Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.
आजचं मार्केट – २५ जानेवारी २०२१
आज क्रूड US $ ५५.३७ प्रती बॅरल ते US $ ५५.७९ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७२.९२ ते US $१=Rs ७२.९५ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९०.२२ VIX २३.०८ PCR ०.६८ होता. आज रुपया मजबूत होता.
उद्यापासून फेडची दोन दिवसांची FOMC सुरु होईल. अर्थव्यवस्थेत किती लिक्विडीटी रिलीज करायची, किती कालपर्यंत करायची, आता अर्थव्यवस्थेत असलेली लिक्विडीटी पुरेशी आहे की अजून वाढत्या प्रमाणावर लिक्विडीटी रिलीज करणे आवश्यक आहे अशा प्रकारच्या प्रश्नांवर विचार विनिमय करून निर्णय घेतले जातील. फेडच्या नजीकच्या भविष्य विषयीच्या कॉमेंटरीवर सर्वांचे लक्ष असेल. कारण या लिक्विडिटीच्या आधारावर इमर्जिंग मार्केट्समधील तेजी आणि तेजीची मुदत अवलंबून आहे.
भारतीय मार्केट्समध्ये वर्षभरातील अंदाजपत्रकाचे सादरीकरण हा मोठा इव्हेण्ट ३ ट्रेडिंग सेशन दूर आहे. तसेच २८ जानेवारीला वर्षातील पहिली मासिक एक्स्पायरी असल्याने आज मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग झाले. मुख्यतः बँक निफ्टीमध्ये प्रॉफिट बुकिंग झाले. चीनमध्ये मेटल्सची मागणी थंडावल्यामुळे आज मेटल्स क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये मंदी होती.
सरकार अंदाजपत्रकात नॅशनल बँक फॉर इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंटची घोषणा करण्याची शक्यता आहे. ही बँक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सना अर्थपुरवठा करेल. या बँकेचे कॅपिटल Rs १ लाख कोटी असून सध्या तिचे पेड अप कॅपिटल Rs २०००० कोटी असेल. ही बँक टॅक्स फ्री बॉण्ड्स इशू करू शकेल. इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सना गॅरंटी देऊ शकेल. करात सवलत देऊ शकेल. या बँकेला रिझर्व्ह बँकेकडून थेट अर्थपुरवठा केला जाऊ शकेल. सरकार पेन्शन फंड्स, इन्शुअरन्स फंड्स, प्रॉव्हिडण्ट फंड्स यांना या बँकेच्या भांडवल उभारणीत सहभागी व्हायला सांगू शकते.
सरकार येत्या अंदाजपत्रकात R & D खर्चावर २००% सूट देण्याचा विचार करत आहे. ही योजना फार्मा, केमिक्लस, IT क्षेत्रातील कंपन्यांना लागू होईल. तसेच सरकार शेती आणि संबंधी उद्योग क्षेत्रात डायव्हर्सिफाइड ऍग्रीकल्चरचा प्रयोग करू इच्छिते. गहू तांदूळ आणि ऊस या पारंपारिक पिकांना भूजल अधिक लागते. त्याऐवजी सरकार जर शेतकऱ्यांनी कमी खर्चात होणारी आणि जास्त उत्पन्न देणारी पिके लावली तर सरकार हरियाणा राज्य सरकारच्या योजनेच्या धर्तीवर दर एकरी काही अर्थसहाय्य देईल. या योजनेचा फायदा मुख्यतः पंजाब हरयाणा आणि पश्चिम UP मधील शेतकऱयांना होईल.
केंद्र सरकारने GST कॉम्पेन्सेशनच्या अंतर्गत विविध राज्यांना Rs ६००० कोटी दिले.
आधार हाऊसिंग फायनान्स ह्या कंपनीने Rs ७३०० कोटींच्या IPO साठी SEBI कडे अर्ज सादर केला.
BPCL त्यांचा नूमालिगढ रिफायनरीमधील ६१.६५ % स्टेक ऑइल इंडियाला विकणार आहे. ऑइल इंडियाच्या या कंपनीत २०% तर आसाम राज्यसरकारचा १२.३५% स्टेक आहे.
टाटा मोटर्सने आपल्या विविध मॉडेल्सची किंमत Rs ३६००० पर्यंत वाढवली.
PNC इंफ्राटेक या कंपनीला UP राज्य सरकारकडून Rs २४७५ कोटींच्या ६ वॉटर सप्लाय प्रोजक्टससाठी LOA मिळाले. या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी आली.
तिसऱ्या तिमाहीचे चांगले निकाल येण्याची साखळी आज ही चालू राहिली. किर्लोस्कर फेरस, शारदा क्रॉपकेम, UCO बँक (लॉसमधून प्रॉफीटमध्ये आली. NPA माफक प्रमाणात कमी झाले, NII वाढले), अल्ट्राटेक सिमेंट, APL अपोलो ट्यूब्स ( प्रॉफिट Rs ७४ कोटींवरून Rs १३२ कोटी तर उत्पन्न Rs २११६ कोटींवरून Rs २६०१ कोटी ), आरती ड्रग्स या कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
कोटक महिंद्रा बँकेचे प्रॉफिट Rs १८५३.५० कोटी, NII ४००७.०० कोटी, GNPA २.२६% तर NNPA ०.५०% होते.
येस बँकेच्या व्यवस्थापनाने सांगितले की आम्ही Rs ८००० कोटींच्या लोनचे रिस्ट्रक्चरिंग करणार आहोत. तसेच दर महिन्याला १ लाख ग्राहक मिळवण्याचा आम्ही निश्चय केला आहे. करंट अकौंट्स आणी बचत आणि मुदत ठेवीच्या खात्यांमध्ये वाढ होत आहे.
सिम्फनीने सांगितले की कच्च्या मालाच्या किमतीत बचत, इनोव्हेशन, प्रोडक्ट मिक्स, आणि नवीन प्रोडक्ट लाँच केल्यामुळे आमचे मार्जिन कायम राखण्यात यशस्वी ठरलो. आमची ऑस्ट्रेलियातील सबसिडीअरी ‘CLIMATE ऑस्ट्रेलिया’ टर्नराउंड होईल. या सबसिडीअरीमार्फत आम्ही युरोपमध्ये ग्राहक मिळवू शकतो.
L & T चे नेट प्रॉफिट ५५% ने वाढून Rs २४६७ कोटी झाले. ऑर्डरबुक YOY ७६% ने वाढले. रेव्हेन्यू १.७८% ने कमी झाले.एकंदरीत निकाल चांगले आले. एक्सिस बँक, HUL, मेरिको यांचे बुधवारी तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर होतील.
ग्रासिम ही कंपनी डेकोरेटिव्ह पेंट्स बिझिनेस लाँच करणार आहेत. त्यासाठी Rs ५००० कोटींची गुंतवणूक करणार आहेत. एशियन पेंट्स ही डेकोरेटिव्ह पेन्ट्समधील आघाडीची कंपनी त्यांच्या मार्केटिंग नेटवर्क आणि प्रॉडक्ट्सच्या गुणवत्तेवर आघाडी टिकवून आहे.पण ग्रासिमजवळ भांडवलाची गुंतवणूक करण्यासाठी पैसा आणि त्यांच्या सिमेंट बिझिनेस साठी असलेले ट्रेडर्सचे नेटवर्क आहे पण त्यांना डेकोरेटिव्ह पेन्ट्सचा ब्रँड डेव्हलप करण्यासाठी वेळ लागेल. पण आता एशियन पेन्ट्सला थोडेसे व्हॅल्युएशनमध्ये आव्हान. येईल असे वाटते. एशियन पेंट्सचा शेअर एक वर्ष फॉरवर्ड PEच्या ५५ पट चालू आहे. रिलायन्स इंडस्ट्रीच्या ऑइल टू केमिकल डिव्हिजनचा रेव्हेन्यू तिसऱ्या तिमाहीत ३०% ने कमी झाला.
मी आज तुम्हाला एस्कॉर्टस या कंपनीचा इंट्राडे चार्ट देत आहे. एस्कॉर्टस ने १०० DMA तोडला. चार्टमध्ये हेड आणि शोल्डर ब्रेकडाऊन दिसत आहे. ऑटो क्षेत्रातील बहुसंख्य शेअर वाढत असताना हा शेअर मात्र वाढत नाही.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ४८३४७ NSE निर्देशांक निफ्टी १४२३८ बँक निफ्टी ३११९८ वर बंद झाले.
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!
Mala tumache video khup avadtat. Ya vayat tumhi he karata tyache vishesh vatate.Mala vatate tumhi udyachya market baddal aaj bolayala pahije.Kahi clue milu shaktat traders na. Mi 4 varshapasun market madhe aahe pan khup kahi achieve nahi karu shakale. Mala guide karal ka please aajji.