आजचं मार्केट – ७ जानेवारी २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ७ जानेवारी २०२१

आज क्रूड US $ ५४.६२ प्रती बॅरल ते US $ ५४.७५ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=७३.१२ ते US $१= Rs ७३.३३ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ८९.५४ विक्स २०.२० PCR १.७१ होते .

आज USA मध्ये बऱ्याच नाट्यमय प्रसंगानंतर बिडेन यांच्या संयुक्त सभागृहातील सर्टिफिकेशनच्या मंजुरीचा मार्ग मोकळा झाला.तसेच जॉर्जियातील दोन्ही सीट्स डेमोक्रॅट्सनी जिंकल्यामुळे आता येत्या दोन वर्षांसाठी तरी त्यांना त्यांची धोरणे राबवण्यात अडचणी येणार नाहीत. कारण सभापतीचे कास्टिंगवोट त्यांच्यासाठी बहुमत प्रस्थापित करू शकेल. बिडेन यांनी दिलेल्या आश्वासनानुसार आता एक मोठे रिलीफ पॅकेज येईल या अपेक्षेने USA ची मार्केट्स तेजीत होती. काही कंपन्यांना सक्तीने डीलीस्टिंग करायला लागेल या भीतीने NASDAQ मात्र खाली होता.

आज भारतीय मार्केट्स गॅपप ओपन झाली पण हळू हळू मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग झाले. बजेटमध्ये इन्फ्रा सेक्टरला प्राधान्य मिळेल या अपेक्षेने इन्फ्रा क्षेत्रातील शेअर्स आणि महाराष्ट्रामध्ये पारेख कमिटीच्या रिपोर्टनुसार नवीन इमारती बांधताना जे टॅक्स (कन्स्ट्रक्शन प्रीमियम) भरावे लागतात त्यात ५०% कपात केली. त्यामुळे महाराष्ट्रातील रिअल्टी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली. जे बिल्डर या कन्स्ट्रक्शन प्रीमियम मधील ५०% सवलतीचा फायदा घेतील त्यांना ग्राहकांची स्टॅम्पड्युटी भरावी लागेल. ज्या कंपन्यांकडे लँड बँक आहे पण ज्यांचा मुख्य उद्योग वेगळा आहे. अशा कंपन्यांना फायदा होईल याला PSEUDO रिअल्टी कंपनी असे म्हणतात. स्टॅम्पड्युटीमध्ये कपात, होम लोनवरील व्याजाचा दर कमी,आता त्यांना कन्स्ट्रक्शन प्रीमियममध्ये दिलेली ५०% कपात यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रामधील रिअल्टी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये तेजी आली.

ही सवलत ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत लागू राहील उदा ओबेराय रिअल्टी, पूर्वानकारा, प्रेस्टिज, गोदरेज प्रॉपर्टीज, इंडिया बुल्स रिअल इस्टेट, कोलते पाटील, सन टेक रिअल्टी, शोभा, अजमेरा, बॉम्बे डाईंग, रेमंड, GRAUER वेल

काही IT क्षेत्रातील कंपन्यांनी आता कायम तत्वावर ‘वर्क फ्रॉम होम’ धोरण चालू केले याचा फायदा डेन नेटवर्क्स, हाथवे, GTPL हाथवे, या कंपन्यांना होईल. त्यामुळे या कंपन्यांमध्ये तेजी होती.

अजंता फार्मा यांच्या मधुमेहावरील औषधाला आणि DR रेड्डीज यांच्या ऍनास्थेटिक इंजेक्शनला USFDA कडून मान्यता मिळाली. त्यामुळे या शेअर मध्ये तेजी होती.

टाटा सन्सनी TCS चे ९९९७ कोटी शेअर्स बाय बॅक मध्ये दिले.

Rs २ लाख किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचे सोने खरेदी करताना KYC करणे अनिवार्य असेल.

PNC इंफ्राटेक मध्ये बरीच ब्लॉक डील झाली त्यात गोल्डमन साखस, फिडिलिटी, SBI म्युच्युअल फंड, निपोन लाईफ, नोमुरा सिंगापूर.यांचा सहभाग होता.

राजस्थान, हिमाचल प्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश, केरळ या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्ल्यू चा प्रादुर्भाव झाल्यामुळे या राज्यसरकारांनी प्रतिबंधक उपाय सुरु केले आहेत.पोल्ट्री उद्योगावर आलेले हे मोठे संकट असल्यामुळे वेंकीज, SKM एगग्स, सिमरन फार्म्स ओवोबेल फूड्स या कंपन्यांच्या शेअरमध्ये मंदी आली. त्याच प्रमाणे याचा गोदरेज अग्रोव्हेट आणि इतर पशुखाद्य बनवणार्या कंपन्यांवर प्रतिकूल परिणाम होईल.

WENDT आणि कोरोमंडल युनिव्हर्सल WENDT या कंपनीचे ९४७०४ शेअर्स Rs २२०० प्रती शेअर या भावाने (फ्लोअर प्राईस) विकणार म्हणजे ४.७४% स्टेक OFS च्या माध्यमातून विकणार. प्रमोटर्सचा SEBI च्या नियमानुसार ७५% पेक्षा कमी करण्यासाठी हा ऑस आणत आहे. ऑफ्सची फ्लोअर प्राईस CMP ला २९% डिस्काउंटने असल्यामुळे शेअरमध्ये मंदी आली. ९४७१ शिअर्स रिटेल इन्व्हेस्टर्स साठी राखीव आहेत.

NMDC पन्ना मध्ये वनविभागाच्या परवानगीने डायमंड मायनिंग करणार आहे.

डिक्सन टेक्नॉंलॉजीने ‘boAT’ या कंपनी बरोबर ट्वीन वायरलेस स्पिकर्स बनवण्यासाठी टाय अप केले. UPमधील नोइडातील प्लांट मध्ये या स्पिकर्स उत्पादन केले जाईल. यामुळे शेअरमध्ये लक्षणीय तेजी आली.

चीनमधून आयात होणाऱ्या मेलामाईन वरील इम्पॉर्टड्युटी २ महिन्यासाठी वाढवली. याचा फायदा GSFC ला होईल.
भारती एअरटेलच्या तीन सबसिडीअरीजमध्ये १०० % FDI ला मंजुरी दिली त्यांची नावे अशी. भारती HEXACOM, भारती टेलीसोनिक, भारती टेलिकॉम. भारती एअरटेलला त्यांच्या पेमेंट बँकेमध्ये FDI लिमिट ७४% करण्यासाठी RBI आणि FIPB ने परवानगी दिली. भारती एअरटेलला त्यांच्या स्पेक्ट्रम रिन्यू करण्यासाठी Rs १३००० कोटींची गरज होती. या परवानगी मुळे त्यांना हे पैसे जमावणे सोपे जाईल. त्यामुळे भारती एअरटेलच्या शेअरमध्ये तेजी आली.

८ जानेवारी २०२१ रोजी रिट्स च्या लाभांशाची एक्स डेट आहे.

LIC नी बँक ऑफ बरोडामध्ये ४.४% स्टेक खरेदी केला.

GM ब्रुअरीज या कंपनिचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले. प्रॉफिट ५१% ने वाढले, मार्जिन वाढले. आता बाकीच्या मद्यार्क बनवणाऱ्या कंपन्यांचे निकाल चांगले येतील या अपेक्षेने रॅडिको खेतान, ग्लोबस स्पिरिट्स, युनायटेड स्पिरिट्स या शेअर्स मध्ये तेजी होती.

मी आज तुम्हाला महिंद्रा EPC या कंपनीचा मंथली चार्ट पाठवत आहे. ही कंपनी मायक्रो इरिगेशन क्षेत्रात काम करते. कमीतकमी पाण्याचा वापर जास्तीतजास्त जमीन पाण्याखाली आणण्यासाठी सिस्टिम्स बनवतात. यांना सरकारकडून सब्सिडी मिळते. ही कंपनी M & M नी घेतल्यापासून मार्जिन दुप्पट झाले. Rs २५ कोटींचा फायदा झाला. ही एक DEBT फ्री कंपनी आहे. मंथली चार्टवर हायर हाय आणि हायर लो दिसत आहे इन्व्हर्स हेड आणि शोल्डर ची नेकलाईन पार केली आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४८०९३ NSE निर्देशांक निफ्टी १४१३७ बँक निफ्टी ३१९५६ वर बंद झाले.
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

3 thoughts on “आजचं मार्केट – ७ जानेवारी २०२१

 1. Dr RAJIV SAKHARDANDE

  good to review on daily basis.
  the way you have learn & have become expert in this field has given confidence to new entrant like me
  it would be nice to have write up on evergreen & somehow stable stocks during crisis

  Reply
 2. MANU GOKULDAS GANDHI

  जयश्रीकृष्ण🙏 आपण मार्केट संबंधित बनविले ले व्हिडिओ ऐकून समाधान वाटते. अतिशय चांगली माहिती मिळते. शेअर मार्केट मधील धोक्याची कल्पना येते, फायद्याचे पण ज्ञान होते. आपण जी माहिती मार्केट नंतर देता ती चालु ठेवावी व मार्केट पुर्वी काही टिप्स माझा अंदाज ह्या सदरा मार्फत द्यावी विनंती.
  मी मनु गोकुळदास गांधी( वय ७१ रिटायर्ड पेन्शन धारक) मेन रोड करमाळा ४१३२०३ सोलापूर.

  Reply
 3. vinod dhondiram nikam

  The share market is known because of your blog.
  Now your chart makes me feel like an expert in the stock market

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.