आजचं मार्केट – ५ जानेवारी २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ५ जानेवारी २०२१

आज क्रूड US $ ५०.८१ प्रती बॅरल ते US $ ५१.०४ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१ =Rs ७३.११ ते US $१=Rs ७३.१८ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ८९.७५ VIX २०.४४ PCR १.७४ होता.

आज USA ची मार्केट्स मंदीत होती. UK मध्ये १ महिन्यासाठी नॅशनल लॉक डाऊन जाहीर केला.UK मध्ये US $ ६२० कोटींचे पॅकेज रिटेल, हॉस्पिटॅलिटी आणि LEISURE फर्म्स साठी जाहीर केले. जागतिक मार्केट्स मंदीत असल्यामुळे भारतीय मार्केट गॅप डाऊन ओपन झाले. पण नंतर मार्केटने विशेषतः IT सेक्टर आणि रिअल्टी सेक्टरने तसेच बँक निफ्टीने तेजी पकडली आणि मार्केट चांगलेच सावरले. IT क्षेत्रातील कंपन्यांचे विशेषतः मिडकॅप IT कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले येतील.या अपेक्षेने या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती. तसेच 5G रोलआऊट मुळे IT क्षेत्रात पुष्कळ कॉन्ट्रॅक्ट होतील. ‘वर्क फ्रॉम होम’ कल्चरमुळे त्यांची ऑपरेटिंग कॉस्ट कमी झाली. त्यामुळे ऑपरेटिंग मार्जिन वाढले. कॉन्स्टन्ट करन्सी ग्रोथ चांगली राहील.

इंडस इंड बँकेने Rs २ लाख कोटींची लोन दिली. CASA रेशियो ४०.५ झाला. बँकेची डिपॉझिट Rs २.३९ लाख कोटी झाली.
HDFC बँकेचे डिपॉझिट १९% वाढून Rs १.२७लाख कोटी आणि ऍडव्हान्सेस १६%ने वाढून Rs १.०८ लाख कोटी झाली. CASA रेशियो ४०.५% वरून ४३% झाला.

MSTC ने आंध्र प्रदेशमधील माईन्स आणि जिऑलॉजी डिपार्टमेंट बरोबर MOU केले.

पंतप्रधानांनी कोची मंगलोर गॅस पाइपलाइनचे उद्घाटन केले. या पाइपलाइनचा FACT या कंपनीला फायदा होईल. तसेच हॉऊसहोल्ड सेक्टरला PNG आणि ट्रान्सपोर्ट सेक्टरला CNG चा पुरवठा होईल. हा पुरवठा पर्यावरणपूरक आणि स्वस्त इंधनाचा असेल.

हेरिटेज फूड्स या कंपनीने आपला प्रॉक्सिस होम्स रिटेल अधील पुरा स्टेक Rs ३.९४ कोटींना विकला.

आज डिसेंबर २०२० महिन्यासाठी आर्थीक समीक्षा रिपोर्ट प्रसिद्ध झाला

जूनपासून अर्थव्यवस्थेमध्ये V शेप रिकव्हरी दिसत आहे. व्हॅक्सिनच्या मंजुरीमुळे स्वास्थ्य आणि अर्थव्यवस्था यांच्यात सकारात्मक बदल होतील. सरकार मोठ्या प्रमाणावर व्हॅक्सिनेशनची तयारी करत आहे. एप्रिल ऑक्टोबर २०२० या काळात FDI गुंतवणूक ११% ने वाढून US $ ४६८२ कोटी होती.

सरकार फायनान्सियल इन्वेस्टर्स फॅसिलिटेशन करणार आहे. Rs ५००० कोटीपेक्षा जास्त गुंतवणुकीसंबंधात सरकार तीन दिवसात निर्णय देईल. यात सॉव्हरिन वेल्थ फंड्स पेन्शन फंड्स, व्हेंचर कॅपिटल फंड्स यांचा समावेश असेल.

सरकार अंदाजपत्रकात ऑइल आणि गॅस उद्योगासाठी काही सवलती देण्याची शक्यता आहे. यात रॉयल्टी आणि सेस मध्ये ५०% कपात, परंपरागत आणि अपरंपरागत एनर्जी सोर्सना वेगळी ट्रीटमेंट मिळेल.

नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड या कंपनीने ९.९९ लाख मेट्रिक टन. युरियाचे रेकॉर्ड उत्पादन केले. नांगल आणि पानिपत येथील त्यांच्या प्लान्टने कोरोना काळातील अडचणी आणि रेलरोको असतानाही रेकॉर्ड युरिया उत्पादन केले. पानिपत प्लॅन्टमध्ये BENTONITE सल्फर या नॉन युरिया खतांचेही उत्पादन वाढले.

कॅडीला हेल्थकेअरने सांगितले की त्यांच्या कोरोना व्हॅक्सिनच्या ट्रायल फेज III मे जून २०२१ पर्यंत पूर्ण होईल.

दिलीप बिल्डकॉनने Rs ८५२ कोटींचे स्पेशल पर्पज व्हेईकल फॉर्म केले. गुजरातमध्ये ४लेन धरॊल ते भाद्रपटीया आणि भद्रपाटीया ते पिपलीया सेक्शनसाठी हे SPV बनवले.

अल्ट्राटेक सिमेंटने NCD रूटने Rs १००० कोटी उभारले.

फायझरने SEC (सब्जेक्ट एक्स्पर्ट कमिटी) समोर ३ वेळा संधी देऊनही प्रेझेंटेशन दिले नाही .

झोमॅटो मध्ये ८४% ग्रोथ झाली . यात इन्फोएजचा स्टेक असल्यामुळे इन्फोएज च्या शेअरमध्ये लक्षणीय तेजी आली.
१ फेब्रुवारी २०२१ रोजी माननीय अर्थमंत्री देशाचे अंदाजपत्रक सादर करतील.

आज मी तुम्हाला प्रीकॉल या ऑटो अँसिलिअरीज क्षेत्रातील कंपनीचा मंथली चार्ट पाठवत आहे. या कंपनीचा मुख्य क्लायंट मारुती आहे. सप्टेंबर २०२० तिमाहीचे निकाल चांगले होते. डिसेंबर तिमाहीचे निकाल चांगले येतील. कंपनी टर्नराउंड झाली आहे. ऑटो क्षेत्रात रिकव्हरी होत असल्यामुळे या कंपनीच्या उत्पादनासाठी मागणी वाढेल.२०१८ जानेवारीमध्ये Rs १२१ हाय CMP होती. Rs ६०० कोटींची मार्केट कॅप आहे. .४ जानेवारी २०२१ला विकली चार्टमधे बुलिश एंगलफिंग पॅटर्न तयार झाला होता. मंथली चार्टमधे ब्रेकआऊट दिसत आहे. BSE निर्देशांक सेन्सेक्स ४८४३७ NSE निर्देशांक निफ्टी १४१९९ बँक निफ्टी ३१७२२ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

2 thoughts on “आजचं मार्केट – ५ जानेवारी २०२१

 1. Abhi

  Ma’am ek correction aahe tumhi pillani cha share 31st means ex date paryant ghetla tr bonus sathi eligible hou ase sangitle aani te barobar aahe but record date 2 Jan hoti aani tya diwasi market band hote mnun trading account la shares aale nahit.

  Reply
  1. surendraphatak

   business standard ला 4 तारखेला लेख आला आहे तो वाचवा 2 तारखेला पहिला शनिवार होता त्यामुळे सुट्टी नव्हती बोनस शेअर ट्रेडिंग अकौंटला जमा होत नाहीत डिमॅट अकौंटला जमा होतात 15 तारखेपर्यंत जमा होतील. – https://www.business-standard.com/article/news-cm/pilani-investment-industries-corporation-has-allots-31-63-lakh-equity-shares-under-bonus-issue-121010400714_1.html

   Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.