आजचं मार्केट – ८ जानेवारी २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ८ जानेवारी २०२१

आज क्रूड US $ ५४.५३ प्रती बॅरल ते US $ ५४.८६ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $ १=Rs ७३.२४ ते US $१= Rs ७३.४५ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ८९.९० VIX २०.६४ PCR १.७१ होते.

युरोप USA आणि UK मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नाही त्यामुळे या देशात अधिकाधिक निर्बंध आणि त्याचबरोबर रिलीफ पॅकेजच्या घोषणा होत आहे. फायझर आणि बायोन्टेक आणि अस्त्राझेनेका या दोन व्हॅक्सिन UK मधील नवीन कोरोना व्हरायन्टवर परिणामकारक आहेत असे आढळून आले आहे. त्यामुळे या दोन कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती. भारतातही लवकरच व्हॅक्सिनेशन ड्राईव्ह सुरु होईल.

भारतातही १ फेब्रुवारी २०२१ला सादर होणाऱ्या अंदाजपत्रकात उद्योग जगताला सहाय्यक होतील अशा बर्याच सवलती असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणि परदेशातून येणाऱ्या गुंतवणुकीमुळे आज सतत १० व्या दिवशी भारतीय मार्केट्स तेजीत असून आज त्यांनी ब्ल्यू स्काय टेरिटरीत प्रवेश केला.सेन्सेक्स आणि निफ्टी आज ऑल टाइम हाय होते.याला जोड मिळाली अंदाजपत्रकातील तरतुदींविषयीच्या उत्सुकतेची. तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले येतील या अपेक्षेने IT, सिमेंट,धातू, केमिकल, ऑटो, खाजगी बँका आणि NBFC तसेच रिअल्टी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती. बँकिंग क्षेत्रातील काही बँकांनी याआधीच डिपॉझिट आणि ऍडव्हान्सेस मध्ये वाढ झाल्याची घोषणा केली आहे.

आज सोने आणि चांदी माफक मंदीत तर क्रूड तेजीत होते

रबराच्या किमती खूप वाढल्या आहेत. मागणी वाढली आहे. याचा परिणाम टायर उद्योगाव्रर होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या काळात ग्लोव्जना खूपच मागणी होती.

चहाच्या किमतीही वाढत आहेत. हॅरिसन मल्याळम ही कंपनी तोट्यातून फायद्यात आली आणि या कंपनीचे कर्जही कमी झाले.

टाटा कन्झ्युमर ही कंपनी रॉक सॉल्ट, आणि बिव्हरेजीसमध्ये अनेक इम्युनिटी बुस्टर्स लाँच करणार आहे.

टाटा स्टीलवर आयर्न ओअर आणि कोळशाच्या वाढणाऱ्या किमतीचा परिणाम जाणवणार नाही. त्यांचा या दोन्ही गोष्टीचा कॅप्टिव्ह सप्लाय आहे.

भारतात १५ डिसेम्बरला ३० GW चे रिन्यूएबल एनर्जी पार्क लाँच झाले. हे जगातील सर्वात मोठे एनर्जी पार्क असेल. भारत एनर्जी ट्रान्झिशन करत आहे हे दाखवतो जमिनिची कॉस्ट कमी होईल. अर्थव्यवस्था डिकार्बनाईझ्ड होईल. लँड अक्विझिशनच्या प्रश्नांची जटिलता कमी होईल.. हा UMREP ( अल्ट्रा मेगा रिन्यूएबल एनर्जी पार्क) खावडा या कच्छच्या रिजन मध्ये आहे. सरकारने या साठी जमीन अलॉट केली आहे. याचा फायदा पॉवर ग्रीड, अडाणी पॉवर, NTPC, इनॉक्स ,सुझलॉन यांना होईल.

टेलिकॉम कंपन्यांना स्पेक्ट्रम रिन्यूअलसाठी Rs ५० लाख कोटी लागतील. भारती एअरटेलला Rs १५००० कोटी आणि रिलायन्स जिओ ला Rs २४००० कोटी लागतील. ही प्रक्रिया १ मार्च पासून सुरु होईल.

DGTR ने चीनमधून आयात होणाऱ्या NONYL फिनॉलवर ऍन्टीडम्पिंग ड्युटी बसवण्याचा प्रस्ताव दिला. याचा फायदा आरती ड्रग्स या कंपनीला होईल.

SHRIPADAN इन्व्हेस्टमेंट मॉरिशस ने IDFC मधील ५.४६% स्टेक विकला.

सरकारने चौथ्या तिमाहीसाठी प्रॉयोरिटी क्षेत्रासाठी Rs १०००० कोटींची RoDTEP इन्सेन्टिव्हला मंजुरी दिली.

सरकार डिजिटल व्यवहाराला उत्तेजन देण्यासाठी RUPAY आणि UPI कार्ड द्वारे केलेल्या Rs २००० पर्यंतच्या व्यवहाराला MDR (मर्चन्ट डिस्काउंट रेट) चार्जेस माफ करण्याचा विचार करत आहे. तसेच Rs २००० पुढील व्यवहारासाठी MDR चार्जेसची कमाल मर्यादा ठरवणार आहे. सरकार MDR चार्जेस साठी सबसिडी देण्याचा विचार करत आहे.
याचा फायदा TVS इलेक्ट्रॉनिक्सला होईल..

SBI ने व्याजाच्या दरात ०.३०% सूट दिली तसेच काही निकषानुसार .प्रोसेसींग चार्जेस माफ करण्याची घोषणा केली.
हिमंतसिंगका सिडने ‘वॉल्ट डिस्ने’ बरोबर यूरोपमधील बिझिनेससाठी करार केला. या शेअरमध्ये तेजी आली.
टाटा मोटर्सने टाटा इन्फ्रा V २० ही PV नेपाळमध्ये Rs १९ लाख नेपाळी किमतीला लाँच केली.

SHALBI या हॉस्पिटल चेन चालवणाऱ्या कंपनीचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले. प्रॉफिट Rs १६ कोटी झाले YOY आणि QOQ निकाल चांगले आले.

आज टी सी एस या IT क्षेत्रातील दिग्गज कंपनीने आपले तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. प्रॉफिट Rs ७४७५ कोटींवरून Rs ८७०१ कोटी झाला.(QOQ) उत्पन्न Rs ४०१३५ कोटीवरून Rs ४२०२० कोटी झाले. EBITD Rs १०५१५ कोटींवरून Rs १११८४ कोटी झाले. EBITD मार्जिन २६.२% वरून २६.६% झाले. Rs ६ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
भारत रसायन ही कंपनी १२ जानेवारी २०२१ रोजी शेअर बाय बॅक वर विचार करेल.

१९ जानेवारीला ICICI लोम्बार्ड त्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करेल.

आज मी तुम्हाला S H केळकर आणि कंपनीचा मंथली चार्ट पाठवत आहे. ही कंपनी परफ्युम उत्पादन, अरोमा इन्ग्रेडियंटसचे उत्पादन करते आणि FMCG फार्मा डेअरी सेक्टरला पुरवते. या कंपनीचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले येतील अशी अपेक्षा आहे.८५% शेअर्स मोठ्या इन्व्हेस्टरकडे आहेत. जानेवारी २०१७ मध्ये Rs ३६३ हाय होता. नोव्हेम्बरमध्ये अक्युम्युलेशन आणि डिसेम्बरमध्ये कन्सॉलिडेशन झाले आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४८७८२ NSE निर्देशांक निफ्टी १४३४७ बँक निफ्टी ३२०८४ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

One thought on “आजचं मार्केट – ८ जानेवारी २०२१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.