आजचं मार्केट – १६ फेब्रुवारी २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १६ फेब्रुवारी २०२१

आज क्रूड US $ ६३.१५ प्रती बॅरल ते US $ ६३.६५ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७२.६४ ते US $१=Rs ७२.७६ या दरम्यान तर US $ निर्देशांक ९०.२२ VIX २१.६७ PCR १.४० होते.

आज USA मध्ये खूप हिमवृष्टी झाली त्यामुळे क्रूड आणि नैसर्गिक गॅस तेजीत होते. जर्मनी, UK , फ्रान्स येथील मार्केट्स तेजीत होती. हवामान अती थंड असल्यामुळे रिफायनरीज बंद होत्या. चीन आणि तैवानची मार्केट्स बंद होती.

लेमन ट्री या कंपनीने ऍक्सिस बँक आणि IDBI चे कर्ज फेडले. त्यामुळे लेमन ट्री हॉटेल्सचा शेअर माफक तेजीत होता.
DFM फूडचे रेटिंग क्रिसिलने काढून टाकले होते. ते आता पुन्हा बहाल केले.

‘HERANBA केमिकल्स ‘ या गूजरात बेस्ड क्रॉप प्रोटेक्शन केमिकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा Rs ६२५ कोटींचा IPO २३ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०२१ या दरम्यान येत आहे.कंपनी ९०,१५,००० शेअर्सची OFS आणि Rs ६० कोटींचा फ्रेश इशू आणत आहे. या IPO चा प्राईस बँड Rs ६२६ ते Rs ६२७ आहे, मिनिमम लॉट २३ शेअर्सचा आहे. . ही कंपनी १९९६ ला स्थापन झाली . ही कंपनी सिंथेटिक PYRETHROIDS, पेस्टीसाइड्स, फंगीसाईड्स, आणि हर्बिसाईड्स बनवते. रॅलिज, सुमिमोटो केमिकल्स, भारत रसायन या कंपनीच्या बिझिनेस क्षेत्रात काम करणाऱ्या PEER कंपन्या आहेत.

CREDIT SUISSE ने भारताचे रेटिंग अपग्रेड केले.क्रूड ,कार्स यांच्यासाठी मागणी वाढली. भारताच्या साधन संपत्तीत वाढ झाली. भारताने कोरोनाच्या काळात अर्थव्यवस्था चांगली सांभाळली म्हणून रेटिंग वाढवले. चीन आणि थायलंड यांच्या बाजाराचे रेटिंग घटवले.

क्रूड आणि नैसर्गिक गॅसमधील तेजीचा फायदा पेट्रोनेट LNG आणि गेल यांना होईल.

निफ्टीमध्ये GAIL च्या जागी टाटा कंझ्युमर्स या कंपनीचा समावेश होईल.

सरकारने बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, आणि बँक ऑफ महाराष्ट्र या चार बँकांना खाजगीकरणासाठी शॉर्टलिस्ट केले त्यामुळे चार बँकेत जबरदस्त व्हॉल्यूमने खरेदी होती. इंडियन ओव्हरसीज बँकेत सरकारचा सगळ्यात जास्त स्टेक आहे आज इतर राष्ट्रीयीकृत विशेषतः इंडियन बँकेत आणि खाजगी बँकांमध्ये खरेदी झाली. कॅपिटल गुड्स इंडस्ट्रीज, NBFC मध्ये खरेदी झाली.

‘पॉलिसी बाजार डॉट कॉम’ च्या IPO ची तयारी सुरु झाली आहे. याचा परिणाम इन्फोएज वर होईल.

इंडिगो लवकरच बिझिनेस ट्रॅव्हल सुरु करण्याची शक्यता आहे. इंडिगोने AEROTROPOLIS BENGAL बरोबर दुर्गापूरहून सेवा सुरु करण्यासाठी करार केला.

ब्रूकफील्ड च्या ‘REIT चे Rs २८१ वर लिस्टिंग झाले.

क्लॅरियंट केमिकल्स ही कंपनी इंडिया ग्लायकॉलमधील ५१% स्टेक Rs ५०० कोटींना खरेदी करेल. हा स्टेक खरेदी केल्यावर इंडिया ग्लायकॉलचा स्पेशालिटी केमिकल बिझिनेस क्लॅरियंट केमिकलच्या मालकीचा होईल. या स्टेक विक्रीच्या रकमेतून इंडिया ग्लायकोल कर्ज फेडेल. केमिकल बिझिनेसचा जो भाग इंडिया ग्लायकॉलकडे राहील त्यासाठी वेगळी सबसिडी बनवली जाईल.त्यामुळे आज इंडिया ग्लायकॉल चा शेअर वाढला.

टाटा कम्युनिकेशनने गूगल क्लाउडबरोबर भारतात क्लाउड ऍडॉप्शनसाठी करार केला.

इंडिया रेटिंगने वेदांताचे रेटिंग सुधारले. आऊटलूक निगेटिव्ह बदलून स्टेबल केला.

लोढा डेव्हलपर्स हे त्यांच्या मायक्रोटेक या कंपनीच्या Rs २५०० ते Rs २७०० कोटींच्या IPO साठी अर्ज देतील. या IPO च्या रकमेतून कर्ज कमी करण्याचा संभव आहे.

वरुण बिव्हरेजीस या कंपनीचे निकाल ठीक होते. उत्पन्न वाढले, कंपनीचा तोटा कमी झाला.

R सिस्टिम्स या कंपनीचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले होते.

नेस्ले या कंपनीचे प्रॉफिट Rs ४७३ कोटींवरून Rs ४८३ कोटी झाले. उत्पन्न Rs ३१४९ कोटींवरून Rs ३४३३ कोटी झाले.ऑपरेटिंग मार्जिन २२.६१% राहिले. कंपनीने Rs ६५ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

आज मी तुम्हाला वेदांता या कंपनीचा चार्ट देत आहे. आज या शेअरने ८ जानेवारी २०२१ चा हाय पार केला तसेच एप्रिल २०१९ नंतर हायवर आहे. Rs १८५ ते Rs १९० ही रेझिस्टन्स लेव्हल तोडली आहे.

कृष्णा गोदावरी बेसिनमधून नैसर्गिक गॅसचे उत्पादन वाढेल असा रिपोर्ट आल्यामुळे ONGC च्या शेअरमध्ये तेजी होती.
हेरिटेज फूड्स या कंपनीने फ्रेंच योगुर्ट प्रोडक्ट ‘MAMIE YOVA ‘ लाँच केले.

आजपासून रेलटेल या रेल्वेशी संबंधित सरकारी कंपनीचा IPO ओपन झाला. पहिल्या दिवशी हा IPO पूर्णपणे सबस्क्राईब झाला.

अडानी पोर्ट्सने महाराष्ट्रातील दिघी पोर्ट्सचे अधिग्रहण केले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२१०४ NSE निर्देशांक निफ्टी १५३१३ बँक निफ्टी ३७०९८ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.