Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.
आजचं मार्केट – १२ जानेवारी २०२१
आज क्रूड US $ ५५.५९ प्रती बॅरल ते US $ ५६.७० प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७३.३१ ते US $१= Rs ७३.४१ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९०.५७ VIX २२.३८ PCR १.८३ होते. सोन्यामध्ये माफक तेजी होती. आज क्रूड तेजीत होते.
सरकारने चीनमधून आयात होणारे DIMETHYL FORMAMIDE वर अँटी डम्पिंग ड्यूटीची मुदत वाढवली. ह्यासंबंधात बालाजी अमाईन्स या कंपनीने तक्रार केली होती.
L & T इन्फोने IBM बरोबर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन विथ हायब्रीड क्लाऊडसाठी करार केला. त्यामुळे या शेअरमध्ये तेजी आली.
इंडिगो लेह दरभंगा, आग्रा अशा ७ डोमेस्टिक एअरपोर्टवरून विमान वाहतूक सुरु करणार आहे.
LASA SUPARGENARICS च्या रत्नागिरी प्लाण्टला GMP (गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस) ची सर्टिफिकेट मिळाले.
सरकार प्रत्येक PSU बँकेसाठी होल्डिंग कंपनी स्थापन करणार आहे. नवीन PSU पॉलिसीप्रमाणे या होल्डिंग कंपन्या काम करतील.
स्टील स्ट्रीप व्हील्सचे प्रॉफिट ६.२९ कोटींवरून Rs २८.७५ कोटी झाले.
१३ जानेवारी २०२१ रोजी विप्रो आणि इन्फोसिस या IT क्षेत्रातल्या दिग्गज कंपन्या आपले तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील.
इंडिगो पेंट्स या कंपनीचा IPO जानेवारी २०२१ च्या अखेरील येण्याची शक्यता आहे. म्हणून हळू हळू आता पेंट्स उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी येईल. अशियन पेंट्स बर्गर पेंट्स शालिमार पेंट्स, अक्झॉ नोबल, कन्साई नेरोलॅक. या सेक्टरमधील कंपन्यांचे व्हॅल्युएशन रिच आहे.
१५ जानेवारी २०२१ रोजी GAIL च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची शेअर बाय बॅक आणि लाभांशावर विचार करण्यासाठी बैठक बोलावली आहे.
नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशनकडून RITES या कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली.
या वर्षीच्या अंदाजपत्रकात स्क्रॅपेज पॉलिसी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑटो क्षेत्रातील शेअर्स मध्ये तेजी होती.
RBI ने नजीकचा भविष्यात होणाऱ्या NPAमधील वाढीविषयी चिंता व्यक्त केली NPA १४% राहतील असा अंदाज व्यक्त केला त्यामुळे बँकांच्या शेअरमध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.
आज कर्नाटक बँकेने त्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. NII Rs ६१४ कोटी तर प्रॉफिट Rs १३५ कोटी झाले. ग्रॉस NPA ३.१६% आणि नेट NPA १.९७% झाले. NII, प्रॉफिट यामध्ये वाढ झाली तर GNPA आणि NNPA यात घट झाली.
आज टाटा एलेक्सि या कंपनीचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले. प्रॉफिट Rs ७५.४ कोटी वरून Rs १०५ कोटी (QOQ), उत्पन्न Rs ४२३ कोटींवरून Rs ४७७ कोटी झाले.
भारत रसायन ही कंपनी Rs ११५०० प्रती शेअर या भावाने टेंडर रूटने २.२% शेअर्स बायबॅक करेल.
पॉवर ग्रीड या कंपनीने इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट IPO साठी सेबी कडे अर्ज केले.
DIPAM आता BALMER LAWRIE या कंपनीचे डायव्हेस्टमेन्ट करणार आहे. ही कंपनी सध्या ८ उदयोगात आहे. ही पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस क्षेत्रातील कंपनी असून रिफायनरी, ऑइल फिल्ड सर्व्हिसेस, ट्रॅव्हल आणि VACATION, इंडस्ट्रियल पॅकेजिंग, क्रीजेस आणि ल्युब्रिकंट्स, लेदर केमिकल्स, लॉजिस्टिक्स आणि लॉजिस्टिक्स इन्फ्रा आणि सर्व्हिसेस या बिझिनेसमध्ये आहे. ह्या कंपनीचे वेगवेगळे उद्योग अलग अलग रीतीने विकले जातील. SBI कॅप या कंपनीला ऍडव्हायझर म्हणून नेमले आहे.
आज डिसेम्बरसाठी CPI ( कन्झ्युमर प्राईस इंडेक्स) ४.५९% ( नोव्हेम्बरसाठी ६.९३%) होते. नोव्हेंबर २०२० महिन्यासाठी IIP -१.९ % (ऑक्टोबर २०२०साठी ४.२%) होते.
आंध्र शुगर ही वेगवेगळी केमिकल्स आणि साखरेचे उत्पादन करते. त्याचबरोबर रॉकेट्ससाठी लागणारे लिक्विड आणि सॉलिड प्रॉपेलंट बनवते. कंपनीचे ऑपरेटिंग मार्जिन सुधारले आहे डिसेंबर २०२० च्या हाय Rs ३४७ वर तसेच ऑगस्ट २०२०च्या नंतर ६ महिन्याच्या हायपेक्षा जास्त CMP ( करंट मार्केट प्राईस) वर चालू आहे. चार्टमध्ये हेड आणि शोल्डर पॅटर्न तयार झाला आहे. शेअरमध्ये ब्रेकआऊट होण्याची शक्यता आहे.
आज BSE निर्देशांक सेन्सेक्स ४९५१७ NSE निर्देशांक निफ्टी १४५६३ बँक निफ्टी ३२३३९ वर बंद झाले.
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!
खूपच छान माहिती देतात आजी तुम्ही आम्हा सारख्या नवीन share मार्केट मध्ये येणार्यांना , खूप खूप धन्यवाद 🙏