आजचं मार्केट –  १९ जानेवारी २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट –  १९ जानेवारी २०२१

आज क्रूड US $ ५४.९९ प्रती बॅरल ते US $ ५५.३५ प्रती बॅरल या दरम्यान तर रूपया US $१= Rs ७३.१७ ते US $१=Rs ७३.२७ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९०.६६ VIX २४.४० आणि PCR १.१२ होते.

आज USA मधील मार्केट तेजीत होती. भारतीय मार्केटमध्ये आज ट्रेडर्स/ गुंतवणूकदारांचा आनंद द्विगुणीत झाला.. कारण भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाबरोबरचा चौथा कसोटी सामना आणि कसोटी सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर जिंकली. आणि भारतीय मार्केटने मंदीची मरगळ टाकून देऊन तेजीची शाल चढवली. त्यामुळे मार्केट्मधील तेजीची मजा काही न्यारीच झाली.

मार्केटमधील आजच्या तेजीत सातत्य होते. चीनचे GDP ग्रोथचे आकडे चांगले आले. जगातील जवळजवळ सर्व देशातील कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तेथील सरकारे रिलीफ पॅकेजिस जाहीर करत आहेत. त्यामुळे भारतात परदेशी गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचा प्रवाह सातत्याने येत आहे. हा लिक्विडिटीचा प्रवाह अजून काही महीने तरी चालू राहील अशी शक्यता आहे.मध्ये काही दिवस त्याच्या रकमेत बदल होऊ शकतो.लसीकरण चालू झाल्यामुळे गुंतवणूकदारांच्या मनातील भीती आणि अनिश्चितता हळू हळू दूर होत आहे.भारतातील कंपन्यांचे तिसर्या तिमाहीचे निकाल चांगले येत आहेत तसेच व्यवस्थापनाच्या गायडंसवरून आणि त्यांच्या मुलाखतीतून आता वाईट काळ मागे पडला आहे आणि भविष्य चांगले आहे असा विचार प्रवाह आढळतो. आता अंदाजपत्रकात जर काही मार्केटला पसंत न पडणाऱ्या गोष्टीचा समावेश झाला किंवा आताची शेअर्सची व्हॅल्युएशन इन्फ्लेएटेड आहे असे मार्केटला वाटले तर मात्र करेक्शन येण्याची शक्यता आहे. तसेच आता बजेटमध्ये काय असेल या उत्सुकतेपोटी मार्केटमध्ये खरेदी होत आहे, बजेटचा इव्हेंट झाल्यावर मार्केटमध्ये मंदी येण्याची शक्यता आहे.

आजपासून IRFC या कंपनीच्या IPOचा दुसरा दिवस. आज हा IPO पूर्णपणे भरला तर रिटेल कोटा १.२५ पट भरला.
उद्यापासून इंडिगो पेंट्स या डेकोरेटिव्ह पेंट्स क्षेत्रातील कंपनीचा Rs १००० कोटींचा IPO ओपन होऊन २२ तारखेला बंद होईल. या IPO चा प्राईस बँड १४८८ ते Rs १४९० असून मिनिमम लॉट १० शेअर्सचा आहे. ह्या कंपनीच्या बिझिनेसवर कोरोना काळादरम्यान किमान परिणाम झाला कारण या कंपनीचा बिझिनेस २७ छोट्या शहरातून विस्तारला आहे. त्यामुळे त्यांना मार्केटिंग आणि जाहिरात खर्च कमी येतो. कंपनी टिनटिन्ग (TINTING) मशीन आणि GYRO SHAKER क्षमतेचा विस्तार करणार आहे तसेच फ्लोअर पेंटिंग या क्षेत्रात पदार्पण करत आहे. कंपनी सतत नवीन प्रॉडक्ट्स लाँच करत असते. कंपनी IPO च्या प्रोसीड्समधून त्यांना सध्या असलेले कर्ज फेडणार असल्यामुळे DEBTफ्री होईल. कंपनीचे EBIT मार्जिन १८.५% आहे. ( पेंट्स इंडस्ट्रीमध्ये हे मार्जिन १७% च्या आसपास आहे). ROE २४% ते २७% आहे.
इंडिगो पेंट्सचा IPO येत असल्यामुळे पेंट्स उद्योगातील इतर कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती.

२१ जानेवारी २०२१ पासून होम फर्स्ट फायनान्स या होमलोन कंपनीचा IPO ओपन होऊन २५ जानेवारी २०२१ रोजी बंद होईल. हा इशू Rs ११५३.७२ कोटींचा असून यात फ्रेश इशू ऑफ शेअर्स Rs २६५ कोटींचा असून Rs ८८८.७२ कोटींची OFS असेल ( ट्रू नॉर्थ, GIC, BESSEMAR हे आपला ५०% स्टेक विकत आहेत).

प्राईस बँड Rs ५१७ ते ५१८ असून मिनिमम लॉट २८ शेअर्सचा आहे.ही कंपनी अफोर्डेबल होम क्षेत्रात गृह कर्ज देते.
L &T फायनान्स या कंपनीचा राईट्स इशू १ फेब्रुवारी २०२१ ला ओपन होऊन १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत ओपन राहील.हा इशू Rs ३००० कोटींचा असून कंपनी वर्तमान शेअरहोल्डर्सना Rs ६५ प्रती शेअर या भावाने त्यांच्या जवळ असलेल्या ७४ शेअर्ससाठी १७ राईट्स शेअर्स ऑफर करत आहे. या राईट्स इशूची रेकॉर्ड डेट २२ जानेवारी २०२१ आहे. कंपनीने स्पष्ट केले आहे की ५ किंवा यापेक्षा कमी शेअर्स असलेल्या शेअरहोल्डर्सना १ राइट्सची ऑफर केली जाईल.

गोवा कार्बन या कंपनीने त्यांच्या पारादीप येथील युनिटमध्ये काम सुरु केले.

बँक ऑफ महाराष्ट्र,हट्सन ऍग्रो, CSB बँक, अलेम्बिक फार्मा,गेटवे डिस्ट्रिपार्क, DCM श्रीराम, टाटा मेटॅलिक, यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. स्नोमॅन लॉजिस्टिक्स तोट्यातून फायद्यात आली.

एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया बरोबर अडानी एंटरप्रायझेस ने जयपूर तिरुवअनंतपूरम, गौहाती या विमातळांसाठी ५० वर्ष मुदतीचा कन्सेशन करार केला. लखनौ मंगलोर आणि अहमदाबाद हे विमानतळही अडानीना व्यवस्थापनासाठी दिले आहेत.

मारुती या ऑटो क्षेत्रातील कंपनीने त्यांच्या विविध मॉडेल्सच्या किमती Rs ५००० ते Rs ३००००च्या दरम्यान वाढवल्या.
टाटा सन्सनी टाटा केमिकल्समधला स्टेक २९.३९% वरून ३१.९०% पर्यंत वाढवला.

सरकारने टेलिकॉम इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्ससाठी प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह स्कीम जाहीर केली.त्यासाठी टेलिकॉम इक्विपमेंटचे ५ विभागात वर्गीकरण केले आहे. ५ वर्षांसाठी वाढलेल्या विक्रीवर ७% एवढी ही इन्सेन्टिव्ह दिली जाईल.
डिस्कव्हर इंडिया ही योजना सरकारने फार्मा उद्योगासाठी विशेषतः API फॉर्म्युलेशन्सचे उत्पादन करण्यासाठी जाहीर केली. या मध्ये करात सवलत,निर्यात वाढवणे, सबसिडी देणे याचा समावेश आहे.

सरकारने इनोव्हेशन पॉलिसी जाहीर केली . यात औषध क्षेत्रा नवीन औषधे शोधणे त्यासाठी संशोधन आणि विकास करणे यांचा समावेश आहे. सरकारच्या मंत्रालयातही R & D सेल स्थापन केला जाईल.

आज रिअल्टी क्षेत्रात तेजी होती. DLF चा शेअर ६ वर्षाच्या कमाल स्तरावर होता.

उद्या २१ जानेवारी २०२१ रोजी फेडरल बँक, हॅवेल्स, HDFC AMC, बजाज फायनान्स, तसेच L & T टेक आणि २२ जानेवारी रोजी एशियन पेंट्स आणि बजाज ऑटो आपले तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील.

आज माईंड ट्रीच्या व्यवस्थापनाने सांगितले की त्यांच्या ऑर्डर बुकने US $ १ बिलियनचा टप्पा पार केला आहे. आमच्या डील्सची रक्कम तसेच मुदत वाढते आहे. UK आणि युरोप मधून येणारे उत्पन्न वाढेल. आम्ही UK आनि यूरोप मध्ये गुंतवणूक करत आहे. आम्ही ऑटोमेशन डिजिटलायझेशन यावर फोकस करत आहोत. हेल्थकेअरमध्ये आता टेक्नॉलॉजीचे डिसरप्शन होत आहे आता हेल्थकेअर टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रातही आम्ही पदार्पण करीत आहोत. सध्या तरी हे प्राथमिक अवस्थेत असून आमची जुळवाजुळव चालू आहे. आमचे ऑपरेशनल मार्जिन २०+% असून ते सस्टेनेबल आहे. माइंडट्रीचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आल्यामुळे त्यांच्या शेअरमध्ये लक्षणीय तेजी होती.

आज मी तुम्हाला ओबेराय रिअल्टी या कंपनीचा चार्ट देत आहे. या चार्टमध्ये बर्याच दिवसांच्या मंदीनंतर मॉर्निंग स्टार हा पॅटर्न तयार झाल्याचे दिसत आहे. लोअर टॉप लोअर बॉटम हा ट्रेण्ड निगेट झाल्याचे दिसते. त्यामुळे आता यात ट्रेंड रिव्हर्सल होऊन तेजी सुरु होण्याची शक्यता दिसते . हा पॅटर्न तीन कॅण्डलनी तयार होतो. शेवटच्या तीन कँडल पहा यामध्ये मोठी पहिली कँडल मंदीची दुसरी कँडल मंदी कमी होत गेलेली आणि तिसरी कँडल मंदी संपून तेजी सुरु झाली असे दर्शवते. BSE निर्देशांक सेन्सेक्स ४९३९८ NSE निर्देशांक निफ्टी १४५२१ वर बँक निफ्टी ३२४२५ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

One thought on “आजचं मार्केट –  १९ जानेवारी २०२१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.