आजचं मार्केट – २३ फेब्रुवारी २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २३ फेब्रुवारी २०२१

आज क्रूड US $ ६५.९३ प्रती बॅरल ते US $ ६६.७० प्रती बॅरल दरम्यान तर रुपया US $१=Rs ७२.३३ ते US $१= Rs ७२.३९ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९०.१४ VIX २५.४७ आणि PCR ०.९९ होते.

आज जपानच्या सम्राटाच्या वाढदिवसानिमित्त जपानचे बाजार बंद होते. आज USA च्या मार्केट्समध्ये DOW जोन्स मध्ये माफक तेजी तर NASHDAQ आणि S & P या निर्देशांकात मंदी होती. तसेच टेक शेअर्समध्ये मंदी होती. ब्राझील आणि थायलंडमधील साखरेचे उत्पादन कमी झाले. OPEC +ची ३ आणि ४ मार्च २०२१ रोजी बैठक आहे. सौदी अरेबिया उत्पादन सध्याच्या स्तरावर ठेवण्याच्या तर रशिया उत्पादन वाढवण्याच्या पक्षात आहेत. USA मधील क्रूडचे उत्पादन सुरु व्हायला उशीर होत आहे. त्यामुळे ४० लाख बॅरेल्सच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होत आहे. या सर्व गोष्टींमुळे आज क्रूड US $ ६६ प्रती बॅरलच्या वर होते.USA चे अध्यक्ष बिडेन यांनी आज कॉर्पोरेट आणि वेल्थ टॅक्स आकारण्याचे सूतोवाच केले. त्यामुळे USA मध्ये प्रॉफीटबुकिंग झाले. UK, जर्मनी, इटली, फ्रांस या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी न होता वाढत आहे. त्यामुळे युरोपियन मार्केट्सही मंदीत होती. US $ निर्देशांकात विकनेस आहे, बॉण्ड यिल्ड कमी झाले आहे आणि USA मध्ये पॅकेजच्या अपेक्षेने सोन्यात तेजी परतत आहे. औद्योगिक मागणी वाढल्यामुळे आज चांदीमध्ये तेजी होती. कॉपर, निकेल, जस्त, लेड, यात तेजी होती. यात कॉपर गेल्या १० वर्षातील कमाल स्तरावर होते. त्यामुळे आज हिंदाल्को, हिंदुस्थान कॉपर, नाल्को, वेदांता, हिंदुस्थान झिंक या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये तेजी होती. तसेच स्टील सेक्टरमधील टाटा स्टील, JSPL, SAIL, JSW स्टील, कल्याणी स्टील, याही शेअर्स मध्ये तेजी होती.

आज UPL च्या भडोच प्लांट मध्ये लागलेल्या आगीमुळे कंपनीचे बरेच नुकसान झाले.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड त्यांचा ऑइल टू केमिकल बिझिनेसचे डीमर्जर करणार आहे यामध्ये पेट्रोकेमिकल्स, गॅस, फ्युएल रिटेलिंग यांचा समावेश केला जाईल. या उद्योगासाठी वेगळी सबसिडीअरी उघडली जाईल. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या सबसिडीअरीला १० वर्ष मुदतीचे US $२५ बिलियनचे कर्ज देईल. आरामको आणि इतर इन्व्हेस्टरना या सबसिडीअरीत गुंतवणूक करण्यात स्वारस्य आहे.

VISCOSE स्टेपल फायबरवर सरकार ऍन्टीडम्पिंग ड्युटी लावणार आहे. याचा फायदा ग्रासिमला होईल.

अमेझॉन आणि महिंद्रा इलेक्ट्रिक या कंपन्यांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीसाठी पार्टनरशिपचा करार झाला. अमेझॉनने ७ शहरात महिंद्रा TREO चा वापर सुरु केला आहे. अमेझॉन डिलिव्हरी सर्व्हिससाठी १०००० इलेक्ट्रिक वाहने खरेदी करू शकते.

भारत फोर्ज या कंपनीला कल्याणी M -४ वाहनांसाठी आर्मिकडून Rs १७८ कोटींची ऑर्डर मिळाली.

DR रेड्डीज आणि इतर फार्मा कंपन्यांच्या व्हॅक्सिंच्या बॉटलिंगचे काम ग्लॅन्ड फार्मा करणे शक्य आहे.
भारती एअरटेलने QUALCOMM बरोबर 5G सेवांसाठी ५G RAN प्लॅटफॉर्म वापरण्यासाठी करार केला.

तामिळनाडू राज्य सरकारच्या अंदाजपत्रकात १२००० बसेस ( यात २००० बसेस EV असतील) खरेदी करण्यासाठी तरतूद केलेली आहे. त्याचा फायदा अशोक लेलँड, टाटा मोटर्स JBM ऑटो यांना होण्याची शक्यता आहे.

दुबई .एअरोस्पेस बरोबर इंडिगोने A ३२१ NEO एअरबस लीजवर घेण्यासाठी करार केला.

पॉवर ग्रीड १ मार्च २०२१ रोजी अंतरिम लाभांश जाहीर करण्यावर विचार करेल.

ISMT आणि जिंदाल SAW ने दिलेल्या प्रस्तावाप्रमाणे चीनमधून आयात होणाऱ्या काही स्टील प्रॉडक्टस वरील ऍन्टीडम्पिंग ड्युटी चालू राहील.

युनायटेड स्पिरिट्स त्यांच्या काही निवडक ब्रॅण्ड्सची समीक्षा करणार आहे . तर कोअर ब्रॅंड्सवर जास्त लक्ष केंद्रित करणार आहे. हा उपक्रम २०२१ च्या अखेरपर्यंत पुरा होईल.

बाळकृष्ण इंडस्ट्रीजने Rs १९०० कोटींचा कॅपेक्स कार्बन ब्लॅक सेगमेंटमध्ये करणार असे जाहीर केल्यामुळे गुंतवणूकदार नाखूष झाले. आणि शेअरची किमत पडायला सुरुवात झाली. कंपनीचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. ही पडझड आता थांबली आहे. शेअरमध्ये तेजी होण्याची चिन्हे दिसत आहेत असे आज तयार झालेला मॉर्निंग स्टार पॅटर्न दर्शवत आहे.

source – chartlink.com

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४९७५१ NSE निर्देशांक निफ्टी १४७०७ बँक निफ्टी ३५११६ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.