आजचं मार्केट – १९ मार्च २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १९ मार्च २०२१

आज क्रूड US $६३.१० प्रती बॅरल ते US $६३.५९ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७२.४७ ते US $ १=Rs ७२.५६ या दरम्यान , US $ निर्देशांक ९१.८५ VIX २१.७६ PCR ०.९९ होते. आज USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.७२ झाले नंतर मार्केटच्या वेळात पुन्हा १.६८ झाले.

क्रूडचा दर आज US $ ६३ प्रति बॅरल झाला. त्यामुळे मार्केटच्या स्थितीमध्ये आज बदल होईल असे सर्वांना वाटत होते. .मार्केट आज असमंजस स्थितीत होते पण VIX , बॉण्ड यिल्ड, क्रूड, PCR या सगळ्या गोष्टी अनुकूल झाल्यामुळे ITC HUL आणि ऊर्जा क्षेत्रातील बहुतेक शेअर्स यांनी मार्केटला सावरण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली. दिवस अखेरीला निफ्टी १४७५० चा टप्पा मार्केटने पार केला. फेडने व्याजाच्या दरामध्ये कोणतेही बदल केले नाहीत त्यामुळे सोन्यामध्ये आलेली तेजी टिकाव धरू शकली नाही.

ज्युबिलण्ट लाईफसायन्सेस यांचे ठरल्याप्रमाणे डीमर्जर झाले होते. फार्मा बिझिनेस ज्युबिलण्ट फार्मोवा आणि ज्युबिलन्ट्स लाईफसायन्स इन्ग्रेडियंट बिझिनेसची वेगळी कंपनी झाली तिचे नाव ज्युबिलण्ट इन्ग्रेविया असे झाले. या कंपनीचे आज Rs २५८ ला लिस्टिंग झाले. ज्यांच्या कडे ज्युबिलण्ट लाईफसायन्सेसचे शेअर्स होते त्यांना १:१ या प्रमाणात ज्युबिलण्ट इन्ग्रेव्हिया चे शेअर्स दिले.

आरती ड्रग्स ने टेंडर रूटने Rs १००० प्रती शेअर या भावाने शेअर बायबॅक जाहीर केला. या बायबॅक साठी कंपनी Rs ६० कोटी खर्च करणार आहे.

दिल्ली हायकोर्टाने अमेझॉनने केलेल्या अर्जासंबंधात फ्युचर रिटेलला रिलायन्स इंडस्ट्रीजबरोबर केलेल्या Rs २४७१३ कोटींच्या सौद्याच्या संदर्भात पुढील कारवाई करण्यास मनाई केली.सिंगापूर आर्बिट्रेशनने दिलेला निकाल कायम ठेवला.
रबराच्या किमती वाढल्यामुळे ऑटो कंपन्यांशी टायर उत्पादक कंपन्या टायरच्या किमती वाढवण्यासाठी वाटाघाटी करत आहे. अपोलो टायर्स १ एप्रिल २०२१ पासून सर्व प्रकारच्या टायर्सच्या किमती ४% ने वाढवणार आहे.

BIS स्टॅन्डर्सचे पालन केले नाही म्हणून ६४ इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्टसच्या आयात आणि उत्पादनाला सप्टेंबर २०२१ पर्यंत मनाई केली. ३२” पेक्षा मोठ्या LCD आणि LED यांचा यात समावेश आहे.

इझी ट्रिप प्लानर्स या IPO चे आज लिस्टिंग झाले. BSE वर Rs २०६ आणि NSE वर Rs २१२ वर लिस्टिंग झाले. हा शेअर Rs १८७ला दिला होता.

अहमदाबाद मध्ये विकएंडला मॉल्स आणि थिएटर्स बंद राहतील. महाराष्ट्रात मॉल्समध्ये जाण्यासाठी कोरोनाची टेस्ट करावी लागेल म्हणून आज PVR ,इनॉक्स, ज्युबिलण्ट फूड्स, इत्यादी शेअर्स मंदीत होते

आज मी तुम्हाला सन टीव्हीचा चार्ट देत आहे. मार्केट पडत असताना या शेअरने नवा लो पाईंट केला नाही. Rs ५७० ते Rs ४७० असे Rs १०० चे करेक्शन या शेअरमध्ये झाले आहे २०० DMA ला या शेअरने सपोर्ट घेतला आहे. आणि ट्रेंड रिव्हर्स होतो आहे असे दिसते आहे. निवडणुका, क्रिकेटचे सामने यामुळे जाहिरातीचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.या मूलभूत बाबी सुद्धा या शेअरसाठी अनुकूल आहेत.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४९६५८ NSE निर्देशांक निफ्टी १४७४४ बँक निफ्टी ३४१६१ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.