आजचं मार्केट – २२ फेब्रुवारी २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २२ फेब्रुवारी २०२१

आज क्रूड US $ ६३.३४ प्रती बॅरल ते US $ ६३.९२ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= ७२.३५ ते US $ १=Rs ७२.५१ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९०.३७ VIX २५.३८ PCR १.१९ होते.

आज सकाळी एशियन मार्केट्स मध्ये किंचित तेजी होती. USA मधील १० वर्षाच्या बॉण्ड्सचे यिल्ड १.३७ वर पोहोचले. टेक्सासमधील रिफायनरीजचे काम आता हळूहळू पूर्वस्थितीवर येत आहे. फायझरचे व्हॅक्सिन कोरोनाचे संक्रमण रोखण्यात सक्षम ठरत आहे. केरळमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. PCR १.१९ आहे हे बुल्सच्या दृष्टीने महत्वाचे आहे.

आज USA मध्ये US $ १.९० ट्रिलियनचे बिल त्यांच्या संसदेत सादर केले. या घटने मुळे एक असा अंदाज आहे की USA मधील परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा असल्यामुळे इमर्जिंग मार्केटमधून गुंतवणूक परत USA च्या मार्केटमध्ये परत जाईल. त्यामुळे आज मार्केटमध्ये मंदी आली असावी.

आज बिट कॉइनच्या किमतीत घट झाली, डॉलर निर्देशांक वीक होता त्यामुळे सोन्यात तेजी होती तर US मधील बॉण्ड यिल्डस वाढत असल्यामुळे सोन्यावर थोडाफार दबाव होता. कोरोनाच्या काळात दक्षिण अमेरिकेतील विविध धातूंच्या ४०० खाणी बंद होत्या. त्यामुळे कॉपर,अल्युमिनियम, झिंक, निकेल या सर्व धातूंमध्ये तेजी होती.कमी पुरवठा आणि चीनमधून येणारी वाढती मागणी यामुळे या धातूंमध्ये तेजी होती. कॉपर मधील तेजीचा फायदा हिंदुस्तान कॉपर आणि नाल्को यांना होईल. झिंक आणि अल्युमिनियम यांच्यामधील तेजीचा फायदा अनुक्रमे हिंदुस्थान झिंक आणि वेदांता यांना होईल.

FTSE( फायनान्सियल टाइम्स स्टॉक एक्स्चेंज ग्रुप) या निर्देशांकाचे मार्च, जून, सप्टेंबर आणि डिसेंबर मध्ये रीबॅलन्सिंग होते.FTSE चे आता १९ मार्च २०२१ रोजी रीबॅलन्सिंग होणार आहे. त्यामुळे भारतात Rs ६५०० कोटी गुंतवणूक येईल अशी अपेक्षा आहे. लार्ज कॅप मध्ये रिलायन्स PP, अडाणी एंटरप्रायझेस, अडानी टोटलगॅस यांचा समावेश केला. अस्त्रल पॉली, हनीवेल, HAL, अपोलो हॉस्पिटल्स, माईंड ट्री, वरूण बिव्हरेजीस, युनायटेड ब्रुअरीज, PNB यांचा मिडकॅप इंडेक्स मध्ये समावेश केला जाईल. भारती एअरटेल, इंडस टॉवर्स, अडाणी टोटल यांचा मार्च १९ २०२१ पासून समावेश होईल. रिलायन्स, HDFC , इन्फोसिस यांचे वेटेज कमी होईल.आणि फ्युचर रिटेल या कंपनीचे शेअर्स वगळले जातील

NSE फेब,२४, २०२१ पासून खाली दिलेले १५ कंपन्यांचे शेअर्स डीलीस्ट करणार आहे.

ऑटोराइडर्स फायनान्स, बिलपॉवर, B S लिमिटेड, गिरधारीलाल शुगर आणि अलाइड इंडस्ट्रीज, खेतान इलेक्ट्रिकल्स, नागार्जुना ऑइल रिफायनरी, पोचीराजू इंडस्ट्रीज, PROVOGUE, S कुमारस इंटरनॅशनल, श्री गणेश फोर्जिंग्ज, सुनील हायटेक इंजिनीअर्स, सुराणा कॉर्पोरेशन, तारा ज्युवेलर्स, विजय शांती बिल्डर्स, झायलॉग सिस्टिम्स. यापैकी गिरधारीलाल शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज, PROVOGUE, झायलॉग सिस्टिम्स या कंपन्या अंडर लिक्विडेशन प्रोसेस मध्ये आहेत.
ANILINE वर US $ १३१.७९ प्रती टन एवढी अँटी डम्पिंग ड्युटी लावणार आहे याचा फायदा GNFC ला होईल.
टेट्राफ्लुरोइथेन वर ऍन्टीडम्पिंग ड्युटी बसवणार आहे. याचा फायदा SRF, नवीन फ्ल्युओरीनला होईल. हे केमिकल रेफ्रिजरेशनसाठी लागते.

टाटा मोटर्सने सफारीची नवीन ६ व्हरायन्ट लाँच केली. व्यवस्थापनाने सांगितले की सेफ्टी, काम्फर्ट आणि नव्या पिढीच्या अपेक्षा लक्षांत घेऊन ही व्हरायन्ट बनवली आहेत. या कारची किंमत Rs १४.७० लाख एवढी ठेवली आहे.
रिलायन्स US $ ४० मिलियनला ऑन लाईन मिल्क डिलिव्हरी स्टार्टअप ‘मिल्क बास्केट’ विकत घेणार आहे.
जागरण प्रकाशन ही कंपनी २ मार्च २०२१ रोजी शेअर बायबॅकवर विचार करेल.

चीनमधून सीमलेस ट्यूब्स (अलॉय आणि नॉन अलॉय) डम्पिंग होते अशी तक्रार जिंदाल SAW ने केली होती. आता DGTR त्याच्यावर ऍन्टीडम्पिंग ड्युटी बसवण्याचा विचार करत आहे. याचा फायदा महाराष्ट्र सीमलेस, जिंदाल SAW यांना होईल.
हिंडाल्कोने कॅश फ्लो पाहता ८% ते १०% लाभांश देण्याचे धोरण मान्य केले आहे.

इंटलेक्ट डिझाईन एरेना या कंपनीला इंडोनेशीयातील ‘BANK RAKYAT’ च्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनची ऑर्डर मिळाली.
सरकार आता संरक्षण क्षेत्राला लागणाऱ्या शस्त्रांबरोबरच या शस्त्रांसाठी लागणाऱ्या स्पेअरपार्टसची निगेटिव्ह लिस्ट जाहीर करणार आहे. या लिस्टमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या स्पेअरपार्टसच्या आयातीवर बंदी असेल.

मार्च महिन्यात होणाऱ्या GST कौन्सिलच्या बैठकीत लिथियम आयन बॅटरीवरील GST १८% वरून १२% वर आणली जाण्याची शक्यता आहे. ही बॅटरी इलेक्ट्रिक कार मध्ये वापरली जाते. सरकार इलेक्ट्रिक कारच्या उत्पादनाला उत्तेजन देणार आहे.

२४ फेब्रुवारी २०२१ रोजी होणाया वेबिनार मध्ये विनिवेशावर तसेच PSU चे नॉन कोअर ऍसेट मॉनेटायझेशनवर विचार केला जाईल. यात माननीय पंतप्रधान, माननीय अर्थमंत्री तसेच १० वेगवेगळ्या मंत्रालयाचे अधिकारी सामील होतील.

लक्ष्मी ऑर्गनिक्स ह्या स्पेशालिटी केमिकल क्षेत्रात ( ETHYL ACETATE) काम करणाऱ्या कंपनीचा Rs ८०० कोटींचा IPO ( फ्रेश इशू Rs ५०० कोटी आणि Rs ३०० कोटी चा OFS) नजीकच्या भविष्यात येण्याची शक्यता आहे.

MTAR टेक्नॉलॉजीज या संरक्षण, एअरोस्पेस, एनर्जी या क्षेत्राला सेवा पुरवणाऱ्या कंपनीचा Rs ६५० कोटींचा IPO लवकरच येण्याची शक्यता आहे.

MPHASIS खरेदी करण्याच्या शर्यतीत ब्रुकफिल्ड, बेन कॅपिटल, CVC या कंपन्या आहेत. पण आघाडीवर कार्लाइल आहे.
मी आज तुम्हाला LIC हौसिंग फायनान्सचा चार्ट देत आहे. कॅश मार्केटमध्ये मंदी आहे. २०२० जानेवारीमध्ये Rs ४८६ चा हाय गाठला होता. येत्या जानेवारीत पुन्हा या लेव्हलच्या जवळ गेला होता. गेल्या आठवड्याचा लो Rs ४४३ तोडला. चार्टमध्ये इव्हिनिंग स्टार हा पॅटर्न बनलाआहे MA निर्णायकरित्या तोडला आहे.. Rs ४३० च्या खाली फ्रेश ब्रेकडाऊन होईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४९७४४ NSE निर्देशांक निफ्टी १४६७५ बँक निफ्टी ३५२५७ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

One thought on “आजचं मार्केट – २२ फेब्रुवारी २०२१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.