Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.
आजचं मार्केट – २८ जानेवारी २०२१
आज क्रूड US $ ५५.३८ प्रती बॅरल ते US $ ५५.६६ प्रति बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७३.०६ ते US $ १= Rs ७३.१४ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९०.६७ VIX २४.९० PCR ०.८९ होते.
बिडेन यांनी H १B व्हिसा होल्डर्सच्या वैवाहिक जोडीदाराला (SPOUSE) वर्क परमिट देण्याच्या बाबतीत दिलासा दिला.
फेडने आपल्या व्याज दरात कोणतेही बदल केले नाहीत. अर्थव्यवस्था पूर्णपणे पुनरुज्जीवित होईपर्यंत आम्ही लिक्विडिटीचा पुरवठा करत राहू असे सांगितले. USA मार्केट आज पडली कारण काही कॉर्पोरेट निकाल उदा बोईंग, टेसला, अपेक्षेप्रमाणे आले नाहीत. आणि मार्केट ओव्हर व्हॅल्यूड आहे असे वाटले. DOW जोन्स, NASHDAQ, S & P हे तिन्ही निर्देशांक मंदीत होते. एशियायी, युरोपियन मार्केट्सही मंदीत होती. सोने आणि चांदीत माफक मंदी आली.
काल निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये बेअरिश बेल्ट होल्ड पॅटर्न तयार झाला. ज्या प्राईसला मार्केट उघडले तोच कालचा हाय पाईंट झाला. कारण मार्केट ओपन झाल्यावर ते बंद होईपर्यंत पडत राहिले. अपर शॅडो किंवा लोअर शॅडो नाही.
आदित्य बिर्ला फॅशनने ‘सब्यसाची’ मध्ये ५०% स्टेक Rs ३९८ कोटींना घेतला.
केंद्र सरकारने नाट्यगृहे, एक्झिबिशन हॉल्स, सिनेमा थिएटर्स आदी पूर्ण क्षमतेने सुरु करायला परवानगी देण्याच्या बाबतीत राज्य सरकारांना अधिकार दिले. त्यामुळे आज PVR, इनॉक्स लेजर, मुक्ता आर्ट्स, सिनेलाईन, UFO मुव्हीज या शेअर्समध्ये तेजी होती.
स्टोव्ह क्राफ्टच्या IPO चा शेवटचा दिवस. आता पर्यंत हा IPO २.९३ पट भरला आहे.
रशिया चीन कोरियातुन आयात होणाऱ्या PTFE वरच्या अँटी डम्पिंग ड्युटीची मुदत ५ वर्षापर्यंत वाढवली आहे. या बाबतीत गुजरात फ्लुओरो या कंपनीने यासाठी तक्रार केली होती. या बाबतीत DGTR ने नोटिफिकेशन जारी केले.
अंदाजपत्रकात रेफ्रिजरेटर, ड्रायर यावरील इम्पोर्ट ड्युटी वाढवण्याची शक्यता आहे. याचा फायदा व्हर्लपूल, लिंडे इंडिया, अंबर एंटरप्रायझेस या कंपन्यांना फायदा होईल.
ऑइल इंडियाने त्रिपुरामध्ये ऑइल एक्स्प्लोरेशन, प्रॉडक्शन आणि सेइस्मिक सर्वे सुरु केले.
PVR ने Rs ८०० कोटींचा QIP लाँच केला.
हॅवेल्सने आंध्र प्रदेशातील ४५.५८ एकर्स जमीन Rs ३९ कोटींना लीजवर दिली.
अंदाजपत्रकात हेल्थ केअर इन्फ्रावर जोर असेल. विशेषतः टायर २, ३, ४ शहरात ५० बेड्सची हॉस्पिटल्स, आणि गावात २५ बेड्सची हॉस्पिटल्स सुरु करण्यासाठी गुंतवलेल्या भांडवलावर टॅक्सची सूट दिली जाईल. आता ही सूट १०० बेड्सच्या हॉस्पिटल्ससाठी आहे. IT क्षेत्रातील स्पेशल बीझिनेससाठी १००% सूट दिली जाण्याची शक्यता आहे .
भारती एअरटेलने 5G रेड़ी नेटवर्कची घोषणा केली. हैदराबाद मध्ये त्यांनी १८०० MH बँड मध्ये ही सर्व्हिस लाँच केली. तसेच कंपनी सर्व बॅण्डमध्ये ही सर्व्हिस लाँच करण्यासाठी तयार असे सांगितली. त्यामुळे भारतीय एअरटेलचा शेअर वाढला.
टीमलीज, वेलस्पन कॉर्प, कलाहस्ती पाईप्स, गोवा कार्बन यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते. सुवेन लाईफ सायन्सेसचे निकाल ठीक होते.
एरिस लाईफसायन्सेस ( प्रॉफिट, उत्पन्न, मार्जिन वाढले ), कोलगेट ( प्रॉफिट Rs २४८ कोटी, उत्पन्न Rs १२३२.०० कोटी मार्जिन ३०.१%) रॅडिको खेतान, IDBI बँक ( तोट्यातून फायद्यात आली) , GHCL, ग्रनुअल्स, डाटामाटिक्स, GHCL, ROUTE मोबाइल, प्रिसम जॉन्सन नितीन स्पिनर्स, DB कॉर्प, NIPON लाईफ, युनायटेड स्पिरिट्स, या कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. कॉस्मो फिल्म्सने Rs २५ प्रती शेअर लाभांश जाहीर केला. VRL लॉजिस्टिक्स ही कंपनी ६ फेब्रुवारी २०२१ रोजी शेअर बायबॅकवर विचार करणार आहे
आज मारुती सुझुकीचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल आले..कंपनीचे प्रॉफिट २४% वाढून Rs १९४१ कोटी झाले. उत्पन्न १३% ने वाढून Rs २३४५८ कोटी झाले. ऑपरेटिंग मार्जिन १०.२% होते. कंपनीने ४.९५ लाख युनिट्स विकली. कंपनीची विक्री वाढलीय, कंपनीच्या कॉस्टमध्ये बचत झाली, पण कमोडिटी प्राइसेस वाढल्या आणि परदेशी चलनाची मुव्हमेंट प्रतिकूल असल्यामुळे प्रॉफिटवर परिणाम झाला. निकाल जाहीर झाल्यावर कंपनीचा शेअर १.९% पडला.
आजचे प्रॉफिट बुकिंग सर्व क्षेत्रात झाले. कंपन्यांचा निकाल चांगला आला तरी त्याही शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग झाले. आतापर्यंतच्या किमतीमध्ये सर्व सकारात्मक गोष्टी समाविष्ट असल्यामुळे आज प्रॉफिट बुकिंग झाले.
आज मी तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियाचा चार्ट देत आहे. हा शेअर गेले चार दिवस लोअर टॉप लोअर बॉटम करत आहे. ५० DMA तोडले. २७४ पासून बेस बनत आहे.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ४६८७४ NSE निर्देशांक निफ्टी १३८१७ बँक निफ्टी ३०३५८ वर बंद झाले.
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!