आजचं मार्केट – ३१ डिसेंबर २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ३१ डिसेंबर २०२०

आज क्रूड US $ ५१.४८ प्रती बॅरल ते US $ ५१.६६ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७३.०४ ते US $१=Rs ७३.०८ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ८९.६३ VIX २०.९० आणि PCR १.३७ होते.

हा आपला या वर्षातील शेवटचा ब्लॉग आहे. आपण वर्ष २०२० ला निरोप देऊन २०२१च्या स्वागताची तयारी करू या. तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा मार्केटने सुद्धा आज इंट्राडे ( निफ्टी) १४००० चा टप्पा पार करून तेजीची चुणूक दाखवली आहे.आणि निफ्टीच्या नव्या विक्रमाची नोंद केली.

आज USA आणि आशियातली मार्केट्स तेजीत होती. जपान आणि कोरियातली मार्केट बंद होती. सोने आणि चांदी यात मंदी होती.

आज UK आणि EU यांच्यातील ब्रेक्झिट करारावर दोन्ही पक्षांच्या सह्या झाल्या. त्यामुळे कराराशिवाय ब्रेक्झिट झाले तर काय होईल याविषयीची अनिश्चितता आणि काळजी कमी झाली.

UK ने अस्त्राझेनेका आणि ऑक्सफर्ड यांच्या व्हॅक्सिनला मंजुरी दिली आणि १ जानेवारी २०२१ पासून प्रायॉरीटी ग्रुप्सच्या लसीकरणाची सुरुवात होईल असे सांगितले.

सरकारने स्मॉल सेविंग योजनांवरील व्याजाचे दर जानेवारी २०२१ते मार्च २०२१ या तिमाहीसाठी बदलले नाहीत.
सरकारने चीन मध्ये उत्पादन केलेल्या किंवा चीनमधून आयात झालेल्या POLYTHYLENE TEREPHTALATE (PET रेझीन) वर US $ १५.५४ ते US $ २००.६६ प्रती मेट्रिक टन या दराने पांच वर्षांकरता अँटी डम्पिंग ड्युटी बसवण्यात येईल.असे सांगितले. पेट रेझीन हे टेक्सटाईल्स,प्लास्टिक बॉटल्स, टायर्स, अंडर सी केबल आणि ३ D-प्रिंटिंगमध्ये वापरण्यात येते. धूनसेरी पेट्रो आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांनी याबाबतीत तक्रार केली होती.

कोरियामधून आयात होणाऱ्या STYRENE BUTAADIEN रबरवर अँटिसबसिडी ड्युटी लावण्याची शक्यता आहे. याचा फायदा रिलायन्स इंडस्ट्रीजला होईल.

DGTR ने चीन आणि कोरियातून आयात होणाऱ्या VISCOSE SPUN यार्नवर अँटी डम्पिंग ड्युटी बसवण्याची शिफारस करून तसे नोटिफिकेशन जारी केले. या बाबत यार्न मॅन्युफॅक्चरिंग असोशिएशन ने तक्रार केली होती.

WOCKHARDT ही कंपनी त्यांच्या UK प्लांटमध्ये फील अँड फिनिश सेवा पुरवेल.

ITC येत्या १२ महिन्यात ९ नवीन WELCOMEHOTEL प्रॉपर्टीज लाँच करेल. हिमाचल प्रदेशातील सिमला येथे या ब्रॅण्डखालील पहिले हॉटेल सुरु केले. या हॉटेलमध्ये ४७ रूम्स असतील.

वेदांताला ओडिशामधील;राधिकापूर येथील कोळशाची खाण मिळाली.

आर्चिडप्लाय इंडस्ट्रीज ६ जानेवारी २०२१ रोजी होणाऱ्या बैठकीत शेअर बायबॅकवर विचार करील.

युनायटेड स्पिरिट्स चे रेटिंग AA + असे करून आऊटलूक पॉझिटिव्ह केला.

सरकारने FASTAG १ जानेवारीपासून अनिवार्य केला. पण आता ही मुदत १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत पुढें ढकलली.
व्हाट्सऍपचे अपग्रेडेशन झाल्यावर १जानेवारी २०२१ पासून ते काही जुन्या अँड्रॉइड आणि IOS स्मार्ट फोन्सवर उपलब्ध नसेल.

१ जानेवारीपासून बहुतेक ऑटो उत्पादक कंपन्यांनी माहिती दिल्याप्रमाणे टू व्हीलर आणि फोर व्हीलर गाड्यांच्या किमतीत वाढ होईल.

आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासावरील बंधने एव्हिएशन मंत्रालयाने ३१ जानेवारी २०२१ पर्यंत वाढवली.

आज वन टाइम रिस्ट्रक्चरिंग साठी उघडलेल्या विंडो चा शेवटचा दिवस. आतापर्यत बँकांकडे १.२२ लाख कोटीच्या रिस्ट्रक्चरिंग साठी अर्ज आले आहेत. कामथ रिपोर्टप्रमाणे औद्योगिक क्षेत्राला दिलेली Rs १५.५२ लाख कोटीची कर्ज कोरोनाच्या काळात प्रभावित झाली होती.

BHEL या कंपनीला Rs ३२०० कोटींची हायड्रो प्रोजेक्टसाठी ऑर्डर मिळाली.

HDFC AMC, DR लाल पाथ लॅब आणि आरती इंडस्ट्रीज १ जानेवारी २०२१ पासून F &O सेगमेंटमध्ये समाविष्ट होतील.
NSE ने निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस इंडेक्सवरील डेरिव्हेटीव्ह कॉन्ट्रॅक्ट ११ जानेवारी २०२१ पासून लाँच केले. या मध्ये २० कंपन्यांचा समावेश असेल. या इंडेक्समुळे फायनान्सियल मार्केट्सचा बिहेवियर आणि परफॉर्मन्स समजण्यास मदत होईल. यांच्यामध्ये बँका, फायनान्सियल इन्स्टिट्यूशन्स, हाऊसिंग फायनान्स कंपन्या, आणि इन्शुअरन्स आणि इतर फायनान्सियल सर्व्हिसेस कंपन्यांचा समावेश असेल. या डेरीव्हेटीव्ह्जची ४ सिरीयल वीकली काँट्रॅक्टस , थ्री सिरियल मंथली काँट्रॅक्टस ( यात चालु मंथली एक्स्पायरीचा समावेश नसेल. उपलब्ध असलेल्या डेटा फॉरीन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंटपैकी ४८% इन्व्हेस्टमेंट या सेक्टरमध्ये येती. निफ्टी ५० शी नवा इंडेक्स ९४% आणि बँक निफ्टीशिंदे ९८% संबंधीत आहे. आणि त्या खालीलप्रमाणे
(१) HDFC
(२) ICICI बँक
(३) REC
(४) श्री राम ट्रान्सपोर्ट
(५) ICICI लोम्बार्ड
(६) चोला इन्व्हेस्टमेंट फायनान्स
(७) M & M फायनान्स
(८) HDFC AMC
(९) HDFC बँक
(१०) SBI लाईफ
(११) HDFC लाईफ
(१२) ICICI प्रु
(१३) PFC
(१४) पिरामल
(१५) बजाज फिनसर्व
(१६) SBI
(१७) बजाज फायनान्स
(१८) ऍक्सिस बँक
(१९) बजाज होल्डिंग
(२०) कोटक महिंद्रा बँक

IDBI बँक IDBI फेडरल इन्शुअरन्समधील आपला स्टेक विकणार आहे.

गॅस, पॅकेजिंग मटेरियल आणि कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे आता टाईल्स मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आता सिरॅमिक्स आणी टाईल्स यांच्या किमती वाढवणार आहेत . याचा फायदा कजारिया सिरॅमिक्स, HR जॉन्सन, मुरुडेश्वर सिरॅमिक्स, एशियन ग्रॅनाईट यांना होईल.

१ जानेवारी २०२१ पासून रिलायन्स जियोने सांगितले की इतर नेट्वर्कवरील डोमेस्टिक कॉल्स फ्री झाले . आता रिलायन्स इतर नेट्वर्कवरील कॉलसाठी इंटर कनेक्ट युसेज चार्जेस घेणार नाही. याचा फायदा वोडाफोन आयडियाला होईल.
ज्युबिलण्ट फूड्स ही कंपनी BARBEQUE हॉस्पिटॅलिटी नेशनमध्ये १०.६% स्टेक Rs ६२ कोटींना खरेदी केले.
ऑइल इंडिया आसाम मध्ये ७५ तेलविहिरीसाठी प्रोजेक्ट सुरु करणार आहे या साठी Rs ३५०० कोटींची गुंतवणूक करेल.
आज मी तुम्हाला ISGEC हेवी इंजिनीअरिंग या BSE वर लिस्टेड असलेल्या कंपनीचा मंथली चार्ट पाठवत आहे. ही EPC क्षेत्रातील कंपनी असून तिचे ६४ % उत्पन्न EPC, ३०% हेवी मशिनरी आणि इक्विपमेंट उत्पादनातुन येते. Rs १४० कोटी नफा झाला. हा ११.५ P /E वर आहे. बुक व्हॅल्यू Rs २५९ आहे. प्रमोटर्सचा स्टेक ६२% आणि म्युच्युअल फंडांचा १०% स्टेक आहे. डिलिव्हरी व्हॉल्युम चांगले आहेत. ही कंपनी परदेशी कंपन्यांबरोबर जाईंट व्हेंचर करते. या कंपनीच्या शेअरचा हाय भाव Rs ८०० होता.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४७७५१ NSE निर्देशांक निफ्टी १३९८१ बँक निफ्टी ३१२६४ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

One thought on “आजचं मार्केट – ३१ डिसेंबर २०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.