Monthly Archives: January 2021

आजचं मार्केट –  २९ जानेवारी २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट –  २९ जानेवारी २०२१

आज क्रूड US $ ५५.३७ प्रती बॅरल ते US $ ५५.६४ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७२.९५ ते US $१= Rs ७३.०४ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९०.६८ VIX २४.२९ PCR १.२४ होते.

चीनने १०० अब्ज युआन बँकिंग सिस्टीम मध्ये टाकली. चीनमधून मेटल्ससाठी मागणी कमी झाली. त्यामुळे मेटल्सच्या शेअरमध्ये मंदी आली.

USA मध्ये लोक रिलीफ पॅकेजची वाट पाहात आहे. USA च्या अर्थव्यवस्थेचे आकडे मजबूत आले. USA मधील क्रूडचा साठा ९९ लाख बॅरेल्स एवढा कमी झाला.त्यामुळे क्रुडमध्ये माफक तेजी आली. सोने आणि चांदीमध्ये तेजी होती.
आरती इंडस्ट्रीज आपला केमिकल, फार्मा बिझिनेस वेगळा काढणार आहे.

ASTRAL POLY ही कंपनी पुढील महिन्यात बोनस देण्यासाठी ३ फेब्रुवारी रोजी विचार करणार आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये तुमच्याजवळ ४ शेअर्स असतील तर कंपनीने १ शेअर बोनस दिला आहे. ओरिसामध्ये भुवनेश्वर येथे विस्तार करत आहे.
टाटा स्टिल आणि SSAB यांच्यामधील IJMUDEN स्टील मिल्सच्या अक्विझिशनमध्ये टेक्निकल अडचणी आल्यामुळे या संबंधातील बोलणी फिस्कटली.

अतुल लिमिटेड या कंपनीने Rs ७२५० प्रती शेअर या दराने Rs ५० कोटींचा बायबॅक जाहीर केला. IRCTC ही कंपनी E कॅटरिंग सेवा चालू करणार आहे.

आज IRFC या कंपनीच्या शेअरचे BSE वर Rs २५ तर NSE वर Rs २४.८० वर लिस्टिंग झाले. हे शेअर्स IPO मध्ये Rs २६ प्रति शेअर या दराने दिले होते.

आज ल्युपिन, TVS मोटर्स, नेलको, AU स्मॉल फायनान्स बँक, पीडिलाइट इंडस्ट्रीज, LG बाळकृष्ण, NGL फाईन केम, ब्ल्यू डार्ट,श्रीराम ट्रान्सपोर्ट, ओरिएंट सिमेंट चे निकाल चांगले आले.

DR रेड्डीज ही कंपनी तोट्यातून फायद्यात आली. प्रॉफिट Rs २० कोटी उत्पन्न Rs ४९४० कोटी आणि मार्जिन २४ % होते. कंपनीने Rs ५९७ कोटी इम्पेअरमेंट चार्जेस बुक केले. हे इम्पेअरमेंट चार्जीस बुक करण्याआधी कंपनीला एकूण Rs ८८२ कोटी प्रॉफिट झाले.

राणे इंजीन( तोट्यातून प्रॉफीटमध्ये आली), IOC (प्रॉफिट Rs ४९२० कोटी, उत्पन्न Rs १.०६ लाख कोटी, मार्जिन ९% होते. Rs ७.५० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.), मन्नापुरम फायनान्स, WOCKHARDT ( प्रॉफिट, उत्पन्न वाढले मार्जिन मात्र कमी झाले), सुब्रोस,LIC हौसिंग ( प्रॉफिट, उत्पन्न वाढले), सन फार्मा ( प्रॉफिट Rs १८५२.५० कोटी, उत्पन्न Rs ८८३७ कोटी, मार्जिन २७.२ % Rs ५.५० प्रती शेअर लाभांश), ब्ल्यू स्टार, एक्झाईड, डाबर ( व्हॉल्युम ग्रोथ चांगली), सुदर्शन केमिकल्स,अतुल लिमिटेड ( प्रॉफिट ११% ने वाढले, मार्जिन वाढले) यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
इंडिगो, युनायटेड ब्रुअरीज, जस्ट डायल यांचे निकाल सर्व साधारण होते.

आज पासून संसदेचे अंदाजपत्रकीय अधिवेशन सुरु झाले. अर्थमंत्र्यांनी आज संसदेच्या पटलावर इकॉनॉमिक सर्व्हे ठेवला. FY २१ मध्ये GDP ग्रोथ -७.७% राहील. सर्व्हिसेस आणि मॅन्युफॅक्चरिंग मध्ये निगेटिव्ह ग्रोथ असेल. FY २२ मध्ये रिअल GDP ग्रोथ ११% तर नॉमिनल GDP ग्रोथ १५.४% असेल. हेल्थ आणि इंफ्रावर खर्च वाढवण्यात येईल. गुंतवणुकीत वाढ होईल अशी पावले उचलली जातील.

आज मी तुम्हाला HDFC बँकेचा चार्ट देत आहे. या शेअरने २० DEMA Rs १४४५, ५० DEMA Rs १४१९ तोडले. १०० DEMA च्या जवळ सपोर्ट घेतल्यावर हॅमर पॅटर्न तयार झाला. आणि शेअर Rs १३९० पर्यंत गेला.

आज मार्केटमध्ये खूपच वोलतालीटी होती. एकामागून एक तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले येत असूनही मार्केटने आपला मंदीचा ट्रेंड बदलला नाही. मार्केटची वेळ संपता संपता मार्केट पडले. या वेळच्या अंदाजपत्रकामध्ये काही अनपेक्षित गोष्टी असतील या अनिश्चिततेमुळे मार्केटने प्रॉफिट बुकिंग करून कॅशमध्ये राहणे पसंत केले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४६२८५ NSE निर्देशांक निफ्टी१३६३४ बँक निफ्टी ३०५६५ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट –  २८ जानेवारी २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट –  २८ जानेवारी २०२१

आज क्रूड US $ ५५.३८ प्रती बॅरल ते US $ ५५.६६ प्रति बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७३.०६ ते US $ १= Rs ७३.१४ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९०.६७ VIX २४.९० PCR ०.८९ होते.

बिडेन यांनी H १B व्हिसा होल्डर्सच्या वैवाहिक जोडीदाराला (SPOUSE) वर्क परमिट देण्याच्या बाबतीत दिलासा दिला.
फेडने आपल्या व्याज दरात कोणतेही बदल केले नाहीत. अर्थव्यवस्था पूर्णपणे पुनरुज्जीवित होईपर्यंत आम्ही लिक्विडिटीचा पुरवठा करत राहू असे सांगितले. USA मार्केट आज पडली कारण काही कॉर्पोरेट निकाल उदा बोईंग, टेसला, अपेक्षेप्रमाणे आले नाहीत. आणि मार्केट ओव्हर व्हॅल्यूड आहे असे वाटले. DOW जोन्स, NASHDAQ, S & P हे तिन्ही निर्देशांक मंदीत होते. एशियायी, युरोपियन मार्केट्सही मंदीत होती. सोने आणि चांदीत माफक मंदी आली.

काल निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये बेअरिश बेल्ट होल्ड पॅटर्न तयार झाला. ज्या प्राईसला मार्केट उघडले तोच कालचा हाय पाईंट झाला. कारण मार्केट ओपन झाल्यावर ते बंद होईपर्यंत पडत राहिले. अपर शॅडो किंवा लोअर शॅडो नाही.

आदित्य बिर्ला फॅशनने ‘सब्यसाची’ मध्ये ५०% स्टेक Rs ३९८ कोटींना घेतला.

केंद्र सरकारने नाट्यगृहे, एक्झिबिशन हॉल्स, सिनेमा थिएटर्स आदी पूर्ण क्षमतेने सुरु करायला परवानगी देण्याच्या बाबतीत राज्य सरकारांना अधिकार दिले. त्यामुळे आज PVR, इनॉक्स लेजर, मुक्ता आर्ट्स, सिनेलाईन, UFO मुव्हीज या शेअर्समध्ये तेजी होती.

स्टोव्ह क्राफ्टच्या IPO चा शेवटचा दिवस. आता पर्यंत हा IPO २.९३ पट भरला आहे.

रशिया चीन कोरियातुन आयात होणाऱ्या PTFE वरच्या अँटी डम्पिंग ड्युटीची मुदत ५ वर्षापर्यंत वाढवली आहे. या बाबतीत गुजरात फ्लुओरो या कंपनीने यासाठी तक्रार केली होती. या बाबतीत DGTR ने नोटिफिकेशन जारी केले.

अंदाजपत्रकात रेफ्रिजरेटर, ड्रायर यावरील इम्पोर्ट ड्युटी वाढवण्याची शक्यता आहे. याचा फायदा व्हर्लपूल, लिंडे इंडिया, अंबर एंटरप्रायझेस या कंपन्यांना फायदा होईल.

ऑइल इंडियाने त्रिपुरामध्ये ऑइल एक्स्प्लोरेशन, प्रॉडक्शन आणि सेइस्मिक सर्वे सुरु केले.

PVR ने Rs ८०० कोटींचा QIP लाँच केला.

हॅवेल्सने आंध्र प्रदेशातील ४५.५८ एकर्स जमीन Rs ३९ कोटींना लीजवर दिली.

अंदाजपत्रकात हेल्थ केअर इन्फ्रावर जोर असेल. विशेषतः टायर २, ३, ४ शहरात ५० बेड्सची हॉस्पिटल्स, आणि गावात २५ बेड्सची हॉस्पिटल्स सुरु करण्यासाठी गुंतवलेल्या भांडवलावर टॅक्सची सूट दिली जाईल. आता ही सूट १०० बेड्सच्या हॉस्पिटल्ससाठी आहे. IT क्षेत्रातील स्पेशल बीझिनेससाठी १००% सूट दिली जाण्याची शक्यता आहे .

भारती एअरटेलने 5G रेड़ी नेटवर्कची घोषणा केली. हैदराबाद मध्ये त्यांनी १८०० MH बँड मध्ये ही सर्व्हिस लाँच केली. तसेच कंपनी सर्व बॅण्डमध्ये ही सर्व्हिस लाँच करण्यासाठी तयार असे सांगितली. त्यामुळे भारतीय एअरटेलचा शेअर वाढला.
टीमलीज, वेलस्पन कॉर्प, कलाहस्ती पाईप्स, गोवा कार्बन यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते. सुवेन लाईफ सायन्सेसचे निकाल ठीक होते.

एरिस लाईफसायन्सेस ( प्रॉफिट, उत्पन्न, मार्जिन वाढले ), कोलगेट ( प्रॉफिट Rs २४८ कोटी, उत्पन्न Rs १२३२.०० कोटी मार्जिन ३०.१%) रॅडिको खेतान, IDBI बँक ( तोट्यातून फायद्यात आली) , GHCL, ग्रनुअल्स, डाटामाटिक्स, GHCL, ROUTE मोबाइल, प्रिसम जॉन्सन नितीन स्पिनर्स, DB कॉर्प, NIPON लाईफ, युनायटेड स्पिरिट्स, या कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. कॉस्मो फिल्म्सने Rs २५ प्रती शेअर लाभांश जाहीर केला. VRL लॉजिस्टिक्स ही कंपनी ६ फेब्रुवारी २०२१ रोजी शेअर बायबॅकवर विचार करणार आहे

आज मारुती सुझुकीचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल आले..कंपनीचे प्रॉफिट २४% वाढून Rs १९४१ कोटी झाले. उत्पन्न १३% ने वाढून Rs २३४५८ कोटी झाले. ऑपरेटिंग मार्जिन १०.२% होते. कंपनीने ४.९५ लाख युनिट्स विकली. कंपनीची विक्री वाढलीय, कंपनीच्या कॉस्टमध्ये बचत झाली, पण कमोडिटी प्राइसेस वाढल्या आणि परदेशी चलनाची मुव्हमेंट प्रतिकूल असल्यामुळे प्रॉफिटवर परिणाम झाला. निकाल जाहीर झाल्यावर कंपनीचा शेअर १.९% पडला.
आजचे प्रॉफिट बुकिंग सर्व क्षेत्रात झाले. कंपन्यांचा निकाल चांगला आला तरी त्याही शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग झाले. आतापर्यंतच्या किमतीमध्ये सर्व सकारात्मक गोष्टी समाविष्ट असल्यामुळे आज प्रॉफिट बुकिंग झाले.

आज मी तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियाचा चार्ट देत आहे. हा शेअर गेले चार दिवस लोअर टॉप लोअर बॉटम करत आहे. ५० DMA तोडले. २७४ पासून बेस बनत आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४६८७४ NSE निर्देशांक निफ्टी १३८१७ बँक निफ्टी ३०३५८ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट –  २७ जानेवारी २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट –  २७ जानेवारी २०२१

आज क्रूड US $ ५६.१० प्रती बॅरल ते US $ ५६.४० प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $ १= Rs ७२.८० ते US $१=Rs ७२.८८ या दरम्यान तर US $ निर्देशांक ९०.३५ VIX २४.६९ आणि PCR १.०२ होते.

चीनमध्ये स्टीलचे उत्पादन खूप चांगले झाले आहे. चींन अर्थव्यवस्थेतून ७८ बिलियन युआन एवढी लिक्विडीटी कमी करणार आहे.

USA मध्ये पॅकेजला मंजुरी मिळाली आहे. पण आता ते सिनेटमध्ये मंजूर व्हायला पाहिजे. सिनेटमध्ये रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट्सचे दोघांचेही ५०% सदस्य आहेत. त्यामुळे हे पॅकेज मंजूर करण्यासाठी व्हाईस प्रेसिडेंट कमला हॅरिस यांना मतदान करायला लागण्याची शक्यता आहे.

दावोसला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम चालू आहे. या फोरममध्ये उद्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करतील.
आज भारतीय मार्केटमध्ये अंदाजपत्रक हा मोठा इव्हेंट डोळ्यासमोर ठेवून तसेच उद्याची मासिक एक्स्पायरीजवळ असल्यामुळे DII आणि FII ने विक्री केली. त्यामुळे आज मार्केटमध्ये जबरदस्त प्रॉफिट बुकिंग झाले. IT सेक्टर आणि काही FMCG कंपन्यांचे शेअर्स वगळता सर्वच क्षेत्रात प्रॉफिट बुकिंग झाले.

सरकार लवकरच स्क्रॅपेज पॉलिसी जाहीर करेल. या पॉलिसीअंतर्गत ८ वर्षांपेक्षा जास्त जुन्या गाड्यांवर ग्रीन टॅक्स लावला जाईल. हा टॅक्स वाहन खरेदी करणाऱ्याला भरावा लागेल. १५ वर्षापेक्षा जुन्या गाड्या स्क्रॅप कराव्या लागतील.२००५ आणी २००६ मध्ये ज्या गाड्या विकल्या आहेत त्यांचा या पॉलिसीअंतर्गत समावेश होईल. या पॉलिसीचा फायदा मारुती, M & M, अशोक लेलँड या कंपन्यांना होईल. ही स्क्रॅपेज पॉलिसी १ एप्रिल २०२२ पासून लागू होईल. यामध्ये फारसे काही इन्सेन्टिव्ह दिलेला दिसत नाही. स्क्रॅपेज पॉलिसीचा परिणाम २ व्हीलर आणि पॅसेंजर व्हेईकलवर होणार नाही. श्रीराम ट्रान्सस्पोर्ट फायनान्स सारख्या जुन्या गाड्यांना लोन देणार्या कंपन्यांवर परिणाम होईल.

IMF ने भारताची GDP ग्रोथ ११.५१% होईल आणि भारतात खूप वेगाने प्रगती होईल असे अनुमान केले आहे.

राष्ट्रीय इस्पात निगम या PSU च्या प्रायव्हटायझेशन/ विनिवेशासाठी प्रायव्हटायझेशन पॉलिसी अंतर्गत विचार होईल.
सरकार नीलांचल इस्पात या कंपनीतून आपल्या स्टेकचा विनिवेश करणार आहे.सरकारने या विनिवेशासाठी EOI लाँच केली आहे. या कंपनीत MMTC चा ४९.३८% स्टेक आहे.

NALCO ही कंपनी Rs ५७.५० प्रती शेअर या भावाने १३.०३ कोटी शेअर्स बाय बॅक करेल. सरकारने कोप्रा ची M S P Rs १०३३५ कोटी प्रती QUINTAL जाहीर केली. यात सरकारने Rs ३७५ वाढ केली आहे. HDFC म्युच्युअल फंडाने ऑरोबिंदो फार्मामधील २.१% स्टेक विकला. पॉवर ग्रीड ही कंपनी US $ ११० कोटी चा INVIT IPO आणत आहे.

ज्योती लॅब्स ( प्रॉफिट Rs ५५.३ कोटी, उत्पन्न ४७६.६० कोटी) इंडिया सिमेंट ही कंपनी टर्नराउंड झाली ( प्रॉफिट Rs ६२ कोटी, उत्पन्न Rs ११६० कोटी) कॅनरा बँक ( प्रॉफिट ६९६.१० कोटी, NII ६०८१ कोटी, GNPA आणि NNPA कमी झाले.) H G इन्फ्रा, दिग्विजय सिमेंट (प्रॉफिट Rs १४ कोटी उत्पन्न Rs १४३ कोटी) इमामी ( प्रॉफिट Rs २०८ कोटी, उत्पन्न ९३३.६० कोटी ३६.४% मार्जिन Rs ४ अंतरिम लाभांश) SKM EGGS, थंगामाईल ज्युवेलरी, पॉलीमेडिक्युअर , मेरिको ( प्रॉफिट Rs ३१२ कोटी, उत्पन्न Rs २१२२ कोटी, डोमेस्टिक सेल्स ग्रोथ १५% ),वेलस्पन इंडिया, जयभारत मारुती, राणे मद्रास, ICICI प्रु, लक्षमी मशीन टूल्स या कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले

एक्सिस बँकेने आज आपले तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. प्रॉफिट Rs ११२२ कोटी, NII Rs ७३७३ कोटी तर NIM ३.५९ % राहिले. GNPA ४.१८% वरून ३.४४ % झाले तर नेट NPA ०.९८% वरून ०.७४% झाले.

आज HUL ने आपले तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीचे एकूण उत्पन्न २१% ने वाढून Rs ११८६२ कोटी झाले. कंपनीचे प्रॉफिट १९% ने वाढून Rs १९२१.०० कोटी झाले.कंपनीला वन टाइम लॉस Rs ४२ कोटी झाला. व्यवस्थापनाने सांगितले की आम्हाला शहरी क्षेत्रात मागणीचे पुनरुज्जीवन होईल असे वाटते आणि ग्रामीण क्षेत्रातील बीझिनेस चांगला होत राहील.ग्रामीण क्षेत्रात डबल डिजिट ग्रोथ झाली. कोविड केसेसमध्ये घट झाली, मोबिलिटी वाढली, आम्ही ग्राहकानुकूल जी इनोव्हेशन केली, आणि आमच्या मार्केटिंगमुळे आणि अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा झाल्यामूळे आमचा परफॉर्मन्स चांगला झाला. PSP प्रोजेक्ट्स, JK पेपर चे तिसर्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते. राईट्स या कंपनीला Rs ६१.२ कोटींची कंसल्टेशनसाठी ऑर्डर मिळाली.हिरोमोटो या कंपनीने मेक्सिको मध्ये GRUPO SALINAS बरोबर डिस्ट्रिब्युशनसाठी करार केला. कंपनीने मेक्सिकोमध्ये ऑपरेशन्स सुरु केली.

१४ फेब्रुवारीपासून तेजस ट्रेन चालू होणार आहेत.

मी आज तुम्हाला युनायटेड ब्रुअरीज या कंपनीचा चार्ट देत आहे. या शेअरने सोमवारी ब्रेकडाऊन दिला. Rs १२६३ वर होता. Rs १२२०चा लो होता. Rs ११८० ते Rs १२०० ला सपोर्ट घेत आहे. Rs १२२० या लोला टच करून पुन्हा तेजीची मूव्ह सुरु झाली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४७४०९ NSE निर्देशांक निफ्टी १३९६७ बँक निफ्टी ३०२८४ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट –  २५ जानेवारी २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट –  २५ जानेवारी २०२१

आज क्रूड US $ ५५.३७ प्रती बॅरल ते US $ ५५.७९ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७२.९२ ते US $१=Rs ७२.९५ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९०.२२ VIX २३.०८ PCR ०.६८ होता. आज रुपया मजबूत होता.

उद्यापासून फेडची दोन दिवसांची FOMC सुरु होईल. अर्थव्यवस्थेत किती लिक्विडीटी रिलीज करायची, किती कालपर्यंत करायची, आता अर्थव्यवस्थेत असलेली लिक्विडीटी पुरेशी आहे की अजून वाढत्या प्रमाणावर लिक्विडीटी रिलीज करणे आवश्यक आहे अशा प्रकारच्या प्रश्नांवर विचार विनिमय करून निर्णय घेतले जातील. फेडच्या नजीकच्या भविष्य विषयीच्या कॉमेंटरीवर सर्वांचे लक्ष असेल. कारण या लिक्विडिटीच्या आधारावर इमर्जिंग मार्केट्समधील तेजी आणि तेजीची मुदत अवलंबून आहे.

भारतीय मार्केट्समध्ये वर्षभरातील अंदाजपत्रकाचे सादरीकरण हा मोठा इव्हेण्ट ३ ट्रेडिंग सेशन दूर आहे. तसेच २८ जानेवारीला वर्षातील पहिली मासिक एक्स्पायरी असल्याने आज मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग झाले. मुख्यतः बँक निफ्टीमध्ये प्रॉफिट बुकिंग झाले. चीनमध्ये मेटल्सची मागणी थंडावल्यामुळे आज मेटल्स क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये मंदी होती.
सरकार अंदाजपत्रकात नॅशनल बँक फॉर इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंटची घोषणा करण्याची शक्यता आहे. ही बँक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सना अर्थपुरवठा करेल. या बँकेचे कॅपिटल Rs १ लाख कोटी असून सध्या तिचे पेड अप कॅपिटल Rs २०००० कोटी असेल. ही बँक टॅक्स फ्री बॉण्ड्स इशू करू शकेल. इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सना गॅरंटी देऊ शकेल. करात सवलत देऊ शकेल. या बँकेला रिझर्व्ह बँकेकडून थेट अर्थपुरवठा केला जाऊ शकेल. सरकार पेन्शन फंड्स, इन्शुअरन्स फंड्स, प्रॉव्हिडण्ट फंड्स यांना या बँकेच्या भांडवल उभारणीत सहभागी व्हायला सांगू शकते.

सरकार येत्या अंदाजपत्रकात R & D खर्चावर २००% सूट देण्याचा विचार करत आहे. ही योजना फार्मा, केमिक्लस, IT क्षेत्रातील कंपन्यांना लागू होईल. तसेच सरकार शेती आणि संबंधी उद्योग क्षेत्रात डायव्हर्सिफाइड ऍग्रीकल्चरचा प्रयोग करू इच्छिते. गहू तांदूळ आणि ऊस या पारंपारिक पिकांना भूजल अधिक लागते. त्याऐवजी सरकार जर शेतकऱ्यांनी कमी खर्चात होणारी आणि जास्त उत्पन्न देणारी पिके लावली तर सरकार हरियाणा राज्य सरकारच्या योजनेच्या धर्तीवर दर एकरी काही अर्थसहाय्य देईल. या योजनेचा फायदा मुख्यतः पंजाब हरयाणा आणि पश्चिम UP मधील शेतकऱयांना होईल.
केंद्र सरकारने GST कॉम्पेन्सेशनच्या अंतर्गत विविध राज्यांना Rs ६००० कोटी दिले.

आधार हाऊसिंग फायनान्स ह्या कंपनीने Rs ७३०० कोटींच्या IPO साठी SEBI कडे अर्ज सादर केला.

BPCL त्यांचा नूमालिगढ रिफायनरीमधील ६१.६५ % स्टेक ऑइल इंडियाला विकणार आहे. ऑइल इंडियाच्या या कंपनीत २०% तर आसाम राज्यसरकारचा १२.३५% स्टेक आहे.

टाटा मोटर्सने आपल्या विविध मॉडेल्सची किंमत Rs ३६००० पर्यंत वाढवली.

PNC इंफ्राटेक या कंपनीला UP राज्य सरकारकडून Rs २४७५ कोटींच्या ६ वॉटर सप्लाय प्रोजक्टससाठी LOA मिळाले. या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी आली.

तिसऱ्या तिमाहीचे चांगले निकाल येण्याची साखळी आज ही चालू राहिली. किर्लोस्कर फेरस, शारदा क्रॉपकेम, UCO बँक (लॉसमधून प्रॉफीटमध्ये आली. NPA माफक प्रमाणात कमी झाले, NII वाढले), अल्ट्राटेक सिमेंट, APL अपोलो ट्यूब्स ( प्रॉफिट Rs ७४ कोटींवरून Rs १३२ कोटी तर उत्पन्न Rs २११६ कोटींवरून Rs २६०१ कोटी ), आरती ड्रग्स या कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

कोटक महिंद्रा बँकेचे प्रॉफिट Rs १८५३.५० कोटी, NII ४००७.०० कोटी, GNPA २.२६% तर NNPA ०.५०% होते.
येस बँकेच्या व्यवस्थापनाने सांगितले की आम्ही Rs ८००० कोटींच्या लोनचे रिस्ट्रक्चरिंग करणार आहोत. तसेच दर महिन्याला १ लाख ग्राहक मिळवण्याचा आम्ही निश्चय केला आहे. करंट अकौंट्स आणी बचत आणि मुदत ठेवीच्या खात्यांमध्ये वाढ होत आहे.

सिम्फनीने सांगितले की कच्च्या मालाच्या किमतीत बचत, इनोव्हेशन, प्रोडक्ट मिक्स, आणि नवीन प्रोडक्ट लाँच केल्यामुळे आमचे मार्जिन कायम राखण्यात यशस्वी ठरलो. आमची ऑस्ट्रेलियातील सबसिडीअरी ‘CLIMATE ऑस्ट्रेलिया’ टर्नराउंड होईल. या सबसिडीअरीमार्फत आम्ही युरोपमध्ये ग्राहक मिळवू शकतो.

L & T चे नेट प्रॉफिट ५५% ने वाढून Rs २४६७ कोटी झाले. ऑर्डरबुक YOY ७६% ने वाढले. रेव्हेन्यू १.७८% ने कमी झाले.एकंदरीत निकाल चांगले आले. एक्सिस बँक, HUL, मेरिको यांचे बुधवारी तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर होतील.
ग्रासिम ही कंपनी डेकोरेटिव्ह पेंट्स बिझिनेस लाँच करणार आहेत. त्यासाठी Rs ५००० कोटींची गुंतवणूक करणार आहेत. एशियन पेंट्स ही डेकोरेटिव्ह पेन्ट्समधील आघाडीची कंपनी त्यांच्या मार्केटिंग नेटवर्क आणि प्रॉडक्ट्सच्या गुणवत्तेवर आघाडी टिकवून आहे.पण ग्रासिमजवळ भांडवलाची गुंतवणूक करण्यासाठी पैसा आणि त्यांच्या सिमेंट बिझिनेस साठी असलेले ट्रेडर्सचे नेटवर्क आहे पण त्यांना डेकोरेटिव्ह पेन्ट्सचा ब्रँड डेव्हलप करण्यासाठी वेळ लागेल. पण आता एशियन पेन्ट्सला थोडेसे व्हॅल्युएशनमध्ये आव्हान. येईल असे वाटते. एशियन पेंट्सचा शेअर एक वर्ष फॉरवर्ड PEच्या ५५ पट चालू आहे. रिलायन्स इंडस्ट्रीच्या ऑइल टू केमिकल डिव्हिजनचा रेव्हेन्यू तिसऱ्या तिमाहीत ३०% ने कमी झाला.

मी आज तुम्हाला एस्कॉर्टस या कंपनीचा इंट्राडे चार्ट देत आहे. एस्कॉर्टस ने १०० DMA तोडला. चार्टमध्ये हेड आणि शोल्डर ब्रेकडाऊन दिसत आहे. ऑटो क्षेत्रातील बहुसंख्य शेअर वाढत असताना हा शेअर मात्र वाढत नाही.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४८३४७ NSE निर्देशांक निफ्टी १४२३८ बँक निफ्टी ३११९८ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट –  २२ जानेवारी २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट –  २२ जानेवारी २०२१

आज क्रूड US $ ५५.२४ प्रती बॅरल ते US $ ५५.५६ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= ७२.९९ ते US $१=७३.०७ या दरम्यान US $ निर्देशांक ९०.२७ VIX २२.९८ PCR ०.८२ होता.

USA मध्ये ट्रेजरी यिल्ड वाढल्यामुळे तसेच US $ मजबूत झाल्यामुळे सोन्यात मंदी आली तर USA मध्ये रिलीफ पॅकेज येईल या अपेक्षेने सोने आणि चांदी याना सपोर्ट मिळाला. USA चा जॉबलेस क्लेम डाटा खराब आला. आज एशियन मार्केट्समध्ये मंदी होती.

साऊथ इंडियन बँकेचा तिसर्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक आले. मार्केटमध्ये करेक्शन ड्यू होते. अंदाजपत्रकाच्या इव्हेंटसाठी घेतलेल्या पोझिशन्स जशी अंदाजपत्रकाची तारीख जवळ येईल तशा सोडून दिल्या जातील.

गेल या कंपनीतील पाईपलाईन चा बिझिनेस वेगळा करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. आता फक्त CEE ( कमिटी ऑफ एस्टॅब्लिशमेंट एक्सपेंडिचर) ची परवानगी लागेल.ही नवीन कंपनी इंडिपेन्डन्ट ऑपरेटरचे काम करेल.गेल फक्त मार्केटींगचे काम करेल.

सरकार ज्या रिअल्टी किंवा इन्फ्रा प्रोजेक्ट्स इंसॉल्व्हंट म्हणून जाहीर झाल्या आहेत त्यांना स्टॅम्प ड्युटी आणि कॅपिटल गेन्स करामध्ये सवलत देण्याचा विचार करत आहे. कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाने अशा अर्थाचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठवला आहे.

२५ जानेवारी २०२१ ला स्टोव्ह क्राफ्ट या कंपनीचा Rs ४१२.६२ कोटींचा ( यात Rs ९५ कोटींचा फ्रेश इशू आणि ८२.५० लाख शेअर्ससाठी OFS असेल) ओपन होईल. ह्या IPO चा प्राईस बँड Rs ३८४ ते Rs ३८५ असून मिनिमम लॉट ३८ शेअर्सचा असेल. ही कंपनी किचन अप्लायन्सेस बनवते आनि PIGEON आणि GILMA या ब्रँडनेमने विकते तसेच ही कंपनी BLACK +DECKER या नावाने किचन सोल्युशन्स विकते. ही कंपनी दोन वर्षांपूर्वी प्रॉफीटमध्ये आली आहे. हा IPO ३४.५ P /E वर आला आहे.

HDFC बँकेने BRH WEALTH CREATORS संबंधात निवेदन दिले. इंडिया रेटिंगने स्ट्राइड्स फार्मा या कंपनीचे रेटिंग A+ केले.

जे के टायर्स या कंपनीचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल फारच चांगले आले. व्यवस्थापनाने सांगितले की आम्ही फिक्सड कॉस्ट कमी करण्यासाठी मार्च २०२० ते डिसेंबर २०२० या ९ महिन्यात Rs १००० कोटीं कर्ज कमी केले.या कंपनीच्या शेअर्समध्ये ऑक्शन झाले.

IEX, JK टायर्स, CYIENT , सुप्रीम पेट्रो, SRF, WENDT ( Rs १० लाभांश), रामकृष्ण फोर्जिंग,इंडियन बँक, गुजराथ अंबुजा, SBI लाईफ, मंगलम ऑर्गनिक्स, JSW स्टील. HDFC लाईफ यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. V मार्ट, बायोकॉन यांचे निकाल सर्वसाधारण आले.

RBI NBFC संबंधित डिस्कर्शन पेपर जाहीर करणार आहे.

सरकारने बल्क ड्रग्स आणि API ( एक्टीव्ह फार्मा इन्ग्रेडियंटस) यांचे भारतातील उत्पादन वाढवण्यासाठी ५ फार्मा प्रोजेक्ट्सना PLI स्कीम लागू केली. यामध्ये औरोबिंदो फार्माच्या Rs ३७६१ कोटी भांडवल गुंतवणूक असलेल्या ३ प्रोजेक्टचा समावेश असेल. ज्या चार स्टार्टींग मटेरियल्स आणि API साठी हे प्रोजेक्ट्स मंजूर केली ती सर्व सध्या पूर्णपणे आयात केली जातात. या बातमीनंतर औरोबिंदो फार्मा आणि सर्वसाधारण फार्मा सेक्टरमधील कंपन्यांमध्ये तेजी आली.

आज बँक निफ्टीचा चार्ट देत आहे. आज बँक नीफटीमध्ये लक्षणीय प्रॉफिट बुकिंग झाले. बँक निफ्टीला ३१५०० वर स

पोर्ट आहे ट्रेंड निगेटिव्ह झाला आहे. बँक निफ्टीचा चार्ट वीक झाला आहे. १८ जानेवारी २०२१ रोजी बेअरिश एंगलफिन्ग पॅटर्न तयार झाला आहे.आजच्या कँडलमुळे त्याचे कन्फर्मेशन झाले आहे. बँक निफ्टीमध्ये ३१००० पर्यंत ब्रेकडाऊन अपेक्षित आहे . साऊथ इंडियन बँकेचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल निराशाजनक होते.

आज रिलायन्स इंडस्ट्रीजचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले. RIL ला तिसऱ्या तिमाहीत Rs १३१०१ कोटी प्रॉफिट झाले आणि रेव्हेन्यू Rs १.२० लाख कोटी झाला. डिजिटल रेव्हेन्यू Rs २३६७८/- कोटी झाला. JIO ला Rs १८४९२ कोटी रेव्हेन्यू झाला, प्रॉफिट Rs ३४८९ कोटी झाले. ARPU Rs १५१/- झाला. एकूण सबस्क्रायबर्स ४१०.८० मिलियन झाले तरतिसऱ्या तिमाहीत २५.१० मिलियन सबस्क्रायबर्स वाढले. रिलायन्स रिटेल चा रेव्हेन्यू Rs ३३०१८ कोटी तर प्रॉफिट Rs ३०८७ कोटी झाले. मार्जिन ९.३% राहिले. मीडियाचा रेव्हेन्यू Rs १४२२ कोटी तर प्रॉफिट Rs ३२४ कोटी झाले. ऑइल टू केमिकल चा रेव्हेन्यू Rs ८३८३८ कोटी झाला. मार्च २०२० पासून रिलायन्स इंडस्ट्रीजने ५०००० कर्मचारी नेमले.

 

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४८८७८ NSE निर्देशांक निफ्टी१४३७१ बँक निफ्टी ३११६७ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट –  २१ जानेवारी २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट –  २१ जानेवारी २०२१

आज क्रूड US $ ५५.६५ प्रती बॅरल ते US $ ५५.९१ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७२.९६ ते US $१=Rs ७२.९९ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९०.२६ VIX २१.७५ PCR १.३६ होते.

आजपासून USA मध्ये बिडेन युग सुरु झाले. सामोपचार,समन्वय, सर्व समावेशक आणि एकोप्याने अडचणींशी मुकाबला करणे हे ध्येय असेल.

आज भारतीय मार्केटमध्ये सेन्सेक्सने इंट्राडे ५०००० चा टप्पा पार केला.सेन्सेक्स ५०००० झाला या आनंदावर सेरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीमुळे विरजण पडले आणि मार्केट पडायला सुरुवात झाली. बघता बघता तेजी नाहीशी होऊन मार्केट ४०० पाईंट मंदीत गेले. सेंसेक्सने आज हा एक महत्वाचा टप्पा पार केला. २०१९ मध्ये सेन्सेक्स ४०००० होते. २०२१ मध्ये ५०००० झाले. या तिमाहीचे आलेले कॉर्पोरेट निकाल पाहता आता अर्थव्यवस्था आणि मार्केट या मध्ये काहीतरी समन्वय आहे असे म्हणता येईल. आतापर्यंत आलेले तिसऱ्या तिमाहीचे सर्व निकाल एखादा अपवाद वगळता अतिशय चांगले आले आहेत.

HDFC ने ‘गुड होस्ट’ मधील त्यांचा २४.४८% स्टेक Rs २३२.८१ कोटींना विकण्यासाठी करार केला. ‘गुड होस्ट’ ही कंपनी विद्यार्थ्यांच्या राहण्याचे व्यवस्थापन करते.

सिमेन्सने ईलेक्ट्रीक व्हेइकल मॅन्युफॅक्चरिंगसाठी ओला बरोबर करार केला. भारतातील सर्वात जास्त प्रगत उत्पादन केंद्र Rs २४०० कोटी गुंतवणूक करून तामिळनाडू राज्यात होईल. हे स्कुटर उत्पादन करणारे सर्वात मोठे केंद्र असेल. १०००० लोकांना नोकऱ्या मिळतील. या युनिट मध्ये २ मिलियन स्कुटर्सचे उत्पादन होईल.

फ्लिप कार्टने A B फॅशन मध्ये स्टेक खरेदी करण्यासाठी CCI( कॉम्पिटिशन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) ची मंजूरी मिळाली. AB फॅशन ८% स्टेक फ्लिप कार्टला Rs १५०० कोटींना विकणार आहे

रिलायन्स आणि फ्युचर डीलला सेबीने मंजुरी दिली. पण अमेझॉनचे म्हणणे शेअरहोल्डर्सना अवगत करून देऊन त्यांची या डीलसाठी मंजुरी घ्यावी लागेल.

एक्सिस बँकेला मॅक्स लाईफ मध्ये स्टेक खरेदी करण्यासाठी मंजुरी मिळाली. त्यामुळे मॅक्स ग्रुपचे शेअर्स आज तेजीत होते.
NALCO ही कंपनी २७ जानेवारी २०२१ रोजी शेअर बायबॅक वर विचार करेल.

आवास फायनान्सियर्स, मान इंडस्ट्रीज, कजरिया सिरॅमिक्स ( Rs १० अंतरिम लाभांश) , इंडो काउंट, एशियन पेंट्स, बजाज ऑटो, JSPL ( कंपनी तोट्यातून फायद्यात आली.) SRF ( Rs १९ प्रती शेअर लाभांश) या कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

वेस्टलाइफ, ओरिएंट हॉटेल्स, यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.

इंडिया ऍसेट रिकव्हरी मॅनेजमेंट मधील १९.९% स्टेक HDFC च्या सबसिडीअरीने विकला.

बंधन बँकेचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल सर्व साधारण होते.

आज मी तुम्हाला बंधन बँकेचा चार्ट देत आहे . आज बंधन बँकेने १०,२०,५०,१०० DMA हेवी व्हॉल्यूमनी तोडले आणि हा शेअर वीक झाला. चार्ट मध्ये ब्रेकडाऊन दिसत आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४९६२४ NSE निर्देशांक निफ्टी १४५९० बँक निफ्टी ३२१८६ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट –  २० जानेवारी २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट –  २० जानेवारी २०२१

आज क्रूड US $ ५६.२० प्रती बॅरल ते US $ ५६.३१ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७३.०३ ते US $१=Rs ७३.१६ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९०.३७ VIX २२.४८ तर PCR १.३४ होते.

आज USA मध्ये बिडेन राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतील.एक नवा अध्याय चालू होईल. त्यांची धोरणे समजावून घ्यायला थोडा वेळ जाऊ द्यावा लागेल.उपराष्ट्राध्यक्ष म्हणून कमला हॅरिस शपथ घेतील.

आज मार्केटने आपला तेजीचा ट्रेंड चालू ठेवला. IT, ऑटो, टायर आणि टाटा ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी होती.कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीसाठी येणारे चांगले निकाल या तेजीत भर घालत होते. आज सेन्सेक्स कमाल स्तरावर होते. क्रूड आणि सोन्यामध्ये माफक तेजी होती.

USA आणि तुर्कस्थान मधून आयात होणाऱ्या सोडा ASH वर अँटी डम्पिंग ड्युटी लावली जाण्याची शक्यता आहे. DCW आणि GHCL या कंपन्यांनी ही मागणी केली होती.

ऑस्ट्रेलिया कॅनडा आणि युरोप मधून आयात होणाऱ्या न्यूज प्रिंट रोलवर अँटी डम्पिंग ड्युटी लावली जावी अशी शिफारस DGTR नी केली आहे. याचा फायदा इमामी पेपर, स्टार पेपर, इत्यादी पेपर उत्पादक कंपन्यांना होईल.

आज मारुतीने ‘जिमनी’ ( JIMNY) चे उत्पादन आणि आयात सुरु केली. १८४ युनिट्स ची पहिली शिपमेंट पेरू आणि कोलंबिया ला रवाना झाली.

LIC ने M & M मधील आपला स्टेक १०.५७% वरून ८.६% पर्यंत कमी केला.

L T फुड्सच्या सबसिडीअरीने नेदर्लंड्सच्या LEEV या कंपनीत ३०% स्टेक खरेदी केला.

टाटा कम्युनिकेशन मधील(विदेशसंचार निगम मध्ये असलेला) आपला २६.१२ % स्टेक सरकार OFSद्वारे आणि काही स्टेक टाटांना विकून टाकणार आहे. OFS साठी ३ फेब्रुवारी २०२१ पर्यंत बीड सबमिट होतील आणि ४ फेब्रुवारी २०२१ रोजी उघडल्या जातील. ही सर्व प्रक्रिया २० मार्चपर्यंत पुरी होईल. यातून सरकार Rs ८००० कोटी उभारेल अशी अपेक्षा आहे.
दिलीप बिल्डकॉन आणि IRB इन्फ्रा यांनी टोल कलेक्शनमध्ये चांगली वाढ होत आहे सांगितले. IRB इंफ्राने १०%(YOY) वाढ होईल असे सांगितले. दिलीप बिल्डकाँनने २०२५ पर्यंत आपले वार्षिक टोल कलेक्शनमध्ये लक्षणीय वाढ होईल असे सांगितले.

सरकार अंदाजपत्रकात इलेक्ट्रिक कार्सच्या आयातीवर इम्पोर्ट ड्युटी लावण्याची शक्यता आहे. त्यात CBU (कंप्लिटली बिल्ट अप) आणि SKD ( सेमी KNOCKED डाऊन) कार्सच्या आयातीचा समावेश असेल. ACBC मोटार ACBC चार्ज यांच्या आयातीवरही ड्युटी लावली जाईल. ह्याचा फायदा डोमेस्टिक इलेक्ट्रिक कार मॅन्युफॅक्चर्सना होईल.

RBI NBFC च्या वर्किंगसाठी गाईडलाईन्स जारी करणार आहे. त्यामुळे आता NBFC मध्ये व्हावी तशी खरेदी होत नाही. टर्म डिपॉझिट स्वीकारणाऱ्या आणि फक्त लोन देणाऱ्या असे NBFC चे वर्गीकरण केले जाते. कोणत्याही NBFC ला बचत आणि करंट खाते ओपन करण्याची परवानगी नाही. मार्केट या गाईडलाईन्सची उत्सुकतेने वाट पाहात आहे.

टाटा मेटॅलिक्सचे टाटा स्टील लॉन्ग प्रॉडक्टस मध्ये मर्जर होणार आहे. टाटा मेटॅलिक्सच्या १० शेअर्सना टाटा स्टील लॉन्ग प्रॉडक्टस चे १२ शेअर्स मिळतील . दोन्ही कंपन्यांचे प्लांट्स जवळ जवळ असल्याने ( जमशेदपूर आणि खरगपूर) सिनर्जी आणि कॉस्टसेविंग होईल. टाटा मेटॅलिक्सच्या व्यवस्थापनाने सांगितले की आमच्याकडे १८ महिन्याचे ऑर्डर बुक आहे. कोरोनाच्या काळात आमच्या स्टीलडक्ट पाईपच्या बिझिनेसमध्ये थोडी घट झाली होते. कारण हे पाईप्स वॉटर आणि सॅनिटेशन यांच्यात वापरले जातात. लॉकडाऊनमुळे सरकारच्या या प्रकारच्या कामात घट झाली.कंपनीचा तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

फेडरल बँक, सुंदरम फासनर्स ( Rs १२ प्रती शेअर लाभांश) फिलिप्स कार्बन ( Rs ७ प्रति शेअर लाभांश) हिंदुस्थान झिंक, हॅवेल्स, HDFC AMC, न्यू जेन सॉफ्टवेअर, स्टरलाईटटेक्नॉलॉजीज, बजाज फायनान्स , VST इंडस्ट्रीज या कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीत निकाल चांगले आले.

आज IRFC या कंपनीचा IPO पूर्णपणे भरला. तसेच इंडिगो पेन्ट्सचा IPO ही पहिल्या दिवशी पूर्णपणे भरला.

कोलगेट या कंपनीचा चार्ट देत आहे. लोअर टॉप आणि लोअर बॉटमचा पॅटर्न निगेट झाला आहे. ह्या शेअर्समधील करेक्शन थांबण्याची चिन्हे दिसत आहेत. या चार्टमधे बुलिश हरामी पॅटर्न तयार झाला आहे. एक आठवड्याच्या मंदी नंतर आधीच्या मंदीच्या कॅंडलमध्ये सामावणारी तेजीची कँडल तयार झाली आहे. हा पॅटर्न ट्रेंड रिव्हर्सल दाखवतो. मंदी संपून तेजी सुरु होईल असे हा पॅटर्न दाखवतो. ह्या पॅटर्नच्या कन्फर्मेशनसाठी पुढे तयार होणारी कँडल बघावी लागते

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४९७९२ NSE निर्देशांक निफ्टी १४६४४ आणि बँक निफ्टी ३२५४३ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट –  १९ जानेवारी २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट –  १९ जानेवारी २०२१

आज क्रूड US $ ५४.९९ प्रती बॅरल ते US $ ५५.३५ प्रती बॅरल या दरम्यान तर रूपया US $१= Rs ७३.१७ ते US $१=Rs ७३.२७ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९०.६६ VIX २४.४० आणि PCR १.१२ होते.

आज USA मधील मार्केट तेजीत होती. भारतीय मार्केटमध्ये आज ट्रेडर्स/ गुंतवणूकदारांचा आनंद द्विगुणीत झाला.. कारण भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाबरोबरचा चौथा कसोटी सामना आणि कसोटी सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर जिंकली. आणि भारतीय मार्केटने मंदीची मरगळ टाकून देऊन तेजीची शाल चढवली. त्यामुळे मार्केट्मधील तेजीची मजा काही न्यारीच झाली.

मार्केटमधील आजच्या तेजीत सातत्य होते. चीनचे GDP ग्रोथचे आकडे चांगले आले. जगातील जवळजवळ सर्व देशातील कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तेथील सरकारे रिलीफ पॅकेजिस जाहीर करत आहेत. त्यामुळे भारतात परदेशी गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचा प्रवाह सातत्याने येत आहे. हा लिक्विडिटीचा प्रवाह अजून काही महीने तरी चालू राहील अशी शक्यता आहे.मध्ये काही दिवस त्याच्या रकमेत बदल होऊ शकतो.लसीकरण चालू झाल्यामुळे गुंतवणूकदारांच्या मनातील भीती आणि अनिश्चितता हळू हळू दूर होत आहे.भारतातील कंपन्यांचे तिसर्या तिमाहीचे निकाल चांगले येत आहेत तसेच व्यवस्थापनाच्या गायडंसवरून आणि त्यांच्या मुलाखतीतून आता वाईट काळ मागे पडला आहे आणि भविष्य चांगले आहे असा विचार प्रवाह आढळतो. आता अंदाजपत्रकात जर काही मार्केटला पसंत न पडणाऱ्या गोष्टीचा समावेश झाला किंवा आताची शेअर्सची व्हॅल्युएशन इन्फ्लेएटेड आहे असे मार्केटला वाटले तर मात्र करेक्शन येण्याची शक्यता आहे. तसेच आता बजेटमध्ये काय असेल या उत्सुकतेपोटी मार्केटमध्ये खरेदी होत आहे, बजेटचा इव्हेंट झाल्यावर मार्केटमध्ये मंदी येण्याची शक्यता आहे.

आजपासून IRFC या कंपनीच्या IPOचा दुसरा दिवस. आज हा IPO पूर्णपणे भरला तर रिटेल कोटा १.२५ पट भरला.
उद्यापासून इंडिगो पेंट्स या डेकोरेटिव्ह पेंट्स क्षेत्रातील कंपनीचा Rs १००० कोटींचा IPO ओपन होऊन २२ तारखेला बंद होईल. या IPO चा प्राईस बँड १४८८ ते Rs १४९० असून मिनिमम लॉट १० शेअर्सचा आहे. ह्या कंपनीच्या बिझिनेसवर कोरोना काळादरम्यान किमान परिणाम झाला कारण या कंपनीचा बिझिनेस २७ छोट्या शहरातून विस्तारला आहे. त्यामुळे त्यांना मार्केटिंग आणि जाहिरात खर्च कमी येतो. कंपनी टिनटिन्ग (TINTING) मशीन आणि GYRO SHAKER क्षमतेचा विस्तार करणार आहे तसेच फ्लोअर पेंटिंग या क्षेत्रात पदार्पण करत आहे. कंपनी सतत नवीन प्रॉडक्ट्स लाँच करत असते. कंपनी IPO च्या प्रोसीड्समधून त्यांना सध्या असलेले कर्ज फेडणार असल्यामुळे DEBTफ्री होईल. कंपनीचे EBIT मार्जिन १८.५% आहे. ( पेंट्स इंडस्ट्रीमध्ये हे मार्जिन १७% च्या आसपास आहे). ROE २४% ते २७% आहे.
इंडिगो पेंट्सचा IPO येत असल्यामुळे पेंट्स उद्योगातील इतर कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती.

२१ जानेवारी २०२१ पासून होम फर्स्ट फायनान्स या होमलोन कंपनीचा IPO ओपन होऊन २५ जानेवारी २०२१ रोजी बंद होईल. हा इशू Rs ११५३.७२ कोटींचा असून यात फ्रेश इशू ऑफ शेअर्स Rs २६५ कोटींचा असून Rs ८८८.७२ कोटींची OFS असेल ( ट्रू नॉर्थ, GIC, BESSEMAR हे आपला ५०% स्टेक विकत आहेत).

प्राईस बँड Rs ५१७ ते ५१८ असून मिनिमम लॉट २८ शेअर्सचा आहे.ही कंपनी अफोर्डेबल होम क्षेत्रात गृह कर्ज देते.
L &T फायनान्स या कंपनीचा राईट्स इशू १ फेब्रुवारी २०२१ ला ओपन होऊन १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत ओपन राहील.हा इशू Rs ३००० कोटींचा असून कंपनी वर्तमान शेअरहोल्डर्सना Rs ६५ प्रती शेअर या भावाने त्यांच्या जवळ असलेल्या ७४ शेअर्ससाठी १७ राईट्स शेअर्स ऑफर करत आहे. या राईट्स इशूची रेकॉर्ड डेट २२ जानेवारी २०२१ आहे. कंपनीने स्पष्ट केले आहे की ५ किंवा यापेक्षा कमी शेअर्स असलेल्या शेअरहोल्डर्सना १ राइट्सची ऑफर केली जाईल.

गोवा कार्बन या कंपनीने त्यांच्या पारादीप येथील युनिटमध्ये काम सुरु केले.

बँक ऑफ महाराष्ट्र,हट्सन ऍग्रो, CSB बँक, अलेम्बिक फार्मा,गेटवे डिस्ट्रिपार्क, DCM श्रीराम, टाटा मेटॅलिक, यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. स्नोमॅन लॉजिस्टिक्स तोट्यातून फायद्यात आली.

एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया बरोबर अडानी एंटरप्रायझेस ने जयपूर तिरुवअनंतपूरम, गौहाती या विमातळांसाठी ५० वर्ष मुदतीचा कन्सेशन करार केला. लखनौ मंगलोर आणि अहमदाबाद हे विमानतळही अडानीना व्यवस्थापनासाठी दिले आहेत.

मारुती या ऑटो क्षेत्रातील कंपनीने त्यांच्या विविध मॉडेल्सच्या किमती Rs ५००० ते Rs ३००००च्या दरम्यान वाढवल्या.
टाटा सन्सनी टाटा केमिकल्समधला स्टेक २९.३९% वरून ३१.९०% पर्यंत वाढवला.

सरकारने टेलिकॉम इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्ससाठी प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह स्कीम जाहीर केली.त्यासाठी टेलिकॉम इक्विपमेंटचे ५ विभागात वर्गीकरण केले आहे. ५ वर्षांसाठी वाढलेल्या विक्रीवर ७% एवढी ही इन्सेन्टिव्ह दिली जाईल.
डिस्कव्हर इंडिया ही योजना सरकारने फार्मा उद्योगासाठी विशेषतः API फॉर्म्युलेशन्सचे उत्पादन करण्यासाठी जाहीर केली. या मध्ये करात सवलत,निर्यात वाढवणे, सबसिडी देणे याचा समावेश आहे.

सरकारने इनोव्हेशन पॉलिसी जाहीर केली . यात औषध क्षेत्रा नवीन औषधे शोधणे त्यासाठी संशोधन आणि विकास करणे यांचा समावेश आहे. सरकारच्या मंत्रालयातही R & D सेल स्थापन केला जाईल.

आज रिअल्टी क्षेत्रात तेजी होती. DLF चा शेअर ६ वर्षाच्या कमाल स्तरावर होता.

उद्या २१ जानेवारी २०२१ रोजी फेडरल बँक, हॅवेल्स, HDFC AMC, बजाज फायनान्स, तसेच L & T टेक आणि २२ जानेवारी रोजी एशियन पेंट्स आणि बजाज ऑटो आपले तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील.

आज माईंड ट्रीच्या व्यवस्थापनाने सांगितले की त्यांच्या ऑर्डर बुकने US $ १ बिलियनचा टप्पा पार केला आहे. आमच्या डील्सची रक्कम तसेच मुदत वाढते आहे. UK आणि युरोप मधून येणारे उत्पन्न वाढेल. आम्ही UK आनि यूरोप मध्ये गुंतवणूक करत आहे. आम्ही ऑटोमेशन डिजिटलायझेशन यावर फोकस करत आहोत. हेल्थकेअरमध्ये आता टेक्नॉलॉजीचे डिसरप्शन होत आहे आता हेल्थकेअर टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रातही आम्ही पदार्पण करीत आहोत. सध्या तरी हे प्राथमिक अवस्थेत असून आमची जुळवाजुळव चालू आहे. आमचे ऑपरेशनल मार्जिन २०+% असून ते सस्टेनेबल आहे. माइंडट्रीचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आल्यामुळे त्यांच्या शेअरमध्ये लक्षणीय तेजी होती.

आज मी तुम्हाला ओबेराय रिअल्टी या कंपनीचा चार्ट देत आहे. या चार्टमध्ये बर्याच दिवसांच्या मंदीनंतर मॉर्निंग स्टार हा पॅटर्न तयार झाल्याचे दिसत आहे. लोअर टॉप लोअर बॉटम हा ट्रेण्ड निगेट झाल्याचे दिसते. त्यामुळे आता यात ट्रेंड रिव्हर्सल होऊन तेजी सुरु होण्याची शक्यता दिसते . हा पॅटर्न तीन कॅण्डलनी तयार होतो. शेवटच्या तीन कँडल पहा यामध्ये मोठी पहिली कँडल मंदीची दुसरी कँडल मंदी कमी होत गेलेली आणि तिसरी कँडल मंदी संपून तेजी सुरु झाली असे दर्शवते. BSE निर्देशांक सेन्सेक्स ४९३९८ NSE निर्देशांक निफ्टी १४५२१ वर बँक निफ्टी ३२४२५ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट –  १८ जानेवारी २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट –  १८ जानेवारी २०२१

आज क्रूड US $ ५४.६५ प्रती बॅरल ते US $ ५४.८९ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७३.०७ ते Rs ७३.२८ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९०.७६ VIX २५.३४ आणी PCR १.१९ होते.

आज USA मधील मार्केट बंद होती.

चीनची चौथ्या तिमाहीसाठी GDP ग्रोथ २.६% (QOQ) आणि ६.५ % (YOY) होती. पण चीनमध्ये काही शहरात तसेच UK ,जर्मनी आणि यूरोपातील इतर काही देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे निर्बंध लावण्यात आले. तसेच US $ मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या आणि क्रूडच्या मागणीत घट झाली. त्यामुळे आज सोने आणि क्रूड मंदीत होते.

आज भारतीय मार्केटमध्ये तेजी आणि मंदीचा उनपावसासारखा खेळ चालू होता.

भारतातील सर्व शहरात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यामुळे महागाई वाढेल असे वाटले. नव्या वर्षाच्या पहिल्या १८ दिवसांत ५ वेळेला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे .

विक्स, मार्केटच्या वेळात सतत वाढत असल्यामुळे वोलतालीटी सतत वाढत होती. मार्केटच्या वेळात दोनदा मार्केट पडून वाढले आणि शेवटी पुन्हा पडले. या तेजी मंदीच्या लाटा ५०० ते ६०० पाईण्टच्या होत्या.

भारताची निर्यात वाढली पण आयात वाढल्यामुळे ट्रेड गॅप वाढली. सोन्याच्या आयातीत ८१% वाढ झाली.

वेदांताच्या दक्षिण आफ्रिकेमधील खाणीत काम सुरु झाले .

HDFC बँकेचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. प्रॉफिट ,डिपॉझिट आणि ऍडव्हान्सेस मध्ये चांगली वाढ झाले. NPA ची विक्री केल्यामुळे GNPA आणि NNPA कमी झाले. निकाल चांगले आल्यामुळे शेअरमध्ये लक्षणीय तेजी होती.

सरकार इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंगसाठी Rs १०००० कोटींची PLI योजना जाहीर करेल.

स्टार सिमेंटच्या पश्चिम बंगालमधील सिलिगुरी येथील ग्राइंडिंग युनिट सुरु झाले.

JBM ऑटो या कंपनीला दिल्ली ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटीकडून ७०० बसेसची ऑर्डर मिळाली.

आज IRFC चा IPO ओपन झाला. हा IPO २० जानेवारी २०२१ पर्यंत ओपन राहील.

वेंकीजनी सांगितले की ऑर्गनाईझ्ड पोल्ट्री सेक्टरमध्ये आता पर्यंत बर्ड फ्लू चा प्रभाव आढळला नाही. आमचे उत्पादन नेहेमीच्या स्तरावर चालू आहे. कंपनीच्या या निवेदनानंतर शेअरमध्ये थोडा वेळ तेजी आली.

दिल्लीमध्ये ATF च्या किमती Rs १५१२.३८ प्रती किलो लिटर एवढ्या वाढला. इंडिगोचा मार्केट शेअर ५३.०९% आणि

पॅसेंजर लोड ७१.५ तर स्पाईस जेटचा मार्केट शेअर १३% आणि पॅसेंजर लोड ७८% होते.

पिरामल इंटरप्रायझेस च्या ‘DHFL’ या कंपनीच्या ऑफरला कमिटी ऑफ क्रेडिटर्सनी मान्यता दिली.

CAPLIN फार्मा या कंपनीने JAMP फार्मा या कंपनीबरोबर कॅनडा मध्ये औषध विक्रीसाठी स्ट्रॅटेजिक पार्टनरचा करार केला.

अडानी ग्रीन या कंपनीमध्ये फ्रान्स ची कंपनी ‘TOTAL’ ही २०% स्टेक घेणार आहे. त्यामुळे त्यांना अडाणी ग्रीनच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स वर एक सीट मिळेल. अडानी ग्रीनच्या शेअर्समध्ये तेजी होती.

UK मध्ये 5G रोल आऊट करण्यासाटी TCS ने THREE UK बरोबर करार केला. THREE UK ही UK मधील टेलिकॉम क्षेत्रातील मोठी आणि नावाजलेली कंपनी आहे.

ग्रॅव्हिटी या कंपनीला सोनीर कॉर्पोरेशन कडून Rs १२५ कोटींची ऑर्डर मिळाली. त्यामुळे कंपनीच्या शेअरमध्ये तेजी आली.
5G सेवा लाँच करण्यासाठी आवश्यक असलेल्या तयारीच्या ड्राफ्टला २२ जानेवारी पर्यंत स्टँडिंग कमिटी अंतिम रूप देईल.
गणेशन हायटेक डायग्नॉस्टिक्स ही चेन्नई बेस्ड कंपनी मेट्रोपोलीस हेल्थ केअर या कंपनीने Rs ५०० कोटींना विकत घेतली.
अपोलो हॉस्पिटल्सने त्यांचा Rs १५०० प्रती शेअर या भावानं QIP इशू आणला. डोमेस्टिक म्युच्युअल फंड्स, इन्व्हेस्टमेंट बँकर्स आणि सॉव्हरिन फन्ड्स यांनी या QIP मध्ये स्वारस्य दाखवले.

साखरेचे उत्पादन ४८७ साखर कारखान्यात सुरु झाले. १ ऑक्टोबर २०२० ते १५ जानेवारी २०२१ या काळात साखरेचं १.४३ कोटी टन एवढे उत्पादन झाले.

येस बँकेची २२ जानेवारी २०२१ रोजी फंड उभारण्यावर विचार करण्यासाठी बैठक आहे.

२२ जानेवारी २०२१ रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज आणि HDFC लाईफ या कंपन्या त्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील.

अडाणी एंटरप्रायझेस ही कंपनी नवी मुंबई विमानतळाची या आठवड्यापासून देखभाल करेल.

ब्रिगेड ही कंपनी हैदराबादमध्ये ११.८ एकर जमिनीत, प्रोजेक्ट लाँच करणार आहे.

शक्ती पंप्स ही कंपनी तोट्यातून फायद्यात आली. L & T फायनान्सियल होल्डिंग्स आणि शॉपर्स स्टॉप यांचे तिसर्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते. रॅलीज इंडिया या कंपनीचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. कंपनीला ६.१ कोटींचा वन टाइम गेन झाला. हाथवे केबलचा निकाल सर्वसाधारण आला. माईंड ट्री, ट्रायडन्ट या कंपन्यांचे तिसर्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

LIC चे व्हॅल्युएशन Rs १० लाख कोटी ते Rs १२ लाख कोटी होईल. सरकारचा LIC मध्ये स्टेक ( कॅपिटल)Rs १०० कोटीं आहे . या कॅपिटलच्या हिशेबाने IPO मध्ये शेअरची किंमत खूप ठेवावी लागेल. हि किंमत कमी करण्यासाठी सरकार LIC मध्ये गुंतवणूक करेल येत्या अंदाजपत्रकात या रकमेची तरतूद केली जाईल.

मी तुम्हाला कोटक महिंद्रा बँकेचा चार्ट देत आहे. या शेअरने १० DMA , २० DMA, ५० DMA चा स्तर सोडला. या चार्टमध्ये शॉर्ट टर्म ब्रेक डाऊन दिसत आहे. आजची हाय प्राईस Rs १८७० लो प्राईस Rs १८३८ आहे. पण मध्यम मुदत आणि दीर्घ मुदतीचा टेन्ड सकारात्मक आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४८५६४ NSE निर्देशांक निफ्टी १४२८१ बँक निफ्टी ३१८११ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट –  १५ जानेवारी २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट –  १५ जानेवारी २०२१

आज क्रूड US $ ५५.६४ प्रती बॅरल ते US $ ५६.२४ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७३.०१ ते US $१= Rs ७३.१२ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९०.३३ VIX २४.६७ PCR १.५३ होते.

सिनेटची बैठक लवकरात लवकर १९ जानेवारीला बोलावता येणार असल्यामुळे ट्रम्प यांच्या इम्पीचमेंटवर निर्णय १९ तारखेनंतरच होऊ शकतो. आज बिडेन यांनी US $ १.९० ट्रिलियनचे पॅकेज देऊ असे जाहीर केले. या पॅकेज अंतर्गत प्रत्येक USA नागरिकाच्या बचत खात्यात US $ १००० जमा होतील. US $ १ ट्रिलियन फॉर इंडिविज्युअल्स आणि फॅमिली साठी असतील US $ ४१५ बिलियन कोरोनाच्या संकटासाठी, US $ ४४० बिलियन उद्योगांसाठी खर्च केले जातील. US $ ३०० ते US $ ४०० साप्ताहिक बेकार भत्ता दिला जाईल. USA मध्ये सत्तेवर येणाऱ्या नवीन सरकारची ध्येय धोरणे स्पष्ट झाल्यावर मार्केटला एक निश्चित दिशा मिळेल.

आज यूरोपमधील देशातील लॉकडाऊनमुळे आणि USA ,यूरोपमध्ये झालेल्या कोरोनाच्या नव्या प्रादुर्भावामुळे क्रूडसाठी मागणी कमी झाली. सोन्यात माफक तेजी तर चांदीत मंदी होती.

टाटा स्टील लॉन्ग प्रॉडक्ट्स ,डेन नेटवर्क्स या कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

युनिकेम लॅब या कंपनीच्या आर्थ्रायटिस वरील औषधाला, (जे आतापर्यंत फायझरच बनवत होते) USFDA ने मंजुरी दिली. ह्या औषधाचे उत्पादन कंपनीच्या गोवा प्लॅन्टमध्ये केले जाईल. फायझर या कंपनीने आर्थ्रायटिस संबंधित औषधा साठी औरोबिंदो फार्मावर केस टाकली.

डाबर ही कंपनी आता ‘घी’ च्या उत्पादनात उतरली आहे. हे ‘घी’ Rs ५९० प्रति लिटर या दराने विकले जाईल.
निफ्टीच्या अर्धवार्षिक रिव्ह्यूमध्ये यावेळी ‘GAIL’ च्या जागी टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स चा समावेश केला जाईल.टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्सने वेलनेस प्रॉडक्ट्सबरोबरच इम्युनिटी बूस्टर्स वर फोकस ठेवला आहे.टाटा कंझ्युमर्सने आता D टू C म्हणजेच डायरेक्ट टू कन्झ्युमर क्षेत्रात पुष्कळ उत्पादने आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्या प्रमाणे टेटली टी, संपन्न ब्रँडचे मसाले, डाळी, इन्स्टंट टी आणि कॉफी इत्यादी प्रॉडक्ट्स ते मार्केट मध्ये आणत आहेत /आणणार आहेत. फ्री फ्लोट मार्केट कॅपचा विचार करून असे बदल करतात. गेलची मार्केटकॅप Rs ३०००० कोटी तर टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्सची मार्केट कॅप Rs ३६००० आहे. यामुळे FMCG क्षेत्रातील HUL, नेस्ले, ITC आणि टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स असे चार शेअर्स निफ्टी मध्ये असतील.

MSCI इंडेक्सच्या फेब्रुवारी २०२१ मध्ये होणाऱ्या रीबॅलन्सिंग मध्ये भारती एअरटेलच्या वाढलेल्या FI (१००%) लिमीटचा विचार केला जाईल.

IRCTC आता ‘रेडी टू ईट’ पॅक्ड फूड गाड्यांमध्ये सर्व्ह करणार आहे. उदा. हल्दीराम, ITC, MTR, वाघ बकरी चहा.

PFC ही सरकारी क्षेत्रातील कंपनी बॉण्ड इशू करणार आहे. हे बॉण्ड ३,५.१०, १५ वर्षे मुदतीचे असतील. ह्यापासून मिळणारे उत्पन्न करपात्र असेल. १५ वर्षे मुदतीच्या बॉण्डसाठी व्याजाचा दर ७.१५% असेल. हा बॉण्ड्स इशू १५ जानेवारी २०२१ ते २९ जानेवारी २०२१ दरम्यान ओपन राहील. Rs ५००० कोटींच्या दोन टप्प्यात हा इशू येईल. या इशुत ८०% कोटा रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव असेल.

ट्रायडंट या टाटा ग्रुपच्या कंपनीला मेथड ऑफ मॅन्युफफॅक्चरिंग फॅब्रिकचे पेटंट मिळाले.

मारुती सुझुकीचा ऑन लाईन फायनान्स प्लॅटफॉर्म ‘मारुती सुझुकी एरेनासा’ठी लाँच झाला.मारुती सुझुकीने स्मार्ट फायनान्स प्लॅटफॉर्म लाँच केला.

साखरेच्या किमती आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये एप्रिल २०१७ नंतरच्या कमाल स्तरावर आहेत. ब्राझीलमध्ये साखरेचे उत्पादन कमी झाले आहे. तर भारतात मात्र साखरेचे उत्पादन ४२% ने वाढून ११० लाख टन झाले आहे. भारतातून यावेळी साखरेची चांगली निर्यात होईल.

CEAT ही कंपनी रॉयल एन्फिल्ड इंटरसेप्टर ६५० CC बाईक साठी टायर्सचा सप्लाय करेल.

ABB इंडियाला सुरत वॉटर सप्लाय कडून १० लाख घरांना पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेल्या इलेक्ट्रिक उपकरणांसाठी ऑर्डर मिळाली.

वेदांताची पब्लिक ऑफर ४ मार्च २०२१ रोजी ओपन होऊन १८ मार्च २०२१ ला बंद होईल.

CESC ने जाहीर केलेल्या Rs ४५ लाभांशाची रेकॉर्ड डेट २५ जानेवारी २०२१ असून ५ फेब्रुवारी किंवा त्यानंतर हा लाभांश तुमच्या बचत खात्यात जमा केला जाईल.

‘GAIL’ ने आज झालेल्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स च्या बैठकीमध्ये Rs १५० प्रती शेअर टेंडर ऑफर रूटने ६.९८ कोटी शेअर्सच्या बायबॅकसाठी आणि Rs २.५० प्रती शेअर लाभांशाची घोषणा केली. शेअर बायबॅक आणि लाभांशासाठी २८ जानेवारी २०२१ ही रेकॉर्ड डेट असेल. GAIL यासाठी Rs १०४६.३० कोटी खर्च करेल.

आज HCL टेक या IT क्षेत्रातील मोठ्या कंपनीचे तिसर्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले.

EBIT मार्जिन २२.९% होते. कंपनीला Rs ३९६९ कोटी प्रॉफीट झाले. कंपनीने EBIT मार्जिन गायडन्स २१% ते २१.५% तर ग्रोथ गायडन्स २% ते ३% दिला आहे. US $ रेव्हेन्यू ग्रोथ ४.४% होती. कंपनीने Rs ४ प्रती शेअर लाभांश जाहीर केला. ऑपरेटिंग इन्कम Rs ४४१६ कोटी झाले .

आज PVR या मल्टिप्लेक्सेसच्या मालक असलेल्या कंपनीचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले. कंपनी फायद्यातून तोट्यात गेली. हे अपेक्षित होते कारण कोरोनाकाळातील सगळ्यात जास्त प्रतिकूल परिणाम झालेला एंटरटेनमेंट हा उद्योग आहे. कंपनीला Rs ४९ कोटी तोटा झाला. कंपनीचे उत्पन्न Rs ४५ कोटी तर इतर उत्पन्न Rs २७४ कोटी होते. आता बहुतांश राज्यातून मल्टिप्लेक्सेस ओपन होत आहेत म्हणून या कंपनीला त्याचा फायदा होईल.

मी आज तुम्हाला HCL टेक चा विकली चार्ट देत आहे. या चार्टमध्ये हेवी व्हॉल्यूमने शूटिंग स्टार पॅटर्न दिसत आहे. हा पॅटर्न ट्रेड रिव्हर्सल दाखवतो. हा पॅटर्न टॉपला तयार होतो. बर्याच दिवसांच्या तेजीनंतर बनतो. आज कंपनीचे तिमाही निकाल जाहीर झाल्यावर शेअरमध्ये प्रॉफिट बुकिंग झाले. या पॅटर्ननंतर जी कँडल तयार होते ती पाहावी लागते. हा पॅटर्न इन्व्हर्टेड हॅमरसारखा असतो. या पॅटर्ननंतर मंदी सुरु होते.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४९०३४ NSE निर्देशांक निफ्टी १४४३३ बँक निफ्टी ३२२४६ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!