आजचं मार्केट – २५ फेब्रुवारी २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २५ फेब्रुवारी २०२१

आज क्रूड US $ ६७.२१ प्रती बॅरल ते US $ ६७.५९ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७२.४३ ते US $ १= Rs ७२.५१ या दरम्यान तर US $ निर्देशांक ८९.९० VIX २३.०० PCR १.१४ होता.

आज बेस मेटल्स म्हणजे कॉपर, जस्त, लेड, अल्युमिनियम तेजीत होते. सोने मंदीत तर चांदी तेजीत होती. USA मध्ये क्रूड उत्पादनातील अडचणींमुळे क्रूड तेजीत होते.

मूडीज या रेटिंग एजन्सीने भारताच्या GDP ग्रोथचे अनुमान FY २२ साठी १३.७% तसेच FY २३ मध्ये ६.२% केले आहे.
NURECA या कंपनीच्या शेअर्सचे लिस्टिंग BSE वर Rs ६३४.९५ आणि NSE वर Rs ६१५ वर झाले. कंपनीने हा शेअर Rs ४०० प्रती शेअर या भावाने IPO मध्ये दिला होता.

अशोक लेलँड या कंपनीने हिंदुजा टेक या कंपनीमधील, निसान इंटरनॅशनल होल्डिंग BV या कंपनीच्या मालकीचा ३८% स्टेक Rs ७०.२० कोटींना खरेदी करण्यासाठी करार केला. या स्टेक खरेदीनंतर हिंदुजा टेक ही अशोक लेलँड ची ‘WHOLLY OWNED’ सबसिडीअरी होईल.अशोक लेलँड चा शेअर तेजीत होता

IRDAI ( इन्शुअरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया) ने एक्सिस बँक आणि मॅक्स लाईफ इन्शुअरन्स यांच्यामधील डीलला परवानगी दिली. हे डील एप्रिल २०२० मध्ये जाहीर झाले होते. या डीलप्रमाणे एक्सिस बँक मॅक्स लाईफ मधील १९% स्टेक घेणार होती. एक्सिस बँक ९% आणि एक्सिस कॅपिटल आणि एक्सिस सिक्युरिटीज हे दोघे मिळून ३% स्टेक घेतील. राहिलेला ७% स्टेक एक्सिस बँक येत्या काही वर्षात टप्प्याटप्प्याने घेईल. हे डील दोन्हीही कंपन्यांना फायदेशीर असल्यामुळे आज एक्सिस बँक आणि मॅक्स फायनान्शियल हे दोन्ही शेअर्स तेजीत होते.

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सरकार बिझिनेसची मालकी ठेवू इच्छित नाही तसेच उद्योग चालवणे हे सरकारचे काम नाही. त्यामुळे खाजगी उद्योगांना उत्तेजन देण्याचे तसेच त्यांना ‘ईज ऑफ बिझिनेस’ उपलब्ध करण्याचे सरकारचे धोरण असेल. खाजगी उद्योग सतत आपले तंत्र आधुनिक करत असतात, पुरेशा पैशाची तरतूद करत असतात. त्यामुळे आता सरकार एकतर उद्योगाचे मॉनेटायझेशन करेल किंवा मॉडर्नायझेशन करेल किंवा खाजगीकरण करेल.ऍटोमिक एनर्जी, स्पेस आणि संरक्षण, ट्रान्सपोर्ट आणि टेलिकॉम, आणि पॉवर आणि पेट्रोलियम ही क्षेत्रे त्याला अपवाद असतील या क्षेत्रात PSU काम करतील.

मार्केटने या भाषणाचा धागा पकडला आणि आज सर्व पब्लीक सेक्टर उद्योगांमध्ये, बँकांमध्ये जबरदस्त खरेदी झाली . त्यामुळे आज बँका, NBFC, CPSE ETF, BEML, BEL या आणि इतर तत्सम सरकारी कंपन्यांमध्ये जबरदस्त खरेदी झाली. RBI च्या गव्हर्नरनीही सांगितले की आम्ही अर्थव्यवस्थेमध्ये पुरेशी लिक्विडीटी राहील याची काळजी घेऊ.

कोल इंडियाने आज घोषणा केली की ते वर्ष २०२४ पर्यंत खाजगी उद्योगांबरोबर जॉईंट व्हेंचर करून एकूण २६ नवीन उद्योगात Rs १.४३ लाख कोटींची गुंतवणूक करून प्रवेश करणार आहेत. FY २२ च्या दुसऱ्या तिमाहीत ते ह्या जॉईंट व्हेंचर्सचा आराखडा बनवतील.

गुजरात अल्कलीज ही कंपनी SBI कडून एक्स्टर्नल कमर्शियल बॉरोइंगद्वारे US $ ७ कोटी उभारणार आहे. L & T टेक सर्व्हिसेस या कंपनीला एअर बस या कंपनीकडून त्यांच्या स्कायवाईज प्लॅटफॉर्मसाठी टेक्नॉलॉजिकल आणि डिजिटल सोल्युशन्स पुरवण्यासाठी ऑर्डर मिळाली. त्यामुळे L & T टेक मध्ये तेजी होती.

ज्युबीलण्ट इंडस्ट्रीजनी सांगितले की आम्ही रिस्ट्रक्चरिंगच्या वेगवेगळ्या पर्यायांचे मुल्य मापन करत आहोत. ऍग्री आणि कन्झ्युमर प्रॉडक्टस बिझिनेसच्या मर्जरची शक्यता अजमावून पाहत आहोत.

अंबुजा सिमेंटच्या अंतरिम लाभांशाची रेकॉर्ड डेट २२ मार्च २०२१ ही असेल.

BEL १६ मार्च २०२१ रोजी दुसर्या अंतरिम लाभांशावर विचार करेल.

MTAR टेक्नॉलॉजी या संरक्षण ( DRDO) स्पेस ( इसरो) क्षेत्रात टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस(प्रिसिजन ईंजिनीअरिंग सोल्युशन्स) पुरवणाऱ्या कंपनीचा Rs ५९६ कोटींचा IPO ३ मार्च २०२१ रोजी ओपन होऊन ५ मार्च २०२१ रोजी बंद होईल. या IPO चा प्राईस बँड Rs ५७४ ते Rs ५७५ आहे मिनिमम लॉट २६ शेअर्सचा आहे. या कंपनीचे तेलंगणामध्ये ७ प्लान्ट आहेत.
उद्यापासून १६ नवीन कंपन्यांचा F & O सेगमेंट मध्ये समावेश होईल. ट्रेंट, नवीन फ्ल्युओरीन , PI इंडस्ट्रीज, फायझर, दीपक नायट्रेट. IRCTC, निपोंन लाईफ, L & T इन्फोटेक,L & T टेक, आलेम्बिक फार्मा, ग्रनुअल्स, अल्केम लॅब, सिटी युनियन बँक, AU स्मॉल फायनान्स बँक,गुजरात गॅस, MPHASIS चा समावेश असेल.

गेल (२०००KM) HPCL ( ३६० किलोमीटर्स ) IOCL यांच्या पाइपलाइनचे मोनेटायझेशन करणार आहे.SAIL चे सालेम आणि भद्रावती प्लांट, BPCL, एअरइंडिया, पवन हंस यांचे डायव्हेस्टमेन्ट प्लॅन शेवटच्या टप्प्यात आहे. MTNL, BEML आणि HMT यांचे नॉनकोअर असेटचे मोनेटायझेशन करणार आहे पॉवर ग्रीड चे नेटवर्क ट्रान्स्मिशनच्या १,६८०००km लाईनचे मोनेटायझेशन करणार आहे. IDBI आणि NINL चे डायव्हेस्टमेन्ट प्लॅन अंतिम टप्प्यात आहे.

महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स ह्या कंपनीचा शेअर बऱ्याच कालच्या मंदीनंतर सावरतो आहे हा शेअर Rs १०० ते Rs १२५ या रेंजमध्ये कन्सॉलिडेट होत होता. हा शेअर मार्केटला आउट परफॉर्म करतो म्हणजे तेजी असताना मार्केटपेक्षा जास्त प्रमाणात वाढतो आणि मार्केट मंदीत असताना मार्केटपेक्षा कमी प्रमाणात पडतो.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५१०३९ NSE निर्देशांक निफ्टी १५०९७ बँक निफ्टी ३६५४९ वर बंद झाले

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.