Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.
आजचं मार्केट – २६ फेब्रुवारी २०२१
आज क्रूड US $ ६६.०० प्रती बॅरल ते US $ ६६.६१ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७२.४२ ते US $१= Rs ७३.४६ या दरम्यान होते US $ निर्देशांक ९०.३७ VIX २९.२८ PCR १.७९ होते.
आज USA, आशियाई, युरोपियन सर्व मार्केट मंदीत होती. USA मध्ये १० वर्षाच्या बॉण्ड्स वरील यिल्ड १.६० च्या पातळीला पोहोचले. त्यामुळे इमर्जिंग मार्केट्समधून गुंतवणूक काढून घेऊन गुंतवणूकदारांनी USA च्या बॉण्ड्स मार्केटमध्ये पैसा गुंतवला. त्यामुळे सर्व इमर्जिंग मार्केट्समध्ये जबरदस्त मंदी आली, आपले मार्केटही त्याला अपवाद राहिले नाही. त्यात VIX वाढत असल्यामुळे मार्केटमध्ये जबरदस्त वोलतालीटी होती. काही अपवाद वगळता आजची मंदी सर्व क्षेत्रांना व्यापून उरली. या मंदीला एक चंदेरी किनार होती ती म्हणजे रेलटेल या रेल्वेशी संबंधित सरकारी कंपनीचे झालेले लिस्टिंग. IPO मध्ये Rs ९४ प्रती शेअर किमतीला दिलेल्या शेअरचे BSE वर Rs १०४.६० वर तर NSE वर Rs १०९ वर लिस्टिंग झाले. ज्या अर्जदारांना शेअर्स अलॉट झाले त्यांना चांगला लिस्टिंग गेन झाला.सरकारी बॉण्ड्सचि विक्री खूप झाली त्यामुळे बॉण्ड यिल्ड वाढले. USA च्या संसदेचे असे म्हणणे आहे की US $१५ एवढी मजूरी पॅकेजमध्ये समाविष्ट करू नये. त्यातच USA ने सीरियावर एअर स्ट्राईक केला. हाँगकाँगमध्ये सरकारने शेअर्सच्या खरेदी विक्रीवर असलेली स्टॅम्पड्युटी वाढवली. त्यामुळे हाँगकाँगचे मार्केट पडले.
USA मधील क्रूडचे उत्पादन वाढले. ४ मार्चला ओपेक+ ची बैठक आहे. त्यात क्रूडचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय होऊ शकतो.
US $ मजबूत झाल्यामुळे निकेल सोडून सर्व बेस मेटल्स मध्ये आज मंदी होती. टेक्नॉलॉजी क्षेत्रातले शेअर्स पडले, सोनेही पडले, मेटल्समध्ये जेव्हा तेजी येते तेव्हा त्याचा परिणाम सगळ्या उद्योगांवर होतो. महागाई वाढते.
BOB ( बँक ऑफ बरोडा) Rs ८५.९८ या फ्लोअर प्राईसवर QIP करून Rs ४२०० कोटी उभारणार आहे.
चीनमध्ये कॉपरचे सगळ्यात जास्त उत्पादन होते. कॉपर ही रियुजेबल कमोडिटी आहे. EV मध्ये कॉपरचा उपयोग केला जातो.
चीनमधून येणाऱ्या मालामाईन वरील ड्युटी सरकारने ३१ मार्चपर्यंत वाढवली. याचा फायदा GNFC या कंपनीला होईल.
चीनमधून येणाऱ्या ग्लेझ्ड किंवा अन्ग्लेझ्ड पोर्सिलीन वरील अँटी डम्पिंग ड्युटी २८ जूनपासून वाढवली जाईल. याचा फायदा कजरिया सिरॅमिक्स यासारख्या कंपन्यांना होईल.
आज मार्केट बंद झाल्यावर MSCI चे रीबॅलन्सिंग होईल.
क्रेडिट कॉस्ट सामान्य होत आहे कमजोर कॉर्पोरेट क्रेडिटचा काळ संपत आला आहे. असे SBI ने सांगितले .
ASIA PARAXYLENE ची किंमत २१ महिन्यांच्या उच्च स्तरावर होती. त्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजचा फायदा होईल. पण आजच्या मंदीच्या लाटेत याचा शेअरच्या किमतीवर परिणाम दिसून आला नाही.
दक्षिण भारतात सिमेंटच्या किमती Rs ३० ते Rs ४० प्रती पोते वाढणार आहेत. ACC, अंबुजा सिमेंट, सागर सिमेंट इंडिया सिमेंट या कंपन्यांना फायदा होईल.
इथेनॉल ब्लेंडींग वाढवण्यावर सरकारचा भर आहे. आज सरकारने इथेनॉल संबंधित ४१८ प्रोजेक्ट्सना मंजुरी दिली. यामध्ये Rs ४०००० कोटींची गुंतवणूक केली जाईल.दरवर्षी १६७५ कोटी लिटर एवढे एथॅनॉलचे उत्पादन होईल.
नवभारत व्हेंचर्स ही कंपनी १.५ कोटी शेअर्स Rs १०० प्रती शेअर या भावाने ओपन मार्केट रूटने बाय बॅक करण्यासाठी Rs १५० कोटी खर्च करील.
ABB पॉवर प्रॉडक्टस ( Rs २ लाभांश) , KSB पंप्स या कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
शिपिंग कॉर्पोरेशन आणि BEML यांच्यातील विनिवेशासाठी EOI सादर करण्याची तारीख अनुक्रमे १ मार्च २०२१ आणि २२ मार्च २०२१ या असतील.
आज मी तुम्हाला LIC हौसिंग कॉर्प चा चार्ट देत आहे . हा शेअर आज गॅप डाऊन उघडला आणि नंतरही पडतच आहे. इव्हिनिंग स्टार पॅटर्न बनला आहे. बुधवारचा लो तोडला. हेड आणि शोल्डर पॅटर्नचा ब्रेक डाऊन दिसत आहे.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ४९०९९ NSE निर्देशांक निफ्टी १४५२९ बँक निफ्टी ३४८०३ वर बंद झाले.
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!