आजचं मार्केट –  १८ जानेवारी २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट –  १८ जानेवारी २०२१

आज क्रूड US $ ५४.६५ प्रती बॅरल ते US $ ५४.८९ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७३.०७ ते Rs ७३.२८ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९०.७६ VIX २५.३४ आणी PCR १.१९ होते.

आज USA मधील मार्केट बंद होती.

चीनची चौथ्या तिमाहीसाठी GDP ग्रोथ २.६% (QOQ) आणि ६.५ % (YOY) होती. पण चीनमध्ये काही शहरात तसेच UK ,जर्मनी आणि यूरोपातील इतर काही देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे निर्बंध लावण्यात आले. तसेच US $ मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या आणि क्रूडच्या मागणीत घट झाली. त्यामुळे आज सोने आणि क्रूड मंदीत होते.

आज भारतीय मार्केटमध्ये तेजी आणि मंदीचा उनपावसासारखा खेळ चालू होता.

भारतातील सर्व शहरात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यामुळे महागाई वाढेल असे वाटले. नव्या वर्षाच्या पहिल्या १८ दिवसांत ५ वेळेला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे .

विक्स, मार्केटच्या वेळात सतत वाढत असल्यामुळे वोलतालीटी सतत वाढत होती. मार्केटच्या वेळात दोनदा मार्केट पडून वाढले आणि शेवटी पुन्हा पडले. या तेजी मंदीच्या लाटा ५०० ते ६०० पाईण्टच्या होत्या.

भारताची निर्यात वाढली पण आयात वाढल्यामुळे ट्रेड गॅप वाढली. सोन्याच्या आयातीत ८१% वाढ झाली.

वेदांताच्या दक्षिण आफ्रिकेमधील खाणीत काम सुरु झाले .

HDFC बँकेचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. प्रॉफिट ,डिपॉझिट आणि ऍडव्हान्सेस मध्ये चांगली वाढ झाले. NPA ची विक्री केल्यामुळे GNPA आणि NNPA कमी झाले. निकाल चांगले आल्यामुळे शेअरमध्ये लक्षणीय तेजी होती.

सरकार इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंगसाठी Rs १०००० कोटींची PLI योजना जाहीर करेल.

स्टार सिमेंटच्या पश्चिम बंगालमधील सिलिगुरी येथील ग्राइंडिंग युनिट सुरु झाले.

JBM ऑटो या कंपनीला दिल्ली ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटीकडून ७०० बसेसची ऑर्डर मिळाली.

आज IRFC चा IPO ओपन झाला. हा IPO २० जानेवारी २०२१ पर्यंत ओपन राहील.

वेंकीजनी सांगितले की ऑर्गनाईझ्ड पोल्ट्री सेक्टरमध्ये आता पर्यंत बर्ड फ्लू चा प्रभाव आढळला नाही. आमचे उत्पादन नेहेमीच्या स्तरावर चालू आहे. कंपनीच्या या निवेदनानंतर शेअरमध्ये थोडा वेळ तेजी आली.

दिल्लीमध्ये ATF च्या किमती Rs १५१२.३८ प्रती किलो लिटर एवढ्या वाढला. इंडिगोचा मार्केट शेअर ५३.०९% आणि

पॅसेंजर लोड ७१.५ तर स्पाईस जेटचा मार्केट शेअर १३% आणि पॅसेंजर लोड ७८% होते.

पिरामल इंटरप्रायझेस च्या ‘DHFL’ या कंपनीच्या ऑफरला कमिटी ऑफ क्रेडिटर्सनी मान्यता दिली.

CAPLIN फार्मा या कंपनीने JAMP फार्मा या कंपनीबरोबर कॅनडा मध्ये औषध विक्रीसाठी स्ट्रॅटेजिक पार्टनरचा करार केला.

अडानी ग्रीन या कंपनीमध्ये फ्रान्स ची कंपनी ‘TOTAL’ ही २०% स्टेक घेणार आहे. त्यामुळे त्यांना अडाणी ग्रीनच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स वर एक सीट मिळेल. अडानी ग्रीनच्या शेअर्समध्ये तेजी होती.

UK मध्ये 5G रोल आऊट करण्यासाटी TCS ने THREE UK बरोबर करार केला. THREE UK ही UK मधील टेलिकॉम क्षेत्रातील मोठी आणि नावाजलेली कंपनी आहे.

ग्रॅव्हिटी या कंपनीला सोनीर कॉर्पोरेशन कडून Rs १२५ कोटींची ऑर्डर मिळाली. त्यामुळे कंपनीच्या शेअरमध्ये तेजी आली.
5G सेवा लाँच करण्यासाठी आवश्यक असलेल्या तयारीच्या ड्राफ्टला २२ जानेवारी पर्यंत स्टँडिंग कमिटी अंतिम रूप देईल.
गणेशन हायटेक डायग्नॉस्टिक्स ही चेन्नई बेस्ड कंपनी मेट्रोपोलीस हेल्थ केअर या कंपनीने Rs ५०० कोटींना विकत घेतली.
अपोलो हॉस्पिटल्सने त्यांचा Rs १५०० प्रती शेअर या भावानं QIP इशू आणला. डोमेस्टिक म्युच्युअल फंड्स, इन्व्हेस्टमेंट बँकर्स आणि सॉव्हरिन फन्ड्स यांनी या QIP मध्ये स्वारस्य दाखवले.

साखरेचे उत्पादन ४८७ साखर कारखान्यात सुरु झाले. १ ऑक्टोबर २०२० ते १५ जानेवारी २०२१ या काळात साखरेचं १.४३ कोटी टन एवढे उत्पादन झाले.

येस बँकेची २२ जानेवारी २०२१ रोजी फंड उभारण्यावर विचार करण्यासाठी बैठक आहे.

२२ जानेवारी २०२१ रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज आणि HDFC लाईफ या कंपन्या त्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील.

अडाणी एंटरप्रायझेस ही कंपनी नवी मुंबई विमानतळाची या आठवड्यापासून देखभाल करेल.

ब्रिगेड ही कंपनी हैदराबादमध्ये ११.८ एकर जमिनीत, प्रोजेक्ट लाँच करणार आहे.

शक्ती पंप्स ही कंपनी तोट्यातून फायद्यात आली. L & T फायनान्सियल होल्डिंग्स आणि शॉपर्स स्टॉप यांचे तिसर्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते. रॅलीज इंडिया या कंपनीचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. कंपनीला ६.१ कोटींचा वन टाइम गेन झाला. हाथवे केबलचा निकाल सर्वसाधारण आला. माईंड ट्री, ट्रायडन्ट या कंपन्यांचे तिसर्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

LIC चे व्हॅल्युएशन Rs १० लाख कोटी ते Rs १२ लाख कोटी होईल. सरकारचा LIC मध्ये स्टेक ( कॅपिटल)Rs १०० कोटीं आहे . या कॅपिटलच्या हिशेबाने IPO मध्ये शेअरची किंमत खूप ठेवावी लागेल. हि किंमत कमी करण्यासाठी सरकार LIC मध्ये गुंतवणूक करेल येत्या अंदाजपत्रकात या रकमेची तरतूद केली जाईल.

मी तुम्हाला कोटक महिंद्रा बँकेचा चार्ट देत आहे. या शेअरने १० DMA , २० DMA, ५० DMA चा स्तर सोडला. या चार्टमध्ये शॉर्ट टर्म ब्रेक डाऊन दिसत आहे. आजची हाय प्राईस Rs १८७० लो प्राईस Rs १८३८ आहे. पण मध्यम मुदत आणि दीर्घ मुदतीचा टेन्ड सकारात्मक आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४८५६४ NSE निर्देशांक निफ्टी १४२८१ बँक निफ्टी ३१८११ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.