आजचं मार्केट – ४ जानेवारी २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ४ जानेवारी २०२१

आज क्रूड US $ ५२.३३ प्रती बॅरल ते US $ ५३.०४ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७२.९० ते US $१=Rs ७३.१२ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ८९.४४ VIX २०.२० PCR १.६० होते.

जगात सर्वत्र आता व्हॅक्सिनेशनची लगबग चालू आहे. भारतातही कॊव्हॅक्सिन आणि कोविशील्ड या दोन व्हॅक्सीनना मंजूरी दिली. तसेच कॅडीला हेल्थकेअरला त्यांच्या कोरोनावरील व्हॅक्सिन च्या ट्रायल फेजIII सुरु करायला परवानगी दिली. मंजुरी दिलेल्या व्हॅक्सिनचे ड्राय रन ही भारतात सुरु झाले

कमजोर US $, कोरोनाच्या नवीन प्रादुर्भावामुळे USA UK, जपान या देशात पुन्हा वाढणारे निर्बंध, महागाई वाढण्याच्या चिंतेपोटी सोन्यात लक्षणीय तेजी होती. सोने २ महिन्यांच्या कमाल स्तरावर होते. कोरोनाच्या नवीन प्रादुर्भावामुळे कमी होणारी मागणी आणि ओपेक+ उत्पादन कपात चालू ठेवण्याची शक्यता यामुळे क्रूड आज US $ ५२ प्रती बॅरल च्या पुढे गेले.

आज TVS मोटर्सचे विक्रीचे आकडे आले. एकूण विक्री २.७२ लाख युनिट झाली पण थ्री व्हीलर विक्रीमध्ये मात्र घट झाली हिरोमोटोची विक्री ४.४७ लाख युनिट्स झाली. तर आयशर मोटर्सच्या रॉयल एन्फिल्डची विक्री ६८९९५ युनिट्स झाली. M & M च्या ‘THAR’ या मॉडेलसाठी ६ महिन्यांच्यावर वेटिंग लिस्ट आहे.

कोल इंडियाचे उत्पादन ५८.८ मिलियन टन्स झाले तर NMDC च्या उत्पादनात आणि विक्रीत वाढ झाली. तिसऱ्या तिमाहीमध्ये JSPL चे उत्पादन २०% वाढून १९.३ लाख टन्स झाले मॉर्गनस्टॅनलेच्या रिपोर्टप्रमाणे मेटल्सच्या किमती वाढतील. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कोळसा आणि आयर्न ओअर च्या किमती अजून वाढतील. त्यामुळे आज सर्व धातू संबंधित क्षेत्रातील कंपन्यांमध्ये तेजी होती. उदा:- नाल्को, हिंदाल्को, टाटा स्टील, JSPL, जिंदाल स्टेनलेस, SAIL
GAIL ने कोचिन ते मंगलोर ही ४५० KM लांबीची गॅस साठी पाइपलाईन बांधली ती सुरु झाली.

फेडरल बँकेचे डिपॉझिट वाढले CASA रेशियोत चांगली वाढ झाली. लोन्स आणि इतर क्रेडिट फॅसिलिटीजमध्ये मात्र माफक ग्रोथ झाली. CSB बँकेच्या लोन्समध्ये चांगली वाढ झाली पण हि वाढ बहुतांशी गोल्ड लोन्समध्ये झाली.
सरकार RCF मधील १०% स्टेक OFS द्वारे विनिवेश करणार आहे. २९ जानेवारी २०२१ पर्यन्त लीगल अडवायझरसाठी अर्ज द्यायचे आहेत.

GUFIC BIO मध्ये गुफीक लाईफ सायन्सेसचे मर्जर करण्यासाठी NCLT नी परवानगी दिली.
तामिळनाडू आणी केरळ या राज्यात मल्टीप्लेक्सएसमध्ये ५० % ऐवजी १०० % क्षमतेवर काम सुरु करायला परवानगी दिली. याचा फायदा PVR,इनॉक्स लेजर, सिनेलाईन इंडिया यांना होईल त्यामुळे या शेअर्समध्ये तेजी आली.

अल्कली अमाईन्स ही कंपनी २ फेब्रुवारी २०२१ रोजी स्टॉक स्प्लिटवर विचार करेल.

NHPC ने J & K स्टेट पॉवर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनबरोबर हायड्रोपॉवर प्रोजेक्टसाठी MOU केले.

ऑक्टोबर ते डिसेंबर २०१९ मध्ये साखरेचे उत्पादन १.१ कोटी टन झाले. महाराष्ट्राचे उत्पादन १६.५ लाख टनांवरून ४० लाख टन झाले. उत्तरप्रदेश चे उत्पादन १.५% वाढून ३३.७ लाख टन झाले. कर्नाटक मध्ये १६.३ लाख टनावरून २४ लाख टन झाले.

कोची शिपयार्ड या कंपनीने Rs ९ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

HDFC २ फेब्रुवारी २०२१ रोजी NCD रूटने Rs ४५,००० कोटी उभारण्यावर विचार करेल.

वोडाफोन आयडिया मध्ये इनक्रेड कॅपिटल आणि PJT पार्टनर्स Rs १५००० कोटी गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या शेअरमध्ये तेजी आली.

मी आज तुम्हाला इंडस टॉवर या कंपनीचा चार्ट पाठवत आहे. इंडस टॉवर्स ( पूर्वीची भारती इंफ्राटेल) ने Rs २२४ चा LOW दिला. त्यानंतर हॅमर पॅटर्न तयार होऊन Rs २३७ पर्यंत गेला. त्यानंतर हायर लेव्हलवर कन्सॉलिडेट होत आहे. हा शेअर ब्रेकआऊट साठी थांबला आहे. खरेदी ची गती वाढली तर प्राईस व्हॉल्युम ब्रेकआऊट होईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४८१७६ NSE निर्देशांक निफ्टी १४१३२ बॅंक निफ्टी ३१२१२ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

One thought on “आजचं मार्केट – ४ जानेवारी २०२१

  1. अवधूत प्रभाकर आठवले

    नमस्कार मी अवधूत आठवले बदलापूर.मॅडम मी तुमचा ब्लॉग गेले एक ते दीड वर्ष नियमित वाचतो आहे पण मला शेअर मार्केट बद्दल तितकीशी नीट माहिती नाही तसेच मला शेअर मार्केटमध्ये कधी फायदाही झाला नाही तरी मला पण काही शेअर सुचवाल का जेणेकरून ते खरेदी केल्यावर ती मला फायदा होईल किंवा मला एखादा बेसिक कोर्स करता येईल. माझं वय सध्या 50 वर्षे इतके आहेकोणाच्या तरी सांगण्यावरून मी बरेचदा शेअर खरेदी केले पण मला त्याच्यामध्ये कधी फायदा झाला नाही मला त्याच्यामध्ये नुकसान झाले आहे तरी तुमचा ब्लॉग पोचल्यानंतर परत शेअर ट्रेडिंग करावं असं वाटतं तरी तुम्ही मला एखादा किंवा जे तुम्हाला वाटेल ते शेअर सुचवाल का खरेदी करण्यासाठी

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.