आजचं मार्केट –  ९ फेब्रुवारी  २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट –  ९ फेब्रुवारी  २०२१

आज क्रूड US $ ६०.९५ प्रती बॅरल ते US $ ६१.१९ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $ १=Rs ७२.८५ ते US $ १ = ७२.८८ या दरम्यान US $ निर्देशांक ९०.८७ VIX २४.२७ PCR १.६८ होते.

आज USA मधील मार्केट्स तेजीत होती युरोपियन, आशियायी मार्केट्सही तेजीत होती.आज सोने तेजीत होते कारण US $ वीक झाला, USA मध्ये येणार असलेल्या रिलीफ पॅकेजमुळे तेजी होती तर US ट्रेजरी यिल्ड मध्ये तेजी असल्याने रेझिस्टन्स होता. चांदीमध्ये माफक मंदी होती. क्रूड मात्र रशिया आणि इराकने सुद्धा उत्पादनात कपातीचा निर्णय घेतल्यामुळे क्रुडमध्ये तेजी होती.

सरकारने सांगितले की STT किंवा शेअर्सवरील LTCG रद्द करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारपुढे नाही. तसेच सिगारेटवर आणि तंबाखूच्या इतर प्रॉडक्टसवर कर बसवण्याचा प्रस्ताव नाही.

FY २१ मध्ये गुंतवणुकीचे लक्ष्य BPCL ने Rs ८००० कोटींवरून ९००० कोटी केले.

BPCL ला Rs २७८० कोटी प्रॉफिट झाले, उत्पन्न Rs ६६७३२ कोटी आणि मार्जिन ६.४% होते. कंपनीने Rs १६ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

NMDC, बाळकृष्ण इंडस्ट्रीज, सन टीव्ही, किर्लोस्कर BROS. राणे होल्डिंग ( कंपनी तोट्यातून फायद्यात आली), JBM ऑटो ( प्रॉफिट उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले), इंडोको रेमिडीज, ऍस्ट्रॉन पेपर, मॅक्स फायनान्सियल्स, फर्स्ट सोर्स, बोडल केमिकल्स, अडाणी पोर्ट्स ,सेंच्युरी प्लायवूड, BASF आणि DCW या दोन कंपन्या तोट्यातून नफ्यात आल्या, VST टिलर्स,गार्डन रिच शिपबिल्डर्स, एक्झो नोबल ( Rs २० लाभांश ), BCL इंडस्ट्रीजचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
ABBOTT लॅब, J कुमार इन्फ्राचे निकाल ठीक आले.

वर्रोक इंजिनीअरिंग ( प्रॉफीटमधून तोट्यात ( वन टाइम लॉस Rs ११० कोटी) , KRBL( प्रॉफिट, उत्पन्नात घट), उत्तम गाल्वा, अस्ट्राझेनेका, जागरण प्रकाशन, SPARC यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.

सरकार टाटा कम्युनिकेशनमधील स्टेक मार्च २०२१ पर्यंत विकणार आहे.

नेसले या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची अंतिम लाभांशावर विचार करण्यासाठी १६ फेब्रुवारी २०२१ रोजी बैठक आहे.
IRKON या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची १५ फेब्रुवारी २०२१ रोजी बोनस शेअर इशू करण्यावर विचार करण्यासाठी बैठक आहे.

USA मध्ये १० वर्षाच्या बॉण्ड्सचे यिल्ड,१.१७ %, ३० वर्षाच्या बॉण्ड्सचे यिल्ड २% वर गेले. भारतीय मार्केट्समध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी Rs १८४१७ कोटी गुंतवले.

टाटा मोटर्सची UK मध्ये जग्वार विक्री ६०% ने कमी होऊन ९१४ युनिट झाली. लँड रोव्हर विक्री ३५.४% ने कमी होऊन ३६२८ युनिट झाली. JLR UK विक्री ४२% ने कमी होऊन ४५४२ युनिट्स झाली.

रिलायन्स आणि फ्युचर ग्रुपमधील डीलवर घातलेली बंदी दिल्ली हायकोर्टाने उठवली. त्यामुळे आज रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये तेजी होती.

जून २०२० नंतर कार्टलायझेशन करून स्टीलच्या किमती निश्चित केल्या यासाठी CCI ( कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया) ने चौकशी सुरु केली.

FADA ने सांगितले की किंमत वाढल्यामुळे वाहन रजिस्ट्रेशन ९.६६% कमी झाले.

टू व्हीलर चे रजिस्ट्रेशन ८.७% कमी तर पॅसेंजर व्हेइकलचे ४.४% आणि कमर्शियल व्हेइकलचे रजिस्ट्रेशन २५%ने कमी झाले. थ्री व्हिलर्सचे रजिस्ट्रेशन ५१% ने कमी झाले. ट्रॅक्टर्सची विक्री ११% ने वाढून ६०७५४ युनिट झाली. ऑटो फायनान्सिंग प्रीकोविड लेव्हलपेक्षा कमी आहे.

सेमीकंडक्टरच्या टंचाईमुळे ऑटो विक्रीवर प्रतिकूल परिणाम झाला.

RBI ११ फेब्रुवारीला Rs २२००० कोटींच्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीजचा स्पेशल ऑक्शन करेल.

बाळकृष्ण इंडस्ट्रीजने कार्बन ब्लॅक व्यवसायात उतरण्याची तयारी केलेले मार्केटला आवडले नाही त्यामुळे शेअरमध्ये मंदी आली.

रेल्वेखात्याने रेल्वे यूजर डेव्हलपमेंट फी लावण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.

NBCC च्या सबसिडीअरीला १२ जिल्ह्याच्या ठिकाणी हॉस्पिटल उघडण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट मिळाले.

केमिकल, गॅस, इन्शुअरन्स कंपन्या, सरकारी बँका, IT सेक्टरमध्ये तेजी होती.

आज सेन्सेक्सने ५१८२१चा ऑलटाइम हाय आणि निफ्टीने १५२५६ चा आल टाइम हाय नोंदवला.आज मार्केटमध्ये सुरुवातीला तेजी होती. पण मार्केट संपता संपता प्रॉफिट बुकिंग झाल्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी कालच्या लेव्हलच्या जवळपास क्लोज झाले

LIC च्या IPO मधील १०% हिस्सा पॉलिसी होल्डर्ससाठी राखीव ठेवला जाईल. IPO नंतरही सरकार मेजॉरिटी स्टेक होल्डर असेल आणि व्यवस्थापनही सरकारकडे राहील त्यामुळे पॉलिसीहोल्डर्सच्या हितरक्षणाकडे पूर्ण लक्ष दिले जाईल.
जानेवारी २०२१ चा NBP डेटा मिळाला. ICICI प्रु १८%, SBI लाईफ १७.५% , HDFC लाईफ १६.४%, मॅक्स लाईफ १५% नी वाढले. त्यामुळे इंशुअरंस कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती.

आज मी तुम्हाला GSPL चा चार्ट देत आहे. हा शेअर २० DMA आणि ५० DMA च्या वर आहे. MA ही पार केला आहे. जानेवारीमध्ये Rs २१६ ची लेव्हलही पार झाली आणि नंतर या लेव्हलच्यावर आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५१३२९ NSE निर्देशांक निफ्टी १५१०९ बँक निफ्टी ३६०५६ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.