आजचं मार्केट –  १० फेब्रुवारी  २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट –  १० फेब्रुवारी  २०२१

आज क्रूड US $ ६०.९० प्रती बॅरल ते US $६१.१३ प्रती बॅरल या दरम्यान तर US $१=Rs ७२.८२ ते US $१=Rs ७२.८७ या दरम्यान US $ निर्देशांक ९०.३९ VIX २४.४६ PCR १.५३ होते.

USA मध्ये स्टिम्युलस पॅकेज येत आहे सोने तेजीत होते.USA मध्ये बॉण्ड यिल्डस वाढल्यामुळे सोन्याला थोडा रेझिस्टन्स मिळत आहे. कॉपर आज तेजीत होते कारण पेरूमध्ये उत्पादन कमी झाले. क्रुडमध्ये तेजी होती कारण आता लिबियानेही उत्पादनात कपात केलेली आहे.

सरकार NFL मधील २०% स्टेक OFS रूटने विकणार आहे. आता सरकारचा या कंपनीत ७४.७१% स्टेक आहे. सरकार LIC मध्ये Rs २५००० कोटींचे पेडप कॅपिटल म्हणजेच (Rs २५०० कोटी) आउटस्टँडिंग शेअर्स Rs १० दर्शनी किमतीचे) गुंतवणार आहे. सरकार यापैकी १०% कॅपिटल डायव्हेस्टमेन्ट करणार आहे. म्हणजेच सरकार Rs १० दर्शनी किमतीचे २५० कोटी शेअर्स म्हणजेच Rs २५०० कोटींचा IPO आणेल . यापैकी १०% शेअर्स पॉलिसी होल्डर्ससाठी म्हणजे २५ कोटी शेअर्स राखीव ठेवण्याची शक्यता आहे. वर्तमान परिस्थितीत LIC चे २८.९२ कोटी पॉलिसी होल्डर आहेत. म्हणजे प्रत्येक पॉलिसी होल्डरला शेअर्स मिळतीलच असे नाही.सरकारला या IPO मधून Rs १ ते १.२ लाख कोटी मिळतील. LIC चे मार्केट कॅपिटलायझेश Rs १२ लाख कोटी धरले तर शेअरची किंमत सुमारे Rs ४८० येईल. LIC ने आतापर्यंत अनेक अनलिस्टेड छोट्या कंपन्या,जमीन, तोट्यामध्ये चालणाऱ्या सरकारी कंपन्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रात गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक काही गुंतवणूकदारांसाठी थोडा काळजीचा विषय असेल. इंडिया पेस्टीसाईड्स ही कंपनी नजीकच्या भविष्यात IPO आणण्याची शक्यता आहे. ही एक R & D फोकस्ड, अग्रोकेमिकल. टेक्निकल कंपनी आहे.

PNGRB ने सांगितले की सिटी गॅस डिस्ट्रिब्युशनच्या लायसेन्स देण्यासाठी नवीन राउंडची तयारी पूर्ण झाली आहे. नवीन राउंड साठी लवकरच घोषणा होईल.

MSCI इंडेक्सचे रीबॅलन्सिंग २६ फेब्रुवारीला होईल आणि ते १ मार्च २०२१ पासून अमलात येईल. यात इंडियाचे वेटेज ५६१ बेसिस पाईंट्सने वाढेल. यात भारती एअरटेल मध्ये Rs ४२५० कोटी, इंडस टॉवर्समध्ये Rs ५०० कोटी, HDFC लाईफ मध्ये ३७६ कोटी आनि ICICI लोम्बार्ड मध्ये Rs १५० कोटींची गुंतवणूक येण्याची शक्यता आहे. या बरोबरच रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, HDFC, आणि ICICI बँक या शेअर्समध्ये काही प्रमाणात विक्री येऊ शकते.

अलेम्बिक फार्मा, सिटी युनियन बँक, ग्रॅनुअल्स, गुजरात गॅस, L &T इन्फोटेक, MPHASIS या कंपन्यांच्या शेअर्सचा F & O मध्ये मार्च सिरीजपासून समावेश होईल.

नॅशनल लॉजिस्टिक पॉलिसीमध्ये पॅकेजिंगवर फोकस असेल.

टाटा स्टील या वेळेला टर्नअराउंड झाली. Rs ११६६ कोटी तोट्याऐवजी Rs ३९९० कोटी प्रॉफिट झाले. कंपनीच्या व्यवस्थापनाने सांगितले की ऑटो सेक्टरमधील रिकव्हरीमुळे डोमेस्टिक मार्केटमध्ये विक्री वाढली. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये स्टीलच्या किंमती वाढल्या.आम्ही चीनमध्ये आयर्न आणि स्टीलची निर्यात केली. स्टीलच्या किमती नजीकच्या भविष्यात वाढत राहतील. त्यामुळे आमच्या कंपनीसाठी चौथी तिमाही आणखी चांगली असेल. आम्ही Rs १०००० कोटी एवढे कर्ज कमी केले आहे आणि आणखी Rs १०००० कोटी कर्ज कमी करण्याचे लक्ष्य आहे. Q४ मध्ये आमच्या युरोपमधल्या बिझिनेसमध्ये सुधारणा अपेक्षित आहे. किमती वाढल्यामुळे आमचे ऑपरेशनल मार्जिन जवळजवळ दुप्पट झाले. कंपनी NINL च्या विक्रीमध्ये भाग घेण्याची शक्यता आहे.

UK सरकारने WOCKHARDT बरोबरचे व्हॅक्सिनसाठी कॉन्ट्रॅक्ट १८ ते २४ महिन्यासाठी वाढवले.

इंडिगो या कंपनीने SEBI बरोबर लिस्टिंग नॉर्म्स मधील आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्समधील त्रुटींसाठी Rs २.१कोटींना क्लेम सेटल केला.

TEXMACO इन्फ्रा या कंपनीचं डीलीस्टिंग प्रपोजल मिळाले.

राज्यसभेत मेजॉर पोर्ट ऑथॉरिटी बिल पास झाले.

SBI ने सांगितले की आम्ही ५ वर्षात Rs ५ लाख कोटींचे होम लोन देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. होमलोन मार्केटमध्ये SBI चा ३५% शेअर आहे. आता SBI च्या होम लोन पोर्टफोलिओने Rs ५ लाख कोटींचा टप्पा पार केला आहे.
ल्युपिनने Be One या नावाने आयुर्वेदिक सप्लिमेंट लाँच केले.

टी सी एस ने सांगितले की UK मध्ये आम्ही गुंतवणूक करणे चालू ठेवू. आम्ही आणखी १५०० कर्मचाऱ्यांची नेमणूक करू.
म्युच्युअल फंडांमध्ये रिटेल गुंतवणूकदार रिडम्प्शन करत आहेत. रिटेल गुंतवणूकदार म्युच्युअल फंडातून पैसे काढून घेऊन डायरेकट मार्केटमध्ये गुंतवणूक करत आहेत.

मनाली पेट्रो, अपार इंडस्ट्रीज, ASAAHI इंडिया, बँक ऑफ इंडिया, FACT(प्रॉफिट कमी झाले उत्पन्न आणि मार्जिन वाढले. Rs ९७२.२० कोटींचा वन टाइम लॉस), TTK प्रेस्टिज ( प्रॉफिट उत्पादन मार्जिन वाढले), सुवेन फार्मा ( Rs १ लाभांश जाहीर केला) पेज इंडस्ट्रीज, GAIL, हिंदाल्को, BEML ( Rs ४.८० लाभांश), ABB, पॉलीप्लेक्स( Rs १०० लाभांश) या कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. भारत बिजलीचा निकाल ठीक होता. राईट्स (प्रॉफिट उत्पन्न कमी झाले), स्पाईस जेट ( नफ्यातून तोट्यात) या कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.
आज मी आपल्याला HDFC लाईफचा चार्ट पाठवत आहे.

HDFC लाईफमध्ये ओपन इंटरेस्ट वाढत आहे पण फ्युचर्स मध्ये ओपन इंटरेस्ट कमी होत आहे. शॉर्ट्स ट्रॅप झाले. Rs ७२०च्या वर रेंज तोडली. आता Rs ७३३ चा रेझिस्टन्स आहे. हायर टॉप हायर बॉटम पॅटर्न आहे. पहिल्या हायर टॉपला दुसऱ्या हायर टॉपने क्रॉस केले पाहिजे. MSIC निर्देशांकाच्या रीबॅलन्सिंगच्या वेळेला या शेअरमध्ये खरेदी होण्याची शक्यता आहे. या कंपनीच्या न्यू बिझिनेस प्रीमियममध्ये चांगली वाढ झाली आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५१३०९ NSE निर्देशांक निफ्टी १५१०६ बँक निफ्टी ३५७८३ वर बंद झाले

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.