आजचं मार्केट – १७ फेब्रुवारी २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १७ फेब्रुवारी २०२१

आज क्रूड US $ ६३.४५ प्रती बॅरल ते US $ ६३.९६ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७२.८३ ते US $ १= Rs ७२.९१ यास दरम्यान होते. US $ निर्देशांक ९०.७५ VIX २१.५८ PCR १.३० होता.

आज USA आणि कॅनडामधी खूपच बर्फवृष्टी होत असल्याने क्रूड आणि नैसर्गिक गॅस यांच्यात तेजी होती. USA मध्ये ट्रेजरी यिल्ड वाढले त्यामुळे सोने मंदीत होते, चांदीतही मंदी होती.

IOB ही बँक PCA मधून बाहेर पडेल. सरकारने तसे पत्र RBI लिहिले आहे. आज बॅंकांमध्येही त्याच्यात विशेषतः सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँका यांच्यात तेजी होती.

३ मार्चला मेरिकोच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची लाभांशावर विचार करण्यासाठी बैठक आहे. मॅग्मा फिनकॉर्प या कंपनीच्या शेअर्ससाठी ८ एप्रिल २०२१ ते २६ एप्रिल २०२१ दरम्यान ओपन ऑफर आणली जाईल.

चीनमधील कंपन्यांकडून होणाऱ्या SG बेस स्टेशन, नेटवर्क, अँटेना, राउटर या सारख्या नेटवर्किंग आणि टेलिकॉम उपकरणांच्या आयातीवर अवलंबून राहायला लागू नये म्हणून सरकारने आज या आणि इतर उपकरणांच्या उत्पादनासाठी PLI (प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह ) योजना जाहीर केली. ही योजना ५ वर्षे मुदतीची असेल. या योजनीसाठीए सरकार Rs १२१९४ कोटींची तरतूद केली आहे. या योजनीचा फायदा ITI, तेजस नेटवर्क, स्टरलाईट टेक्नॉलॉजी, HFCL, पॅरामाऊंट कम्युनिकेशन, स्मार्ट लिंक, D -लिंक या कंपन्यांना होईल. या मुळे आज. या सर्व कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती. ही स्कीम १ एप्रिल २०२१ पासून लागू होईल. या योजनेमुळे Rs २.४५ लाख कोटी उत्पादन, Rs १.९५ लाख कोटी निर्यात वाढेल आणि ४०००० नवीन माणसांना काम उपलब्ध होईल

आज मॉरीशस इकॉनॉमिक पार्टनरशिप कराराला मंजुरी मिळाली.

आज सरकारने कॅप्टिव्ह कोल माईन्स तसेच इतर खनिज उत्पादनाचे ५०% उत्पादन ओपन मार्केटमध्ये विक्री करायला मंजुरी दिली. यात आयर्न ओअर, ब्रोमाइड बॉकसाईट यांचा समावेश आहे. भारतात सरकारने हे मंजूर काही अटींवर दिली आहे.

आज मी तुम्हाला HDFC लाईफ या कंपनीचा चार्ट देत आहे. चार दिवसांच्या कन्सॉलिडेशननंतर शेअर तेजीत आला. इम्पॉर्टन्ट सपोर्ट वरून वाढत आहे. दिवसाचा नांवें हाय चांगल्या व्हॉल्युम सह दिसत आहे.आजच्या या शेअरच्या लाल कँडल ( मंदीच्या ) कमी व्हॉल्युमी आणि तेजीच्या कँडल्स जास्त व्हॉल्यूमने तयार होत आहेत.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५१७०४ NSE निर्देशांक निफ्टी १५२०८ बँक निफ्टी ३६९१० वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

4 thoughts on “आजचं मार्केट – १७ फेब्रुवारी २०२१

  1. Dnyaneshwar Chandrakant Dhakiphale

    Aaji mala tumchi share market vishaya varil sarv pustake vikat ghyayachi ahet tar me the kase vikat gheu shaken. Online kharedi Karu shakato ka .

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.