आजचं मार्केट –  २० जानेवारी २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट –  २० जानेवारी २०२१

आज क्रूड US $ ५६.२० प्रती बॅरल ते US $ ५६.३१ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७३.०३ ते US $१=Rs ७३.१६ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९०.३७ VIX २२.४८ तर PCR १.३४ होते.

आज USA मध्ये बिडेन राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतील.एक नवा अध्याय चालू होईल. त्यांची धोरणे समजावून घ्यायला थोडा वेळ जाऊ द्यावा लागेल.उपराष्ट्राध्यक्ष म्हणून कमला हॅरिस शपथ घेतील.

आज मार्केटने आपला तेजीचा ट्रेंड चालू ठेवला. IT, ऑटो, टायर आणि टाटा ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी होती.कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीसाठी येणारे चांगले निकाल या तेजीत भर घालत होते. आज सेन्सेक्स कमाल स्तरावर होते. क्रूड आणि सोन्यामध्ये माफक तेजी होती.

USA आणि तुर्कस्थान मधून आयात होणाऱ्या सोडा ASH वर अँटी डम्पिंग ड्युटी लावली जाण्याची शक्यता आहे. DCW आणि GHCL या कंपन्यांनी ही मागणी केली होती.

ऑस्ट्रेलिया कॅनडा आणि युरोप मधून आयात होणाऱ्या न्यूज प्रिंट रोलवर अँटी डम्पिंग ड्युटी लावली जावी अशी शिफारस DGTR नी केली आहे. याचा फायदा इमामी पेपर, स्टार पेपर, इत्यादी पेपर उत्पादक कंपन्यांना होईल.

आज मारुतीने ‘जिमनी’ ( JIMNY) चे उत्पादन आणि आयात सुरु केली. १८४ युनिट्स ची पहिली शिपमेंट पेरू आणि कोलंबिया ला रवाना झाली.

LIC ने M & M मधील आपला स्टेक १०.५७% वरून ८.६% पर्यंत कमी केला.

L T फुड्सच्या सबसिडीअरीने नेदर्लंड्सच्या LEEV या कंपनीत ३०% स्टेक खरेदी केला.

टाटा कम्युनिकेशन मधील(विदेशसंचार निगम मध्ये असलेला) आपला २६.१२ % स्टेक सरकार OFSद्वारे आणि काही स्टेक टाटांना विकून टाकणार आहे. OFS साठी ३ फेब्रुवारी २०२१ पर्यंत बीड सबमिट होतील आणि ४ फेब्रुवारी २०२१ रोजी उघडल्या जातील. ही सर्व प्रक्रिया २० मार्चपर्यंत पुरी होईल. यातून सरकार Rs ८००० कोटी उभारेल अशी अपेक्षा आहे.
दिलीप बिल्डकॉन आणि IRB इन्फ्रा यांनी टोल कलेक्शनमध्ये चांगली वाढ होत आहे सांगितले. IRB इंफ्राने १०%(YOY) वाढ होईल असे सांगितले. दिलीप बिल्डकाँनने २०२५ पर्यंत आपले वार्षिक टोल कलेक्शनमध्ये लक्षणीय वाढ होईल असे सांगितले.

सरकार अंदाजपत्रकात इलेक्ट्रिक कार्सच्या आयातीवर इम्पोर्ट ड्युटी लावण्याची शक्यता आहे. त्यात CBU (कंप्लिटली बिल्ट अप) आणि SKD ( सेमी KNOCKED डाऊन) कार्सच्या आयातीचा समावेश असेल. ACBC मोटार ACBC चार्ज यांच्या आयातीवरही ड्युटी लावली जाईल. ह्याचा फायदा डोमेस्टिक इलेक्ट्रिक कार मॅन्युफॅक्चर्सना होईल.

RBI NBFC च्या वर्किंगसाठी गाईडलाईन्स जारी करणार आहे. त्यामुळे आता NBFC मध्ये व्हावी तशी खरेदी होत नाही. टर्म डिपॉझिट स्वीकारणाऱ्या आणि फक्त लोन देणाऱ्या असे NBFC चे वर्गीकरण केले जाते. कोणत्याही NBFC ला बचत आणि करंट खाते ओपन करण्याची परवानगी नाही. मार्केट या गाईडलाईन्सची उत्सुकतेने वाट पाहात आहे.

टाटा मेटॅलिक्सचे टाटा स्टील लॉन्ग प्रॉडक्टस मध्ये मर्जर होणार आहे. टाटा मेटॅलिक्सच्या १० शेअर्सना टाटा स्टील लॉन्ग प्रॉडक्टस चे १२ शेअर्स मिळतील . दोन्ही कंपन्यांचे प्लांट्स जवळ जवळ असल्याने ( जमशेदपूर आणि खरगपूर) सिनर्जी आणि कॉस्टसेविंग होईल. टाटा मेटॅलिक्सच्या व्यवस्थापनाने सांगितले की आमच्याकडे १८ महिन्याचे ऑर्डर बुक आहे. कोरोनाच्या काळात आमच्या स्टीलडक्ट पाईपच्या बिझिनेसमध्ये थोडी घट झाली होते. कारण हे पाईप्स वॉटर आणि सॅनिटेशन यांच्यात वापरले जातात. लॉकडाऊनमुळे सरकारच्या या प्रकारच्या कामात घट झाली.कंपनीचा तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

फेडरल बँक, सुंदरम फासनर्स ( Rs १२ प्रती शेअर लाभांश) फिलिप्स कार्बन ( Rs ७ प्रति शेअर लाभांश) हिंदुस्थान झिंक, हॅवेल्स, HDFC AMC, न्यू जेन सॉफ्टवेअर, स्टरलाईटटेक्नॉलॉजीज, बजाज फायनान्स , VST इंडस्ट्रीज या कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीत निकाल चांगले आले.

आज IRFC या कंपनीचा IPO पूर्णपणे भरला. तसेच इंडिगो पेन्ट्सचा IPO ही पहिल्या दिवशी पूर्णपणे भरला.

कोलगेट या कंपनीचा चार्ट देत आहे. लोअर टॉप आणि लोअर बॉटमचा पॅटर्न निगेट झाला आहे. ह्या शेअर्समधील करेक्शन थांबण्याची चिन्हे दिसत आहेत. या चार्टमधे बुलिश हरामी पॅटर्न तयार झाला आहे. एक आठवड्याच्या मंदी नंतर आधीच्या मंदीच्या कॅंडलमध्ये सामावणारी तेजीची कँडल तयार झाली आहे. हा पॅटर्न ट्रेंड रिव्हर्सल दाखवतो. मंदी संपून तेजी सुरु होईल असे हा पॅटर्न दाखवतो. ह्या पॅटर्नच्या कन्फर्मेशनसाठी पुढे तयार होणारी कँडल बघावी लागते

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४९७९२ NSE निर्देशांक निफ्टी १४६४४ आणि बँक निफ्टी ३२५४३ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.