Monthly Archives: December 2020

आजचं मार्केट – ३१ डिसेंबर २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ३१ डिसेंबर २०२०

आज क्रूड US $ ५१.४८ प्रती बॅरल ते US $ ५१.६६ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७३.०४ ते US $१=Rs ७३.०८ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ८९.६३ VIX २०.९० आणि PCR १.३७ होते.

हा आपला या वर्षातील शेवटचा ब्लॉग आहे. आपण वर्ष २०२० ला निरोप देऊन २०२१च्या स्वागताची तयारी करू या. तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा मार्केटने सुद्धा आज इंट्राडे ( निफ्टी) १४००० चा टप्पा पार करून तेजीची चुणूक दाखवली आहे.आणि निफ्टीच्या नव्या विक्रमाची नोंद केली.

आज USA आणि आशियातली मार्केट्स तेजीत होती. जपान आणि कोरियातली मार्केट बंद होती. सोने आणि चांदी यात मंदी होती.

आज UK आणि EU यांच्यातील ब्रेक्झिट करारावर दोन्ही पक्षांच्या सह्या झाल्या. त्यामुळे कराराशिवाय ब्रेक्झिट झाले तर काय होईल याविषयीची अनिश्चितता आणि काळजी कमी झाली.

UK ने अस्त्राझेनेका आणि ऑक्सफर्ड यांच्या व्हॅक्सिनला मंजुरी दिली आणि १ जानेवारी २०२१ पासून प्रायॉरीटी ग्रुप्सच्या लसीकरणाची सुरुवात होईल असे सांगितले.

सरकारने स्मॉल सेविंग योजनांवरील व्याजाचे दर जानेवारी २०२१ते मार्च २०२१ या तिमाहीसाठी बदलले नाहीत.
सरकारने चीन मध्ये उत्पादन केलेल्या किंवा चीनमधून आयात झालेल्या POLYTHYLENE TEREPHTALATE (PET रेझीन) वर US $ १५.५४ ते US $ २००.६६ प्रती मेट्रिक टन या दराने पांच वर्षांकरता अँटी डम्पिंग ड्युटी बसवण्यात येईल.असे सांगितले. पेट रेझीन हे टेक्सटाईल्स,प्लास्टिक बॉटल्स, टायर्स, अंडर सी केबल आणि ३ D-प्रिंटिंगमध्ये वापरण्यात येते. धूनसेरी पेट्रो आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांनी याबाबतीत तक्रार केली होती.

कोरियामधून आयात होणाऱ्या STYRENE BUTAADIEN रबरवर अँटिसबसिडी ड्युटी लावण्याची शक्यता आहे. याचा फायदा रिलायन्स इंडस्ट्रीजला होईल.

DGTR ने चीन आणि कोरियातून आयात होणाऱ्या VISCOSE SPUN यार्नवर अँटी डम्पिंग ड्युटी बसवण्याची शिफारस करून तसे नोटिफिकेशन जारी केले. या बाबत यार्न मॅन्युफॅक्चरिंग असोशिएशन ने तक्रार केली होती.

WOCKHARDT ही कंपनी त्यांच्या UK प्लांटमध्ये फील अँड फिनिश सेवा पुरवेल.

ITC येत्या १२ महिन्यात ९ नवीन WELCOMEHOTEL प्रॉपर्टीज लाँच करेल. हिमाचल प्रदेशातील सिमला येथे या ब्रॅण्डखालील पहिले हॉटेल सुरु केले. या हॉटेलमध्ये ४७ रूम्स असतील.

वेदांताला ओडिशामधील;राधिकापूर येथील कोळशाची खाण मिळाली.

आर्चिडप्लाय इंडस्ट्रीज ६ जानेवारी २०२१ रोजी होणाऱ्या बैठकीत शेअर बायबॅकवर विचार करील.

युनायटेड स्पिरिट्स चे रेटिंग AA + असे करून आऊटलूक पॉझिटिव्ह केला.

सरकारने FASTAG १ जानेवारीपासून अनिवार्य केला. पण आता ही मुदत १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत पुढें ढकलली.
व्हाट्सऍपचे अपग्रेडेशन झाल्यावर १जानेवारी २०२१ पासून ते काही जुन्या अँड्रॉइड आणि IOS स्मार्ट फोन्सवर उपलब्ध नसेल.

१ जानेवारीपासून बहुतेक ऑटो उत्पादक कंपन्यांनी माहिती दिल्याप्रमाणे टू व्हीलर आणि फोर व्हीलर गाड्यांच्या किमतीत वाढ होईल.

आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासावरील बंधने एव्हिएशन मंत्रालयाने ३१ जानेवारी २०२१ पर्यंत वाढवली.

आज वन टाइम रिस्ट्रक्चरिंग साठी उघडलेल्या विंडो चा शेवटचा दिवस. आतापर्यत बँकांकडे १.२२ लाख कोटीच्या रिस्ट्रक्चरिंग साठी अर्ज आले आहेत. कामथ रिपोर्टप्रमाणे औद्योगिक क्षेत्राला दिलेली Rs १५.५२ लाख कोटीची कर्ज कोरोनाच्या काळात प्रभावित झाली होती.

BHEL या कंपनीला Rs ३२०० कोटींची हायड्रो प्रोजेक्टसाठी ऑर्डर मिळाली.

HDFC AMC, DR लाल पाथ लॅब आणि आरती इंडस्ट्रीज १ जानेवारी २०२१ पासून F &O सेगमेंटमध्ये समाविष्ट होतील.
NSE ने निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस इंडेक्सवरील डेरिव्हेटीव्ह कॉन्ट्रॅक्ट ११ जानेवारी २०२१ पासून लाँच केले. या मध्ये २० कंपन्यांचा समावेश असेल. या इंडेक्समुळे फायनान्सियल मार्केट्सचा बिहेवियर आणि परफॉर्मन्स समजण्यास मदत होईल. यांच्यामध्ये बँका, फायनान्सियल इन्स्टिट्यूशन्स, हाऊसिंग फायनान्स कंपन्या, आणि इन्शुअरन्स आणि इतर फायनान्सियल सर्व्हिसेस कंपन्यांचा समावेश असेल. या डेरीव्हेटीव्ह्जची ४ सिरीयल वीकली काँट्रॅक्टस , थ्री सिरियल मंथली काँट्रॅक्टस ( यात चालु मंथली एक्स्पायरीचा समावेश नसेल. उपलब्ध असलेल्या डेटा फॉरीन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंटपैकी ४८% इन्व्हेस्टमेंट या सेक्टरमध्ये येती. निफ्टी ५० शी नवा इंडेक्स ९४% आणि बँक निफ्टीशिंदे ९८% संबंधीत आहे. आणि त्या खालीलप्रमाणे
(१) HDFC
(२) ICICI बँक
(३) REC
(४) श्री राम ट्रान्सपोर्ट
(५) ICICI लोम्बार्ड
(६) चोला इन्व्हेस्टमेंट फायनान्स
(७) M & M फायनान्स
(८) HDFC AMC
(९) HDFC बँक
(१०) SBI लाईफ
(११) HDFC लाईफ
(१२) ICICI प्रु
(१३) PFC
(१४) पिरामल
(१५) बजाज फिनसर्व
(१६) SBI
(१७) बजाज फायनान्स
(१८) ऍक्सिस बँक
(१९) बजाज होल्डिंग
(२०) कोटक महिंद्रा बँक

IDBI बँक IDBI फेडरल इन्शुअरन्समधील आपला स्टेक विकणार आहे.

गॅस, पॅकेजिंग मटेरियल आणि कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे आता टाईल्स मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आता सिरॅमिक्स आणी टाईल्स यांच्या किमती वाढवणार आहेत . याचा फायदा कजारिया सिरॅमिक्स, HR जॉन्सन, मुरुडेश्वर सिरॅमिक्स, एशियन ग्रॅनाईट यांना होईल.

१ जानेवारी २०२१ पासून रिलायन्स जियोने सांगितले की इतर नेट्वर्कवरील डोमेस्टिक कॉल्स फ्री झाले . आता रिलायन्स इतर नेट्वर्कवरील कॉलसाठी इंटर कनेक्ट युसेज चार्जेस घेणार नाही. याचा फायदा वोडाफोन आयडियाला होईल.
ज्युबिलण्ट फूड्स ही कंपनी BARBEQUE हॉस्पिटॅलिटी नेशनमध्ये १०.६% स्टेक Rs ६२ कोटींना खरेदी केले.
ऑइल इंडिया आसाम मध्ये ७५ तेलविहिरीसाठी प्रोजेक्ट सुरु करणार आहे या साठी Rs ३५०० कोटींची गुंतवणूक करेल.
आज मी तुम्हाला ISGEC हेवी इंजिनीअरिंग या BSE वर लिस्टेड असलेल्या कंपनीचा मंथली चार्ट पाठवत आहे. ही EPC क्षेत्रातील कंपनी असून तिचे ६४ % उत्पन्न EPC, ३०% हेवी मशिनरी आणि इक्विपमेंट उत्पादनातुन येते. Rs १४० कोटी नफा झाला. हा ११.५ P /E वर आहे. बुक व्हॅल्यू Rs २५९ आहे. प्रमोटर्सचा स्टेक ६२% आणि म्युच्युअल फंडांचा १०% स्टेक आहे. डिलिव्हरी व्हॉल्युम चांगले आहेत. ही कंपनी परदेशी कंपन्यांबरोबर जाईंट व्हेंचर करते. या कंपनीच्या शेअरचा हाय भाव Rs ८०० होता.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४७७५१ NSE निर्देशांक निफ्टी १३९८१ बँक निफ्टी ३१२६४ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – ३० डिसेंबर २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ३० डिसेंबर २०२०

आज क्रूड US $५१.१७ प्रती बॅरल ते US $५१.३८ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७३.२९ ते US $१=Rs ७३.३३ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ८९.७५ VIX २१.४२ PCR १.३१ होते. आज US $ कमजोर झाला आणि रुपया वधारला.

ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाच्या कोविडच्या व्हॅक्सिनला UK कडून मंजुरी मिळाली. नवीन वर्षात UK मध्ये व्हॅक्सिनेशनचा पहिला टप्पा सुरु होईल. ४ ते १२ आठवड्यांच्या अंतराने २ डोसेस व्हॅक्सिन देणार. UK मधून १० कोटी डोसेस साठी ऑर्डर मिळाली. कंपनीने सांगितले की आम्ही जगातील सर्व देशांच्या रेग्युलेटरी ऑथॉरिटीजकडे मंजुरीसाठी अर्ज करत आहोत. भारत सरकारही त्यांच्या कोविशील्ड व्हॅक्सीनला मंजुरी देण्याची शक्यता आहे. यामुळे अस्त्रा झेनेकाच्या शेअरमध्ये तेजी आली. USA आणि यूरोपमध्ये फायझर आणि मॉडर्ना कंपन्यांच्या लसीकरण कामाला आरंभ झाला आहे.

आज USA मध्ये जाहीर झालेल्या पॅकेजमुळे आणि डॉलर कमजोर झाल्यामुळे सोन्यामध्ये तेजी होती तर व्हॅक्सिन रोल आऊटमुळे या तेजीला मर्यादा पडली. चांदी मात्र तेजीत होती. व्हॅक्सिन रोल आउटमुळे मागणी वाढायची शक्यता असल्यामुळे क्रूडमध्ये मात्र तेजी होती.

शारदा एनर्जी या कंपनीला MP आणि छत्तीसगढमधील दोन कोळशाच्या खाणी मिळाल्या. त्यामुळे या शेअरमध्ये तेजी आली.

ASM टेक्नॉलॉजीने १:१ बोनस जाहीर केला. त्यामुळे या शेअरमध्ये तेजी आली. UPL या कंपनीने Rs २८७० कोटी एवढे कर्ज कमी केले. त्यामुळे या शेअरमध्ये तेजी आली.

EID पॅरी या कंपनीने Rs ८०३.१९ ( CMP ला ३% ते ६% डिस्काउंटने) प्रती शेअर या भावाने कोरोमंडल इंटरनॅशनल या कंपनीचे ५८ लाख शेअर्स विकले. EID पॅरी या कंपनीला Rs ८७० कोटींचे कर्ज आहे त्यापैकी Rs ४८० कोटींचे कर्ज फेडले जाईल असा अंदाज आहे.

मका आणी तांदूळ यापासून इथेनॉल बनवल्यास जास्त सबसिडी मिळेल. ही सबसिडी व्याज दरात मिळेल. १२% पेक्षा कमी व्याज असल्यास ५०% व्याज कमी द्यावे लागेल. ६% व्याज आकारले जाईल. म्हणून एथॅनॉल उत्पादक कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी आली. इंडिया ग्लायकॉल,प्राज इंडस्ट्रीज, द्वारिकेश इंडस्ट्रीज आणि इतर साखर उत्पादक कंपन्या.
JSL आणी जिंदाल स्टेनलेस (हिस्सार) या कंपन्यांच्या मर्जरला त्यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरनी मंजुरी दिली. JSL च्या एका शेअरला जिंदाल स्टेनलेस ( हिस्सार) चे १.९५ शेअर्स म्हणजेच JSL च्या १०० शेअर्सला JSL ( हिस्सार) चे १९५ शेअर्स मिळतील. मर्जर नंतर JSL ही एकच लिस्टेड कंपनी असेल. प्रमोटर होल्डिंग ५७% तर पब्लिक होल्डिंग ४३% असेल. ह्या मर्जरचि प्रक्रिया १ एप्रिल २०२१ पर्यंत पुरी होईल. या दोन्ही कंपन्या एकाच क्षेत्रातील असल्यामुळे कॉस्ट कमी होईल.
क्लिअर फ्लोट ग्लास वर अँटी डम्पिंग ड्युटी लावण्याची मागणी असाही इंडियानी केली होती. DGTR नी तपास करून या ग्लासवर काउंटरव्हेलिंग ड्युटी लावली जाईल असे सांगितले. याचा फायदा असाही इंडिया आणि सेंट गोबेन यांना होईल.
मुंजाल शोवामधील १.१०% स्टेक शोवा कॉर्पोरेशन विकणार आहे.

पारादीप पोर्ट च्या डेव्हलपमेंटला मंजुरी मिळाली. मल्टिमोडल लॉजिस्टीक्सला मंजुरी मिळाली. याचा फायदा शिपिंग कंपन्या, ड्रेजिंग कॉर्पोरेशन यांना होईल.

मी आज तुम्हाला वेंकीज या कंपनीचा चार्ट देत आहे. थंडीचा मोसम सुरु झाला आहे. कोरोनामुळे अंडी, कोंबड्या यांच्या सेवनाविषयी निर्माण झालेली भीती कमी झाली आहे. त्यामुळे अंडी कोंबड्या यांच्या किमती वाढत आहेत. याचा फायदा वेंकीजला होईल.अंड्यांच्या किमती मुंबईत १८%, दिल्लीत १०% तर अहमदाबादला १६% वाढल्या आहेत चिकनच्या किमती दुप्पट झाल्या आहेत. २०१८ मध्ये हा शेअर Rs ४७७५ होता वेंकीजची CAGR ग्रोथ १४% आहे. आज या शेअरमध्ये ब्रेकआऊट झाला आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४७७४६ NSE निर्देशांक निफ्टी १३९८१ बँक निफ्टी ३१३०३ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २९ डिसेंबर २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २९ डिसेंबर २०२०

आज क्रूड US $ ५१.२१ प्रती बॅरल ते US $ ५१.३९ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७३.३६ ते US $१= Rs ७३.४३ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९०.१३ VIX २०.५२ PCR १.३० होते.

आज USA ची मार्केट्स US $ ९०० बिलियनच्या पॅकेजमुळे तेजीत होती. आज यूरोपमधील मार्केट्सही ब्रेक्झिटचा प्रश्न सामोपचाराने आणि समाधानकारकरित्या सुटल्यामुळे तेजीत होती. भारतातील मार्केटही FII चा फ्लो अविरत चालू असल्यामुळे तेजीत होती. IT आणि फायनान्सियल क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी होती. आतापर्यंत डिसेम्बर महिन्यात Rs ६०००० कोटींची FII गुंतवणूक आली. नोव्हेम्बरमध्ये ही गुंतवणूक Rs ६०३०० कोटी होती. निफ्टीने १३९०० पार केला आणि १४००० पार करण्याची अपेक्षा आहे.

३i इन्फोटेक या कंपनीने त्यांचा डिजिटल प्रॉडक्टस चा बिझिनेस Rs १००० कोटींना विकला.या कंपनीची मार्केट व्हॅल्यू Rs ९५५.४४कोटी आहे. त्यामुळे या शेअरमध्ये तेजी आली.

अहलुवालिया कॉन्टॅक्टस या कंपनीला Rs ३०९ कोटींची ऑर्डर मिळाली. त्यामुळे या शेअरमध्ये तेजी आली.
ICICI बँकेने ‘MYCLASSBOARD’ या ऑन लाईन प्लॅटफॉर्ममध्ये Rs ४.५ कोटींना ९.०९% स्टेक खरेदी केला.

गेटवे डिस्ट्रिपार्क या कंपनीने Rs २ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला.

कोची शिपयार्डची अंतरिम लाभांशावर विचार करण्यासाठी ४ जानेवारी २०२१ रोजी बैठक आहे.

बांगला देशाने तांदुळाच्या आयातीवरील ड्युटी ६२.५% वरून २५% केली. त्यामुळे बंगला देशाला तांदूळ निर्यात करणाऱ्या कंपन्यांना फायदा होईल.बांगला देश हा एक तांदूळ उत्पादन करणारा देश आहे. पण यावर्षी आलेल्या पुरामुळे बांगलादेशात तांदुळाच्या किमती खूपच वाढल्या. बांगला देश ५ लाख टन तांदूळ आयात करण्याची शक्यता आहे. याचा फायदा KRBL, LT फूड्स, चमनलाल सेठिया एक्स्पोर्ट्स. या कंपन्यांना होईल. नॉन बासमती तांदुळाच्या निर्यातीत लक्षणीय वाढ होईल.

सरकारचा BEML मध्ये ५४.०३% स्टेक आहे. त्यापैकी २६% स्टेक सरकार विनिवेश करणार आहे. या साठी आज EOI कच्चा मसुदा मंत्रीमंडळाने मंजूर केला. या कंपनीची जमीन वेगळी विकली जाईल. या प्रक्रियेत PSU ना भाग घेण्याला मनाई असू शकेल. या प्रक्रियेत खाजगी कंपन्यांना सामील होण्याची सूट असेल. या बातमीनंतर काहीवेळापर्यंत या शेअरमध्ये माफक तेजी होती.

अलाइड डीजीटल या कंपनीला ३ वर्षांसाठी US $ २.१८ कोटींची ऑर्डर मिळाली. ह्या बातमीनंतर या शेअरला अपर सर्किट लागेल.

बजाज ऑटोची मार्केट कॅप Rs १ लाख कोटी झाली. त्यामुळे ही भारतातील ऑटो क्षेत्राती दुसरी सर्वात मोठी कंपनी झाली.
ऑरोबिंदो फार्मा ही कंपनी आपल्या उत्पादनांचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाइड करत आहेत.तसेच COVAXX च्या सहकार्याने कोरोनावरील व्हॅक्सिन ( UB -६१२) बनवत आहे. हे व्हॅक्सिन ऑर्डीनरी रेफ्रीजरेशन तापमानाला स्थिर असेल तसेच त्यांची कोरोनावरील व्हॅक्सिन इतर कंपन्यांच्या व्हॅक्सिनपेक्षा स्वस्त असेल आणि जून २०२१मध्ये उपलब्ध होईल. त्यामुळे औरोबिंदो फार्माच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल.

रिलायन्स इंडस्ट्रीजने US $ २७ बिलिअनची गुंतवणुक वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांकडून स्वीकारली. आता या गुंतवणुकीचा फायदेशीर विनियोग वेगवेगळ्या क्षेत्रात कसा होतो आहे याकडे सर्वांचे लक्ष आहे. 5 G नेटवर्क सुरु करणे, फेसबुकच्या WHATSAPP ची पेमेंट सर्व्हिस रिलायन्सच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून सुरू करणे, रिलायन्स रिटेल मार्फत मॉम अँड पॉप -स्टोर्स चालू करणे इत्यादी या कार्यक्रमात समाविष्ट आहे. या कार्यक्रमाची पूर्तता जेवढ्या लवकर आणि जेवढ्या परिणामकारकरीत्या होईल तेव्हढे रिलायन्सला क्रेडिट मिळेल. रिलायन्सच्या शेअरमध्ये ही गुंतवणुक आली तेव्हा लक्षणीय तेजी आली. पण आता या पुढे या गुंतवणुकीच्या फायदेशीर विनीयोगावर पुढची वाढ अवलंबून असेल. तोपर्यंत रिलायन्सचा शेअर रेंज बाउंड कन्सॉलिडेशनमध्ये राहण्याची शक्यता आहे.

मी आज तुम्हाला किर्लोस्कर ऑइल इंजिन्स या कंपनीचा चार्ट देत आहे किर्लोस्कर ऑइल इंजिन्स ही कंपनी किर्लोस्कर ग्रुपची फ्लॅगशिप कंपनी आहे. हे डिझेल वर चालणारी इंजिन्स, पंप्स, जनरेशन सेट्स, पॉवर टिलर्स आनि अन्य शेतकी अवजारे बनवतात. या कंपनीच्या शेअरची CMP १० ते ११ P /E वर आहे तर बुकव्हल्यू Rs १२४ आहे. ही एक DEBT फ्री कंपनी आहे. कोरोनाच्या काळात शेती हा किमान प्रतिकूल परिणाम झालेला व्यवसाय असल्यामुळे आणि सरकारनी ग्रामीण क्षेत्रात रिलीफ पॅकेज दिल्यामुळे ग्रामीण क्षेत्रातून कम्पनीच्या उत्पादनांना चांगली मागणी येत आहे. कंपनीची सबसिडीअरी आता इलेक्ट्रिक पम्प बनवत आहे. Rs १२५ च्या लेव्हलवरून ब्रेकआऊट होण्याची शक्यता दिसत आहे. ऑलटाइम हाय २०१८ मध्ये Rs ४०० होता. ALLTIME लो Rs ७० होता. ५२वीक हाय Rs १६० होता.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४७६१३ NSE निर्देशांक निफ्टी १३९३२ बँक निफ्टी ३१३२२ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २८ डिसेंबर २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २८ डिसेंबर २०२०

आज क्रूड US $ ५०.९० प्रती बॅरल ते US $ ५१.१५ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७३.५१ ते US $१= Rs ७३.५७ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९०.१८ VIX २१.०० PCR १.५९ होते.

आजपासून या वर्षीचा शेवटचा आठवडा सुरु झाला. ट्रम्प यांनी US $ ९०० बिलियन पॅकेजवर सही केली.या पॅकेजप्रमाणे आठवड्याला US $ ३०० रोजगार मिळेल म्हणजेच US $ १२०० महिन्याला मिळतील.महिन्याला किमान US $ २००० रोजगार द्यावा असे सांगत ट्रम्प यांनी या रिलीफ पॅकेजवर सही केली. त्याचप्रमाणे नव्या वर्षाच्या सुरुवातीला आणखी एक रिलीफ पॅकेज दिले जाईल असे सांगितले. त्यामुळे ज्याचा शेवट गोड ते सगळे गोड असे म्हणावे लागेल. त्यामुळे USA च्या मार्केटमध्ये तेजी आली.

आता कमोडिटीजच्या नवीन सायकलला सुरुवात झाली. त्यामुळे आता सर्व कमोडिटीजमध्ये तेजी येईल.

USA मध्ये आणि यूरोपमध्ये कोरोनासाठी लसीकरण सुरु झाले .

ब्रेक्झिट करार व्यवस्थितपणे झाल्यामुळे UK शी संबंधित ज्या कंपन्यांचा व्यवहार आहे त्या कंपन्यांनीही सुटकेचा निश्वास सोडला. EU आणि UK मध्ये डील होत आहे. झिरो टॅरीफ ठरवून फ्री ट्रेडिंग ऑफ गुड्स सुचवला आहे. उदा टाटा मोटर्स, मजेस्को, टी सी एस, मदर्सन सुमी, मास्टेक

USA च्या अर्थव्यवस्थेमध्ये लिक्विडीटी वाढल्यामुळे USA ची मार्केट्स तसेच ब्रेक्झिटमुळे युरोपमधील मार्केट्स तेजीत होती.
अस्त्राझेनेकाने सांगितले की त्यांची व्हॅक्सिन नवीन संसर्गजन्य कोरोनावर सुद्धा परिणामकारक आहे. त्यांच्या व्हॅक्सिनला भारतामध्ये इमर्जन्सी यूजसाठी आठवड्याभरात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यांचा व्हॅक्सिनचा सक्सेस रेट ९५% आहे. फायझरच्या व्हॅक्सिनच्या बाबतीत तपमानाचा प्रॉब्लेम आई. फायझरचे व्हॅक्सिन -७० तापमानाला स्थिर राहते.

सोने आणि चांदी यात लक्षणीय तेजी आली. चांदी Rs २००० तर सोने १० ग्रॅमला Rs ४०० ने वाढले.

USA मध्ये मंजुरी मिळालेल्या पॅकेजमुळे भारतात येणारा FII चा फ्लो चालू राहिला आणि त्यामुळे आज पुन्हा एकदा मार्केट तेजी मध्ये बंद झाले.

ग्रोथ शेअरची किंमत खूप वाढल्यामुळे मिड CAP स्मॉल कॅप मध्ये रॅली सुरु झाली. ज्या शेअरमध्ये व्हॅल्यू आहे, ग्रोथची संभावना आहे, पण शेअरची CMP कमी आहे अशा शेअर्समध्ये तेजी दिसत आहे.

NIIT या कंपनीने Rs २४० प्रति शेअर या भावाने ९८७५००० शेअर्स बायबॅक जाहीर केला. या साठी कंपनी Rs २३७ कोटी खर्च करेल.

बायोकॉनचा मार्केटशेअर कमी झाला आहे. USFDA ने सुद्धा बायोकॉन-मायलॉन च्या संदर्भांत निर्णय टाळला. पण त्याचे कारण कोरोनामुळे व्हिजिट करता येत नाही असे दिले. ( BIOLOGICS लायसेन्स अप्लिकेशन)

PAISALO डिजिटल या कंपनीमध्ये SBI लाइफने ९% स्टेक Rs ४९० या भावाने Rs १८० कोटींना खरेदी केला.

DLFने फेअरलीफ रिअल इस्टेटमध्ये ५१.८% स्टेक खरेदी केला.वन हॉरिझॉनसेंटर मध्ये स्टेक खरेदी केला.DCGDL या DLF च्या रेंटल आर्मने Rs ७८० कोटींमध्ये ५२% स्टेक HINES या गुरुग्राम मधील प्रीमियम कमर्शियल प्रोजेक्टमध्ये घेतला.
FASTAG मुळे टोल कलेक्शन वाढेल याचा फायदा रस्तेबांधणीच्या क्षेत्रातील कंपन्यांना होईल. दिलीप बिल्डकॉन, IRB इन्फ्रा, PNC इन्फ्रा. जय कॉर्प

डिश टी व्ही ला सरकारने लायसेन्स आणि व्याजासाठी Rs ४१६४ कोटीची नोटीस पाठवली आहे.

कोल इंडिया आता वेगळ्या क्षेत्रात उतरणार आहे. कोल इंडिया हे आता नॉन-कोल मायनिंग आणि क्लीन टेक्नॉलॉजी मध्ये गुंतवणूक करणार आहे. कोल इंडिया Rs १ लाख कोटी ऍल्युमिनियम आणि सोलर सेक्टरमध्ये गुंतवणार आहे. Rs ४५५०० कोटी गुंतवणूक करून सोलर वेफर मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी, Rs ३८००० कोटी ची ग्रीन फिल्ड अल्युमिनियम प्रोजेक्ट आणि नाल्को बरोबर Rs २३४०० कोटी गुंतवून अल्युमिनियम स्मेल्टिंग युनिट चालू करणार आहे. ही युनिट्स ओडिशा आणि झारखंडमध्ये सुरु होण्याची शक्यता आहे.कोल इंडियाने सांगितले की आमच्या कंपनीला नेट झिरो कार्बन एमिशनचे लक्ष्य पुरे करायचे आहे. यामुळे आज कोल इंडियामध्ये माफक तेजी होती.

सिकल लॉजीस्टिक्स या कंपनिच्या NCD वरील व्याज देण्यात उशीर झाला. कमी झालेला कॅश फ्लो आणि कोरोनाच्या काळातील अडचणी अशी कारणे कंपनीने यासाठी दिली.

NTPC ने DULANGA या कोळशाच्या खाणीत उत्पादन सुरु झाले.

सेंट्रल बँक त्यांच्या हौसिंग फायनान्स जॉईंट व्हेंचरमधील ६४% स्टेक सेन्ट्रम हौसिंग फायनान्स या कंपनीला Rs १६० कोटींना विकणार आहे.

डिक्सन टेक्नॉलॉजीने मोटोरोला या कंपनीबरोबर स्मार्ट फोन मॅन्युफॅक्चरिंगसाठी करार केला. त्यामुळे डिक्सन टेक्नॉलॉजीच्या शेअरमध्ये लक्षणीय तेजी आली.

TRAI टेलिकॉम कंपन्यांना कोअरनेटवर्किंग शेअर करण्यासाठी मंजुरी देण्याची शक्यता आहे. आता या कंपन्या फक्त टॉवर आनि BTS नेटवर्क शेअर करू शकतात. यामुळे टेलिकॉम कंपन्यांची कॉस्ट २०% ते २५% कमी होईल तसेच 5G नेटवर्क लावायला सोपे जाईल. TRAI या संबंधात जानेवारी २०२१ मध्ये कंसल्टेशन पेपर प्रसिद्ध करेल.

टिप्स म्युझिकने फेसबुकबरोबर ग्लोबल लायसेन्सिंगसाठी करार केला. त्यामुळे टिप्स म्युझिकचा शेअर २०% ने वाढला.
टी सी एस ची मार्केट कॅप Rs ११ लाख कोटींच्यावर गेली.

IRCON या कंपनीत सरकारचा ८९.१८% स्टेक आहे.१७ ते १९ सप्टेंबर २०१८ मध्ये या कंपनी चा IPO आला होता. IPO पासून ३ वर्षाच्या आत हा स्टेक ७५% करावा लागतो. हा OFS एका आठवड्यात येईल. सरकार या OFS मधून Rs ४०० कोटी उभारेल..

येत्या अंदाजपत्रकात इन्फ्रास्ट्रक्चर तसेच सोशल इन्फ्रास्ट्रक्चरवर सरकारचा जोर असेल. सोशल इन्फ्रा मध्ये हेल्थकेअर, शिक्षण, यांचा समावेश होते. सरकार यासाठी डेव्हलपमेंट फाय नान्सियल इन्स्टिट्यूशन स्थापन करण्याची शक्यता आहे. या इन्स्टिट्यूशन्स दीर्घ कालावधीकरता कमी व्याजाच्या दरावर कर्ज देतील. यामुळे पटेल इंटिग्रेटेड, नवकर कॉर्प, गती अशा शेअर्समध्ये तेजी आली.

भारत दरवर्षी १०००० कंटेनर्सची चीनमधून आयात करतो. आता ‘आत्मनिर्भर भारत’ या योजनेअंतर्गत १००० कंटेनर्सच्या उत्पादनासाठी BHEL आणी BRAITHWAITE या कंपन्यांना ऑर्डर दिली जाईल. हळू हळू या ऑर्डर्स खाजगी क्षेत्रातील कंपन्यांनाही दिल्या जातील. या बातमीनंतर भेलच्या शेअरमध्ये तेजी आली.

आज मी तुम्हाला TBZ या कंपनीचा चार्ट देत आहे. TBZ हि जेम्स आणि ज्युवेलरी या क्षेत्रातली कंपनी आहे. सोन्याचे आणि चांदीचे भाव वाढत आहेत.आता लग्नकार्याचा सिझन आहे पण कोरोनामध्ये धूम धडाक्यात लग्नकार्य करता येत नाहि . त्यामुळे तीच रक्कम सोन्यामध्ये गुंतवणे लोक पसंत करत आहेत. मंथली चार्टमधे ब्रेकआऊट आहे. अशा वेळी तुम्ही शॉर्ट टर्म आनि मीडियम टर्मसाठी शेअरचा विचार करू शकता. पण हा गुंतवणुकीचा शेअर नव्हे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४७३५३ NSE निर्देशांक निफ्टी १३८७३ बँक निफ्टी ३०८८० वर बंद झाले

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २४ डिसेंबर २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २४ डिसेंबर २०२०

आज क्रूड US $ ५१.२९ प्रती बॅरल ते US $ ५१.६३ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७३.५३ ते US $ १=Rs ७३.६१ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९०.१६ VIX २०.५० आणि PCR १.४८ होते

सरकारने DTH लायसन्सेस २० वर्षांसाठी दिले जाईल, हे लायसेन्स दर दहा वर्षांनी र्रिन्यू केले जाईल. लायन्सस फी दर तिमाही गोळा केली जाईल. या क्षेत्रात काम करण्याऱ्या कंपन्यांना कंपन्यात १००% FDI आणण्यास मंजूरी दिली.याचा फायदा डेन नेटवर्क्स, GTPL हाथवे, हाथवे केबल, डिश टी व्ही याना होईल.

३१ डिसेंबर २०२० हि ब्रेक्झिटची तारीख नक्की झाली आहे. आता कोणत्याही ट्रेड डील शिवाय ब्रेक्झिट होईल असे UK चे पंतप्रधानांनी सांगितले आहे. त्यामुळे बॉण्ड यिल्ड वाढण्याची शक्यता आहे. UK आणि EU यांच्यात आता ब्रेक्झिटसंबंधात करार होण्याची शक्यता वाढल्यामुळे संबंधीत देशांच्या अर्थव्यवस्थेला विना करार ब्रेकझिटची पोहोचणारी झळ कमी होईल. त्यामुळे आज सर्वच मार्केट तेजीत होती

BEML मधील सरकारचा २६% स्टेक विक्री करण्यासंबंधात २८ डिसेंबर २०२० रोजी तर ITDC च्या डायव्हेस्टमेन्टवर विचार करण्यासाठी ३० डिसेंबर २०२० रोजी बैठक आहे.त्यामुळे या दोन कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी होती. .

ओडिशा पॉवर जनरेशन मध्ये ४९% स्टेक घेण्यासाठी अदानी पॉवरबरोबर केलेला करार ओडिशा सरकारने राईट ऑफ फर्स्ट रिफ्युझलच्या अंतर्गत रद्द केला.

भारती एअरटेलने ऑक्टोबर महिन्यात ३६.७४ लाख ग्राहक जोडले (सप्टेंबर महिन्यात ३७.८ लाख) तर रिलायन्स जिओने २२.२८ लाख ग्राहक जोडले.(सप्टेंबर महिन्यात १४.६१ लाख) वोडाफोनआयडिया ने २३.५६ लाख ग्राहक गमावले. सप्टेंबर महिन्यात ४६.५३ लाख ग्राहक गमावले.

वेदांताचे प्रमोटर्सने ४.९८% स्टेक खरेदी केला . त्यामुळे वेदांताच्या शेअरमध्ये तेजी आली.

USLस्टीलचा चा कर्नाटकात असलेला पिग आयर्न प्लांट घेतला होता त्याचे अक्विझिशन किर्लोस्कर फेरस ने पूर्ण केले.
ACC ने होलसिमकडून टेक्नॉलॉजि आणि नोहाउ घेण्यासाठी करार केला होता . यासाठी नेट सेल्सच्या १% ऐवढी फी ACC देईल. हा करार दोन वर्षांकरता केला आहे.

भारत फोर्ज आणि जर्मन सबसिडीअरी कंपनी यांच्यामध्ये सेटलमेंट झाली जर्मन कोर्टाने R २८८ कोटी दंड लावला. . .
COVAXX यांचे व्हॅक्सिनच्या डेव्हलपमेंट आणि भारतातील विक्री बाबत औरोबिंदो फर्माने करार केला. या व्हॅक्सिनची दुसरी आणि तिसरी ट्रायल २०२१च्या पहिल्या तिमाहीत केली जाईल.

स्पेशालिटी रेस्टारंटच्या शेअरमध्ये तेजी होती. सरकारच्या लिकर लायसेन्स फी मधील ३०% कपात आणि क्लब आणि रूम लायसेन्स फी मध्ये ५०% कपात यामुळे या कंपनीचा फायदा होईल. हा शेअर २०० DMA च्या वर ट्रेड करत आहे.
रिलायन्स कॅपिटलचा त्यांच्या विविध सब्सिडिअमधील स्टेक आणि इतर ऍसेट्सच्या मोनेटायझेशन साठी मागवलेल्या बोलींना चांगला प्रतिसाद मिळाला. एकूण ६० बीड मिळाल्या त्यामधील ८ बीड्स या सर्व ऍसेट्स साठी होत्या. यात OAKTREE JC फ्लॉवर आणि मल्टिपल ARC चा समावेश होता. रिलायंस जनरल इन्शुअरन्स, लाईफ इन्शुअरन्स यामधील स्टेकला चांगला प्रतिसाद मिळत आहे

SJVN या कंपनीला हिमाचल प्रदेश राज्य सरकारकडून ५०१ MW हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्टसाठी ऑर्डर मिळाली.
VOLKSWAGAN इंडिया ने पोलो आणि वेंटो यांच्या किमतीत जानेवारी २०२१ पासून २.५% ने वाढ केली.याचा फायदा मदरसनसुमीला होईल.

स्पेशालिटी केमिकल्स क्षेत्रातील अनुपम रसायन या कंपनीचा IPO नजीकचा भविष्यात येणार आहे.

मी आज तुम्हाला वॉटर बेस या कंपनीचा इंट्राडे चार्ट देत आहे . ही कंपनी श्रिम्प आणि श्रिम्पफीड ची निर्यात करते. हा एक हाय प्रोटीन डाएट आहे. वॉटरबेस ही कंपनी हाय क्वालिटी फीडचे उत्पादन करते . उदा बे व्हाईट ही खाद्य VANNANEEI श्रिम्पसाठी तयार करतात. भारत जपान आणि रशिया मध्ये श्रिम्पची चांगली खरेदी होत आहे. ब्लॅक टायगर श्रिम्पची पूर्वी जपानमध्ये तपासणी होत होती पण आता ती होत नाही. ही एक पूर्णपणे इंटिग्रेटेड अक्वा कल्चर कंपनी आहे. ही DEBT फ्री, कॅश रिच कंपनी आहे . डबल डिजिट ग्रोथ पुढील काही वर्षात कायम राहण्याची शक्यता आहे. ही एक स्माल कॅप कंपनी आहे. आता कोरोनाची भीती थोडी कमी झाल्यामुळे या कंपनीच्या उत्पादनाला मागणी येत आहे. सरकारही मत्स्यपालनासाठी उत्तेजन देत आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४६९७३ NSE निर्देशांक निफ्टी १३७४९ बँक निफ्टी ३०४०२ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २३ डिसेंबर २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २३ डिसेंबर २०२०

आज क्रूड US $ ४९.२९ प्रती बॅरल ते US $ ४९.९१ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=७३.८० ते US $१= Rs ७३.९० या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९०.५८ VIX २१.९८ आणि PCR १.५४ होते.

आज सोने आणि चांदी त्याप्रमाणेच क्रुडमध्ये मंदी होती. विविध देशात जाहीर होणारे लॉकडाऊन यामुळे मागणी कमी होत आहे.

USA मध्ये US $ ९०० बिलियनचे पँकेज मंजूर झाले. पण त्याची अंमलबजावणी होण्यामध्ये उशीर होत आहे. कारण हे पॅकेज कमी आहे असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे पण हे पॅकेज पुरेसे नाही यावर सगळ्यांचे एकमत झाले. त्यामुळे USA चे भावी प्रेसिडेंट बिडेन यांनी सांगितले की सरकार आणखी एक रिलीफ पॅकेज द्यायचा विचार करत आहे. फायझर, BIONTECH, आणि मॉडर्ना या व्हॅक्सिन बनवणाऱ्या कंपन्यांनी सांगितले की आम्ही बनवलेली व्हॅक्सीन्स कोरोनाच्या नवीन स्ट्रेन वरही उपायकारक ठरू शकतील.

इन्फोसिसने DAILMER या कंपनीबरोबर US $ ३२५ कोटींचा ऑटो आणि इन्फ्राचे ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी करार केला. इन्फोसिस DAILMER च्या कर्मचाऱ्यांचा या कामासाठी उपयोग करेल. या बातमीमुळे इन्फोसिसच्या शेअरमध्ये लक्षणीय तेजी आली.

विप्रो या कंपनीने METRO AG या जर्मन कंपनीबरोबर US$ ७० कोटींचा करार केला. विप्रो या कंपनीचा शेअर बायबॅक Rs ४०० प्रती शेअर या भावाने २९ डिसेंबर २०२० रोजी ओपन होऊन ११ जानेवारी २०२१ ला बंद होईल. विप्रो यासाठी Rs ९५०० कोटी खर्च करेल. आज विप्रोच्या शेअरमध्ये तेजी होती.

ज्युबिलण्ट फूड्स या कंपनीने पूर्ण शाकाहारी पण मांसाहारी चवीचा वाटणारा नवीन प्रोटीनबेस्ड पिझ्झा मार्केटमध्ये आणला. त्यामुळे आज या शेअरमध्ये तेजी होती.

LIC ने PNB च्या QIP मध्ये शेअर्स खरेदी करूंन PNB मधील आपली गुंतवणूक वाढवली.

टाटा मोटर्सकडून BRIGHTON JLR चा बिझिनेस US $ २.३२ कोटींना ऑटो स्पोर्ट्स ग्रुप खरेदी करेल. या बातमीनंतर टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये तेजी आली.

सरकार DTH सर्व्हिसेससाठी नवीन गाईडलाईन्स जाहीर करणार आहे. याचा फायदा दिश टीव्ही GTPL हाथवे, हाथवे, आणि सन टी ही यांना होईल.

CAIRN या कंपनीला आंतरराष्ट्रीय कोर्टाने आर्बिट्रेशनमध्ये रेट्रो टॅक्स संबंधात वेदांताच्या बाजूने निकाल दिला. आता वेदांताला भारत सरकारकडून US $ १८० कोटींची नुकसानभरपाई मिळेल.

इमामीच्या वापी आणि MASAT या प्लांट्सना WHO (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) ने GMP ( गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस) सर्टिफिकेशन दिले. तसेच इमामीच्या ‘झंडू’ या ब्रॅण्डखालील ४० आयुर्वेदिक औषधांना COPP (सर्टिफिकेट ऑफ फार्मास्युटिकल प्रॉडक्ट) स्टॅटस दिला. यासाठी सुपीरियर क्वालिटी, सेफटी, आणि EFFICACY यांचा विचार केला जातो. या मुळे कंपनीच्या शेअरमध्ये तेजी आली.

ग्रासिम या कंपनीला ITAT ( इनकम टॅक्स अपीलेट ट्रायब्युनल)ने काही रिलीफ दिला. AB नुवो आणि AB कॅपिटलच्या मर्जर संबंधात Rs ३७८६ कोटींची मागणी केलेली होती.आणि ही रक्कम ताबडतोब भरावी लागेल असे सांगितले होते. टॅक्स वसुलीसाठी किमान १ आठवड्याचा वेळ द्यावा लागेल असे सांगितले. ही बातमी येताच ग्रासिमच्या शेअरमध्ये तेजी आली.
EIL ( इंजिनीअर्स इंडिया लिमिटेड) या कंपनीच्या Rs ८४ प्रती शेअर या भावाने ६.९८ कोटी शेअर्स ( ११.०६% स्टेक) च्या बायबॅकसाठी शेअर होल्डर्सनी मंजुरी दिली.

हिंदुस्थान फूड्स ही कंपनी उत्तर भारतात Rs १२५ कोटींची गुंतवणूक करून फूड आणि बिव्हरेजीस उत्पादन करणारे युनिट लाँच करणार आहे.

कार्बन ब्लॅक वर ५ वर्षांकरता अँटी डम्पिंग ड्युटी बसवण्याचा प्रस्ताव केला आहे. याचा फायदा REIN इंडस्ट्रीज. फिलिप्स ब्लॅक कार्बन,गोवा कार्बन या कंपन्यांना होईल.

PHENOL वर अँटी डम्पिंग ड्युटी लावण्याचा DGTR यांनी प्रस्ताव केला आहे. याचा फायदा दीपक नायट्रेट या कंपनीला होईल.

धामापूर शुगर ने सांगितले की असमोली प्लांटची क्षमता १ लाख LPD वाढवणार आहे.

फर्स्ट सोर्स सोल्युशन या कंपनीने ‘PATIENT MATTERS’ या हेल्थकेअर रेव्हेन्यू सायकल सोल्युशन प्रोव्हायडर कंपनीचे अधिग्रहण केले. यामुळे कंपनी च्या शेअरमध्ये तेजी आली.

टाटा कन्झ्युमर या टाटा ग्रुपच्या कंपनीचा निफ्टीमध्ये समावेश होण्याची शक्यता आहे.

आज मी तुम्हाला IRCON या रेल्वेशी आणि अंदाजपत्रकाशी संबंधित कंपनीचा चार्ट देत आहे. या चार्टमधे मॉर्निंग स्टार पॅटर्न तयार झाला आहे. हा पॅटर्न बर्याच कालच्या मंदी नंतर येणाऱ्या तेजीची चाहूल देतो. ही कंपनी रेल्वेज आणी हायवेजच्या कॉम्प्लेक्स आणि सोफिस्टिकेटेड EPC ( इंजिनिअरिंग प्राक्युअरमेंट आणि कन्स्ट्रक्शन) चे काम करते. या शेअरचा IPO Rs ४७० ते Rs ४७५ या दरम्यान आला होता. या शेअरमध्ये डाऊनसाइड लिमिटेड आहे आणि अप साईड खूप आहे. ५२ वीक LOW Rs ५८ तर ५२ वीक हाय Rs ११८ होता.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४६४४४ NSE निर्दशांक निफ्टी १३६०१ बँक निफ्टी २९८८३ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २२ डिसेंबर २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २२ डिसेंबर २०२०

आज क्रूड US $ ४९.६२ प्रती बॅरल ते US $ ५०.७१ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=७३.८३ ते US $१= Rs ७३.९४ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९०.२८ VIX २४.४० आणि PCR १.१० होते.

UK मध्ये तयार झालेल्या नवीन कोरोनाच्या बातमीमूळे जगातील बहुसंख्य मार्केट्स काल मंदीत होती . WHO ने सांगितले की नवीन प्रकारचा कोरोना विकसित होत असला तरी जी व्हॅक्सीन्स तयार केली आहेत ती नवीन कोरोनावर ही परिणामकारक ठरतील . UK मधील शास्त्रद्न्यांनी असे सानितले की मेथड ऑफ अटॅक बदलली की मेथड ऑफ डिफेन्स बदलली जाते. सगळेच व्हायरस MUTATE होतात उदा फ्लू, व्हॅक्सिनमध्ये त्यानुसार वेळोवेळी बदल केले जातात यात वेगळे काही नाही त्यामुळे यात घाबरण्यासारखे काहीं नाही. त्यामुळे मार्केट पडण्याचा वेग कमी झाला दुपारी यूरोपमध्येही मार्केट्स तेजीत ओपन झाल्यामुळे मार्केटमध्ये तेजी पुन्हा परतली

BSE ने BEAM AGRI-E-SPOT PLATFORM लाँच केला. या प्लॅटफॉर्मवरून ऍग्री कमोडिटीजमध्ये स्पॉट ट्रेडिंग होईल. या प्लॅटफॉर्मवर क्वालिटी सर्टिफिकेशन, फायनान्स आणि स्टोअरेज या सोयी उपलब्ध असतील . शेतकऱ्यांना या प्लॅटफॉर्मवर मोफत ट्रेडिंग सुविधा दिली जाईल. त्यामुळे BSE च्या शेअरमध्ये तेजी आली.

ICRAने JSPL या कंपनीचे रेटिंग वाढवून BBB +केले.

सेरा सॅनिटरीवेअरच्या मेहसाणा युनिटमध्ये पुन्हा काम सुरू झाले . कंपनीने त्यांच्या वेतनरचनेत कोणताही फरक केला नाही.

IDBI बँकेतील सरकारचा स्टेक विकण्यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी आवश्यक आहे.

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची डायव्हेस्टमेन्ट येत्या एप्रिलमध्ये होईल.

मजेस्को या कंपनीने Rs ९७४ लाभांश जाहीर केला. उद्या या लाभांशाची एक्स डेट आहे. लोकांना भीती वाटत होती की जर ह्या शेअरची आजची क्लोजिंग CMP Rs ९७४ च्यापेक्षा कमी झाली तर एक्सडेटच्या दिवशी CMP निगेटिव्ह होईल का ? . आज स्टॉक एक्सचेंजीस नी स्पष्ट केले की Rs ५ ( ही शेअरची दर्शनी किंमत आहे) या शेअर किमतीवर हा शेअर ट्रेड होईल. आज या शेअरचा क्लोज भाव Rs ९८५ आहे. Rs ९७४ लाभांश वजा जाता Rs ११ चा भाव एक्सडिव्हिडंड असेल.
दिल्ली सरकारनी सांगितले की प्रदूषण कमी करण्यासाठी ३१ जानेवारी २०२१ पासून दिल्लीतील सर्व उद्योगांनी PNG चा वापर केला पाहिजे. यामुळे IGL ला फायदा होईल.

टाटा मोटर्सनी सांगितले की १ जानेवारी २०२१ पासून कंपनी कमर्शियल वाहनांच्या किमतीत वाढ करणार आहे.

WENDT या कंपनीची OFS ४.७४% स्टेक साठी फ्लोअर प्राईस Rs २२००/- वर २२ डिसेम्बरला नॉनरिटेल गुंतवणूकदारांसाठी आणि २३ डिसेंबर २०२१ रोजी रिटेल गुंतवणूकदारांसाठी ओपन असेल. या शेअरची ५२ वीक हाय Rs ४२५७ आणि LOW Rs १५९० आहे. कालची क्लोजिंग प्राईस Rs ३१३५ होती.विक्री करण्यासाठी असलेल्या शेअर्सची ट्रान्स्फर करण्यात उशीर झाल्यामुळे CORBORUNDUM UNIVERSAL आणि WENDT GmBH या प्रमोटर्सनी OFS WITHDRAW केली.

VALIANT ऑर्गनिक्स ने १:१ बोनस १३ नोव्हेंबर २०२० ला जाहीर केला होता. त्याची रेकॉर्ड डेट २८ डिसेंबर २०२० ही आहे.आणि एक्स डेट २४ डिसेंबर २०२० आहे CHLORINATION, AMMONOLYSIS, ACETYLATION, HYDROGENATION METHOXYLATION बेस्ड स्पेशालिटी प्रॉडक्टस चे उत्पादन करते.

सेबीने प्रभात डेअरीच्या डीलीस्टिंग साठी आणखी ६ महिन्यांची मुदत दिली.

कोरोनासाठी घातलेल्या निर्बंधांमुळे पर्यटनामध्ये घट आणि ख्रिसमस साध्या आणि छोट्या प्रमाणात साजरा होईल. याचा परिणाम हॉटेल इंडस्ट्री आणि पर्यटन उद्योगावर होईल.

SCI मधील सरकारनी स्टेक विक्रीसाठी १३ फेब्रुवारी २०२१ पर्यंत EOI मागवली आहेत.

उद्या RBI Rs १०००० कोटींचे OMO करेल.

NIIT २४ डिसेंबर २०२० रोजी शेअर बायबॅक वर विचार करेल.

भारती इंफ्राटेल या कंपनीचे नाव बदलून आता इंडस टॉवर असे झाले आहे . स्टॉक एक्सचेंजीसवर हा बदल केला आहे.
बिर्लासॉफ्ट या कंपनीच्या शेअर्समध्ये ६७ लाख शेअर्सची विक्री ACACIA II ने केली. म्हणून शेअर पडला होता पण INVHESTO, आदित्य बिर्ला, ICICI PRU यांनी प्रत्येकी २० लाख आणि ऍव्हेंडर्स नी उरलेले शेअर्स घेतले हे समजताच शेअरमध्ये तेजी आली

मी तुम्हाला ITDC या कंपनीचा आजचा चार्ट देत आहे. ITDC च्या या चार्टमध्ये व्हॉल्युम वाढलेले दिसत आहेत. डिलिव्हरी व्हॉल्युम चांगले आहेत. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची डायव्हेस्टमेन्ट होत आहे असे दिसून आल्यावर आता ITDC ची डायव्हेस्टमेन्ट लवकरच होईल अशी शक्यता वाटल्यामुळे ITDC च्या शेअरमध्ये तेजी आली.हा शेअर सगळ्या मूव्हिंग ऍव्हरेजीसच्यावर ट्रेडिंग करत आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४६००६ NSE निर्देशांक निफ्टी १३४६६ बँक निफ्टी २९६२५ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २१ डिसेंबर २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २१ डिसेंबर २०२०

आज क्रूड US $ ४९.७३ प्रती बॅरल ते US $ ५०.६७ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७३.६६ ते US $१=Rs ७३.७८ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९०.४२ तर VIX १८.६२ ते २३.४६ या दरम्यान तर PCR १.६४ होते. आज मार्केट किती वोलटाइल होते याची विक्सच्या रेंजवरून कल्पना येईल.

UK मध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नवीन व्हरायन्टच्या बातमीमुळे मार्केट भयचकित झाले. हे व्हरायन्ट जास्त संसर्गजन्य आहे आणि त्याचा प्रादुर्भाव फार वेगाने होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. एक वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर शोधलेली व्हॅक्सीन्स नवीन व्हरायन्टवर प्रभावी होईल का ? अशी शंका उपस्थित केली जात आहे. त्यामुळे UK मधून येणाऱ्या प्रवाशांच्या वाहतुकीवर ऑस्ट्रिया,जर्मनी, बेल्जीयम, फ्रान्स, USA या देशांनी बंदी घातली.भारतातही UK मधून येणाऱ्या प्रवाशांवर कडक निर्बंध लावले गेले आहेत. USA मधेही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोच आहे. त्यात आर्थिक डेटा खराब आला.त्यामुळे US$ ९०० बिलियनचे रिलीफ पॅकेज मंजूर होऊनही USA चे मार्केट सावरू शकले नाही. त्यामुळे मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रॉफिट बुकिंग झाले.या बरोबरच जपानमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.

नेहेमी २५ डिसेंबरच्या आसपास मार्केट मंदीत असतात.कारण युरोप, USA या आणि इतर ठिकाणी सुट्टी असते. सणासुदीचे दिवस असल्यामुळे म्युच्युअल फंडाकडेही रिडम्प्शनसाठी मागणी असते. त्यामुळे परदेशी तसेच डोमेस्टिक संस्थागत गुंतवणूकदार मार्केटमध्ये हजर नसतात. परिणामी मार्केटमध्ये व्हॉल्युम्स कमी असतात. त्यातून मार्केट ऑलटाइम हाय लेव्हलवर चालले होते. चारी बाजूनी रिलीफ पॅकेजेस आणि लिक्विडिटीचा ओघ चालू असल्यामुळे नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करून मार्केटची घोडदौड चालू होती. मार्केट वारंवार १३७५० ला स्पर्श करून पाठीमागे येत होते. आता हा रेझिस्टन्स पार होत नाही असे समजल्यावर फार मोठ्या प्रमाणावर प्रॉफिट बुकिंग झाले.

आज KG D-६ क्षेत्रातून RIL ने BP बरोबर गॅसचे उत्पादन सुरु केले. हे उत्पादन १२.९ MMSCMD एवढे होईल. यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या उत्पन्नात ३% वाढ होईल आणि कॅशफ्लो वाढेल. त्यामुळे रिलायन्स च्या शेअरमध्ये तेजी होती.
शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियातील सरकारच्या स्टेक विक्री साठी लवकरच सरकार EOI मागवेल.

सरकारने PSU ना मार्केट कॅप वाढवायला सांगितले. २०२१-२०२२ साठी डिव्हिडंड पेआऊट वाढवायला सांगितला. तसेच नॉनकोअर ऍसेट्सचे मोनेटायझेश करायला सांगितले.

LIC ने एक्झाईड मधील आपला स्टेक ३.४८% वरून ५.५% पर्यंत वाढवला

PVR इक्विटी रूटने Rs ८०० कोटी भांडवल उभारणी करेल.

सरकारने USA मध्ये ८४२४ MT RAW शुगर कमी टॅरीफमध्ये ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत निर्यात करायला मंजुरी दिली.
झोमॅटो मध्ये ४ निवेशकांकडून US $ २५.३४ कोटी गुंतवणूक आली. यात इन्फोएज चा स्टेक असल्यामुळे इन्फोएज मध्ये तेजी आली.

सरकारने BSNL आणि MTNL या कंपन्यांचे पुनरुज्जीवन करण्यावर विचार चालू आहे असे सांगितले.ही बातमी समजताच एवढ्या मंदीच्या मार्केटमध्येही MTNLचा शेअर तेजीत होता.

ओबेराय रिअल्टीच्या सबसिडीअरीने मुंबईमध्ये एक हॉटेल Rs १०३० कोटींना खरेदी केले. त्यामुळे कंपनीच्या शेअरमध्ये तेजी आली.

कोलगेट ही कंपनी सातत्याने नवीन उत्पादने लाँच करत आहे . उदा वेदशक्ती माऊथ स्प्रे, शुगरफ्री टूथपेस्ट. इनकमही ६% ते ८% वाढेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कंपनीची बॅलन्स शीट मजबूत आहे.

ONGC च्या २४ परगण्यांमधील अशोकनगर-१ मधील ऑइलविहिरीत उत्पादन सुरु झाले .

WHOOPNC मधील १/३ स्टेक इन्फोसिसने US $ १ कोटींना विकला. त्यामुळे या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी आली.
M & M ट्रक्टरच्या किमती १ जानेवारीपासून वाढवणार आहे.

आज NSDL मूळे पुन्हा एकदा मार्केट्मध्ये गोंधळ झाला. NSDL ने सांगितले की L & T या कंपनीचे ऑटोमॅटिक रुटने FPI लिमिट ४९% वरून ७५% केले आहे. या बातमीनंतर L & T मध्ये लक्षणीय तेजी आली. पण काही वेळाने L & T ने असा खुलासा केला की आमच्या FPI लिमिट मध्ये कोठलाही बदल झालेला नाही. या कंपनीच्या खुलाशानंतर कंपनीच्या शेअरमध्ये मंदी आली . या प्रसंगामुळे भारती एअरटेलच्या FPI लिमीटबद्दल झालेल्या गोंधळाची सगळ्यांना आठवण झाली.

L & T डिफेन्सला संरक्षण मंत्रालयाकडून ग्रीन चॅनेल हा स्टॅटस मिळाला.

आपण आपल्या चार्टच्या मालिकेमध्ये वेगवेगळ्या चार्ट्स चा अभ्यास करतो. आज मार्केटमध्ये मंदी आल्यामुळे ब्रेक डाऊन दाखवणारा ACC या सिमेंट क्षेत्रातील कंपनीचा डेली चार्ट मी देत आहे. सिमेंट क्षेत्रात कार्टलायझेशन होत आहे अशी शंका आल्यामुळे CCI ने तपासणी करायचे ठरवले होते. पण मार्केट जोरदार तेजीत असल्यामुळे या बातमीचा नकारात्मक परिणाम दिसला नाही. पण आज मंदीच्या मार्केटमध्ये शेअरमध्ये ब्रेकडाऊन दिसत आहे. हा शेअर इन्हेस्टमेन्टच्या गुणवत्तेचा आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४५५५३ NSE निर्देशांक निफ्टी १३३२८ बँक निफ्टी २९४५६ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – १८ डिसेंबर २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १८ डिसेंबर २०२०

आज क्रूड US $ ५१.३१ प्रती बॅरल ते US $ ५१.४० प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७३.५१ ते US $१= Rs ७३.५५ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ८९.९० VIX १८.९० तर PCR १.८७ होते.

USA आणि युरोप मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे निर्बंधही वाढत आहेत अर्थव्यवस्था पूर्णपणे वेगात सुरु व्हायला अडचणी येत आहेत. रिलीफ पॅकेज पुढच्या आठवड्यात येण्याची खात्री आहे. त्यामुळे सोन्यात आणि चांदीत तेजी येत आहे.त्यामुळे सोन्याच्या सिक्युरिटीवर फायनान्सिंग करणाऱ्या कंपन्यांचा फायदा होईल.

‘ACCENTURE’ चे निकाल चांगले आले. त्यांनी गायडन्सही वाढवला. यामुळे भारतीय IT कंपन्यांचे तिमाही निकाल चांगले येतील या अपेक्षेने IT क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्स मध्ये खरेदी झाली.

भारत गॅस रिसोर्सेसचे BPCL मध्ये मर्जर होईल.

भारत सरकारच्या ‘ डिफेन्स अक्विझिशन कौन्सिल’ ने AWCS (‘एअरबॉर्न वॉर्निंग & कंट्रोल सिस्टीम)’ आणि सुईसाईड ड्रोन, ऑफशोअर पॅट्रोल व्हेसल्स आणि मॉड्युलर ब्रिजेससाठी Rs २८००० कोटींच्या ऑर्डर्स दिल्या. या ऑर्डरपैकी Rs २७००० कोटींच्या ऑर्डर्स भारतीय कंपन्याना दिल्या जातील.यापैकी मॉड्युलर ब्रिजेस टिटाघर वॅगन्स करते आणि AWCS अपोलो मायक्रो सिस्टिम्स आणि ASTRA मायक्रो या कंपन्या करतात.

स्पाईस जेट ही कंपनी दरभंगापासून, दिल्ली मुंबई बंगलोर यांच्या बरोबरच हैदराबाद, अहमदाबाद, पुणे अशा ६ डोमेस्टिक फ्लाईट्स सुरु करणार आहे.आता स्पाईस जेटच्या एकूण १४० डोमेस्टिक फ्लाईट्स होतील.अहमदाबाद मध्ये सीप्लेन सेवा २७ डिसेम्बरपासून सुरु होतील. स्पाईस जेटचा मार्केटशेअर वरून १३.४% वरून १३.२% पण पॅसेंजर लोड फॅक्टर ७४% वरून ७७.७% झाला.

भारतातील हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची संख्या ५०.९% ने कमी झाली. इंडिगो चा मार्केट शेअर ५५.५% वरून ५३.९% झाला तर पॅसेंजर लोड फॅक्टर ६८.२ वरून ७४.०० झाला. एअर इंडियाचा मार्केट शेअर ९.४% वरून १०.३% झाला.

१ जानेवारी २०२१ पासून HDFC AMC, आरती इंडस्ट्रीज, लाल पाथ लॅब हे शेअर्स F & O सेगमेंटमध्ये समाविष्ट होतील तर कॅनरा बँक आणि PNB बाहेर पडतील.

गुजरात अल्कली, DCW, ग्रासिम यांनी केलेल्या तक्रारीवरून सरकार कॉस्टिक सोड्यावर अँटी डम्पिंग ड्युटी बसवण्याची शक्यता आहे. ही ड्युटी जपान, इराण, कतार, ओमान, या देशातून आयात होणाऱ्या कॉस्टिक सोड्यावर बसवली जाईल.
KNR कन्स्ट्रक्शन या कंपनीने १:१ बोनस जाहीर केला.

सूर्या रोशनीला IOC कडून ७२.६ कोटींची ऑर्डर मिळाली.

HUL आणि GSK हेल्थकेअर यांचे मर्जर झाले आहे. GSK हेल्थकेअर या कंपनीने ऑट्रिव्हिन या नावाने ‘NASAL DECONGESTANT’ लाँच केले.त्यामुळे HUL चा शेअर वाढला.

मी आज तुम्हाला DCW या कंपनीचा मंथली चार्ट पाठवत आहे. DCW ही कंपनी कॉस्टिक सोडा बनवते. त्यांनी गुजरात अल्कली आणि ग्रासिम यांच्या बरोबर कॉस्टिक सोड्यावर अँटीडम्पिंग ड्युटी बसवण्यासाठी अर्ज केला आहे या शेअरची बुक व्हॅल्यू Rs २५ आहे. टार्गेट Rs २७ ते Rs ३० आहे. जेव्हा हा शेअर पडत होता तेव्हा व्हॉल्युम कमी होते. या शेअरमध्ये बुलिश ट्रेंड आहे. शेअर ५० DMA च्यावर क्लोज झाला आहे. हा शेअर ट्रेडिंग कॅटेगरीमध्ये येतो. इन्व्हेस्टमेंट कॅटेगरीमध्ये नाही.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४६९६० NSE निर्देशांक निफ्टी १३७६० बँक निफ्टी ३०७१४ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – १७ डिसेंबर २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १७ डिसेंबर २०२०

आज क्रूड US $ ५१.२७ प्रती बॅरल ते US $ ५१.७२ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७३.४० ते US $१=Rs ७३.४८ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९०.१६ VIX १८.९४ PCR १.७४ होते.

फेडने दरांत कोणतेही बदल केले नाहीत. २०२३ पर्यंत व्याज दर ०.०० ते ०.२५% याच रेंजमध्ये असेल. २०२१ मध्ये GDP ग्रोथ रेट ४% वरून ४.२% राहील असे अनुमान केले. ह्या वर्षी बेकारी ६.७% राहील पुढील वर्षापर्यंत ५% एवढी असेल. दर महिन्याला US $ १२० बिलियन एवढी बॉण्ड खरेदी करत राहू. अर्थव्यवस्था पूर्वपदावर येईस्तोपर्यंत जरूर भासेल तसा लिक्विडीटीचा पुरवठा करत राहू. महागाईचे अनुमान १.२% राहील. कोरोनाच्या केसेस वाढत असल्यामुळे USA च्या काही राज्यात निर्बंध लागू होत आहेत. USA ट्रेजरी डिपार्टमेंटने त्यांच्या फॉरीन एक्स्चेंज रिपोर्टमध्ये करन्सी प्रॅक्टिसेस मॉनिटरिंग लिस्ट मध्ये भारतासकट चीन, जपान, जर्मनी, कोरिया, सिंगापूर, मलेशिया, थायलंड यांचा समावेश केला. जर्मनी, UK आणि इतर युरोपियन देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध लावले जात आहेत. जपानने रिअल GDP ग्रोथचे अनुमान ३.४% वरून ४% केले.

सोने आणि चांदी यामध्ये USA मध्ये येणाऱ्या US $ ९०० बिलियनच्या पॅकेजच्या अपेक्षेने आणि त्यामुळे वाढणाऱ्या महागाईत हेज करण्यासाठी तेजी आली. कॉपर, निकेल, झिंक यांच्यातही तेजी होती.

क्रूडचे भाव वाढत आहेत त्यामुळे ONGC, ऑइल इंडिया, MRPL, चेन्नई पेट्रो, मनाली पेट्रो, पनामा पेट्रो, तामिळनाडू पेट्रो, सदर्न पेट्रो यांना फायदा होईल.

सरकार टेक्सटाईल सेक्टरसाठी नॅशनल पॉलिसी आणणार आहे. टेक्सटाईल ही कॅपिटल इंटेन्सिव्ह सेक्टर असल्यामुळे या सेक्टरसाठी कॅपिटल सबसिडी दिली जाईल. इतरही काही सवलती दिल्या जातील . नॅशनल टेक्सटाईल फंड स्थापन करून त्यात सरकार सवलतींसाठी पैसे जमा करेल. सरकार फोकस प्रोडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह योजना लागू करेल आणि या योजनेचा आवाका वाढवेल. मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्कमध्ये सरकार Rs १०००० कोटींची गुंतवणूक करेल. येत्या ५ वर्षांत टेक्सटाईल उद्योगामध्ये चांगली ग्रोथ उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे. येत्या ५ वर्षांत निर्यातीमध्ये लक्षणीय वाढ करण्याचे लक्ष्य असेल. याचा फायदा लव्हेबल लिंगरी, बॉम्बे डाईंग, गोकुळदास एक्स्पोर्ट्स, AB फॅशन्स आणि रिटेल, डॉनीअर इंडस्ट्रीज, डॉलर इंडस्ट्रीज, मॉन्टेकार्लो, झोडियॅक क्लोदिंग यांना होईल.

ज्युबिलण्ट फुडने फाईन अँड कॅज्युअल डायनींग सेक्टरमध्ये ‘EKDUM’ बिर्याणी लाँच करून केला. ही कंपनी गुरुग्राममध्ये तीन रेस्टारंट चालू करेल.

NMDC चा शेअर बायबॅक १७ तारखेला ओपन होऊन ३१ डिसेम्बर २०२० ला बंद होईल.

HAL च्या Rs १५ प्रती शेअर आणि पॉवर ग्रीड च्या Rs ५ प्रती शेअरसाठीए आज एक्स डेट आहे.

IDFC आणि IDFC I st बँकेचे मर्जर होण्याची शक्यता आहे. IDFC च्या १ शेअरला IDFC I st बँकेचे १.४ शेअर मिळतील.
डुप्लिकेट आणि कमी गुणवत्तेच्या कॉस्मेटिक्सच्या आयात रोखण्यासाठी सरकारने आता कॉस्मेटिक्सच्या आयातीसाठी लायसेन्सची आणि BIS सर्टिफिकीटची अट केली आहे.

नवीन फ्ल्युओरीनच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी मल्टिपर्पज प्लांट लावण्यासाठी Rs १९५ कोटींच्या कॅपेक्सला मंजुरीने दिली.
अल्लाना ग्रुपने LT फुड्सचे १६.५० लाख शेअर्स खरेदी केले. त्यामुळे LT फुड्सच्या शेअरमध्ये तेजी आली.
नोमुरा सिंगापूरने CSB बँकेचे १५ लाख शेअर्स खरेदी केले.

हिरो मोटो त्यांच्या टू व्हिलर्स च्या किमती १ जानेवारी २०२१ पासून Rs १५०० ने वाढवले.

TCSचा बायबॅक १८ डिसेम्बरपासून सुरु होऊन १ जानेवारी २०२१पर्यंत ओपन राहील. कमी गुणवत्तेच्या आणि डुप्लिकेट कॉस्मेटिक्सची आयात रोखण्यासाठी सरकारने हे आयटेम्स आयात करण्यासाठी लायसेन्स लागेल आणि BIS सर्टिफिकेशन असल्याशिवाय ही आयात करता येणार नाही असा प्रस्ताव केला आहे.

प्रिंटिंग पेपरच्या किमतीत १५% तर क्राफ्ट पेपर आणि पॅकिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या पेपरच्या किमतीत ३०% वाढ झाली. ही किमतीतील वाढ १ जानेवारीपासून अमलात येईल. चीनमध्ये पेपरवर ड्युटी लावल्याने उत्पादन कमी होत आहे. ही बातमी आल्यावर सर्व पेपर उत्पादक शेअर्स मध्ये तेजी आली. उदा शेषशायी पेपर, इमामी पेपर, JK पेपर, मालू पेपर, star पेपर, रुचिरा पेपर, इंटरनशनल पेपर, ओरिएंट पेपर, ऍस्ट्रोन पेपर, QUANTUM पेपर, वेस्टकोस्ट पेपर ,NR अग्रवाल
१ ते १५ डिसेम्बर दरम्यान साखरेचे उत्पादन ४५.८ लाख टनांवरून ७३.८ लाख टन झाले. महाराष्ट्र, कर्नाटक UP मध्ये ४६० मिल्समध्ये चालू आहे. आतापर्यंत ३ लाख टन साखरेची निर्यात झाली.

L & T च्या हायड्रोकार्बन डिव्हिजनला HPCL च्या राजस्थानमधील रीफायनरीची Rs १३००० कोटींची ऑर्डर मिळाली

मी आज तुम्हाला मुरुडेश्वर सिरॅमिक्सचा चार्ट देत आहे. रिअल इस्टेट क्षेत्रात तेजी आली की रिअल इस्टेटसाठी ज्या गोष्टी लागतात त्याही शेअर्समध्ये तेजी येते. लाद्या किंवा टाईल्स शिवाय कोणतेही बांधकाम होत नाही. याच सेरॅमिक्सच्या क्षेत्रात ही कंपनी काम करते. या शेअरमध्ये आज प्राईस आणि व्हॉल्युम ब्रेक आउट झाला आहे. हा तीन महिन्याचा चार्ट आहे. ज्या ज्या ठिकाणी तेजी आहे त्या त्या ठिकाणी तुम्हाला वाढते व्हॉल्युम्स दिसत आहेत.

ऍडव्हान्स टॅक्स कलेक्शनमध्ये ४९% वाढ झाली. हे अर्थव्यवस्था सुधारण्याचे लक्षण आहे.

डिशमन कार्बोजेन ही कंपनी OFS रूट दवारा प्रमोटर्सचा ४.४% स्टेक Rs १४५.७० प्रती शेअर या भावाने विकणार आहे. या शेअरचा आजचा हाय Rs १६१ तर LOW Rs १५३ होता.

अडाणी गॅसने PNG च्या किंमती ३.९%ते ४.५%ने वाढवल्या.

MRS बेक्टर्स फूडचा IPO १९७ वेळा ओव्हरसब्सक्राइब झाला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४६८९० NSE निर्देशांक निफ्टी १३७४० बँक निफ्टी ३०८४७ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!