Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.
आजचं मार्केट – १४ जानेवारी २०२१
आज क्रूड US $ ५५.८८ प्रती बॅरल ते US $ ५६.०४ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७३.०१ ते US $१= Rs ७३.१४ या दरम्यान US $ निर्देशांक ९०.३९ VIX २३.०९ आणि PCR १.६९ होते.
USA मध्ये अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इम्पीचमेंटचे विधेयक खालच्या सभागृहात( हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह्ज) मंजूर झाले. आता हे विधेयक USA च्या सिनेटमध्ये प्रस्तावित केले जाईल. अध्यक्षांच्या इम्पीचमेंटसाठी जर सिनेटची मंजुरी मिळाली तर USA मध्ये लोकक्षोभ उसळेल आणि बिडेन यांच्या शपथविधीला थोडा उशीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे सहाजिकच रिलीफ पॅकेज येण्यासाटी उशीर होईल.तसेच USA च्या अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारत आहे यामुळे FII ची गुंतवणूक कमी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. यूरोपमधील देशांमध्येही लॉकडाऊन घोषित होत आहेत. त्यामुळे आज DOWJONES तटस्थ होते पण NASHDAQ आणि S & P मध्ये तेजी होती. US $ मध्ये तेजी असल्यामुळे सोन्यामध्ये माफक तेजी होती. बाकीच्या मेटल्समध्ये मंदी होती.
चीनच्या अर्थव्यवस्थेचे ( आयात आणि निर्यात) आणि ट्रेड सरप्लसचे आकडे चांगले आल्यामुळे आशियायी मार्केट तेजीत होती. जपानमध्ये मात्र कोरोनामुळे विदेशी नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
मंत्रिमंडळाने ७३ LCA ( लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट) साठी आणि १० ट्रेनर LCA साठी HAL ( हिंदुस्थान एअरोनाटिक्स) या कंपनीला एकूण Rs ४५६९६ कोटीची ऑर्डर देण्यासाठी मंजुरी दिली.
इनॉक्स लेजर या कंपनीने ३ नवीन तर ११ जुन्या मल्टीप्लेक्सेस मध्ये काम सुरु केले. त्यामुळे या शेअरमध्ये तेजी होती.
आज सरकारने SAIL या कंपनीतील १०% स्टेक विनिवेश करण्यासाठी Rs ६४ फ्लोअर प्राईसवर ( CMP ला १३.५% डिस्काउंटने) OFS आणला आहे. आज हा OFS नॉन रिटेल गुंतवणूकदारांसाठी ओपन होता. त्यांच्यासाठी असलेला कोटा पूर्णपणे भरला.
उद्या हा OFS रिटेल गुंतवणूकदारांसाठी ओपन राहील.
कालच्या ब्लॉगमध्ये इंडिगो पेन्ट्सच्या IPO विषयी माहिती दिली होती . आज त्यांच्या IPO चा प्राईस बँड Rs १४८८ ते Rs १४९० असा निश्चित केला आहे.
डिक्सन टेक्नॉलॉजीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची शेअर स्प्लिटवर विचार करण्यासाठी २ फेब्रुवारी २०२१ रोजी बैठक आहे. डिक्सन टेक्नॉंलॉजीने नोकियाबरोबर मोबाईल फोन आणी स्मार्ट TVS ( लॉईड, तोशिबा, नोकिया, इंटेल) चे उत्पादन करण्यासाठी करार केला. डिक्सन टेक्नॉंलॉजीची सबसिडीअरी पॅजेट इलेक्ट्रॉनिक्स ही LG स्मार्ट फोन, HMD ग्लोबलचे फोन आणि लेनोवो ( मोटोरोला) यांच्याही फोनचे असेम्बलिंग करते.
HFCL त्यांच्या हैदराबाद युनिटची ऑप्टिक फायबर केबल प्रॉडक्शन क्षमता १/३ ने वाढवणार आहे. भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ मोठ्या शहरात FTTH ( फायबर TO THE होम) नेट वर्क्सचा विस्तार करत आहेत. तसेच भारतात 5G ही लाँच होत आहे. ह्या क्षमतेमुळे कंपनी १०लाख वायरलेस नेटवर्किंग पोर्टफोलिओ (ज्यामध्ये रेडिओज, WIFI ऍक्सेस यांचा समावेश असेल) चे उत्पादन करू शकेल.
LIC ने निपोन लाईफ मॅनेजमेंट मध्ये स्टेक वाढवला. SBI MF ने बंधन बँक, वेदांता, टाटा स्टील यांच्यातला स्टेक कमी केला.
आसाममध्ये ज्या महिला मायक्रो फायनान्स योजनेखाली लोन घेतात त्यांचे कर्ज माफ व्हावे यासाठी विचार विनिमय चालू असल्यामुळे बंधन बँकेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
गार्डन रीच शिपबिल्डर्स या सरकारी कंपनीला गयाना या दक्षिण अमेरिकेतील देशाच्या सरकारकडून US $ १.२७ कोटींची ऑर्डर मिळाली.
दिल्लीमधील २०० कोंबड्यांच्या तपासणीत ‘AVIAN’ हा व्हायरस आढळला नाही. निरनिराळ्या राज्यांमध्ये बर्ड फ्ल्यू चा प्रादुर्भाव आढळून आला आहे. आणि त्यामुळे या राज्यात पक्षी मृत्यू पावत आहेत. याचा प्रतिकूल परिणाम वेंकीज, S K M एग्स, आणि गोदरेज अग्रोव्हेट आणि इतर पशु खाद्य विकणाऱ्या कंपन्यांवर झाला.
डिसेंबर २०२० महिन्यासाठी WPI (होलसेल प्राईस इंडेक्स) १.२२% ( नोव्हेम्बरमध्ये १.५५%) होते. मॅन्युफॅक्चर्ड प्रॉडक्ट्स,भाज्या अन्नधान्य यांच्या घाऊक किमतीत मोठी घट झाल्याने हा इंडेक्स कमी झाला
अडाणी एंटरप्रायझेसला NHAI कडून Rs १८३८ कोटींच्या काँट्रॅक्टसाठी LOA मिळाला. त्यामुळे शेअरमध्ये तेजी आली.
टाटा मोटर्सने सफारी SUV चे नवीन व्हरायन्ट लाँच केले.
वेबसोल एनर्जी या कंपनीचा तिसऱ्या तिमाहीचा निकाल चांगला आला.
स्पाईस जेटने असे सांगितले की आमचा डोमेस्टिक बिझिनेस प्रीकोविड लेव्हलच्या ७०% आहे पण आंतरराष्ट्रीय बिझिनेस प्रीकोविड लेव्हलवर येण्यासाठी अजून एक वर्ष लागेल . आम्ही कोरोना व्हॅक्सिनच्या वाहतुकीत जरूर मदत करू. आम्ही आमच्या कार्गो बिझिनेसमध्ये वाढ होईल अशी अपेक्षा करत आहोत. कंपनीकडे आता १७ विमाने आहेत.
डिशमन कार्बोजेन AMCIS या कंपनीच्या OFS मध्ये ( फ्लोअर प्राईस Rs १४५.७०.) नॉन रिटेल कोट्यामध्ये नॉनरिटेल इन्व्हेस्टर्सकडून ६६.८ लाख शेअर्स साठी मागणी आल्यामुळे OFS ओव्हरसबस्क्राईब झाला. आज हा इशू रिटेल गुंतवणुकदारांसाठी ओपन होता.
सरकारने OFS द्वारे FY २१ साठी Rs ४००० कोटी उभारायचे लक्ष्य निश्चित केले आहे. या वर्षी सरकार ६ कंपन्यांमध्ये OFS आणेल. यामध्ये RCF, मिश्र धातू निगम, IRCON, RVNL, NFL, गार्डन रिच शिपबिल्डर्स यांचा समावेश असेल.
आज SIAM ने डिसेंबर २०२० महिन्यासाठी ऑटोविक्रीचे आकडे जाहीर केले. ते असे
पॅसेंजर कार विक्री ८.४% ने वाढून १.४६ लाख युनिट झाली. पॅसेंजर व्हेईकल विक्री १३.६% ने वाढून २.५२ लाख युनिट झाली. टू व्हीलर विक्री ७.४% ने वाढून ११.२० लाख युनिट झाली. युटिलिटी व्हेईकल ची विक्री १९.८% वाढून ९७७८७ युनिट झाली. हे आकडे ऑटो क्षेत्रात रिकव्हरी होत आहे असे दर्शवतात
RBI उद्या पासून १४ दिवस रिव्हर्स रेपो ट्रॅन्झॅक्शन द्वारे Rs २ लाख कोटींची ओपन मार्केटमधून खरेदी करेल. यामुळे अर्थव्यवस्थेतील लिक्विडीटी कमी होईल.
आज मी तुम्हाला इंडस इंड बँकेचा चार्ट देत आहे. आज इंडस इंड बँकेच्या प्रमोटर्सना शेअर वॉरंटस सबस्क्राईब करण्यासाठी मुदतवाढ मिळाली. त्यामुळे आज बँकेचा शेअर कमाल व्हॉल्यूमने वाढत होता. Rs ९५० च्या स्तरावर ब्रेकआऊट झाला आहे.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ४९५८४ NSE निर्देशांक निफ्टी १४५९५ बँक निफ्टी ३२५१९ वर बंद झाले.
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!