आजचं मार्केट – १ जानेवारी २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १ जानेवारी २०२१

आज क्रूड US $ ५१.७० प्रति बॅरल ते US ५१.७२ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७३.०२ ते US $१= Rs ७३.१० या दरम्यान होते. US $ निर्देशांक ८९.९४ VIX २०.१० PCR १.५४ होते.

आज २०२१ या वर्षांचा आणि २०२१-२०३० या दशकाचा पहिला दिवस. आपल्याला हे वर्ष आणि दशक सुखाचे,समृद्धीचे, यशाचे आणि स्वास्थ्याचे जावो ही शुभेच्छा.

आज जगातील USA, युरोप, आणि एशियामधील मार्केट्स नववर्षदिनानिमित्त बंद होती. त्यामुळे आपल्याही मार्केटमध्ये व्हॉल्युम कमी होते.

आज अँथोनी वेस्ट हँडलिंगचे जोरदार लिस्टिंग झाले. (BSE वर Rs ४३० आणि NSE वर Rs ४३६ ). त्यामुळे ज्यांना शेअर्सची अलॉटमेंट झाली त्यांना चांगला लिस्टिंग गेन झाला.

आज HSIL च्या शेअर बायबॅक चा शेवटचा दिवस होता.

इन्फिबीम या कंपनीने त्यांची ‘कार्डपे टेक्नॉलॉजी’ ही सबसिडीअरी विकली.

रेन इंडस्ट्रीज या कंपनीने आपल्या २ सबसिडीअरीज Rs ६३७ कोटींना विकल्या. या प्रोसिड्सचा उपयोग कर्ज कमी करण्यासाठी केला जाईल. या बातमीमुळे रेन इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये तेजी आली.

IDBI बँकेने IDBI फेडरल इन्शुअरन्समधील त्यांचा २३% स्टेक विकला. आता IDBI बँकेचा या कंपनीत २५% स्टेक असेल.
टी सी एस ही IT क्षेत्रातील कंपनी ८ जानेवारी २०२१ रोजी आपले तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करेल. टी सी एस नी पोस्टबॅंक सिस्टिम्स AG चे अधिग्रहण पूर्ण केले.

M & M ह्या कंपनीने आपले फोर्ड मोटर्सबरोबरचे ऑटोमोटिव्ह JV रद्द केले.

JSPL या कंपनीने गारे पाल्मा IV/I माईन्ससाठी बोली जिंकली. या कंपंनीच्या शेअरमध्ये तेजी आली.

MOIL या कंपनीने सगळ्या ग्रेडच्या मँगनीज ओअरच्या किमती १०% ते १५% वाढवल्या. या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी आली.

क्रिसिल या रेटिंग क्षेत्रातील कंपनीला आपला रेटिंग बिझिनेस वेगळा करण्यासाठी सेबी आणि RBI यांनी मंजुरी दिली
फायझरच्या कोरोनावरील व्हॅक्सिनला .WHO (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) ची मंजुरी मिळाली. त्यामुळे फायझरच्या शेअरमध्ये तेजी आली.WHO कडून मंजुरी मिळालेली फायझर ही पहिली कंपनी आहे.

आज डिसेंबर २०२० महिन्यासाठी ऑटोविक्रीचे आकडे आले.

M & M ची एकूण विक्री ३५१८७ युनिट्स झाली (त्यात युटिलिटी व्हेहिकल्स १६०५० आणि पॅसेंजर व्हेहिकल्स १६१८२ होती) ट्रॅक्टर्सची विक्री २२४१७ युनिट्स झाली.महिंद्रा आणि महिंद्रा च्या शेअरमध्ये तेजी आली.

मारुतीची विक्री २०.२% ने (YOY) वाढून १.६० लाख युनिट झाली. ( डोमेस्टिक विक्री १.५० लाख युनिट्स आणि निर्यात ९९३८ युनिट्स झाली). मारुतीच्या शेअरमध्ये लक्षणीय तेजी आली.

एस्कॉर्टसची ट्रॅक्टर विक्री ७७३३ युनिट्स झाली. ट्रॅक्टर्सची विक्री वाढल्यामुळे याही शेअरमध्ये तेजी आली.
अशोक लेलँडची एकूण विक्री १४% ने वाढून १२७३२ युनिट झाली. शेअरमध्ये तेजी आली.

आयशर मोटर्सची CV विक्री ३% ने कमी होऊन ४८९२ युनिट्स झाली.

अतुल ऑटोची विक्री ५७.८५% ने कमी झाली.

डिसेम्बरमधील ऑटोविक्रीच्या आकड्यांमुळे आणि GST चे कलेक्शन कमाल स्तरावर (१.१५ लाख कोटी) झाल्यामुळे अर्थव्यवस्था पुन्हा सुरळीत होत आहे असा मार्केटला दिलासा मिळाला.

पेट्रोलियम मंत्रालयाने असे जाहीर केले की या वर्षी बायोगॅस सेक्टरमध्ये मोठी गुंतवणूक केली जाण्याची शक्यता आहे. बायोफ्युएलवर फोकस असेल. १८००० KM ची पाईपलाईन बनवली आहे. आणखी ३४००० KM पाईपलाईन बांधण्याचे लक्ष्य आहे.

नागार्जुना फर्टिलायझर त्यांची जयप्रकाश इंजिनीअरिंग आणि स्टील कंपनी तील गुंतवणूक विकणार आहेत. .

HPCL ही VOLT UP बरोबर बॅटरी स्वॅप सोल्युशनसाठी करार केला आहे. जयपूरमधील पेट्रोलपंपावर स्वॅपिंग साठी सेट अप तयार केला जाणार आहे. ५० शहरामध्ये बॅटरी स्वपसाठी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणार आहे. IOC या कंपनीने बॅटरी स्टेशन बनवण्यासाठी सन मोबिलिटी या कंपनीबरोबर करार केला आहे. ( बॅटरी स्वॅप म्हणजे तुम्ही तुमची चार्ज संपलेली बॅटरी देऊन बॅटरी स्टेशनवर तुम्हाला पूर्णपणे चार्ज केलेली बॅटरी मिळेल. त्यामुळे तुम्हाला पेट्रोल पंपावर बॅटरी चार्ज होण्यासाठी थांबायला लागणार नाही). या दोन्ही कंपन्या एका नवीन क्षेत्रामध्ये प्रवेश करतील.

डाबर या कंपनीने आयुर्वेदिक माऊथ वॉश २७५/१९५ ML च्या पॅकमध्ये लाँच केला.

इनॉक्स लेजर ही एंटरटेनमेंट क्षेत्रातील प्रस्थापित कंपनी आहे कोरोनाच्या काळात सर्व चित्रपटगृहे, मॉल्स बंद होते. त्यामुळे या शेअरमध्ये करेक्शन आले. त्यानंतर हळू हळू अर्थव्यवस्था ओपन होऊ लागली तसे थिएटर्स ओपन करायला परवानगी दिली गेली. आता कोरोनावर व्हॅक्सिन आल्यामुळे निर्बंध कमी होतील. या शेअरला ५० DMAच्या स्तरावर सपोर्ट मिळाला. १८ डिसेंबरच्या हायच्यावर ट्रेड करत आहे. या चार्ट मध्ये मार्निंग स्टार पॅटर्न तयार झालेला दिसत आहे आजच्या ट्रेडमध्ये पॅटर्नचा हाय पाईंट हेवी व्हॉल्युमसह पार केला आहे. त्यामुळे या शेअरमध्ये ब्रेकआऊट झाला आहे. ५२ वीक हाय Rs ५१० आहे आणि ५२ वीक लो Rs १५८ आहे. CMP Rs २८६ आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४७८६८ NSE निर्देशांक निफ्टी १४०१८ बँक निफ्टी ३१२२५ वर बंद झाले

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.