आजचं मार्केट – ६ जानेवारी २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ६ जानेवारी २०२१

आज क्रूड US $ ५३.७५ प्रती बॅरल ते US $ ५४.०२ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७३.०५ ते US $१= Rs ७३.१७ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ८९.३८ VIX २०.४६ PCR १.६२ होते.

USA मध्ये दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक होईल. त्यात USA चे नवनिर्वाचित अध्यक्ष बिडेन यांचे अध्यक्षपदासाठी सर्टिफिकेशन चालू होईल. विस्कॉन्सिन आणि इतर ५ ते ६ स्टेट्स विरोध करण्याची शक्यता आहे. जॉर्जियाच्या दोन सीट डेमोक्रॅटिक्सनी जिंकल्या तर बिडेन यांचा त्यांचे धोरण राबविण्याचा मार्ग सरळ आणि सोपा होऊ शकेल. त्यामुळे USA च्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. US मॅन्युफॅक्चरिंग डेटा २८ महिन्यांच्या कमाल स्तरावर होता. तर US $ फेब्रुवारी २०१८ नंतरच्या किमान स्तरावर होता. USA मधील तिन्ही निर्देशांक तेजीत होते .

सौदी अरेबियाने उत्पादनात १० mbpd कपात केली. त्यामुळे क्रूड US $ ५४ च्या वर गेले. याचा फायदा ऑइल सोअर्सिंग आणि एक्स्प्लोरेशन कंपन्यांना होईल. ONGC OIL इंडिया HOEC सेलन एक्स्प्लोरेशन, वेदांता (CAIRN) रिलायन्स इंडस्ट्रीज. ज्या कंपन्यांना क्रूड स्वस्त असल्यामुळे फायदा होतो उदा OMC ( ऑइल मार्केटिंग कंपन्या), पेंट्स, टायर्स, केमिकल्स, त्या कंपन्यांचे शेअर्स सध्या तेजीत आहेत. तर ज्या कंपन्यांचा क्रूडचे भाव वाढल्यामुळे तोटा होतो. या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव कमी आहे. क्रूडचे भाव वाढायला सुरुवात झाल्यामुळे हे चक्र आता उलटायला सुरुवात होईल.

US $ मधील रिकव्हरीमुळे आणि कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यूरोपिअन देशात लावलेल्या वाढत्या निर्बंधांमुळे सोने आणि चांदीमध्ये मंदी होती.

आपलेही मार्केट गॅप अप ओपन झाले आणि नंतर प्रॉफिट बुकिंग झाले. मार्केटच्या वेळेच्या उत्तरार्धात पुन्हा मार्केट थोडेफार सावरले.

BEML या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनीला लष्कराकडून हाय मोबिलिटी व्हेहिकल्स सप्लाय करण्यासाठी Rs ७५८ कोटींचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले. त्यामुळे या शेअरमध्ये तेजी आली.

IRCON ची सबसिडीअरी IRCON DHHL त्यांना दिलेलया Rs ३२६ कोटींच्या लोनची परत फेड IRCON ला केली.
काँकॉर आपल्या सर्व सबसिडीज आपल्यात मर्ज करणार आहे.

बजाज फायनान्सला रिस्क मॅनेजमेंट आणि आउटसोअर्सिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल Rs २.५ कोटींचा दंड केला.
EDTO नी A ३२०/३२१ NFO इंजिनच्या २९ विमानांसाठी इंडिगो या कंपनीला मंजुरी दिली. SAIL ने फ्लॅट स्टीलचे भाव Rs ४०००/टन ने वाढवला.

बंधन बँक इंडियन आर्मी पर्सोनेलना सॅलरी अकौंट देईल.

स्पाईस जेटने आजपासून २१ नवीन उड्डाणे सुरु केली. यामुळे मेट्रो आणि नॉनमेट्रो मध्ये कनेक्टिव्हीटी वाढेल.
असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया ने सेबी नॉर्म्सप्रमाणे शेअर्सचे वर्गीकरण जाहीर केले. प्रत्येक ६ महिन्याला वर्गीकरणामध्ये आवश्यक ते बदल केले जातात. मार्केट कॅपनुसार पहिले १०० लार्ज कॅप. १०१ ते २५० मिडकॅप आणि २५१ पासून पुढे स्मॉल कॅपमध्ये वर्गीकरण केले जाते. अडाणी इंटरप्रायझेस, येस बँक, PI इंडस्ट्रीज, ज्युबिलण्ट फूड्स, हिंदुस्थान एरोनाटिक्स यांचे वर्गीकरण लार्ज कॅप म्हणून केले. म्युच्युअल फंड्स या वर्गीकरणानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या फंडांमध्ये सेबीच्या गाईडलाईन्स नुसार गुंतवणूक करतात.

IDFC Ist बँकेचा CASA रेशियो २०.९% वरून ४४.६% झाला. डिपॉझिट ४१% वाढून Rs ७७२८९ कोटी तर रिटेल डिपॉझिट्स १००%ने वाढून Rs ५८४३५ कोटी झाले.

आर्चिडप्लाय ही कंपनी Rs ३७ प्रती शेअर या भावाने ८.१४ कोटी शेअर्स टेंडर ऑफर रूटने बायबॅक करेल.
हिंदुस्थान एरोनाटीक्स या कंपनीला ८३ लढाऊ विमानांची ३ वर्ष मुदतीचे Rs ३७००० कोटींचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले. त्यामुळे या शेअरमध्ये तेजी आली.

टाटा मोटर्सने ‘टाटा सफारी’ चे बुकिंग पुन्हा सुरु केले. UK लँडरोव्हरची विक्री ५.४% ने वाढून ४५४८ युनिट झाली. JLR विक्री १८५५ वरून ३८८६ युनिट्स झाली. त्यामुळे आज टाटा मोटर्सचा शेअर वर होता.

येत्या अंदाजपत्रकात इन्फ्रास्ट्रक्चरसंबंधीत PSU ना उत्तेजन दिले जाईल पॅसेंजर रेल्वेच्या खाजगीकरणावर जोर दिला जाईल, फ्रेट कॉरिडॉर, एअरपोर्ट विस्तारासाठी उत्तेजन दिले जाईल जेम्स आणि ज्युवेलरी वरील इम्पोर्ट ड्युटी कमी केली जाईल, सुट्या सिगारेट्स विक्रीवर बंदी आणि धुम्रपानासाठी वयाची मर्यादा १८ वरून २१ केली जाईल आणि सार्वजनिक ठिकाणी सिगारेटचे सेवन केल्यास Rs २००० दंड लावला जाईल अशी शक्यता आहे.

भारत जपान यांच्यातील स्पेसिफाईड स्किल वर्कर पार्टनरशिपसाठी मंजुरी मिळाली.

भारती एअरटेलने सुप्रीम कोर्टात Rs ४३९८० कोटी ‘AGR’ थकबाकी पूर्णपणे चुकविण्याच्या आदेशात बदली करण्याची विनंती करणारा अर्ज केला.

सध्या फक्त ५७% गाड्यांचा विमा होतो आहे. आता सगळ्या वाहनांचा विमा काढावा लागेल याचा फायदा ICICI लोम्बार्ड या कंपनीला होईल. त्यामुळे आया शेअरमध्ये तेजी आली.

आज मी तुम्हाला SHALBY लिमिटेड या कंपनीचा चार्ट देत आहे. ह्या कंपनीची हॉस्पिटल्सची चेन आहे. ही हॉस्पिटल्स सर्जरीसाठी प्रसिद्ध आहेत. कोरोनाच्या काळात ऑपरेशन्स बंद असल्यामुळे त्यांचे नियमित उत्पन्न कमी झाले होते. पण आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे आता त्यांची ऑपरेशन्स पुन्हा सुरु झाली आहेत .बुक व्हॅल्यू Rs ७४ आहे P /B १.७३ आहे. चार्ट मध्ये हायर टॉप हायर बॉटम पॅटर्न फॉर्म झाला आहे. फायनान्सियल परफॉर्मन्स चांगला असून QUALITY मॅनेजमेंट आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४८१७४ NSE निर्देशांक निफ्टी १४१४६ बँक निफ्टी ३१७९७ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.