आजचं मार्केट – १९ फेब्रुवारी २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १९ फेब्रुवारी २०२१

आज क्रूड US $ ६२.६९ प्रती बॅरल ते US $ ६३.३५ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७२.६३ ते US $१= Rs ७२.६५ होते. US $ निर्देशांक ९०.४० VIX २२.२१ PCR १.१७ होते.

USA मध्ये बर्फ़ाचे वादळ आल्यामुळे टेक्सास राज्यात जेथे मुख्य रिफायनरी आहेत तेथे क्रूडचे प्रॉडक्शन बंद होते. या रिफायनरीज अजून काही काळ बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेले दोन दिवस क्रुडमध्ये तेजी होती. USA मध्ये रोजगारीचे आकडे खराब आले.USA मध्ये US $ २.२ ट्रिलियन पर्यंत पॅकेजची रक्कम वाढण्याची शक्यता आहे. USA मध्ये ट्रेजरी यिल्डस वाढल्यामुळे सोन्याचा भाव घसरला.

कोरोनाचे प्रमाण कमी होत असल्यामुळे थिएटर्स सभागृहे आणि नाट्यगृह उघडण्यासाठी आणि १००% क्षमतेवर ( अर्थात सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून) चालवण्यासाठी राज्य सरकारे परवानगी देत आहेत. त्यामुळे आता नवीन मुव्हीज रिलीज होण्याचे प्रमाण वाढेल. उदा चक्र, फौजी कॉलिंग इत्यादी. याचा परिणाम PVR, इनॉक्स लिजर, मुक्ता आर्ट्स, UFO मुव्हीज, सिनेलाईन इंडिया यांना होईल.

इंजिनीअर्स इंडिया आणि ऑइल इंडिया नुमाळीगढ रिफायनरीसाठी बीड करणार आहेत.

डाबर इंडियाचे प्रमोटर्सनी फायनान्सियल इन्व्हेस्टर म्हणून व्यक्तीशः एव्हरेडी मध्ये १९.८४ % पर्यंत स्टेक वाढवला.बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये १ सीट त्यांना देण्याचा विचार आहे. डाबरच्या प्रमोटर्स ०.५४% स्टेक विकला .

सविता ऑइल हि कंपनी Rs १४०० प्रती शेअर या भावाने Rs ३५.१४ कोटीपर्यंत शेअर बायबॅकवर खर्च करेल.

चीनमध्ये हॉट रोल्ड कॉईलच्या किंमती वाढल्या याचा फायदा टाटा स्टीलला होईल.

मेरिको ही कंपनी ‘सफोला ऊडल्स’ या नावाने नूडल्सच्या मार्केटमध्ये प्रवेश करत आहे. या मार्केटमध्ये आता नेस्लेचे मॅग्गी आणि ITC चा यीप्पी ब्रँड हे प्रमुख ब्रँड आहेत.मेरिकोने या आधी सफोला ऑइल, सफोला ओट्स इत्यादी प्रॉडक्टस लाँच केली आहेत .

आज IDFC १ST बँकेच्या व्यवस्थापनाने सांगितले की आम्ही Rs ३००० कोटी भांडवल उभारणार आहोत. FY २२ मध्ये लोन ग्रोथ २०% ते २५% असेल. बँकेची बुक व्हॅल्यू Rs ३३.४ होईल. कोरोनाच्या काळात NPA १.६% ने वाढले. आम्ही भविष्य काळातील काँटिन्जन्सीचा विचार करून प्रोव्हिजन केलेली असल्यामुळे अधिक प्रोव्हिजन करण्याची जरूर नाही. येत्या वर्षात रिकव्हरीचे प्रमाण वाढेल. कारण पैसे मिळाल्यावर त्यातून आपण काढलेले कर्ज फेडण्याची आपली संस्कृती आहे.
शीला फोम या कंपनीला त्यांचा जलपाईगुडी प्लांट बंद करायला सांगितला.

ज्युबिलण्ट फूड्स या कंपनीच्या नेदर्लंड्स मधील सबसिडीअरीने ‘फीड्स फूड सिस्टिम्स’ या कंपनीतला ३२.८१% २४.८० मिलियन GBP ला स्टेक घेतला.

अंबुजा सिमेंट या कंपनीचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. कंपनीने Rs १ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

आज मार्केटमध्ये सर्वसाधारणतः मंदी होती. सरकार आणि नीती आयोग यांच्यामध्ये बँकांमधील विनिवेशासंबंधात चर्चा होईल आणि पुढील दोन आठवड्यात या बाबतीत निर्णय घेतला जाइल अशी बातमी आल्यामुळे आज सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांमध्ये प्रॉफिट बुकिंग झाले. निवडक IT, फार्मा कंपन्या तेजीत होत्या. मार्केट आज शेवटी मंदीतच क्लोज झाले.

आज मी तुम्हाला बायोकॉनचा चार्ट देत आहे. बायोकॉनच्या चार्टमध्ये आपल्याला गॅप दिसत आहे.गॅपचा बॉटम हा रेझिस्टन्स आहे हा रेझिस्टन्स शेअर पार करू शकला नाही आणि आज मारूबोझू कँडल तयार झाली आहे. म्हणजे ओपन होत असताना जी CMP होती तीच हाय प्राईस आहे. गॅप पार केल्याशिवाय शेअरमध्ये तेजी संभवत नाही.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५०८८९ NSE निर्देशांक निफ्टी १४९८१ बँक निफ्टी ३५८४१ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.