Monthly Archives: March 2021

आजचं मार्केट – ३१ मार्च २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ३१ मार्च २०२१

आज क्रूड US $ ६४.२४ प्रती बॅरल ते US $६४.६१ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७३.१९ ते US $ १= Rs ७३.५६ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९३.२४ VIX २०.६५ PCR १.६३ होते. USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.७३ होते.

USA १० वर्षाच्या बॉण्ड्सचे यिल्ड वाढत असल्यामुळे आणि US $ मजबूत झाल्यामुळे सोने आणि चांदीत मंदी होती. आज USA ची कन्झ्युमर कॉन्फिडन्स आणि चीनमधील मॅन्युफॅक्चरिंग PMI चे चांगले आकडे यामुळे बेस मेटल्समध्ये तेजी होत
IDFC Ist बँक Rs ३००० कोटींचा QIP Rs ६०.३४ प्रती शेअर या किमतीला आणणार आहे. (QIP इशू या कॉर्पोरेट एक्शनविषयी सविस्तर माहिती माझ्या ‘मार्केट आणि मी’ या पुस्तकांत दिली आहे.)

केंद्र सरकार ४ राष्ट्रीयीकृत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये झीरो कुपन रिकॅपिटलायझेशन बॉण्ड्स द्वारे भांडवल गुंतवणार आहे. या बॉण्ड्सवर व्याज लागणार नाही. ते खालीलप्रमाणे

(१) सेंट्रल बँक Rs ४८०० कोटी (२ ) IOB Rs ४१०० कोटी (३) UCO बँक २६०० (४) बँक ऑफ इंडिया Rs ३००० कोटी. या सरकारच्या घोषणेनंतर या बँकांच्या शेअर्स मध्ये तेजी आली.

मूडीजने टाटा स्टीलचे रेटिंग Ba2 कायम ठेवून ऑउटलूक निगेटिव्हवरून स्टेबल केला. टाटा स्टीलच्या शेअरमध्ये तेजी होती.

झुआरी ऍग्रो या कंपनीच्या NPK-B GOA प्लांटमध्ये उत्पादन सुरु झाले. त्यामुळे या शेअरमध्ये तेजी होती.

GSK फार्मा या कंपनीने त्यांचे VEMGAL येथील उत्पादन युनिट HETERO लॅब या कंपनीला Rs १८० कोटींना विकले .

NHAI BOT समझोत्यानुसार HCC ( हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी) ला Rs १२६० कोटी मिळणार आहेत. यामुळे कंपनीच्या शेअरमध्ये माफक तेजी आली.

SBI ने जपान बँकेबरोबर US $१०० कोटींचे आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी लोन अग्रीमेंट केले. या लोनचा वापर सरकार निरनिराळ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टसाठी करेल.

सरकारने या वर्षी जवळजवळ सर्व उद्योगांसाठी PLI योजना जाहीर केल्या. त्यामुळे सर्व उद्योगांमध्ये उत्पादन वाढेल आणि महागाईला आळा बसेल.

सरकारने फूडप्रोसेसिंग उद्योगासाठी PLI ( प्रोडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह) योजना जाहीर केली. या योजनेमध्ये मरिन फूड, पोल्ट्री, मोझरेला चीज, मिलेट्स, ऑरगॅनिक फूड्स, रेडी तो इट, आणि रेडी टू कुक फूड, प्रोसेस्ड फ्रुट्स, भाज्या इत्यादिंचा समावेश आहे. ह्या स्कीमअंतर्गत शेती आणि संलग्न उद्योगांना उत्तेजन मिळेल. या बातमीनंतर ब्रिटानिया, ITC, नेस्ले, मेरिको, हिंदुस्थान फूड्स या शेअर्समध्ये तेजी आली.

टेलिकॉम कंपन्यांना सरकार PM वाणी या प्रोजेक्टअंतर्गत PPP तत्वावर १० लाख वाईफाई हॉटस्पॉट लावण्यासाठी सबसिडी देण्याची शक्यता आहे. याचा फायदा D-LINK, स्मार्ट लिंक, ITI, तेजस नेटवर्क्स, रेलटेल, या सारख्या कंपन्यांना होईल.

FY २२ साठी MPC ( मॉनेटरी पॉलिसी कमिटी) ची पहिली बैठक ५ एप्रिल ते ७ एप्रील २०२१ रोजी होईल. नंतरच्या बैठका २-४ जून, ४-६ ऑगस्ट, ६-८ ऑक्टोबर, ६-८ डिसेंबर २०२१ आणि ७-९ फेब्रुवारी २०२२ रोजी होतील. RBI च्या द्वैमासिक वित्तीय धोरणाच्या आधी MPC च्या बैठका होतात.

HEMMO फार्मा या कंपनीतील १००% स्टेक पिरामल फार्मा Rs ७८० कोटी अपफ्रंट पेमेंट करून खरेदी करणार आहे. यामुळे पिरामल एंटरप्रायझेस या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी आली.

IOC च्या हायड्रोजन प्रोजेक्टचे, HPCL पाइपलाइनचे आणि GAIL च्या पाइपलाइनचे खाजगीकरण केले जाईल.

निफ्टीमध्ये GAIL च्या जागी टाटा कन्झ्युमर, आणि बँक निफ्टी मधून बँक ऑफ बरोडा च्या जागी AU स्मॉल फायनान्स बँकेचा समावेश केला जाईल. इन्फोएज या कंपनीला IT निर्देशांकातून वगळून त्याच्या जागी ORACLE फायनान्सियलचा समावेश करणार.

आज FY २०२१ संपले. जरी इतर कारणांमुळे हे वर्ष क्लेशदायक झाले असले तरी मार्केटसाठी हे वित्तीय वर्ष ११ वर्षातले सगळ्यात चांगले वर्ष म्हणावे लागेल. अबसोल्यूट टर्म्स मध्ये सर्व निर्देशांकांनी चांगले रिटर्न्स दिले.

आज मी तुम्हाला TVS मोटर्सचा चार्ट देत आहे. TVS मोटर्सच्या फ्युचर्स आणि ऑप्शन मध्ये तेजी दिसत होती. डेली चार्टमध्ये बॉटमला भेट देऊन तेजीचा ट्रेंड दाखवत आहे. हा शेअर फेब्रुवारी आणि मार्चमध्ये पडत होता. हे करेक्शन आता रिव्हर्स होईल. RSI मध्येही बुलिश ट्रेंड दिसत आहे.

उद्या ऑटोविक्रीचे आकडे येतील. पाकिस्तानात साखरेची निर्यात होणार असल्यामुळे आज पडत्या मार्केटमध्येही साखर उत्पादक कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४९५०९ NSE निर्देशांक निफ्टी १४६९० बँक निफ्टी ३३३०३ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – ३० मार्च २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ३० मार्च २०२१

आज क्रूड US $ ६४.६३ प्रती बॅरल ते US $ ६५.०५ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=७२.७९ ते US $ १= Rs ७३.३८ या दरम्यान होते. US $ इंडेक्स ९३.१० PCR १.६५ होते. USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.७६ होते.

USA मध्ये आणखी एक US $ ३ ट्रिलियनच्या पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता आहे. बॉण्ड यिल्ड वाढल्यामुळे सोने मंदीत होते. मेटल्समध्ये मात्र तेजी होती. निफ्टी ने २० DMA क्रॉस केले (निफ्टी १४७५०) फायझर आणि मोडर्ना यांच्या व्हॅक्सीन्स रिअल वर्ल्ड कंडिशन्स मध्ये सुद्धा ९०% परिणामकारक आहे.

आज मार्केटने आपल्या चालीवर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा, लॉकडाउनच्या शक्यतेचा परिणाम होऊ दिला नाही.
स्टीलच्या HRC ( हॉट रोल्ड कॉइल्स) या प्रकारात Rs ४००० प्रती टन एवढी वाढ होणार असल्यामुळे स्टील उत्पादक कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते. उदा टाटा स्टील, कल्याणी स्टील, SAIL, JSPL, JSW स्टील.

ज्या डिजिटल सेवा पुरवल्या जातात त्यावर भारत , इटली, तुर्कस्थान, UK, स्पेन, ऑस्ट्रिया टॅक्स लावतात, त्यामुळे अमेरिकन कंपन्यांच्या बाबतीत भेदभाव होतो. भारतात २०१६ पासून इक्वलायझेशन फी लावली जाते. याबाबत आता USA कारवाई करण्याची शक्यता आहे.

आज निसर्गाच्या कृपेने सुएझ कालवा मोकळा झाला. समुद्राला आलेल्या भरतीमुळे ते जहाज पुन्हा पाण्यावर चालायला लागले. पण सुएझ कालवा हा ONE WAY असल्यामुळे याचा परिणाम अजून १० ते १५ दिवस टिकेल. आणि परिणामी काही वस्तूंची टंचाई आणि वाढलेली किंमत असू शकेल. ओपेक +ची उद्या मे महिन्यातील क्रूडच्या उत्पादनावर विचार करण्यासाठी बैठक आहे.

RBI आपले द्वैमासिक वित्तीय धोरण ७ एप्रिल २०२१ रोजी जाहीर करेल. ब्रिटानिया ही कंपनी २ एप्रिल रोजी लाभांशावर विचार करेल. IRCON ही कंपनी ५ एप्रिलला बोनसवर विचार करेल.

गुजरात ऊर्जा विकास निगमसाठी टाटा पॉवर ६० MV सोलर प्रोजेक्ट डेव्हलप करेल.

VASCON इंजिनीअरिंग या कंपनीला मेडिकल कॉलेज सेट अप करण्यासाठी Rs ५१५.६० कोटींची ऑर्डर मिळाली.
भारती एअरटेल, वोडाफोन, रिलायन्स जिओ या कंपन्यांनी जानेवारी -मार्च तिमाहीसाठी AGR ड्यूजसाठी Rs ५००० कोटी वेळेवर भरले.

नजारा टेक या कंपनीचे आज BSE वर Rs १९७१ तर NSE वर Rs १९९० वर लिस्टिंग झाले. IPO मध्ये हा शेअर Rs ११०१ प्रती शेअर या किमतीला दिला होता. पण लिस्टिंग झाल्यावर हा शेअर Rs १५५० पर्यंत पडला.

‘ARCHEGOS’ हे एक फॅमिली ऑफिस म्हणून USA मध्ये रजिस्टर झालेला HEDGE फंड आहे. हे फॅमिली ऑफिस मुख्यतः श्रीमंत फॅमिलीजच्या पैशाची गुंतवणूक करते USA, चीन, कोरिया आणि जपानच्या मार्केटमध्ये शेअर्समध्ये गुंतवणूक करते. फॅमिली ऑफिसेस ही USA मधील SEC (SECURITIES AND EXCHANGE COMMISSION) या रेग्युलेटरी ऑथॉरिटीच्या कक्षेत येत नाहीत. आणि फॅमिली ऑफिसेसची बहुतेक माहिती सार्वजनिक होत नाही. गेल्या आठवड्यात या फ़ंडातर्फे अर्थसहाय्य करणाऱ्या बँकांना US $ २० बिलियनचे शेअर्स फारच कमी किमतीत( म्हणजे २/३ किमतीत विकावे लागले) या कंपन्यांमध्ये VIACOM CBSकॉर्पोरेशन, डिस्कव्हरी कम्युनिकेशन, आणि BAIDU INC, आणि TENCENT होल्डिंग्स या चिनी कंपन्यांचा समावेश होता.

या शेअर्सच्या किमती मार्केटमध्ये पडल्यावर बँकांनी HEDGE फंडाला आवश्यक ते जादा मार्जिन भरायला सांगितले. ARCHEGOS हे मार्जिन भरू न शकल्यामुळे नोमुरा, क्रेडिट SUISSE, UBS, DEUTSCHE बँक, गोल्डमन साख, आणि मॉर्गन स्टॅन्ले यांनी ARCHEGOS कडे असलेले शेअर्स विकायला सुरुवात केली. या सर्व बँकांनी हे शेअर्स पडत्या किमतिला विकल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर तोटा झाला. स्वॅप हे एक प्रकारचे डेरिव्हेटीव्ह इन्स्ट्रुमेंट असून याच्यामध्ये संस्थागत गुंतवणूकदारांमध्ये ट्रेडिंग होते.

या इंस्ट्रुमेन्टदवारा तुम्हाला ताबडतोब पैसे न गुंतवता शेअर मार्केटमध्ये मोठ्या पोझिशन्स घेता येतात. या स्वॅप मधील व्यवहाराचे पब्लिक रिपोर्टींग होत नाही. या स्वॅप मधील ट्रेडिंग बँकांकडून अर्थसहाय्य घेउन केले जाते. यालाच ‘LEVERAGE’ असे म्हणतात. स्वॅपमध्ये ट्रेडिंग करत असल्यामुळे ARCHEGOS ला पुष्कळ LEVERAGE मिळू शकले. जर शेअर्सच्या किमती पडल्या तर मार्जिन व्हॅल्यूमध्ये तूट आल्यामुळे बँक किंवा ब्रोकर ग्राहकाला जादा मार्जिन जमा करायला सांगतो. यालाच मार्जिन कॉल्स असे म्हणतात.

स्वॅप ज्या शेअर्सचे डेरिव्हेटीव्ह असतात त्या शेअर्सची किंमत कमी व्हायला लागल्यावर जर मार्जिन कॉल्स पूर्ण केले गेले नाहीत तर बँका किंवा ब्रोकर्स हे शेअर्स विकून टाकतात. मोठ्या प्रमाणावर शेअर्सची विक्री झाल्यामुळे शेअर्सची किंमत आणखी कमी होते. त्यामुळे या आंतरराष्ट्रीय बँकांना मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करावा लागू शकतो.

भारतीय मार्केट्समध्ये संस्थागत गुंतवणुकदार देशी, विदेशी लहान मोठे सर्व सेबीच्या नियमांतर्गत येतात. या गुंतवणूकदारांना एक्स्पोजर आणि LEVERAGE यासाठी मर्यादा ठरवून दिलेली असते. पण भारतातही फॅमिली ऑफिसेस कोणत्याही नियामक ऑथॉरिटीच्या नियंत्रणाखाली नाहीत. आजतरी भारतीय मार्केट्सवर या HEDGE फंडसंबंधित घटनेचा प्रभाव दिसून आला नाही.

आज मी तुम्हाला कॅडीला हेल्थकेअर या कंपनीचा चार्ट देत आहे. फ्युचर्स मध्ये लॉन्ग पोझिशन्स ऍड होत आहेत शुक्रवारचा हाय पार केला. २०० DMA च्या वर सपोर्ट घेत आहे. १९ मार्चला Rs ४०८ लो नंतर पुढच्या शुक्रवारी Rs ४१५ लो आहे. हायर हाय हायर लो ट्रेंड दिसत आहे.आज शेअरने २१ DMA पार केले

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५०१३६ NSE निर्देशांक निफ्टी १४८४५ बँक निफ्टी ३३८७५ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २६ मार्च २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २६ मार्च २०२१

आज क्रूड US $ ६२.४६ प्रती बॅरल ते US $ ६२.९१ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७२.४० ते US $ ७२.६२ या दरम्यान होते US $ निर्देशांक ९२.७५ VIX १८.२३ PCR १.५६ होते. USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.६७ होते.

USA मध्ये बेकारी भत्ता मिळण्यासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या कमी झाली. रोजगारीचे आकडे चांगले आले. हवामानाशी संबंधित अडथळे कमी झाल्यामुळे आर्थीक ऍक्टिव्हिटी वाढली. GDP ग्रोथ रेटचे लक्ष्य ४.३% पर्यंत वाढवले.

आज कल्याण ज्युवेलर्सचे BSE वर Rs ७३.९० आणि NSE वर Rs ७३.९५ वर लिस्टिंग झाले. सूर्योदय स्माल फायनान्स बँकेचे BSE वर Rs २९३.०० तर NSE वर Rs २९२.०० वर लिस्टिंग झाले. एकंदरच वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे मार्केटमधील प्रॉफिट बुकिंगची झळ या लिस्टिंग्जना बसली.

प्रायव्हेट ट्रेन चालवण्यासाठी फायनान्सियल बीड सादर करण्याची मुदत आता ३० जून पर्यंत वाढवली. या प्रोजेक्टमध्ये GMR इन्फ्रा, IRB इन्फ्रा, IRCTC यांनी स्वारस्य दाखवले होते. त्यामुळे ह्या शेअर्समध्ये तेजी आली.

आज सुप्रीम कोर्टाने टाटा विरुद्ध शापूरजी पालनजी या खटल्यात टाटा ग्रुपच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे आज टाटा ग्रुपच्या सर्व शेअर्स मध्ये तेजी होती. टाटा स्टील. टाटा स्टील लॉन्ग प्रोडक्टस, टाटा कन्झ्युमर प्रॉडक्टस, टाटा कॉफी, TCS, टाटा एलेक्सि, टाटा मोटर्स इत्यादी टाटा ग्रुपच्या शेअर्समध्ये तेजी आली.

काँकॉर या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनीचा विनिवेश लँड लायसेन्स फी ( काँकॉर रेल्वेला रेल्वेची जमीन वापरण्यासाठी काँकॉर रेल्वेला देत असलेले चार्जेस) जास्त असल्यामुळे उशीर होत होता. आता या लँड लायसेन्स फी वर विचार करण्यासाठी उच्च स्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बातमीनंतर काँकॉर च्या शेअरमध्ये तेजी आली.

आज श्री राम सिटी युनियन कंपनीने Rs १० लाभांश जाहीर केला. RVNL या कंपनीने Rs १.१४ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.या लाभांशासाठी ८ एप्रिल ही रेकॉर्ड देत आहे

डेन नेटवर्क्स ही कंपनी त्यांचा OFS २६ मार्च आणि ३० मार्च य दोन दिवशी ११.६३% स्टेक म्हणजे ५.५४ कोटी शेअर्स Rs ४८.५० या फ्लोअर प्राईसने आणत आहे. या शेअरमध्ये ५२ वीक हाय Rs ११५ आणि ५२ वीक लो Rs २५.८५ होता. ही कंपनी OFS द्वारे Rs २६९ कोटी उभारेल. हाथवे केबल्स ही कंपनी १९.०९% स्टेक म्हणजे ३३८ मिलियन शेअर्स शेअर्सचा OFS २६ मार्च आणि ३० मार्च २०२१ रोजी करणार आहे. याची फ्लोअर प्राईस Rs २५.२५ असेल. या शेअरची ५२ वीक हाय प्राईस Rs ५७.४५ आणि ५२ वीक लो प्राईस Rs ११.१० होती.ही कंपनी OFS द्वारे Rs ८५३.०० कोटी उभारेल. ह्या दोन्हीही कंपन्या प्रमोटर्सचा स्टेक ७५% किंवा त्यापेक्षा कमी करण्याकरता हे OFS आणत आहेत.

LIC ने RVNL या कंपनीमध्ये ८.७२% स्टेक म्हणजेच १८.१८ कोटी शेअर्स खरेदी केले. या शेअरचा ५२ वीक हाय Rs ३५.६० आणि ५२ वीक लो Rs १०.३५ होते.

M & M मध्ये महिंद्रा इलेक्ट्रिक ही कंपनी मर्ज करण्यासाठी मंजुरी मिळाली.

JSW स्टील ही कंपनी भूषण पॉवर आणि स्टीलच्या खरेदीसाठी ( रेझोल्यूशन) Rs १९३५० कोटी देणार आहे. याचा फायदा कर्ज देणार्या युनियन बँक, कॅनरा बँक, PNB आणि इतर बँकांना होईल.

कॉम्प्युकॉम सॉफ्टवेअर या कंपनीला Rs ६६.९९ कोटींचे ५२५ सरकारी शाळेत कॉम्प्युटर शिक्षणासाठी,( कॉम्प्युटर सिस्टीमचा पुरवठा, इन्स्टॉलेशन, आणि ऑपरेशन) कॉन्ट्रॅक्ट मिळाले.

सौदी आरामकोबरोबर रिलायन्स इंडस्ट्रीज चा रिलायन्स इंडस्ट्रीजच्या O २ C बिझिनेस मधील २०% स्टेक घेण्यासाठी करार झाला होता. हा करार मार्च २०२० पूर्वी पूर्ण व्हायचा होता. पण सौदी आरामकोची US$ ७५ बिलियन डिविडेंड देण्यासाठीची कमिटमेंट आणि क्रूडच्या सतत पडत असलेल्या किमती यामुळे हे डील पूर्ण होण्यास उशीर होत आहे / अडचणी येत आहेत. यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर एका मर्यादित रेंजमध्ये फिरत आहे.

आज मी तुम्हाला गोदरेज कन्झ्युमर या कंपनीचा चार्ट देत आहे. या शेअरचा मार्केट पडण्याला सुरुवात होण्याआधीच बॉटम झाला होता. मार्केट पडत असताना हा शेअर सुधारत होता.इन्व्हर्स हेड अँड शोल्डर नेक लाईन ब्रेकआऊट Rs ७०५ च्या वर गेल्यावर होईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४९००८ NSE निर्देशांक निफ्टी १४५०७ बँक निफ्टी ३३३१८ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २५ मार्च २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २५ मार्च २०२१

आज क्रूड US $६३.११ प्रती बॅरल ते US $ ६३.७५ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७२.५९ ते US $ १= Rs ७२.६६ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९२.५८ VIX २२.७० PCR ०.७३ होते. USA १० वर्ष बॉण्ड यिल्ड १.६१ होते.
आज USA मधील ड्युरेबल गुड्सचे आकडे कमजोर आले. येलेन यांनी सांगितले की महागाईची चिंता करण्याची जरुरी नाही. पण नजीकच्या भविष्यात सरकार कर वाढवण्याची शक्यता आहे.

भारत सरकारने आता कोरोनावरील व्हॅक्सिनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे कारण भारतातच आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.

आज भारतीय मार्केट्स गॅपडाऊन उघडले आणि पडतच गेले. मध्ये थोडा सावरण्याचा प्रयत्न केला पण शेवटच्या अर्ध्या तासांत जबरदस्त प्रॉफीटबुकिंग झाले. ५ वाढणाऱ्या शेअर्स मागे ४५ शेअर्स पडत होते. ऑटो, पॉवर, रिअल्टी आणि बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रात प्रॉफिट बुकिंग झाले.

ज्युबिलण्ट फूड्सकडे डॉमिनोज पिझ्झा आणि डंकिन’ डोनट्स या दोन आंतरराष्ट्रीय ब्रॅंड्सचे फ्रॅंचाईझ राईट्स आहेत. आता ते ‘POPEYES’ हा ब्रॅंडसुद्धा त्यांच्या पोर्टफोलिओत ऍड करत आहेत. त्यांनी POPEYES हा ब्रँड भारतात आणि शेजारी देशांमध्ये ऑपरेट करणे, सबलायसेंन्स करणे यासाठी त्यांची एक्स्ल्युझिव्ह राईट्स मिळवण्यासाठी करार केला. ज्युबिलण्ट फूड्स भारत, बांगलादेश, नेपाळ, आणि भूतान या देशात POPEYES रेस्टारंटस स्थापन करून चालू करतील. POPEYES रेस्टारंटस ही USA मधील मल्टिनॅशनल हॉटेल चेन असून फ्राईड चिकन फास्ट फूड साठी प्रसिद्ध आहेत. त्यांची ३४०० रेस्टारंटस २५ देशांमध्ये आहेत. यामुळे ज्युबिलण्ट फूड्स या कंपनीची वाढ होईल.

लक्ष्मी ऑरगॅनिक केमिकल्स याचे लिस्टिंग BSE वर Rs १५६.२० आणि NSE वर Rs १५५.५० वर झाले. कंपनीने IPO मध्ये हा शेअर Rs १३० ला दिला असल्यामुळे ज्यांना शेअर्स अलॉट झाले त्यांना बऱ्यापैकी लिस्टिंग गेन झाला.

क्राफ्ट्समन ऑटोमेशन या कंपनीच्या शेअर्सचे लिस्टिंग BSE वर Rs १३५० वर आणि NSE वर Rs १३५९ वर झाले. या कंपनीचे लिस्टिंग IPO प्राईसच्या डिस्काऊंटला झाल्यामुळे लिस्टिंग गेन्स झाले नाही.

पेट्रोलियम मंत्रालयाने इथॅनॉलला स्टॅंडर्ड फ्युएल म्हणून घोषित केले. त्यामुळे सर्व साखर उत्पादक कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते. बलरामपूर चिनी. द्वारिकेश शुगर, प्राज इंडस्ट्रीज, इंडिया ग्लायकॉल इत्यादी शेअर्स तेजीत होते.

चीनमधून येणाऱ्या PVC फ्लेक्स फिल्म वर अँटी डम्पिंग ड्यूटीची मुदत वाढवण्यात आली. याचा फायदा SRF या कंपनीला होईल.

काल आपण सुएझ कालव्यात जहाज अडकल्याची बातमी ऐकली. पण हे जहाज खूप मोठे आहे. या जहाजामध्ये २ लाख टन माल भरलेला आहे. त्यामुळे सगळ्याच जहाजांचे दळणवळण ठप्प झाले आहे. आज क्रूड US $ ६३.८२ प्रती बॅरलच्या स्तरावर राहिले.

परदेशातून आयात कमी झाल्यामुळे HRC आणि फ्लॅट स्टीलच्या किमती Rs २००० ते Rs ३००० प्रती टन एवढ्या वाढल्या. त्यामुळे मार्केट पडत असतानाही टाटा स्टील, SAIL, JSW स्टील या कंपन्या मात्र तेजीत होत्या

श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स ने Rs ६ प्रती शेअर लाभांश जाहीर केला. SBI लाईफ ने Rs २.५० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

RBI ने OMO च्या माध्यमातून Rs १०००० कोटींच्या गिल्ट्सची खरेदीविक्री केली .

आज मी तुम्हाला श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स या कंपनीचा चार्ट देत आहे. या चार्ट मध्ये फॉलिंग ट्रेंड लाईन चा ब्रेक डाऊन आहे. या शेअरमध्ये प्रत्येक वेळी येणारी तेजी टिकाव धरत नाही. शेअर प्राईस वाढण्याचे प्रमाण कमी आणि पडण्याचे प्रमाण जास्त असते. लोअर टॉप लोअर बॉटम सिरीज चालू आहे त्यामुळे या शेअरमध्ये सेल ऑन रॅलीजचा ट्रेंड चालू आहे.

आज BSE निर्देशांक सेन्सेक्स ४८४४० NSE निर्देशांक निफ्टी १४३२४ बँक निफ्टी ३३००६ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २३ मार्च २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २३ मार्च २०२१

आज क्रूड US $ ६३.६३ प्रती बॅरल ते US $ ६४.०१ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७२.२९ ते US $१=Rs ७२.४२ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९२.११ VIX २०.४९ PCR ०.९१ होते. USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.६४ होते.
युरोपमध्ये कोरोनाची तिसरी लाट आली आहे. आणि ही लाट पूर्वीपेक्षा जास्त संसर्गजन्य आहे. USA चे सरकार US $ ३ ट्रिलियन एवढी दीर्घ मुदतीकरता गुंतवणूक करणार आहे.

आज सुप्रीम कोर्टात बँकांचे NPA जाहीर करणे, मोरॅटोरियम उठवणे या बाबत सुनावणी होती. सुप्रीम कोर्टाने सांगितले की या बाबतीत फक्त कायदेशीर बाजूचे आम्ही अवलोकन करू. पण फायनान्सियल आणि धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी कठीण परिस्थितीत सरकार आणि RBI योग्य तो निर्णय घेईल.कोर्टाने मोरॅटोरियमची मुदत वाढवायला नकार दिला.मोरॅटोरियमच्या काळातील व्याजावरचे व्याज जर आकारले / वसुली केले गेले असले तर ते बँकांना कर्जदारांना परत करायला सांगितले.जरी एखादा हप्ता भरला नसेल तरी त्याच्या व्याजावरील व्याज आकारता येणार नाही तसेच कोणत्या क्षेत्राला किती सवलत द्यायची या बाबतीतही हस्तक्षेप करायला नकार दिला. सुप्रीम कोर्टाने सांगितले की सर्व कर्जावरील व्याजावरील व्याज माफ करावे. जर वसूल केले असले तर व्याजावरचे व्याज बँकांनी परत करावे. या आधी Rs २ कोटी ( सर्व मंजूर आणि बाकी कर्ज मिळून) कर्जाची मर्यादा ठेवली होती. कोरोनाच्या साथीचा सरकारच्या करवसुली तसेच GST उत्पन्नावर परिणाम झाला आहे.

कोणत्या बँकांचे खाजगीकरण करायचे आहे या बाबतीत आज मंत्रिमंडळाचा निर्णय होऊ शकला नाही.
BEML च्या विनिवेशासाठी बर्याच कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे. या कंपन्यांनी ड्यू डिलिजन्स केल्यावर त्यांच्या कडून फायनान्सियल बीड्स मागवल्या जातील.

होळी जवळ आली आहे आणि मद्यार्क सेवन करण्यासाठी वयाची किमान मर्यादा २५ वरून २१ केली. नवीन दुकानासाठी लायसेन्स इशू केले जाणार नाही सरकारी दारूची दुकाने बंद केली जातील असा निर्णय दिल्ली राज्य सरकारने घेतला. रेस्टारंटसमध्ये मद्यार्क सर्व्ह करणाऱ्या व्यक्तीचे वय सुद्धा २१ वर्षांपेक्षा कमी असता कामा नये. राज्य सरकार मद्यार्काची किमान गुणवत्ता ठरवेल. सरकारी परवाने खाजगी लोकांना विकण्यासाठी बीड मागवेल. गोल्डमन साख या रेटिंग एजन्सीने USL चे रेटिंग वाढवले रेटिंग बाय केले आणि टार्गेट Rs ६८३ केले. या सर्व कारणांमुळे GM ब्रुअरीज, युनायटेड ब्रुअरीज, युनायटेड स्पिरिट्स, रॅडिको खेतान. ग्लोबस स्पिरिट्स असे मद्यार्काशी संबंधित शेअर्स तेजीत होते.

मारुती तिसऱ्यांदा त्यांच्या पॅसेंजर व्हेइकल्सच्या किमती वाढवण्याच्या तयारीत आहे. पण दिवसेंदिवस मारुतीचा मार्केट शेअर कमी होत आहे. ५४% वरून मार्केट शेअर ५०% पर्यंत घसरला आहे.

आज अडाणी ग्रुपचे सर्व शेअर्स तेजीत होते. अडाणी ग्रीनने स्काय पॉवर ग्लोबलकडून ५० MV सोलर ऍसेट्स अकवायर केले. अडाणी पोर्टने गंगावरम पोर्टमध्ये कंट्रोलिंग इंटरेस्ट Rs ३६०४ कोटींना घेतला. अडाणी पॉवरला MERCने अडाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई इन्फ्रा लिमिटेड यांना २५ वर्षांसाठी ट्रान्समिशन लायसेन्स दिले त्यामुळे पूर्वी पेक्षा ३३% जास्त म्हणजेच १००० MV एवढी वीज मुंबईला मिळेल. त्यामुळे विजेची वाढती मागणी पुरी होऊ शकेल.

M & M भारतीय सैन्यासाठी Rs १०५६ कोटी किमतीची १३०० आर्मर्ड टॅक्टिकल व्हेईकल्स ४ वर्षाच्या मुदतीत बनवेल. आत्मनिर्भर भारत योजनेखाली खाजगी कंपनीने डिझाईन आणि डेव्हलप केलेली ही पहिलीच आर्म्ड टॅक्टिकल व्हेइकल्स असतील.

इन्सेक्टीसाईड्स इंडिया ही कंपनी ३० मार्च रोजी आपल्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या बैठकीत शेअर बायबॅकवर विचार करेल.

सारेगम या कंपनीने Rs २० प्रती शेअर लाभांश जाहीर केला त्याची रेकोर्ड डेट ६ एप्रिल आहे.

रेलटेल या कंपनीने Rs १ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला.

भारत गॅस रिसोर्सेस लिमिटेड या BPCL च्या १००% सब्सिसीअरीच्या BPCL मधील मर्जरला बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी मंजुरी दिली.

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ ,पुड्डुचेरी, आसाम या ५ राज्यात विधानसभेसाठी निवडणुका होणार आहेत.
मी आज तुम्हाला UPL चा चार्ट देत आहे. ८ दिवसांच्या कन्सॉलिडेशन नंतर ब्रेकआऊट दिला नंतर डोजी कॅण्डल फॉर्म झाली आणि पुन्हा रॅली रिझ्युम झाली. या शेअरच्या बाबतीत बोलायचे झाल्यास एक रेंज पार केल्यानंतर कन्सॉलिडेशन होते आणि पुन्हा रॅली सुरु होते असे या चार्टमध्ये दिसते आहे.

आज BSE निर्देशांक सेन्सेक्स ५००५१ NSE निर्देशांक निफ्टी १४८१४ बँक निफ्टी ३४१८४ वर बंद झाले. BSE निर्देशांक सेन्सेक्स ४९७७१ NSE निर्देशांक १४७३६ बँक निफ्टी ३३६०३ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २२ मार्च २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २२ मार्च २०२१

आज क्रूड US $ ६३.७४ प्रती बॅरल ते US $ ६४.३० प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७२.३७ ते US $१= Rs ७२.५१ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९१.९६ VIX २०.४९ PCR ०.८८ होते . USA चे १० वर्षे बॉण्ड्सचे यिल्ड थोडे कमी होऊन १.७० च्या जवळपास होते.

आज हळू हळू बॉण्ड यिल्ड १.६७ झाले. US $ निर्देशांक ९२.०४ पर्यंत वाढला. सध्या इराणमधून चीनला क्रूडचा पुरवठा होत आहे. भारतही आता क्रूड USA कडून खरेदी करण्याच्या विचारात आहे. कारण सौदी अरेबियाकडून खरेदी केलेल्या क्रूडपेक्षा हे क्रूड भारताला स्वस्त पडत आहे. म्हणून ओपेक+ने केलेल्या उत्पादनातील कपातीचा परिणाम टिकू शकला नाही.

शुक्रवारचा निफ्टीचा कँडलस्टिक चार्ट पाहिला तर PIERCING LINE पॅटर्न तयार झाला होता असे आढळले . वीकली चार्ट मध्ये हॅमर पॅटर्न तयार झाला होता. हे दोन्हीही पॅटर्न मंदी किंवा करेक्शन संपून तेजी आज सुरु होईल असे दर्शवतात. त्याचाच प्रत्यय आज आला.आज एक वेळ अशी होती की निफ्टी जवळजवळ १५० पाईंट पडला होता. पण नंतर मार्केट पूर्णपणे सावरले आणि तेजीत आले. सिमेंट रिऍलीटी आणि काही प्रमाणात फार्मा सेक्टरमध्ये तेजी होती.

BARBEQUE नेशन्स ( स्थापना २००६) चा IPO २४ मार्चला ओपन होऊन २६ मार्चला बंद होईल. याचा प्राईस बँड Rs ४९८ ते Rs ५०० असून मिनिमम लॉट ३० शेअर्सचा आहे. IPO मध्ये Rs १८० कोटींचा फ्रेश इशू असून Rs २७२.८७ कोटींची OFS असेल. ही एक कॅज्युअल डायनिंग चेन असून कंपनीची ७७ शहरात मिळून १४७ हॉटेल्स चालू आहेत.तसेच UAE, ओमान आणि मलेशिया या देशात सहा हॉटेल्स आहेत.कंपनी इ -डिलिव्हरी चा बिझिनेस वाढवत असून सध्या १५% बिझिनेस E -रूट द्वारे होतो. कंपनी IPO च्या प्रोसिड्सचा विनियोग कर्ज फेडण्यासाठी आणि नवीन रेस्टारंट उघडण्यासाठी करेल

प्रभात डेअरीला १३ एप्रिल २०२१ पर्यंत डीलीस्टिंगची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुदत दिली आहे. मार्च २४ ते मार्च ३१ २०२१ पर्यंत कंपनी डीलीस्टिंगसाठी Rs ६३.७७ प्रती शेअर या भावाने बाय बॅक करेल.

दिल्ली हायकोर्टाच्या सिंगल बेंचने रिलायन्स फ्युचर डिलसंबंधात सिंगापूर आर्बिट्रेशन कोर्टाचा निर्णय कायम ठेवून फ्युचर रिलायन्स डीलमध्ये पुढे कोणतीही कारवाई करण्यास फ्युचर ग्रुपला मनाई केली होती.हे आपण शुक्रवारी पाहिले होते. त्या विरोधात पुन्हा फ्युचर ग्रुपने दिल्ली हायकोर्टात अपील केल्यावर ही बाब सुप्रीम कोर्टांत पेंडिंग असल्यामुळे दिल्ली हायकोर्टाच्या सिंगल बेंचने दिलेल्या सर्व ऑर्डर्स दिल्ली हायकोर्टाच्या डिव्हिजन बेंचने रद्द केल्या आणि कोणतीही ऑर्डर पास करण्यास मनाई केली. त्यामुळे फ्युचर ग्रुपचे शेअर तेजीत होते.

सरकारने हिंदुस्थान झिंक मधील सरकारी स्टेक विकण्यासंबंधातील सुनावणी लवकर करावी असा सुप्रीम कोर्टात अर्ज केला. कारण अर्थव्यवस्थेत भांडवल गुंतवणुकीची आवश्यकता आहे.

अडाणी ग्रीन स्काय पॉवर ग्लोबल कडून त्यांच्या सबसिडीअरीतील १००% स्टेक घेणार आहे. या सबसिडीअरीचे तेलंगणामध्ये ५०MV सोलर ऍसेट्स आहेत. त्यामुळे अडाणी ग्रीनची क्षमता ३३९५ MV एवढी होईल. टोटल पोर्टफोलिओ १४८६५ MV चा होईल.

DR रेडिजच्या स्फुटनिक V या व्हॅक्सिनला इमर्जन्सी वापरासाठी या आठवड्यात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. DR रेडीजने या व्हॅक्सिनच्या फेज III ट्रायलचा.डेटा भारताकडे सुपूर्द केला. त्यामुळे DR रेडिजच्या शेअरमध्ये तेजी आली.
हॅवेल्स या कंपनीने एअरप्युरिफायर असलेला सिलिंग फॅन स्थेल्थ (STEALTH) प्यूरो एअर सिलिंग फॅन Rs १५००० किमतीला लाँच केला. ह्या फॅनमुळे थ्री स्टेज फिल्टरेशन आणि एअर प्युरिफिकेशन बेनिफिट्स मिळतील. ह्या नवीन प्रकारच्या प्रिमीयम प्रकारातील फॅनमुळे हॅवेल्सचा मार्केट शेअर वाढेल.

सिमेंटच्या विक्रीचे आकडे पाहता गेल्या १० वर्षाच्या सरासरी विक्रीपेक्षा या वर्षीच्या विक्रीचे आकडे जास्त आहेत. सरकारने नॅशनल बँक फॉर इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट स्थापन करायचे ठरवले आहे. सिमेंटचे भाव सातत्याने वाढत आहेत. रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून रिऍलीटी सेक्टरला उत्तेजन दिले जात आहे. हाऊसिंग लोनच्या व्याजाचा दर कमी झाला आहे. आणि गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर बरेच प्रोजेक्ट लाँच केले जातात. त्यामुळे आज रिऍलिटी आणि सिमेंट क्षेत्रातील शेअर्स तेजीत होते.

आज मी तुम्हाला टाटा केमिकल्सचा चार्ट देत आहे शुक्रवारच्या कँडलने गुरुवारच्या कँडलला पूर्णपणे एंगल्फ केले आहे. जर बोलिंजर बॅण्ड लागू केला तर आजची कँडल मिडपाईण्टच्यावर आहे असे दिसते.टाटा केमिकल्स निफ्टीला आउटपरफॉर्म करत आहे शुक्रवारचा हाय पाईंटही आजच्या कँडलने तोडला आहे त्यामुळे ब्रेकआऊट स्पष्टपणे दिसत आहे.

कोलगेट या कंपनीने Rs २० अंतरिम लाभांश जाहीर केला. या लाभांशासाठी ३१ मार्च २०२१ ही रेकॉर्ड डेट ठरवली आहे. ह्या अंतरिम लाभांशाचे पेमेंट १६ एप्रिल किंवा त्यानंतर केले जाईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४९७७१ NSE निर्देशांक १४७३६ बँक निफ्टी ३३६०३ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – १९ मार्च २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १९ मार्च २०२१

आज क्रूड US $६३.१० प्रती बॅरल ते US $६३.५९ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७२.४७ ते US $ १=Rs ७२.५६ या दरम्यान , US $ निर्देशांक ९१.८५ VIX २१.७६ PCR ०.९९ होते. आज USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.७२ झाले नंतर मार्केटच्या वेळात पुन्हा १.६८ झाले.

क्रूडचा दर आज US $ ६३ प्रति बॅरल झाला. त्यामुळे मार्केटच्या स्थितीमध्ये आज बदल होईल असे सर्वांना वाटत होते. .मार्केट आज असमंजस स्थितीत होते पण VIX , बॉण्ड यिल्ड, क्रूड, PCR या सगळ्या गोष्टी अनुकूल झाल्यामुळे ITC HUL आणि ऊर्जा क्षेत्रातील बहुतेक शेअर्स यांनी मार्केटला सावरण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली. दिवस अखेरीला निफ्टी १४७५० चा टप्पा मार्केटने पार केला. फेडने व्याजाच्या दरामध्ये कोणतेही बदल केले नाहीत त्यामुळे सोन्यामध्ये आलेली तेजी टिकाव धरू शकली नाही.

ज्युबिलण्ट लाईफसायन्सेस यांचे ठरल्याप्रमाणे डीमर्जर झाले होते. फार्मा बिझिनेस ज्युबिलण्ट फार्मोवा आणि ज्युबिलन्ट्स लाईफसायन्स इन्ग्रेडियंट बिझिनेसची वेगळी कंपनी झाली तिचे नाव ज्युबिलण्ट इन्ग्रेविया असे झाले. या कंपनीचे आज Rs २५८ ला लिस्टिंग झाले. ज्यांच्या कडे ज्युबिलण्ट लाईफसायन्सेसचे शेअर्स होते त्यांना १:१ या प्रमाणात ज्युबिलण्ट इन्ग्रेव्हिया चे शेअर्स दिले.

आरती ड्रग्स ने टेंडर रूटने Rs १००० प्रती शेअर या भावाने शेअर बायबॅक जाहीर केला. या बायबॅक साठी कंपनी Rs ६० कोटी खर्च करणार आहे.

दिल्ली हायकोर्टाने अमेझॉनने केलेल्या अर्जासंबंधात फ्युचर रिटेलला रिलायन्स इंडस्ट्रीजबरोबर केलेल्या Rs २४७१३ कोटींच्या सौद्याच्या संदर्भात पुढील कारवाई करण्यास मनाई केली.सिंगापूर आर्बिट्रेशनने दिलेला निकाल कायम ठेवला.
रबराच्या किमती वाढल्यामुळे ऑटो कंपन्यांशी टायर उत्पादक कंपन्या टायरच्या किमती वाढवण्यासाठी वाटाघाटी करत आहे. अपोलो टायर्स १ एप्रिल २०२१ पासून सर्व प्रकारच्या टायर्सच्या किमती ४% ने वाढवणार आहे.

BIS स्टॅन्डर्सचे पालन केले नाही म्हणून ६४ इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्टसच्या आयात आणि उत्पादनाला सप्टेंबर २०२१ पर्यंत मनाई केली. ३२” पेक्षा मोठ्या LCD आणि LED यांचा यात समावेश आहे.

इझी ट्रिप प्लानर्स या IPO चे आज लिस्टिंग झाले. BSE वर Rs २०६ आणि NSE वर Rs २१२ वर लिस्टिंग झाले. हा शेअर Rs १८७ला दिला होता.

अहमदाबाद मध्ये विकएंडला मॉल्स आणि थिएटर्स बंद राहतील. महाराष्ट्रात मॉल्समध्ये जाण्यासाठी कोरोनाची टेस्ट करावी लागेल म्हणून आज PVR ,इनॉक्स, ज्युबिलण्ट फूड्स, इत्यादी शेअर्स मंदीत होते

आज मी तुम्हाला सन टीव्हीचा चार्ट देत आहे. मार्केट पडत असताना या शेअरने नवा लो पाईंट केला नाही. Rs ५७० ते Rs ४७० असे Rs १०० चे करेक्शन या शेअरमध्ये झाले आहे २०० DMA ला या शेअरने सपोर्ट घेतला आहे. आणि ट्रेंड रिव्हर्स होतो आहे असे दिसते आहे. निवडणुका, क्रिकेटचे सामने यामुळे जाहिरातीचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.या मूलभूत बाबी सुद्धा या शेअरसाठी अनुकूल आहेत.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४९६५८ NSE निर्देशांक निफ्टी १४७४४ बँक निफ्टी ३४१६१ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – १८ मार्च २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १८ मार्च २०२१

आज क्रूड US $ ६७.४९ प्रती बॅरल ते US $ ६७.७४ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७२.४५ ते US $१= Rs ७२..५३ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९१.४२ VIX २०.९१ PCR ०.८७ तर USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.७२ वर पोहोचले.
फेडने दरांत कोठलाही बदल केला नाही. व्याजाचे दर वाढवले जाणार नाहीत हे सांगण्याचा प्रयत्न पॉवेल यांनी केला.

कोणतीही गोष्ट प्रीएम्प्ट किंवा ऍंटीसिपेट न करता प्रात्यक्षात काय घडते आहे ते पाहूनच निर्णय घेतला जाईल. YOY तुलना करण्यासाठी गेल्या वर्षाची स्थिती अपवादात्मक होती.त्यामुळे तुलना करणे योग्य होणार नाही अर्थव्यवस्थेला आवश्यक असणारा सपोर्ट दिला जाईल.प्रत्येक महिन्याला US $८० बिलियन GOVT सिक्युरिटीज आणि US $ ४० बिलियनच्या मॉर्गेज सिक्युरिटीजची खरेदी चालू ठेवली जाईल. २०२१ मध्ये ६.५% तर २०२२ मध्ये ३.५% ग्रोथ अपेक्षित आहे. सरासरी महागाईने २% चे लक्ष्य गाठल्यावर पुढील विचार केला जाईल. US $ निर्देशांक मात्र कूल ऑफ होत आहे हे भारताच्या दृष्टीने चांगले आहे त्यामुळे FII चा फ्लो भारतीय मार्केटमध्ये येत राहील. या सगळ्या कारणांमुळे USA मधील, आशियायी, युरोपियन भारतीय मार्केट्स तेजीत होती. त्यावेळीही USA १० वर्षे बॉण्ड्स यिल्ड १.६७ होते. नंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. आणि बॉण्ड यिल्ड १.७२ पर्यंत जाताच मार्केट पडू लागले. निफ्टी १४७५० ची लेव्हल तोडताच मार्केट पडण्याचा वेग वाढला.मार्केटने निफ्टी १४५००ची लेव्हलही तोडली. शेवटी १४४७८ पर्यंत मार्केट पोहोचल्यानंतर मार्केटमध्ये थोडी सुधारणा दिसली.

दालमिया भारत या कंपनीची IL&FS संबंधित सुप्रीम कोर्टात चाललेली केस कंपनीच्या बाजूने झाली. कंपनीने Rs ३४४ कोटींची म्युच्युअल फंडांची युनिट तारण म्हणून दिली होती ती युनिट्स एक महिन्यामध्ये कंपनीच्या अकौन्टला परत जमा होतील. त्यामुळे शेअर तेजीत होता. त्याच बरोबर कंपनीच्या व्यवस्थापनाने सांगितले की कंपनी एक वर्षात DEBT FREE होईल.

शुगर डेव्हलपमेंट फंडातून २% कमी व्याजाच्या दराने सोप्या अटींवर साखर कंपन्यांना कर्ज मिळेल. म्हणून साखर उत्पादन क्षेत्रातले शेअर्स वाढले.

BHEL ने NPCIL च्या (न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) प्रोजेक्टसाठी बीड केले होते. यामध्ये BHEL सगळ्यात कमी बीडर ठरली.१२ प्रेशराइझ्ड हेवी वॉटर रीऍक्टरसाठी स्टीम टरबाइन जनरेटर सेट BHEL पुरवते. ही ऑर्डर Rs १०८०० कोटींची आहे. त्यामुळे BHEL च्या शेअरमध्ये तेजी आली.

OLA , तसेच GoAir या कंपनीचे IPO येत आहे.

आज बजाज ऑटोने लाभांश धोरण जाहीर केले. याप्रमाणे जर सरप्लस Rs १५००० कोटीपेशा जास्त असेल तर ९०% रक्कम, जर सरप्लस Rs ७५०० कोटी ते Rs १५००० कोटींदरम्यान असेल तर ७०% रक्कम आणि सरप्लस Rs ७५०० कोटीपेक्षा कमी असेल तर ५० % रक्कम लाभांश म्हणून जाहीर केला जाईल

PNB ‘PNB CARDS’ या नावाने एक सबसिडीअरी बनवेल. पण SBI कार्ड्सप्रमाणे ग्रोथ होईल का हे पाहावे लागेल.
GMM PFAUDLER ने’ ‘HDO टेक्नॉलॉजी’ ही कंपनी Rs ५८.४६ कोटींना खरेदी केली. हा व्यवहार ३० एप्रिल २०२१ पर्यंत पूर्ण होईल. यामुळे आमच्या ग्लास लाईनबिझिनेसची हेवी इंजिनीअरिंग क्षमता वाढेल आणि करमसाड युनिटला ही फायदा होईल.

मी तुम्हाला आज इंडिया बुल्स हॉऊसींग फायनान्सचा चार्ट देत आहे. या मध्ये DEATH क्रॉस तयार झाला आहे. हिरवी लाईन १० DMAची आहे आणि VIOLET रंगाची लाईन २१ DMAची आहे. ज्यावेळी शॉर्ट टर्म मूव्हिंग ऍव्हरेजची लाईन लॉन्ग टर्म मूव्हिंग ऍव्हरेजीसच्या लाईनला वरून खालच्या दिशेने छेदते. त्यावेळी डेथ क्रॉस तयार होतो. इंडिया बुल्स हौसिंग फायनान्सच्या चार्ट मध्ये १० DMA ची लाईन २१ DMA च्या लाईनला वरून खालच्या दिशेने छेदते. अशा वेळेला शेअरमध्ये शॉर्ट टर्ममध्ये जोरदार मंदी येते.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४९२१६ NSE निर्देशांक निफ्टी १४५५७ बँक निफ्टी ३३८५६ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – १७ मार्च २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १७ मार्च २०२१

आज क्रूड US $ ६८.६३ प्रती बॅरल ते US $ ६८.७६ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७२.५४ ते US $१=Rs ७२.७८ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९१.९० VIX २०.१५ PCR १.२७ होते

आज मार्केटमध्ये फारशी हालचाल नव्हती. मार्च महिन्याची गडबड, ऍडव्हान्स टॅक्स आणि IPO साठी रकमेची तरतूद आणि फेडची पॉलिसी अनौन्समेन्ट या कारणांमुळे खरेदी कमी आणि विक्री जास्त, ओळीने ४ दिवस मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंगचे प्रमाण जास्त होते. एक शेअर वाढत होता तर ५ शेअर पडत होते. पण त्यातही ITC ( कंपनी डीमर्जरवर विचार करत आहे), डेल्टा कॉर्प. इन्फोसिस, अडानी पॉवर, BSE, IIFL असे काही शेअर्स तेजीत होते. निफ्टी १४७५० ची लेव्हल मार्केटने तोडली. कोरोनाच्या केसेस वाढत आहेत. १६ राज्यातल्या ७० जिल्ह्यात १५०% ने कोरोनाच्या केसेस वाढत आहेत. हेही एक मार्केटमधील मंदीचे कारण होते.

SBI कार्ड्समधील कार्लाइल ग्रुपने त्यांचा ४% स्टेक Rs ९८१ ते Rs १०२२ या प्राईसला विकला.त्यातून Rs ३७२८ कोटी त्यांना मिळाले. अजूनही जवळजवळ १२% स्टेक त्यांच्याकडे आहे. त्यांनी २०१७ मध्ये Rs २००० कोटींना GE ग्रुप कडून २६% स्टेक घेतला होता.

वेदांताच्या प्रमोटर्सना जो डीलिस्टिंगचा अनुभव आला त्यामुळे ते त्यांचा स्टेक ७५% पर्यंत वाढवणार आहेत. आधी Rs १६० प्रती शेअरची ओपन ऑफर दिली होती ती आता Rs २३५ प्रती शेअरची ओपन ऑफर दिली आहे. ओपन ऑफरची साईझ १०% वरून १७.५% केली आहे. तरी सुद्धा ही किमत कमी आहे असे सर्वांचे म्हणणे आहे.

BPCL नी नुमालीगढ रिफायनरीमधील स्टेक, ट्रेजरी शेअर्स विकले यामुळे मोठा लाभांश किंवा स्पेशल लाभांश मिळेल असे सगळ्यांना वाटत होते . पण Rs ५ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केल्यामुळे निराशा झाली. म्हणून शेअर सपाटून पडला.

ITC व्हॅल्यू अन- लॉकिंग करायच्या विचारात आहे. एप्रिलमध्ये होणाऱ्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या बैठकीत यावर विचार करत आहे. पेपर, टेक्सटाईल, सिगारेट्स आणि बाकीच्या FMCG डिव्हिजन्स ची एक कंपनी होईल. आणि हॉटेल्स आणि इन्फोटेक यासाठी वेगवेगळ्या दोन कंपन्या होतील. म्हणजेच ITC ही कंपनी तीन कंपन्यात विभागली जाईल. सध्या ITC च्या हॉटेल्सच्या बिझिनेसच्या १४००० रूम्स आहेत. त्याची किंमत Rs २०००० ते Rs २५००० कोटी आहेत. इन्फोटेक बिझिनेस मात्र छोट्या प्रमाणावर आहे. ह्याची किंमत Rs ४००० ते Rs ५००० कोटी आहे. या डीमर्जर नंतर गुंतवणूकदारांना दुप्पट फायदा होईल.

आज ट्रान्सपोर्ट मंत्रालयाने स्क्रॅपेज पॉलिसीचा नवा ड्राफ्ट सादर केला. १ ऑक्टोबर २०२१ पासून ही पॉलिसी लागू होईल. रिन्यूअल चार्ज वाढवण्याचा विचार आहे. त्याचबरोबर टू व्हिलर्स रिरजिस्ट्रेशन Rs ६०० ते Rs १००० ने तर कारचे रिरजिस्ट्रेशन Rs ५००० ने महाग होईल. याचा फायदा MSTC ला होईल. खरे पाहता आज ऑटो क्षेत्रातील शेअर्स तेजीत असायला पाहिजे होते कारण नवीन गाड्यांना स्क्रॅपेज पॉलिसीमुळे मागणी येईल. पण कोणत्याही बातमीला प्रतिक्रिया देण्याच्या मूडमध्ये मार्केट नव्हते.

ISMA ने साखर उत्पादनाचे आकडे जाहीर केले. ऑक्टोबर २०२० ते १५ मार्च २०२१ या काळात २.५९ कोटी टन उत्पादन झाले. पूर्वी हे उत्पादन २.१६ कोटी टन होते.

शक्ती पम्प या कंपनीला US $ ३५ मिलियनची युगांडा सरकारकडून मोठी ऑर्डर मिळाली.

सोलर पॉवर वॉटर पम्पिंग सिस्टिमसाठी ही ऑर्डर मिळाली. त्यामुळे शेअर तेजीत होता. ही कंपनी जवळ जवळ USA , ऑस्ट्रेलिया, UAE अशा १०० देशांना पंपांची निर्यात करते. २८००० MV चा सर्वात मोठा पॉवर प्रोजेक्ट गुजरातमध्ये सुरु होत आहे त्यामध्ये GIPCL या कंपनीला काम मिळाले आहे.

मी आज तुम्हाला नेलकास्ट या ऑटो अँसिलिअरी क्षेत्रातील कंपनीचा चार्ट देत आहे. इतके दिवस फॉलिंग चॅनेलमध्ये हा शेअर ट्रेड करत होता त्यात बदल झाला आहे. सेकण्ड हायेस्ट व्हॉल्युम आहे. करेक्शन पूर्ण झाले आहे. जर विकली चार्ट पाहिला तर २०० आठवड्याच्या MA च्या खाली कधीही शेअर गेलेला नाही. रिस्क रिवॉर्ड रेशियो चांगला आहे.

उद्या बँक निफ्टीची विकली एक्स्पायरी आहे. US $ ६७ प्रति बॅरलच्या जवळपास क्रूड आले आहे फेडच्या पॉलिसीमध्ये काही नकारात्मक बदल नसेल तर उद्या मार्केटमध्ये तेजी येईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४९८०१ NSE निर्देशांक निफ्टी १४७२१ बँक निफ्टी ३४२२९ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – १६ मार्च २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १६ मार्च २०२१

आज क्रूड US $ ६८.०९ प्रती बॅरल ते US $ ६८.४७ प्रति बॅरल या दरम्यान रुपया US $१=Rs ७२.४३ ते US $१=Rs ७२.६१ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९१.८२ VIX २०.३३ PCR १.२९ होते. USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.६० होते.
आज बॉण्ड यिल्ड, VIX, क्रूड या तिन्ही गोष्टींमध्ये थोडी नरमी होती. USA मधील मार्केट्स तेजीतच होती. फेड काय घोषणा करते याकडे सर्वांचे लक्ष आहे. रेट्स मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करतील अशी शक्यता नाही. पण फेडच्या कॉमेंटरीमध्ये सगळ्यांना स्वारस्य आहे. USA सरकारी डेटानुसार तिसऱ्या तिमाहीतसुद्धा निर्यातीत वाढ झाली. सध्या USA मधील मार्केटला भारतीय मार्केट्स फॉलो करत नाही असे जाणवते.म्हणजेच दोन्हीही मार्केट्स एकमेकांपासून डिकपल झाली आहेत. गेल्या ११ ट्रेडिंग सेशन्समध्ये एक दिवस गॅप अप तर दुसरे दिवशी गॅप डाऊन असे सातत्याने घडत आहे.

कोरोनाचे प्रमाण वाढल्यामुळे गुजरातच्या बर्याच शहरात रात्री कर्फ्यू लावला आहे. या कोरोनामुळे फार्मा सेक्टर, सर्व पॅथॉलॉजी लॅबचे शेअर्स, हॉस्पिटल्सचे शेअर्स, IT कंपन्यांचे निकाल चांगले येतील अशा अंदाजामुळे IT क्षेत्रातील सर्व कंपन्यांचे शेअर्स आणि १०वी, १२वी च्या परीक्षा जवळ आल्यामुळे S चांद, नवनीत असे शेअर्स तेजीत होते. पण माननीय अर्थमंत्र्यान्ची मार्केट संपल्यावर प्रेस कॉन्फरन्स आहे असे कळल्यामुळे मार्केट दोलायमान स्थितीत होते.

आज पासून टाटा कम्युनिकेशनचा OFS सुरु झाला ( OFS या कॉर्पोरेट एक्शन विषयी सविस्तर माहिती माझ्या पुस्तकांत दिली आहे.). टाटा कम्युनिकेशन म्हणजेच पूर्वीची VSNL. २००२ मध्ये VSNL ची डायव्हेस्टमेन्ट करण्यात आली. त्यावेळी PANATONE FINVEST हे स्पेशल पर्पज व्हेईकल म्हणून स्थापन झाले. VSNL ची एकूण जमीन १२३०.१३ एकर होती. त्यापैकी पुणे. कोलकाता, दिल्ली चेन्नई येथील ७७३.१३ एकर जमीन बाजूला ठेवली. यासाठी पुन्हा HPIL ही कंपनी स्थापन केली. आता PANATONE कडे ३४.८० % स्टेक, टाटा सन्स कडे १४.०७% स्टेक आणि सरकारकडे २६.१२ % स्टेक आहे. हे तीन प्रमोटर्स आहेत. सरकारच्या स्टेक पैकी PANATONE फ़िन्व्हेस्ट ला १०% स्टेक देणार आहेत. OFS ची फ्लोअर प्राईस Rs ११६१ आहे. आज हा OFS नॉनरिटेलसाठी ओपन होता. तर उद्या रिटेल गुंतवणूकदारांसाठी ओपन असेल. ४५९.४६ लाख शेअर्स या OFS मध्ये ऑफर केले जातील. जर या OFS ला प्रतिसाद चांगला मिळाला तर आणखी शेअर्स ऑफर केले जातील. सरकारने त्यांचा स्टेक विकल्यावर कंपनीला फंड रेझिंग करणे सोपे होईल

अडानी पोर्टला फार चांगली संधी मिळाली. कोलम्बोचे वेस्ट कंटेनर टर्मिनल .डेव्हलप करण्यामध्ये JOHN KEEIIS HOLDING PLC आणि श्री लंका पोर्ट्स ऑथॉरिटीबरोबर अडानी पोर्ट काम करेल. हा करार ३५ वर्षांसाठी आहे.
मॅक्स हेल्थकेअरने साकेत सिटी हॉस्पिटलमधील ४२.८% स्टेक कायक इन्व्हेस्टमेंट होल्डिंग कडून खरेदी केला. साकेत सिटी हॉस्पिटलमध्ये मॅक्सचा ५७.२% स्टेक आणि कायकचा ४२.८% स्टेक होता. आता साकेत सिटी हॉस्पिटल ही मॅक्स हेल्थकेअर या कंपनीची १०० % सबसिडीअरी झाली.

सरकारी बँका होम लोनचे व्याजाचे दर कमी करत आहेत. याचा परिणाम खाजगी बँकांवर होण्याची शक्यता आहे. पुन्हा कोरोनासाठी निर्बंध लावण्यात येणार असल्यामुळे IRCTC सारख्या शेअरवर परिणाम दिसला. गुजरातमधील क्रिकेटच्या सामन्यासाठी जाणार्या लोकांना त्यांचे आरक्षण रद्द करावे लागले. माँल्स संबंधित नियम कडक केले याचा परिणाम ट्रेंट सारख्या शेअरवर होईल. पुन्हा लोक पॅक्ड फूडकडे वळतील. यामुळे UFLEX, मॅट्रिमोनी.COM, इ -कॉमर्स संबंधित शेअर्स पुन्हा चालू लागतील.

दिल्ली मध्ये ATF च्या किमती Rs ८६०.२५ प्रती किलो लिटर वाढल्या.ATF ची किंमत Rs ६०२६१ प्रती किलो लिटर झाली. याचा परिणाम हवाई वाहतूक करणाऱ्या कंपन्यांवर होईल. BHEL आणि अँड्रयू यूल या कंपन्यांच्या डायव्हेस्टमेन्टचा तूर्त तरी प्रस्ताव नाही.असे सरकारने सांगितले.

आज मी तुम्हाला एशियाना हाऊसिंग या कंपनीचा चार्ट देत आहे .मंथली चार्टवर ब्रेकआऊट दिसत आहे फेब्रुवारी २०२० हा हाय पाईंट पार केला आहे. विकली चार्ट मध्ये २०० वीक सिम्पल मुविंग ऍव्हरेजच्या वर प्रथमच गेला आहे. मोठ्या करेक्शन नंतर मे महिन्यापासून रिकव्हरी सुरु झाली. प्राईस व्हॅल्यूम ब्रेकआऊट आज कन्फर्म झाला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५०३६३ NSE निर्देशांक १४९१० बँक निफ्टी ३४८०४ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!