Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.
आजचं मार्केट – २७ जानेवारी २०२१
आज क्रूड US $ ५६.१० प्रती बॅरल ते US $ ५६.४० प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $ १= Rs ७२.८० ते US $१=Rs ७२.८८ या दरम्यान तर US $ निर्देशांक ९०.३५ VIX २४.६९ आणि PCR १.०२ होते.
चीनमध्ये स्टीलचे उत्पादन खूप चांगले झाले आहे. चींन अर्थव्यवस्थेतून ७८ बिलियन युआन एवढी लिक्विडीटी कमी करणार आहे.
USA मध्ये पॅकेजला मंजुरी मिळाली आहे. पण आता ते सिनेटमध्ये मंजूर व्हायला पाहिजे. सिनेटमध्ये रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट्सचे दोघांचेही ५०% सदस्य आहेत. त्यामुळे हे पॅकेज मंजूर करण्यासाठी व्हाईस प्रेसिडेंट कमला हॅरिस यांना मतदान करायला लागण्याची शक्यता आहे.
दावोसला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम चालू आहे. या फोरममध्ये उद्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करतील.
आज भारतीय मार्केटमध्ये अंदाजपत्रक हा मोठा इव्हेंट डोळ्यासमोर ठेवून तसेच उद्याची मासिक एक्स्पायरीजवळ असल्यामुळे DII आणि FII ने विक्री केली. त्यामुळे आज मार्केटमध्ये जबरदस्त प्रॉफिट बुकिंग झाले. IT सेक्टर आणि काही FMCG कंपन्यांचे शेअर्स वगळता सर्वच क्षेत्रात प्रॉफिट बुकिंग झाले.
सरकार लवकरच स्क्रॅपेज पॉलिसी जाहीर करेल. या पॉलिसीअंतर्गत ८ वर्षांपेक्षा जास्त जुन्या गाड्यांवर ग्रीन टॅक्स लावला जाईल. हा टॅक्स वाहन खरेदी करणाऱ्याला भरावा लागेल. १५ वर्षापेक्षा जुन्या गाड्या स्क्रॅप कराव्या लागतील.२००५ आणी २००६ मध्ये ज्या गाड्या विकल्या आहेत त्यांचा या पॉलिसीअंतर्गत समावेश होईल. या पॉलिसीचा फायदा मारुती, M & M, अशोक लेलँड या कंपन्यांना होईल. ही स्क्रॅपेज पॉलिसी १ एप्रिल २०२२ पासून लागू होईल. यामध्ये फारसे काही इन्सेन्टिव्ह दिलेला दिसत नाही. स्क्रॅपेज पॉलिसीचा परिणाम २ व्हीलर आणि पॅसेंजर व्हेईकलवर होणार नाही. श्रीराम ट्रान्सस्पोर्ट फायनान्स सारख्या जुन्या गाड्यांना लोन देणार्या कंपन्यांवर परिणाम होईल.
IMF ने भारताची GDP ग्रोथ ११.५१% होईल आणि भारतात खूप वेगाने प्रगती होईल असे अनुमान केले आहे.
राष्ट्रीय इस्पात निगम या PSU च्या प्रायव्हटायझेशन/ विनिवेशासाठी प्रायव्हटायझेशन पॉलिसी अंतर्गत विचार होईल.
सरकार नीलांचल इस्पात या कंपनीतून आपल्या स्टेकचा विनिवेश करणार आहे.सरकारने या विनिवेशासाठी EOI लाँच केली आहे. या कंपनीत MMTC चा ४९.३८% स्टेक आहे.
NALCO ही कंपनी Rs ५७.५० प्रती शेअर या भावाने १३.०३ कोटी शेअर्स बाय बॅक करेल. सरकारने कोप्रा ची M S P Rs १०३३५ कोटी प्रती QUINTAL जाहीर केली. यात सरकारने Rs ३७५ वाढ केली आहे. HDFC म्युच्युअल फंडाने ऑरोबिंदो फार्मामधील २.१% स्टेक विकला. पॉवर ग्रीड ही कंपनी US $ ११० कोटी चा INVIT IPO आणत आहे.
ज्योती लॅब्स ( प्रॉफिट Rs ५५.३ कोटी, उत्पन्न ४७६.६० कोटी) इंडिया सिमेंट ही कंपनी टर्नराउंड झाली ( प्रॉफिट Rs ६२ कोटी, उत्पन्न Rs ११६० कोटी) कॅनरा बँक ( प्रॉफिट ६९६.१० कोटी, NII ६०८१ कोटी, GNPA आणि NNPA कमी झाले.) H G इन्फ्रा, दिग्विजय सिमेंट (प्रॉफिट Rs १४ कोटी उत्पन्न Rs १४३ कोटी) इमामी ( प्रॉफिट Rs २०८ कोटी, उत्पन्न ९३३.६० कोटी ३६.४% मार्जिन Rs ४ अंतरिम लाभांश) SKM EGGS, थंगामाईल ज्युवेलरी, पॉलीमेडिक्युअर , मेरिको ( प्रॉफिट Rs ३१२ कोटी, उत्पन्न Rs २१२२ कोटी, डोमेस्टिक सेल्स ग्रोथ १५% ),वेलस्पन इंडिया, जयभारत मारुती, राणे मद्रास, ICICI प्रु, लक्षमी मशीन टूल्स या कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले
एक्सिस बँकेने आज आपले तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. प्रॉफिट Rs ११२२ कोटी, NII Rs ७३७३ कोटी तर NIM ३.५९ % राहिले. GNPA ४.१८% वरून ३.४४ % झाले तर नेट NPA ०.९८% वरून ०.७४% झाले.
आज HUL ने आपले तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीचे एकूण उत्पन्न २१% ने वाढून Rs ११८६२ कोटी झाले. कंपनीचे प्रॉफिट १९% ने वाढून Rs १९२१.०० कोटी झाले.कंपनीला वन टाइम लॉस Rs ४२ कोटी झाला. व्यवस्थापनाने सांगितले की आम्हाला शहरी क्षेत्रात मागणीचे पुनरुज्जीवन होईल असे वाटते आणि ग्रामीण क्षेत्रातील बीझिनेस चांगला होत राहील.ग्रामीण क्षेत्रात डबल डिजिट ग्रोथ झाली. कोविड केसेसमध्ये घट झाली, मोबिलिटी वाढली, आम्ही ग्राहकानुकूल जी इनोव्हेशन केली, आणि आमच्या मार्केटिंगमुळे आणि अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा झाल्यामूळे आमचा परफॉर्मन्स चांगला झाला. PSP प्रोजेक्ट्स, JK पेपर चे तिसर्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते. राईट्स या कंपनीला Rs ६१.२ कोटींची कंसल्टेशनसाठी ऑर्डर मिळाली.हिरोमोटो या कंपनीने मेक्सिको मध्ये GRUPO SALINAS बरोबर डिस्ट्रिब्युशनसाठी करार केला. कंपनीने मेक्सिकोमध्ये ऑपरेशन्स सुरु केली.
१४ फेब्रुवारीपासून तेजस ट्रेन चालू होणार आहेत.
मी आज तुम्हाला युनायटेड ब्रुअरीज या कंपनीचा चार्ट देत आहे. या शेअरने सोमवारी ब्रेकडाऊन दिला. Rs १२६३ वर होता. Rs १२२०चा लो होता. Rs ११८० ते Rs १२०० ला सपोर्ट घेत आहे. Rs १२२० या लोला टच करून पुन्हा तेजीची मूव्ह सुरु झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ४७४०९ NSE निर्देशांक निफ्टी १३९६७ बँक निफ्टी ३०२८४ वर बंद झाले.
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!
I like your coments.