आजचं मार्केट –  ११ जानेवारी २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट –  ११ जानेवारी २०२१

आज क्रूड US $ ५५.१२ प्रती बॅरल ते US $ ५५.५५ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७३.२६ ते US $१= Rs ७३.५० या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९०.३८ VIX २२.५७ PCR १.७५ होते.

जपानची मार्केट्स आज ‘ओल्ड एज डे’ निमित्त बंद होती. USA ची मार्केट्स आज तेजीत होती.

USA, UK, जर्मनी, युरोपमधील कॉरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नाही. व्हॅक्सिनेशन मोहीम सर्वत्र राबवली जात आहे. फायझर आणि अस्त्राझेनेकाची व्हॅक्सीन्स UK मधील कोरोनाच्या व्हरायन्टवर परिणामकारक सिद्ध होत आहे. USA मधील अनिश्चितता संपली आहे. बिडेन हे २० तारखेला अध्यक्षपदाची शपथ घेतील हे निश्चित झाले आहे. बिडेननी सांगितले की लवकरच US $ २००० पर्यंतचा स्टिम्युलस चेकची USA नागरिकांसाठी तरतूद असलेले पॅकेज आम्ही जाहीर करू. USA मधील ट्रेजरी यिल्ड वाढत आहे. US $ इंडेक्स वाढत आहे त्यामुळे सोन्यामध्ये मंदी आली सोन्यामध्ये इन्व्हर्टेड हेड आणि शोल्डर पॅटर्न तयार झाला आहे US $ जेवढा मजबूत होईल तेवढी कमोडिटीजमधील रिस्की गुंतवणूक कमी होते.ओपेक+ने सांगितले की उत्पादनातली कपात आम्ही मार्चपर्यंत चालू ठेवणार आहोत. तसेच USA मध्ये नवीन पॅकेज जाहीर झाल्यामुळे क्रुडमध्ये तेजी होती. USA च्या स्टॉक एक्स्चेंजवरून तीन चिनी कंपन्या डीलीस्ट झाल्यामुळे MSCI निर्देशांकातील इतर शेअर्सचे वेटेज वाढले. त्यामुळे या शेअर्समध्ये तेजी आली. FII ने Rs ६००० कोटींची खरेदी भारतीय मार्केटमध्ये केली.

आज NSE ने फायनान्सियल सर्व्हिसेस इंडेक्सवरील फ्युचर्स आणि ऑप्शन्स ही डेरिव्हेटिव्ज लाँच केली. ह्या इंडेक्समध्ये २० कंपन्यांचा समावेश आहे त्यात बँकांसकट फायनान्सियलस, NBFC ,इन्शुअरन्स कंपन्या, होम फायनान्सिंग कंपन्या यांचा समावेश आहे. त्यामुळे बँकांच्या शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग करून गुंतवणूकदारांनी या इंडेक्सच्या डेरिव्हेटिव्जमध्ये गुंतवणूक केली असण्याची शक्यता आहे. मार्केटच्या वेळेत USA च्या मार्केट्समध्ये प्रॉफिट बुकिंग झाल्यामुळे आपल्याही मार्केटमध्ये प्रॉफिट बकिंग झाले. . बॉण्ड यिल्ड वाढत असल्यामुळे बँकांच्या शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग झाले. मार्केट गॅपप ओपन झाले. टेक्सटाईल, फर्टिलायझर्स, ऑटो आणि ऑटो अँसिलिअरीज क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी होती. तर मेटल, बँका, सिमेंट क्षेत्रात मंदी होती. कारण माननीय मंत्र्यांनी सांगितले की सिमेंट आणि स्टील या क्षेत्रातील कंपन्या सिमेंट आणि स्टील यांचे भाव वाढवत आहेत. सरकार या क्षेत्रासाठी रेग्युलेटरी ऑथॉरिटी नेमण्याचा विचार करत आहे.

विप्रो या कंपनीचा Rs ४०० प्रती शेअर या भावाने ओपन असलेला बायबॅक आज बंद होईल.

इक्विटास या कंपनीने सांगितले की त्यांच्या डिपॉझिट आणि ऍडव्हान्सेस मध्ये वाढ झाली. वेदान्ताने १०% स्टेक खरेदी करण्यासाठी Rs १६० प्रती शेअर या भावाने ( CMP ला हा भाव १२% डिस्काउंटने आहे ) शेअर्स खरेदी करण्यासाठी ओपन ऑफर आणली आहे. यासाठी Rs ५९५२ कोटी खर्च येईल. SEBI च्या नियमाप्रमाणे प्रमोटर होल्डिंग २५% पेक्षा जास्त पण ७५% पेक्षा कमी असेल तर क्रीपिंग अक्विझिशन करून ५% शेअर्स एका फायनान्शियल वर्षात घेऊ शकतात. ५% पेक्षा जास्त अक्विझिशन करायचे असल्यास ते ओपन ऑफर आणून करावे लागते. वेदांताने ५०.१४ % वरून ५५.०४% एवढा स्टेक ब्लॉक डीलच्या माध्यमातून घेतला. डीलीस्टिंगसाठी एक वर्षांचा कुलिंग पिरियड असतो. ३० सप्टेंबर रोजी LIC चा स्टेक ५.५८%, ICICI प्रु MF चा ४.३६% HDFC MF चा स्टेक २.७९% आणि SOCEITE GENERAL चा २.३३% स्टेक आहे.

इन्फ्रा क्षेत्रासाठी डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स लाँच करण्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत विचार होईल. या इन्स्टिट्यूशनचे सुरुवातीचे भांडवल Rs १ लाख कोटी असेल. यात IIFCL चा समावेश केला जाऊ शकतो.

सदभाव इंजिनीअरिंग या कंपनीला गुजरात मेट्रो रेल प्रोजेक्टसाठी Rs ७८० कोटींचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले.

कोळसा मंत्रालयाच्या सचिवांनी सांगितले की आतासुद्धा ७२% वीज कोळश्यापासूनच तयार केली जाते. कोळशासाठी असलेली मागणी कमी व्हायला बराच कालावधी लागेल. या महिन्यात कोळशांच्या खाणींच्या कमर्शियल लिलावाचा दुसरा टप्पा सुरु होईल. वेळोवेळी गरज भासेल त्यावेळी आम्ही कमर्शियल कोळशाच्या खाणींचा लिलाव करत राहू. माइनिंग क्षेत्रातील स्ट्रक्चरल रिफॉर्म्स सरकारच्या विचाराधीन आहेत.

TVS मोटर्समध्ये LIC ने आपला स्टेक ६.४६% पर्यंत वाढवला तर FPI गुंतवणूक ११.१५% झाली

DOPE ( डिपार्टमेंट ऑफ पब्लिक इंटरप्रायझेस)नी डिफेन्स, हेवी इंजिनीअरिंग, रेल्वे या क्षेत्रातील कंपन्यांनी निर्यात वाढवण्यावर आपले लक्ष केंद्रित करावे असे सांगितले.

आज GNA एक्सल्स या कंपनीचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल आले. कंपनीला Rs २६.६ कोटी नफा झाला. तर रेव्हेन्यू Rs २७६ कोटी होता. मार्जिन १७.४% होते. या तिन्ही बाबतीत कंपनीने चांगली प्रगती केली. कंपनीच्या शेअरमध्ये तेजी आली.
J कुमार इन्फ्रा या कंपनीला Rs ८७० कोटींची ऑर्डर गुजरात मेट्रो रेल्वेकडून मिळाली.

उद्या तारीख १२ जानेवारी २०२१ रोजी टाटा एलेक्सि, कर्नाटक बँक, इंडियन बँक यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर होतील. १५ जानेवारीला HCL टेक चे तिसया तिमाहीचे निकाल जाहीर होतील.

आज मी तुम्हाला सेण्ट्रम कॅपिटल या कंपनीचा विकली चार्ट देत आहे. या कंपनीची बुक व्हॅल्यू Rs १४.५० आहे. ही कंपनी होम फायनान्स, वेल्थ मॅनेजमेंट, इन्व्हेस्टमेन्ट बँकिंग या व्यवसायात आहे. मॉर्गन स्टॅन्लेने या कंपनीत Rs १९० कोटी गुंतवणूक केली. या कंपनीने सेंट्रल बँक होम फायनान्स ही कंपनी Rs १६० कोटींना खरेदी केली. तसेच L & T फायनान्स या कंपनीकडून सप्लाय चेन विकत घेतली. स्टॅंडर्ड चार्टर्ड आशिया चीफ जसपालसिंग बिंद्रा यांनी सेंटरम ग्रुपच्या CEO पदाची सूत्रे हातात घेतली आहेत. आज TCS च्या मार्केट कॅपने Rs १२ लाख कोटींचा टप्पा पार केला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४९२६९ NSE निर्देशांक निफ्टी १४४८४ बँक निफ्टी ३१९९८ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

3 thoughts on “आजचं मार्केट –  ११ जानेवारी २०२१

  1. स्नेहल

    खूप खूप धन्यवाद मॅडम… तुमचे ज्ञान अफाट आहे… माझ्या सारख्या नवशिख्याला खूप छान माहिती आपल्या या प्रयोजनातून मिळत आहे.आपले शतशः आभार.

    Reply
  2. Shailesh Sharad Naik

    मॅडम, जस आपण निफ्टी बीज (Nifty BeeS) मध्ये SIP करतो तसं आपल्याला निफ्टी फायनान्शिअल इंडेक्स मध्ये SIP करता येऊ शकते का ?

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.