियुष गोयल यांच्या बरोबर बैठक आहे. त्यात साखरेची निर्यात, इथेनॉल साठी सवलती, तसेच MSP वाढविण्या संबंधात सकारात्मक निर्णय येण्याची शक्यता असल्यामुळे साखर उत्पादन क्षेत्रातील सर्व कंपन्यात तेजी होती. मवाना शुगर,अवध शुगर, उगार शुगर बलरामपूर चिनी यासारख्या शेअर्समधी तेजी होती.

सरकार प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह स्कीम टेक्सटाईल क्षेत्राला लागू करण्याची शक्यता आहे. MMF (मॅन मेड फायबर) आणि टेक्निकल टेक्सटाईल या वर सरकारचा भर असेल. सरकार या स्कीम अंतर्गत येत्या ५ वर्षात Rs १०५८३ कोटी खर्च करेल. यामुळे डॉलर इंडस्ट्रीज,गोकुळदास एक्स्पोर्ट्स, गार्डन सिल्क, बॉम्बे डाईंग,वेलस्पन इंडिया, या शेअर्समध्ये तेजी आली.

ऑटोमोबाईल आणि कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये रिकव्हरी आल्यामुळे धातूंसाठी मागणी वाढली आहे. त्यामुळे JSW स्टिल, टाटा स्टील, हिंदाल्को,नाल्को, SAIL या शेअर्समध्ये तेजी होती.

एस्त्रा मायक्रो ही कंपनी प्लास्टिक वॉटर टॅंक उत्पादनाच्या क्षेत्रात पदार्पण करत आहेत. कंपनी Rs ७५ कोटींची गुंतवणूक करेल. कंपनीचा पाईप बिझिनेस चांगला चालू आहे तसेच येत्या वर्षात कंपनीचे मार्जिन वाढेल.

२७ नोव्हेंबर २०२० पासून लक्ष्मी विलास बँकेवर RBI ने बसवलेली मोरॅटोरियम संपुष्टात येईल. लक्ष्मी विलास बँक आणि DBS बँक यांचे मर्जर २७ नोव्हेम्बरपासून अमलात येईल. या तारखेपासून लक्ष्मी विलास बँकेच्या सर्व शाखा DBS बँकेच्या शाखा म्हणून काम करतील. DBS बँकेचा भारतातील ग्राहकवर्ग आणि शाखाची नेटवर्क वाढेल. त्यामुळे डिपॉझिटर्स तसेच इतर ग्राहक नेहेमीप्रमाणे व्यवहार करू शकतील.डिपॉझिटर्स आणि बँकेत काम करणारा कर्मचारी वर्ग यांच्या हिताचे पूर्णपणे रक्षण करण्याकडे लक्ष दिले आहे. लक्ष्मी विलास बँकेचे शेअर कॅपिटल राईटऑफ झाल्यामुळे शेअरहोल्डर्सचे मात्र नुकसान होणार आहे. तसेच लक्ष्मी विलास बँकेच्या शेअर्समधील ट्रेडिंगही बंद होईल. DBS बँक Rs २५०० कोटी भांडवल बँकेत घालेल.ही बँक बुडण्यासाठी जे कोणी जबाबदार असतील त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल.

ट्युब इन्व्हेस्टमेंटने SBI MF आणि अझीमप्रेमजी ट्रस्टला Rs ७३१.५० प्रती शेअर या दराने Rs ३५० कोटींचे इक्विटी शेअर्स जारी केले.

सिमेन्स या कंपनीचा निकाल चांगला आला. कंपनीने Rs ७ प्रती शेअर लाभांश जाहीर केला. त्यामुळे कंपनीच्या शेअरमध्ये तेजी आली.

इंडिगो या शेअरचे रेटिंग ‘CITI’ ने कमी केले. कार्गो ट्रॅव्हेल बिझिनेस मध्ये कंपनी तेव्हढीशी स्वारस्य दाखवत नाही पॅसेंजर ट्रॅव्हेल मध्ये आपला मार्केटशेअर कायम राखू शकेल अशी खात्री वाटत नाही. असे सांगितले. त्यामुळे या शेअरमध्ये मंदी आली.

आज सेबीची मीटिंग आहे. या बैठकीत गुंतवणूकदारांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात येण्यासारख्या उपायांवर , आणि कॅपिटल मार्केट्स मध्ये रिफॉर्म्स आणण्यावर विचार होईल. तसेच सेबीने मार्जिनसंबंधात काही अटी सोप्या केल्या. त्यामुळे व्हॉल्युम वाढतील आणि त्यामुळे ब्रोकर्सचा फायदा होईल.

२७ नोव्हेम्बरपासून MSCI निर्देशांकामधे रीबॅलन्सिंग अमलात येईल. या रिबॅलन्सिंगची आपल्या ब्लॉगमध्ये आधीच चर्चा केली आहे.

आज फिनोलेक्स केबलचा चार्ट देत आहे. या शेअरचा Rs ७५७ चा हाय होता या शेअरने २० ५० १०० २०० DMA चा स्तर भरपूर व्हॉल्युमसकट पार केला. हा शेअर २०० DMA च्या खाली ४ महिने कन्सॉलिडेट होत होता. हा शेअर Rs ३३२ नंतर चालेल आणि ६ ते ९ महिन्यासाठी Rs ४५७ टार्गेट असेल. हा इंट्राडे चार्ट आहे. BSE निर्देशांक सेन्सेक्स ४४२५९ NSE निर्देशांक निफ्टी १२९८७ बँक निफ्टी २९५४९ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.