आजचं मार्केट – २४ फेब्रुवारी २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २४ फेब्रुवारी २०२१

आज क्रूड US $ ६५.०२ प्रती बॅरल ते US $ ६५.२७ प्रती बॅरल या दरम्यान रुपया US $१=Rs ७२.२८ ते US $ ७२.३६ या दरम्यान तर US $ निर्देशांक ९०.०५ VIX २४.१६ PCR ०.९८ होते

आज USA मार्केट्स पैकी DOW जोन्स तेजीत NASHDAQ मंदीत आणि S & P तेजीत होते. एशियन मार्केट्स मंदीत होती.USA फेडने सांगितले कीअजून अर्थव्यवस्थेला पूर्वस्थितीत यायला वेळ लागेल. त्यामुळे आम्ही बॉण्ड्सची खरेदी चालू ठेवू तसेच आताच्या व्याज दरात बदल करणार नाही. इन्फ्लेशनचे लक्ष्य २% ठेवले आहे.अर्थव्यवस्था सुधारली असे वाटल्यावरच आम्ही बॉण्ड्स खरेदी बंद करू. या फेडच्या विधानानंतर मार्केट्स मध्ये तेजी आली.

DAC च्या मीटिंगमध्ये संरक्षणमंत्र्यांनी Rs १३७०० कोटीच्या अक्विझिशनला मान्यता दिली. अर्जुन रणगाड्यांसाठी Rs ६००० कोटी मंजूर केले. या रणगाड्यांचे संरक्षित वाहन BEML बनवेल तर या वेपन सिस्टीम BEL बनवेल. या शस्त्र सामुग्रीचे डिझाईन, स्पेअर पार्ट्स यांचे उत्पादन स्वदेशात केले जाईल.

एलेनटास बेक इंडिया आणि स्टोव्ह क्राफ्ट या कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये RAW शुगर ४ वर्षांच्या कमाल स्तरावर आहे ब्राझीलमधून शिपिंगला उशीर होत आहे. चीन इंडोनेशियामध्ये मागणी वाढत आहे. कंटेनर्सची टंचाई असल्यामुळे भारतातून निर्यातिला उशीर होत आहे. सतत वाढत असणाऱ्या किमतींमुळे साखर उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी होत आहे.

हट्सन ऍग्रो ही कंपनी सोलापूरमध्ये कमर्शियल उत्पादन सुरु करत आहे. तर रमा फॉस्फेट या कंपनीने इंदोर येथे नवीन प्लांट सुरु केला.

झुआरी ऍग्रो ही कंपनी त्यांचा गोव्यामधील प्लांट विकणार आहे.

नुमालीगढ रिफायनरी विक्रीसाठी २६ फेब्रुवारी २०२१ रोजी सचिव स्तरावर हाय लेव्हल बैठक आहे,

२६ फेब्रुवारी २०२१ रोजी नवभारत व्हेंचर्स ही कंपनी शेअर्स बायबॅक वर विचार करेल.

भारती एअरटेल आणि वोडा आयडिया या कंपन्यांनी AGR थकबाकीचा हिशोब पुन्हा करावा अशी सुप्रीम कोर्टाला विनंती केली आहे . मार्च २०२१ मध्ये सुप्रीम कोर्टात या अर्जाची सुनावणी होईल.

५ मार्च २०२१ रोजी कोल इंडिया या कंपनीची अंतरिम लाभांशावर विचार करेल.

३१ मार्च २०२१ रोजी GAIL निफ्टीतुन बाहेर पडेल तर टाटा कंझ्युमर्सचा समावेश केला जाईल.

FY २१ मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेचा GDP ग्रोथ -६.७% तर FY २२ साठी GDP ग्रोथ रेट १३.५% असेल असा अंदाज वर्तवला आहे.

आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व्हर,लॅपटॉप, कॉप्युटर्स यांच्या उत्पादनासाठे Rs ७३०० कोटींची PLI स्कीम मंजूर होण्याची शक्यता आहे याचा फायदा TVS इलेक्ट्रॉनिक्स, D- LINK आणि SMARTLINK यांना होईल. फार्मा आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या उत्पादनासाठी PLI योजना मंजूर झाल्या.

छत्तीसगढ प्लांटच्या दुरुस्तीसाठी गोवा कार्बनचा हा प्लांट बंद राहील.

AB फँशन & रिटेल च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने तरुण ताहिलियानी यांच्या बरोबर केलेल्या कराराला मंजुरी दिली.
हेमीस्फिअर प्रॉपर्टिज सरकारला Rs ७०० कोटींचे शेअर्स इशू करणार आहे.

इंडिया मार्टच्या प्रमोटर्सने त्यांचा २% स्टेक ब्लॉक डीलच्या माध्यमातून विकला . BOSCH मध्ये २ कोटी शेअर्सचे ब्लॉक डील झाले.

सॅनोफी या कंपनीने Rs ३६५ प्रती शेअर लाभांश जाहीर केला

आज मार्केटमध्ये रिअल्टी, मेटल्स, फर्टिलायझर्स आणि बँकिंग आणि फायनान्सियल्स या क्षेत्रात तेजी होती.
आज NSE चे कामकाज नेटवर्क लिंक आणि टेलिकॉम लिंक मध्ये अडचणी येत असल्यामुळे सकाळी ११.४० ते ३.३० वाजेपर्यंत बंद होते. NSE ने आज ३.३० पासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मार्केटची वेळ वाढवली.

मी आज तुम्हाला ग्रासिम या कंपनीचा चार्ट देत आहे. ग्रासिम ही सिमेंट क्षेत्रातील कंपनी असून आता पेन्टउत्पादनाच्या क्षेत्रात मोठी गुंतवणूक करणार आहे. या शेअरच्या चार्टमधे बुलिश हरामी पॅटर्न तयार झाला होता.या शेअरने २० DEMA, ५० DEMA, १०० DEMA पार केला आहे. बुलिश क्रॉसओव्हर पॅटर्न तयार झाला आहे.

आज BSE निर्देशांक सेन्सेक्स ५०७८१ NSE निर्देशांक निफ्टी १४९८२ बँक निफ्टी ३६४५२ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.