आजचं मार्केट – १५ फेब्रुवारी २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १५ फेब्रुवारी २०२१

आज क्रूड US $ ६३.२१ प्रति बॅरेल ते US $ ६३.६८ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७२.५६ ते US $१= Rs ७२.६९ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९०.३५ VIX २१.९३ PCR १.४३ होते.

आज चीन आणि हॉंगकॉंग तसेच USA मधील मार्केट्स बंद होती. सोने आणि चांदी माफक तेजीत होती. कॉपर अल्युमिनियम निकेल तेजीत होते. आज क्रूडही तेजीत होते. भारतीय मार्केट्समध्ये आज IT, आणि फायनान्सियल सेक्टर मध्ये तेजी होती.आज सेन्सेक्सने ५२१७७, निफ्टीने १५३२६ आणि बॅँक निफ्टीने ३७३०६ हा ऑल टाइम हाय इंट्राडे पार केला.

हॅवेल्स ही कंपनी राजस्थानमध्ये नवीन वॉशिंग मशीन उत्पादन करण्याचा प्लान्ट लावणार आहे. त्यामुळे कंपनीचा शेअर तेजीत होता.

CDSL डिमॅट अकौंटहोल्डर्सच्या संख्येने ३ कोटींचा आकडा पार केला. आज CDSL च्या शेअरमध्ये खरेदी दिसून आली.
जानेवारी २०२१ या महिन्यासाठी WPI ( होलसेल प्राईस इंडेक्स) २.०३% होता. ( डिसेंबर २०२० मध्ये हा इंडेक्स १.२२% होता). प्रायमरी आर्टिकल्स, मॅन्युफॅक्चअरिंग प्रॉडक्टस आणि फ्युएल आणि पॉवर यांची महागाई वाढली तर अन्नधान्य, भाजीपाला यांची महागाई कमी झाली.

TVS मोटर्सने UAE मध्ये त्यांची उत्पादने लाँच आणि डिस्ट्रिब्युट करण्यासाठी ‘पब्लिक मोटर्स’ बरोबर करार केला.
RBIने डेप्युटी गव्हर्नरच्या अध्यक्षतेखाली प्रायमरी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक सेक्टर मजबूत करण्यासाठी प्रस्ताव देण्यासाठी एक तद्न्यांची समिती नेमली.

टाटा मोटर्स ने आज सांगितले की आमची कंपनी २०२५ पर्यंत DEBT फ्री होईल. आमची मार्जिन ग्रोथ २०२५ पर्यंत डबल डिजीट होईल.कंपनी जग्वार आणि लँडरोव्हरचे इलेक्ट्रिक व्हेरियंट २०२५ पर्यंत लाँच करेल. त्यामुळे आज टाटा मोटर्स आणि टाटा मोटर्स DVR या शेअर्स मध्ये तेजी आली.

कोविडच्या संकटाची छाया आता थोडी कमी व्हायला लागली आहे. उद्योग, व्यापार आता बर्याच प्रमाणात स्थिरावायला लागले आहेत. २०२१च्या तिसऱ्या तिमाहीने या विश्वासाला

बर्याच प्रमाणात दुजोरा दिला. कारण तुरळक अपवाद वगळता यावेळी बहुतेक क्षेत्रातील बहुसंख्य कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल सकारात्मक आले आहेत. त्याच बरोबर सरकार ही विविध योजनांद्वारा अर्थव्यवस्था प्रीकोविड स्तरावर येउन तिची प्रगती व्हावी असा प्रयत्न करत आहे. अंदाजपत्रकातील सरकारी खर्च ( भांडवली आणि रेव्हेन्यू) वाढवण्याच्या निर्णयामुळे मागणी वाढेल आणि या मागणीला प्रतिसाद म्हणून पुरवठा वाढवण्याचा उद्योग प्रयत्न करतील. त्यासाठी क्रेडिटची आवश्यकता असेल आणि त्यामुळे आज सरकारी, खाजगी बँका, NBFC आणि होम फायनान्सिंग कंपन्या यात तेजी आली. बँक निफ्टीच्या १२ शेअर्समध्ये तेजी होती. SBI ने Rs ५ लाख कोटी होमलोन देण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

सरकारने ज्या बँकांना कॅपिटलची गरज असेल त्यांना रिकॅपिटलायझेशन करण्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद केली आहे. RBI ने आश्वस्त केले आहे की आम्ही अर्थव्यवस्थेमध्ये लिक्विडीटी योग्य स्तरावर राहील याची काळजी घेऊ.तसेच सरकारने सांगितले की एका मर्यादेपेक्षा जास्त असलेले NPA एका SPV किंवा बॅड बँकेकडे ट्रान्स्फर करू . डिसेम्बरसाठी IIP पॉझिटिव्ह झाला आहे आणि जानेवारी साठी CPI ४% च्या आसपास आहे. या सर्व सकारात्मक संकेतांमुळे बँकांना प्रगती करायला योग्य स्पेस उपलब्ध असेल. पूनावालांनी मॅग्मा फिनकॉर्प खरेदी केली, गोदरेज ग्रुप होम फायनान्सच्या क्षेत्रात येत आहे. NBFC चे रीरेटिंग होण्याची शक्यता आहे.त्यामुळे आज प्रथम खाजगी बँकांमध्ये आणि नंतर PSU बँकांमध्ये खरेदी झाली. ऑटो आणि रिअल्टी क्षेत्रातील रिकव्हरीमुळे ऑटो फायनान्स कंपन्या आणि होम फायनान्स कंपन्यांमध्येही तेजी होती. त्यामुळे आज भारतीय मार्केटमधील तिन्ही निर्देशांकांनी इंट्राडे ऑल टाइम हायला स्पर्श केला.

गुजरात अपोलो या कंपनीने Rs २२२ प्रती शेअर या दराने शेअर बायबॅक जाहीर केला.

अमर राजा या कंपनीने आंध्र प्रदेशात नवीन सोलर प्लांट लावला.

NURECA हा IPO १५ फेब्रुवारी २०२१ ला ओपन होऊन १७ फेब्रुवारीला बंद होईल. प्राईस बँड Rs ३९६ ते Rs ४०० आहे. मिनिमम लॉट ३५ शेअरचा आहे. Rs १० दर्शनी किमत आहे.कंपनी हेल्थकेअर आणि वेलनेस प्रॉडक्टसची डिस्ट्रिब्युटर आहे. ह्या शेअरचे लिस्टिंग २६ फेब्रुवारीला होईल. पहिल्या दिवशी हा IPO एकूण ५.७३ वेळा आणि रिटेल कोटा ३१ वेळा भरला.

इरकॉनने त्यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स च्या बैठकीत बोनस शेअर इशू न करण्याचा निर्णय घेतला.कंपनीने Rs १.३० प्रती शेअर असून त्यासाठी रेकॉर्ड डेट २४ फेब्रुवारी आहे.

आज SIS या कंपनी Rs ५५० प्रती शेअर या भावाने टेंडर ऑफर रूटने १८ लाख शेअर्स बायबॅक करण्यासाठी Rs १०० कोटी खर्च करेल.

आरोहण फायनान्सियलस या कंपनीने Rs ८५० कोटींच्या IPO साठी DRHP दाखल केले.

सरकारने दोन बँकांच्या खाजगीकरणासाठी बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, IOB आणि सेंट्रल बँक यांना शॉर्टलिस्ट केले.

RBI २५ फेब्रुवारीला Rs १०,००० कोटींच्या सरकारी सिक्युरिटीजची खरेदी विक्री करेल. उद्या नेस्ले आपले तिमाही निकाल जाहीर करेल.

आज आलेल्या निकालात मयूर UNIQUOTERS, टी व्ही टुडे, इन्फोएज, ग्लेनमार्क फार्मा, गॉडफ्रे फिलिप्स, GIC हौसिंग फायनान्स, बोरोसिल रिन्यूएबल्स, IRFC, कोची शिपयार्ड यांचे निकाल चांगले आले. ONGC,शिल्पा मेडिकेअर, GMR इन्फ्रा, फोर्स मोटर्स, टिमकीन इंडिया, शोभा,MOIL, ड्रेजिंग कॉर्पोरेशन यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल सर्वसाधारण होते.

आज मी तुम्हाला स्टार पेपर या कंपनीचा चार्ट देत आहे. स्टार पेपर आज ५० DMA च्या वर उघडला आणी तोच त्याचा लो पाईंट आहे. MA, ५० DMA च्यावर ब्रेकआउटहोत आहे. डबल बॉटम पॅटर्न तयार झाला होता त्याच्या मध्यावर कन्फर्म झाला. ही DEBT फ्री कंपनी आहे. बिजीनेस आता हळूहळू सामान्य स्थितीत येत आहे. बहुतेक ठिकाणी शाळा कॉलेजीस तसेच ऑफिसेस उघडायला परवानगी मिळत आहे. त्यामुळे कंपनीची विक्री वाढण्याची शक्यता आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२१५४ NSE निर्देशांक निफ्टी १५३१५ वर आणि बँक निफ्टी ३७३०६ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.