Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.
आजचं मार्केट – १३ जानेवारी २०२१
आज क्रूड US $ ५६.७८ प्रती बॅरल ते US $ ५७.२९ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७३.१२ ते US $१=७३.२१ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९०.२१ VIX २३.८५ PCR १.८० होते.
आज सौदी अरेबियाने सांगितले की उत्पादनातली कपात चालू राहील. USA मधेही क्रूडचा साठा ५८ लाख बॅरलनी कमी झाला. आज क्रूडने US $ ५७ प्रती बॅरलचा टप्पा पार केला. जगात सर्वत्र व्हॅक्सिनेशन सुरू झाले आहे.त्यामुळेही क्रूडसाठी मागणी वाढली. आज सोन्याच्या दरात फारसा बदल झाला नव्हता.
आज मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. त्यात स्कुटर्स इंडिया ही कंपनी बंद करण्याला मंजुरी मिळाली. MSTC स्कुटर्स इंडियाच्या प्रॉपर्टी विकण्यासाठी व्यवस्थापन करेल. HAL कडून फायटर एअरक्राफ्ट खरेदी करण्यावरही विचार विनिमय झाला.
आज मायनिंग क्षेत्रातील रिफॉर्म्सला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. ५०० विविध खनिजांच्या खाणींचा लिलाव केला जाईल. सरकारने खनिज उत्पादन दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
सरकारच्या या निर्णयाचा फायदा ओडिशा मिनरल्स, MOIL, हिंदुस्थान कॉपर, NALKO GMDC या कंपन्यांना होणार असल्यामुळे या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती.
टेसला ही ऑटोक्षेत्रातील ख्यातनाम कंपनी बंगलोर येथे आपला प्लांट सुरु करणार आहे. सध्या त्यांनी R & D साठी ऑफिस चालू केले आहे. याचा परिणाम टाटा केमिकल्स आणि हिमाद्री केमिकल्स यांच्यावर होईल. या दोन कंपन्या इलेक्ट्रिक कार्ससाठी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करत आहेत.
येत्या अंदाजपत्रकात पॉवर इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर्सना विविध सवलती दिल्या जातील. त्यांना PLI योजना लागू केली जाईल. याचा फायदा थरमॅक्स, ABB, BHEL, सिमेन्स, L &T यांना होईल.
टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्सच्या किंमती वाढवणार आहे.
कोल इंडियाने आपले FY २१ साठी भांडवली गुंतवणुकीचे लक्ष्य ३०% ने वाढवून Rs १३००० कोटी केले आहे.ही गुंतवणूक ते मशिनरी, जमीन, रेल्वे साइडिंग मध्ये करतील.
आज इन्फोसिसचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल आले. कंपनीचे उत्पन्न Rs २५९२७ कोटी ( Rs २४५७५ कोटी) , प्रॉफिट Rs ५१९७ कोटी ( Rs ४८४५ कोटी) मार्जिन २५.४%(२५.३%) कॉन्स्टन्ट करन्सी ग्रोथ ५.३% होती. US $ उत्पन्न US $ ३५१.६ कोटी (US $ ३३१.२ कोटी). इन्फोसिसने रेव्हेन्यू गायडन्स ४.५% ते ५% तर मार्जिन गायडन्स २४% ते २४.५% दिला आहे. कंपनीने ‘कार्टर डिजिटल’ ही डिझाईन एजन्सीमध्ये स्टेक खरेदी केला..
आज विप्रो या कंपनीचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले. प्रॉफिट Rs २९७० कोटी झाला. EBIT मार्जिन २१.६% US $ उत्पन्न US $ २०७ कोटी झाले. IT सर्व्हिसेस रेव्हेन्यू Rs १५३३३ कोटी, कॉन्स्टन्ट करन्सी ग्रोथ ३.४% होती.
भारती एअरटेलला डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनने कंपनीसाठी FI ची लिमिट १००% मंजूर केली आहे. कंपनीने आज स्टॉक एक्स्चेंजना सांगितले की आम्ही आम्हाला १००% FI गुंतवणुकीसाठी मिळालेली मंजुरी आम्ही डिपॉझिटरीजना कळवणार आहोत. यामुळे विविध निर्देशांकात कंपनीचे वेटेज वाढेल. त्यामुळे जेव्हा या निर्देशांकाचे रीबॅलन्सिंग होईल तेव्हा भारती एअरटेलमध्ये मोठी गुंतवणूक येण्याची शक्यता आहे. यामुळे आज भारती एअरटेलच्या शेअरमध्ये तेजी आली.
CESC (Rs ४५ प्रती शेअर लाभांश), GTPL हाथवे, हरिता सीट्स, हरिता सीट सिस्टिम्स ह्या कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
सरकारी मालकीच्या IRFC ( इंडियन रेल्वे फायनान्स कॉरपोरेशन) या कंपनीचा Rs ४६३३.४० कोटींचा IPO १८ जानेवारीला ओपन होऊन २० जानेवारीला बंद होईल. याचा प्राईस बॅण्ड Rs २५ ते Rs २६ असून मिनिमम लॉट ५७५ शेअर्सचा आहे. ही कंपनी मुख्यतः रेल्वेला रोलिंग स्टॉक घेण्यासाठी फायनान्सची व्यवस्था करते. ह्या कंपनीचे NBFC म्हणून RBI कडे रजिस्ट्रेशन आहे आणि ही इन्फ्रास्ट्रक्चर लिजिंग फायनान्स या प्रकारात मोडते. हा OFS असल्यामुळे या IPO ची प्रोसिड्स सरकारला मिळतील;
GMM फौडलर या कंपनीची लाभांशावर विचार करण्यासाठी २० जानेवारी २०२१ रोजी बैठक आहे. या लाभांशासाठी रेकॉर्ड डेट .२९ जानेवारी असेल.
DCM श्रीराम या कंपनीची १९ जानेवारी २०२१ रोजी लाभांशावर विचार करण्यासाठी बैठक आहे.
SRF या कंपनीची २१ जानेवारी रोजी लाभांशावर विचार करण्यासाठी बैठक आहे. लाभांशासाठी १ फेब्रुवारी २०२१ ही रेकॉर्ड डेट आहे.
सुवेन फार्मास्युटिकल या कंपनीमध्ये ३०% स्टेक ( प्रमोटर्सच्या ६०% स्टेक पैकी) घेण्यासाठी BLACKSTONE, वॉरबर्ग पिनकस, आणि CVC कॅपिटल पार्टनर्स यांनी स्वारस्य दाखवले आहे. हा स्टेक खरेदी केल्यानंतर २६% स्टेक साठी ओपन ऑफर आणली जाईल. यामुळे या गुंतवणूकदारांनी कंपनीतील ५६% स्टेक Rs ६५०० कोटींना खरेदी केल्यासारखे होईल.
आज मी तुम्हाला नेलकास्ट या कंपनीचा मंथली चार्ट देत आहे. ही ऑटो अँसिलिअरीज क्षेत्रातील कंपनी असून कमर्शियल वेहिकल्स आणि ट्रॅक्टर्सला कंपोनंट पुरवते. ह्या कंपनीच्या ग्राहकांच्या यादीत टाटा मोटर्स अशोक लेलँड, M & M या कंपन्यांचा समावेश आहे. कोरोनाच्या काळात या कंपनीने आपल्या उत्पादन क्षमतेत वाढ केली. मेट्रो आणि भारतीय रेल्वेलाही पुरवठा करतात. उत्पादने इलेक्ट्रिक वेहिकल्समध्येही उपयोगी आहेत. प्रमोटर्स होल्डिंग ७४.५ % आहे. कंपनीचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले येतील. त्यामुळे या शेअरमध्ये, ऑटो क्षेत्रासाठी असलेल्या मागणीचा विचार करता ब्रेकआऊट अपेक्षित आहे.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ४९२८९ NSE निर्देशांक निफ्टी १४५६४ बँक निफ्टी ३२५७४ वर बंद झाले.
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!
Respected Madam,
You are really awesome, I am reading your blogs daily without fail. These are giving very valuable information to a new retailer like me.
Regards
Sachin Autade
Which are the business news sites or channels which you feel we should also read?
Ajjcha blog kdhi ….