आजचं मार्केट –  ११ फेब्रुवारी  २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट –  ११ फेब्रुवारी  २०२१

आज क्रूड US $ ६१.०० प्रती बॅरल ते US $ ६१.२२ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७२.७४ ते US $१= Rs ७२.८१ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९०.३७ VIX २२.९० PCR १.५३ होते.

USA मध्ये अंदाजपत्रकाची तयारी चालू आहे. टॅक्सची चर्चा आहे..आज USA मधील मार्केट्स तेजीत होती. जो बिडेन यांनी US $ १.९ ट्रिलियनच्या आर्थीक पॅकेजमध्ये वाढ करण्याचे संकेत दिले. आज आशियातली चीन जपान तैवान आणि कोरिया मधील मार्केट्स नववर्षदिनानिमित्त बंद होती.

अदर पुनावाला हे मॅग्मा फिनकॉर्पमधील ६०% स्टेक Rs ३४५६ कोटींना घेणार आहे.पुनावाला यांची कंपनी राईझींग सन होल्डिंग हा स्टेक घेईल नंतर मॅग्मा फिनकॉर्पचे नाव पुनावाला फायनान्स होईल. ४५८ मिलियन शेअर्स अलॉट केले जातील. प्रमोटर्सकडे १३.३ % स्टेक राहील. ओपन ऑफर आणली जाईल.

अदर पुनावाला यांनी सांगितले की भारतामध्ये फायनान्स सेक्टर मध्ये अमर्याद संधी उपलब्ध आहेत. आमची कंपनी मुख्यतः रिटेल लोन्स, इन्शुरन्स यामध्ये काम करेल.

सरकार २ फार्मा PSU बंद करणार आहे. (१) इंडियन ड्रग्स अँड फार्माक्युटिकल्स (२) RDPL. हिंदुस्थान अँटिबायोटिक्स, बेंगाल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स, कर्नाटका अँटिबायोटिक्स अँड फार्मास्युटिकल्स यामध्ये स्ट्रॅटेजिक डायव्हेस्टमेन्ट करणार आहे.

झोमॅटोने पेडप कॅपिटल तिप्पट वाढवले. इन्फोएजचा यात १९.३% स्टेक आहे.

सूप्राजीत इंजिनीअरिंग Rs ३२० प्रती शेअर या किमतीने टेंडर बायबॅक रुटने शेअर बायबॅक करणार आहे.या बायबॅक साठी २२ फेब्रुवारी २०२१ ही रेकॉर्ड डेट ठरवली आहे. या बायबॅकमध्ये प्रमोटर्सही भाग घेणार आहेत. यासाठी Rs ४८ कोटी खर्च करणार आहे.

टाटा स्टील या कंपनीचे पार्टली पेडप शेअर्स Rs २३९.३५ या लोअर सर्किटला होते. टाटा स्टीलने सांगितले की आम्ही पार्टली पेड शेअर्सवरील Rs ४६१(Rs ४५३ प्रीमियम आणि ७.५० फेस व्हॅल्यू असे एकूण Rs ४६१) चा फायनल कॉल करत आहोत. कंपनीने सांगितले की १९ फेब्रुवारी २०२१ ही रेकॉर्ड डेट ठरवली असून या तारखेला ज्यांच्या नावावर शेअर्स असतील त्यांना ह्या फायनल कॉलची रक्कम १ मार्च २०२१ ते १५ मार्च २०२१ पर्यंत पेड करावी लागेल. ज्यांना या फायनल कॉलची रक्कम भरायची नसेल ते १९ फेब्रुवारी २०२१ पर्यंत त्यांच्याजवळील पार्टली पेड शेअर्स विकून टाकतील.

रेलटेल या रेल्वेशी संबंधीत सरकारी कंपनीचा IPO १६ फेब्रुवारी २०२१ ला ओपन होऊन १८ फेब्रुवारीला बंद होईल. प्राईस बँड Rs ९३ ते Rs ९४ आहे. ही कंपनी २० ते २१ वर्ष जुनी आहे. या वर्षी अंदाजपत्रकात रेल्वेसाठी Rs १ लाख कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे या कंपनीला ऑर्डर इंफ्लो व्यवस्थित असेल. रेल्वेबरोबरच इतर ग्राहकांनाही ही कंपनी ICT इन्फ्रा ( इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी) सर्व्हिसेस पुरवते.

ABB इंडियाला OLA कडून इलेक्ट्रिक स्कुटर्ससाठी रोबोटिक्स आणि ऑटोमोटिव्ह सोल्युशन साठी मोठी ऑर्डर मिळाली.
BHEL ला इंडियन नेव्हीकडून फ्रंटलाईन शिप्स साठी MAIN GUNS साठी ऑर्डर मिळाली.

अनुप इंजिनीअरिंग ही कंपनी Rs ८०० कमाल किमतीने मार्केटमधून शेअर बायबॅकसाठी Rs २५ कोटी खर्च करेल.
बँक ऑफ बरोडा Rs ४५० कोटींचा QIP इशू करेल. या QIP इशूची किंमत सेबीच्या फार्म्युल्यानुसार ठरवली जाईल.
इन्फिबीम ह्या कंपनीने १:१ बोनस इशू जाहीर केला.

महिंद्रा लाईफ स्पेस ही कंपनी पुण्यामध्ये रेसिडेन्शियल प्रोजेक्ट लाँच करणार आहे.

इंडो नॅशनल, प्रिसिजन वायर्स, TVS श्रीचक्र, JTEKT, अमृतांजन या कंपन्यांच्या प्रॉफिट उत्पन्न मार्जिन मध्ये वाढ झाली. तिसऱ्या तिमाहीत निकाल चांगले आले. इंडियन टेरेन फॅशन, ऍपेक्स फ्रोझन फूड्स, ISGEC हेवी इंजिनिअरिंग, यांच्या प्रॉफिट उत्पन्न मार्जिन मध्ये घट झाली.

थिरुमलाई केमिकल्स ही कंपनी तोट्यातून फायद्यात आली. प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले. स्पेन्सर या कंपनीचा तोटा कमी झाला. उत्पन्न कमी झाले पण मार्जिनमध्ये सुधारणा झाली.ग्रॅफाइट ही कंपनी तोट्यातून फायद्यात आली.

पॉवर ग्रीड, PFC या सरकारी कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. कोल इंडियाचे मात्र प्रॉफिट कमी झाले.
उद्या ग्लेनमार्क फार्मा आणि अपोलो हॉस्पिटल्सचे निकाल जाहीर होतील.

आज मी तुम्हाला M & M चा चार्ट देत आहे. १० फेब्रुवारी २०२१ रोजी शेअरच्या चार्टमध्ये बुलिश हरामी पॅटर्न तयार झाला. गेले चार दिवस शेअर मंदीत होता. पण मंदीत असताना व्हॅल्यूम कमी होते. कालचा हाय पाईंट आज शेअरने तोडला. MACD सेंटर आणि सिग्नल लाईनच्या वर होता. हा बुलिश इंडिकेटर असतो.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५१५३१ NSE निर्देशांक निफ्टी १५१७३ बँक निफ्टी ३५७५२ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

One thought on “आजचं मार्केट –  ११ फेब्रुवारी  २०२१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.