आजचं मार्केट –  २१ जानेवारी २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट –  २१ जानेवारी २०२१

आज क्रूड US $ ५५.६५ प्रती बॅरल ते US $ ५५.९१ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७२.९६ ते US $१=Rs ७२.९९ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९०.२६ VIX २१.७५ PCR १.३६ होते.

आजपासून USA मध्ये बिडेन युग सुरु झाले. सामोपचार,समन्वय, सर्व समावेशक आणि एकोप्याने अडचणींशी मुकाबला करणे हे ध्येय असेल.

आज भारतीय मार्केटमध्ये सेन्सेक्सने इंट्राडे ५०००० चा टप्पा पार केला.सेन्सेक्स ५०००० झाला या आनंदावर सेरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीमुळे विरजण पडले आणि मार्केट पडायला सुरुवात झाली. बघता बघता तेजी नाहीशी होऊन मार्केट ४०० पाईंट मंदीत गेले. सेंसेक्सने आज हा एक महत्वाचा टप्पा पार केला. २०१९ मध्ये सेन्सेक्स ४०००० होते. २०२१ मध्ये ५०००० झाले. या तिमाहीचे आलेले कॉर्पोरेट निकाल पाहता आता अर्थव्यवस्था आणि मार्केट या मध्ये काहीतरी समन्वय आहे असे म्हणता येईल. आतापर्यंत आलेले तिसऱ्या तिमाहीचे सर्व निकाल एखादा अपवाद वगळता अतिशय चांगले आले आहेत.

HDFC ने ‘गुड होस्ट’ मधील त्यांचा २४.४८% स्टेक Rs २३२.८१ कोटींना विकण्यासाठी करार केला. ‘गुड होस्ट’ ही कंपनी विद्यार्थ्यांच्या राहण्याचे व्यवस्थापन करते.

सिमेन्सने ईलेक्ट्रीक व्हेइकल मॅन्युफॅक्चरिंगसाठी ओला बरोबर करार केला. भारतातील सर्वात जास्त प्रगत उत्पादन केंद्र Rs २४०० कोटी गुंतवणूक करून तामिळनाडू राज्यात होईल. हे स्कुटर उत्पादन करणारे सर्वात मोठे केंद्र असेल. १०००० लोकांना नोकऱ्या मिळतील. या युनिट मध्ये २ मिलियन स्कुटर्सचे उत्पादन होईल.

फ्लिप कार्टने A B फॅशन मध्ये स्टेक खरेदी करण्यासाठी CCI( कॉम्पिटिशन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) ची मंजूरी मिळाली. AB फॅशन ८% स्टेक फ्लिप कार्टला Rs १५०० कोटींना विकणार आहे

रिलायन्स आणि फ्युचर डीलला सेबीने मंजुरी दिली. पण अमेझॉनचे म्हणणे शेअरहोल्डर्सना अवगत करून देऊन त्यांची या डीलसाठी मंजुरी घ्यावी लागेल.

एक्सिस बँकेला मॅक्स लाईफ मध्ये स्टेक खरेदी करण्यासाठी मंजुरी मिळाली. त्यामुळे मॅक्स ग्रुपचे शेअर्स आज तेजीत होते.
NALCO ही कंपनी २७ जानेवारी २०२१ रोजी शेअर बायबॅक वर विचार करेल.

आवास फायनान्सियर्स, मान इंडस्ट्रीज, कजरिया सिरॅमिक्स ( Rs १० अंतरिम लाभांश) , इंडो काउंट, एशियन पेंट्स, बजाज ऑटो, JSPL ( कंपनी तोट्यातून फायद्यात आली.) SRF ( Rs १९ प्रती शेअर लाभांश) या कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

वेस्टलाइफ, ओरिएंट हॉटेल्स, यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.

इंडिया ऍसेट रिकव्हरी मॅनेजमेंट मधील १९.९% स्टेक HDFC च्या सबसिडीअरीने विकला.

बंधन बँकेचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल सर्व साधारण होते.

आज मी तुम्हाला बंधन बँकेचा चार्ट देत आहे . आज बंधन बँकेने १०,२०,५०,१०० DMA हेवी व्हॉल्यूमनी तोडले आणि हा शेअर वीक झाला. चार्ट मध्ये ब्रेकडाऊन दिसत आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४९६२४ NSE निर्देशांक निफ्टी १४५९० बँक निफ्टी ३२१८६ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

2 thoughts on “आजचं मार्केट –  २१ जानेवारी २०२१

 1. Vijay Vartak

  नमस्कार.
  आपले रोजचे बाजाराचे विश्लेषण सुंदर व उत्तम मांडणी ही असते. माझ्या सारख्या नवशिक्याला यांचा फार उपयोग होतो. रोजचा चार्ट व विश्लेषण उपयुक्त आहे.
  रविवारीय समालोचन हे वेगवेगळे चार्ट व वेगळे candle stick patterns दिल्यास फार फायदेशीर राहील. उत्तम माहिती मिळेल. कृपया यांचा विचार करावा ही नम्र विनंती. धन्यवाद.
  विजय वर्तक औरंगाबाद.

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.