आजचं मार्केट –  १२ फेब्रुवारी  २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १२ फेब्रुवारी २०२१

आज क्रूड US $ ६०.६२ प्रती बॅरल ते US $ ६०.८० प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $ =Rs ७२.७८ ते US $१=Rs ७२.८५ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९०.५९ VIX २२.०४ PCR १.३७ होते.

आशियातील चीन जपान तैवान आणि कोरिया मधील मार्केट्स नववर्षोत्सवानिमित्त बंद होती. भारतीय मार्केट्स तेजीत होती. आज मिडकॅप आणि स्माल कॅप कंपन्यांच्या तिसऱ्या तिमाही निकालांची घोषणा झाली.

US $ मधील पडझड थांबली USA मध्ये बॉण्ड यिल्ड वाढले म्हणून सोन्यात किंचित मंदी होती. कॉपर,झिंक, निकेलमध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल उद्योगाकडून आणि स्टील सेक्टर मधून मागणी असल्यामुळे तेजी होती.

४ फेब्रुवारी २०२१ रोजी सरकारनी ६४ कमर्शियल कोल खाणींसाठी लिलाव केला होता.

सरकारने आता आणखी ११ कमर्शियल कोळश्याच्या खाणींसाठी लिलावांतर्गत बोली मागवल्या आहेत.

मुरुगप्पा ग्रुप ट्यूब इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून व्हेईकल उत्पादन सुरु करणार आहे. एव्हिएशन सेक्टरमध्ये सुधारणा होत आहे . DGCA ने ठरवलेल्या विमान प्रवासी भाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणुन इंडिगो, स्पाईस जेट यांच्या शेअर्समध्ये तेजी होती.

फिनोलेक्स केबल्स, CHEVIOT, ग्लॉस्टर, मदर्सन सुमी, ऍडव्हान्स एंझाइम, हिंदुस्थान फूड्स, हिंदुस्थान एरॉनॉटिक्स, डेक्कन सिमेंट, मुंजाल ऑटो, UFLEX, TNPL, अलकार्गो लॉजिस्टिकस, NHPC, क्रिसिल, ताल इंटरप्रायझेस, हॅरिसन मल्याळम, रेपको होम फायनान्स, कल्याणी फोर्ज, ITD सिमेंटेशन, कनोरिया केमिकल्स ( कंपनी तोट्यातून फायद्यात आली),ITC ( Rs ५ लाभांश दिला), सिमेन्स या कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

पॉवर मेक, डिशमन फार्मा, रिको ऑटो, भारत डायनामिक्स,भारत फोर्ज ( कंपनीने त्यांच्या जर्मन सब्सिडीअरीची सेटलमेंट Rs २९९ कोटी वन टाइम लॉस बुक केला. त्यामुळे कंपनीने Rs २१० कोटी तोटा दाखवला आहे), मिश्र धातू निगम, इमामी रिअल्टी या कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.

१६ फेब्रुवारी २०२१ पासून रेलटेल या रेल्वेशी संबंधित मिनिरत्न सरकारी कंपनीचा IPO ओपन होऊन १८ फेब्रुवारी २०२१ रोजी बंद होईल. ह्या कंपनीच्या शेअर्सची अलॉटमेंट २३ फेब्रुवारी २०२१ रोजी होईल.ह्या कंपनीचे शेअर्स डिमॅट खात्यावर २४ फेब्रुवारी २०२१ रोजी जमा होतील. ह्या कंपनीच्या शेअर्सचे लिस्टिंग २६ फेब्रुवारी २०२१ रोजी होईल. ही कंपनी भारतातील सर्वात मोठी न्यूट्रल टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हायडर आहे. ही २० वर्ष जुनी कंपनी आहे. या IPO चा प्राईस बँड Rs ९३ ते Rs ९४ असून याचा मिनिमम लॉट १५५ शेअर्सचा असून मिनिमम लॉट साठी Rs १४५७० रक्कम गुंतवावी लागेल. रिटेल गुंतवणूकदार १३ लॉट म्हणजे २०१५ शेअर्ससाठी अर्ज करु शकतील. या IPO मध्ये ५०% शेअर्स QIB साठी आणि उरलेल्या ५०% पैकी १५% HNI साठी तर ३५% रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवले आहेत. हा IPO Rs ८१९ कोटींचा असेल. सरकार त्यांचा २७.१६% स्टेक विकणार आहे. त्यामुळे या IPO ची प्रोसिड्स सरकारकडे जातील. डिजिटल थीम, स्टेडी रेव्हेन्यू आणि ग्रोथ आणि रेल्वेला या अंदाजपत्रकात Rs १ लाख कोटींची तरतूद केलेली आहे.रेल्वेचा डिजीटलायझेशन आणि आधुनिकीकरणावर फोकस असल्यामुळे कंपनीला ऑर्डर्सचा तुटवडा असणार नाही. ही कंपनी ICT ( इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी) पुरवते. या कंपनीसारखी दुसरी लिस्टेड कंपनी या क्षेत्रात नाही.
शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या विक्रीसाठी EOI सबमिट करण्याची तारीख १ मार्च २०२१ पर्यंत आणि ई-मेलने EOI सबमिट करण्याची तारीख १५ मार्च २०२१ केली.

१ एप्रिल २०२१ पासून सर्व प्रवासी गाड्या सुरु होण्याची शक्यता आहे असे जाहीर झाल्यामूळे IRCTC च्या आणि रेल्वेशी संबंधित इतर शेअर्समध्ये तेजी आली.

आज मार्केटमध्ये IT सेक्टर, सिमेंट, रिअल्टी सेक्टर, फर्टिलायझर आणि केमिकल सेक्टर्समध्ये तेजी होती. त्यात ज्या कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले त्यांची भर पडली. तर काही कंपन्यांच्या शेअरमध्ये निकालांविषयी अपेक्षा समाविष्ट असल्यामुळे हे शेअर्स कंपनीचे चांगले निकाल येऊनही पडले.

वोल्टास आपल्या डोमेस्टिक कारभाराची रीस्ट्रक्चरिंग करणार आहे. युनिव्हर्सल MEP प्रोजेक्टमध्ये बिझिनेस ट्रान्स्फर होणार आहे. सन फार्माने व्हिसल ब्लोअरने केलेल्या तक्रारीचे निवारण केले यासाठी Rs ३ कोटी
खर्च आला.

आज मी तुम्हाला बंधन बँकेचा चार्ट देत आहे. बंधन बँकेमध्ये १.७५% तेजी होती. बर्याच दिवसांची मंदी आणि लोअर लेव्हलवर कन्सॉलिडेशन नंतर या शेअरमध्ये खरेदी होत आहे. सर्व वाईट बातम्या आतापर्यंत किमतीत समाविष्ट झाल्या आहेत. रिटरेसमेन्ट नंतर तेजी येत आहे. गृह फायनान्स बरोबरच्या मर्जरला आता एकवर्ष पूर्ण होत आहे त्यामुळे आता ही बँक पूर्णपणे बँक म्हणून सर्व बिझिनेस करू शकेल. या शेअरने २० DMA पार केले आहे.
BSE निर्देशांक सेंसेक्स ५१५४४ NSE निर्देशांक निफ्टी १५१६३ आणि बँक निफ्टी ३६१०८ वर बंद झाले.

Nureca IPO 15 ते 17 फेब्रुवारीला येईल price band -396 ते 400 आहे 35 शेअरचा लॉट आहे 10 रुपये face value आहे healthcare आणि wellness प्रॉडक्ट distributor आहे

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५१५३१ NSE निर्देशांक निफ्टी १५१७३ बँक निफ्टी ३५७५२ वर बंद झाले.
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.