आजचं मार्केट – १८ फेब्रुवारी २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १८ फेब्रुवारी २०२१

आज क्रूड US $ ६४.६१ प्रती बॅरल ते US $ ६५.३० प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७२.६५ ते US $१=Rs ७२.७६ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९०.८७ VIX २१.६८ आणि PCR १.१५ होते.

USA मध्ये डाऊ जोन्स तेजीत तर S & P तेजीमंदीत तर NASHDAQ मंदीत होते. युरोपिअन मार्केट्स आणि आशियायी मार्केट्स माफक मंदीत होती.

USA आता कोरोना बरोबरच हवामानाच्या संकटाशीही सामना करत आहे. अतिशय कडक थंडी पडल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणावर हिमवर्षाव होत असल्यामुळे USA मधील क्रूडचे उत्पादन ४०% बंद आहे, ४० लाख बॅरल्सने कमी झाले आहे. सौदी अरेबिया क्रूडचे उत्पादन वाढवायच्या तयारीत आहे. त्यामुळे आज क्रूडचा भाव US $ ६५ प्रती बॅरलच्या वर होता.
USA मध्ये ट्रेजरी यिल्ड १.३०% पेक्षा जास्त झाले आहे तसेच US $ मजबूत होत आहे त्यामुळे सोने आणि चांदी यात मंदी येत आहे. कॉपर आणि जस्तासाठी औद्योगिक मागणी वाढत असल्यामुळे हे धातू तेजीत होते.
या सर्व गोष्टींमुळे जागतिक संकेत आज सावधगिरीचे होते.

IMF ( आंतरराष्ट्रीय मॉनेटरी फंड) यांनी सांगितले की भारताच्या GDP ग्रोथचा रेट २०२१ मध्ये ११.५% असेल तर २०२२ मध्ये ६.८% असेल. त्यामुळे भारत ही सगळ्या मोठ्या अर्थव्यवस्थानमध्ये सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था होईल. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे जागतिक रेटिंग वाढेल.

आज नोमुरा या रेटिंग एजन्सीने भारताचे रेटिंग ओव्हरवेट केले. अंदाजपत्रकातील विविध रिफॉर्म्समुळे भारताची अर्थव्यवस्था सुधारेल असा अंदाज व्यक्त केला. भारतीय मार्केटमध्ये तेजी आणि मंदीच्या लहरी येत होत्या. त्यामुळे मार्केटमध्ये वोलतालीटी होती.

आज ऑइल आणि गॅस क्षेत्रातली शेअर्समध्ये जबरदस्त तेजी होती. एकतर क्रुडमधील तेजी वाढत आहे. सरकारनी नैसर्गिक गॅस GST च्या कक्षेत आणण्याचे ठरवले. त्यामुळे आता निरनिराळ्या राज्यात लागणाऱ्या राज्य सरकारच्या टॅक्समुळे प्रत्येक राज्यात नैसर्गिक गॅसची किंमत वेगळी आहे ती सर्व देशात एकच दराने आकारली जाईल. त्यामुळे नैसगिर्क गॅस स्वस्त झाल्यामुळे निरनिराळया उद्योगात गॅसबेस्ड इंधन वापरले जाईल. त्यामुळे अर्थव्यवस्थेत गॅस बेस्ड उद्योगाचा वाटा वाढेल. तसेच नैसर्गिक गॅसवर इनपुट टॅक्स क्रेडीटचा फायदा देता येईल का याचाही विचार चालू आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा IGL, MGL, गुजरात गॅस, अडानी गॅस या सिटी गॅस डिस्ट्रिब्युटर कंपन्यांना, गॅस उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना तसेच फर्टिलायझर उत्पादन करणाऱ्या, सिरॅमिक्स क्षेत्रातील कंपन्यांना होईल. सरकार या ऑइल आणि गॅस इन्फ्रास्ट्रक्चरसाठी येत्या ५ वर्षात Rs ७.५ लाख कोटी खर्च करेल.

इंडस इंड बँकेच्या प्रमोटर्सनी Rs १७०९ प्रतिशेअर या भावाने त्यांच्या शेअर वॉरंटसचे कॉन्व्हर्जन केले. त्यामुळे इंडसइंड बँकेचे भांडवल Rs २०२१ कोटींनी वाढले.आनि फायनान्सियल रेशियोज सुधारले.

अरविंद फॅशन Rs १३५ प्रती शेअर या दराने Rs २०० कोटींचा राईट्स इशू आणण्याची शक्यता आहे

GAIL या कंपनीचा शेअर बायबॅक २५ फेब्रुवारीला ओपन होऊन १० मार्चला बंद होईल. वार्नबॅग पिनकसने भारती टेलिमेडियामधील २०% स्टेक घेतला.

NURECA या कंपनीचा IPO ४० वेळा ओव्हर सबस्क्राईब झाला .

DHFL च्या रिझोल्युशन प्लान RBI ने मंजूर केला. त्यामुळे आता पिरामल कॅपिटलला DHFL ही कंपनी टेकओव्हर करणे शक्य होईल. अर्थात अजून NCLT ची मंजुरी आवश्यक आहे.

SUUTI मधील सरकारजवळ असलेल्या ऍक्सिस बँकेचा १% स्टेक सरकार विकणार आहे.

RBI कडून सरकारला Rs ५७००० कोटींच्या लाभांशाची अपेक्षा आहे.

आज PSU बँका, पॉवर क्षेत्रातील तसेच ऑइल आणि गॅस क्षेत्रातले PSU तेजीत होते.

सरकारने GIC रे आणि युनायटेड इंडिया इन्शुअरन्स कंपनीचे खाजगीकरण करणार असे जाहीर झाल्यामुळे GIC रे आणि न्यू इंडिया अशुअरन्स या कंपन्यांच्या शेअरमध्ये तसेच इतर जनरल इन्शुअरन्स कंपन्यांच्या शेअर्स मध्ये तेजी होती.
युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बरोडा या तीन सरकारी बँकांनी QIP करण्यासाठी RBI कडे मंजुरी मागितली.

शिल्पा मेडिकेअरच्या तेलंगणामधील युनिटसाठी USFDA ने इम्पोर्ट अलर्ट जारी केला. तीन प्रॉडक्टसना या अलर्टमधून वगळण्यात आले..

डोमेस्टिक हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ३९.५% ने कमी होऊन ७७.३० लाख झाली. या मार्केटमधील स्पाईस जेटचा मार्केटशेअर १२.८% इंडिगोचा ५४.३% आणि एअर इंडियाचा १०.३% होता.

G.E. शिपिंग या भारतीय शिपिंग कंपनीने शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीसाठी बोली दिली.

आज मी तुम्हाला BPCL चा चार्ट देत आहे या कंपनीच्या शेअरमध्ये कन्सॉलिडेशननंतर छोटे करेक्शन आल्यानंतर खरेदी होत आहे. गॅप पूर्ण करून शेअर पूर्णपणे अपट्रेन्ड मध्ये आहे Rs ४३०ला रेझिस्टन्स आहे.तो पार केला तर शेअरमध्ये ब्रेकआउट येण्याची शक्यता आहे.

PSU बँकांमधील तेजी आजही चालू होती. पण दिवसाच्याशेवटी एक्स्पायरी असल्यामुळे प्रॉफिट बुकिंग झाले.
रेलटेल या सरकारी कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी भरघोस पाठिंबा दिला. हा IPO ३७ वेळा ओव्हरसब्सक्राइब झाला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५१३२४ NSE निर्देशांक निफ्टी १५११९ बँक निफ्टी ३६५८७ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.