आजचं मार्केट – २२ मार्च २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २२ मार्च २०२१

आज क्रूड US $ ६३.७४ प्रती बॅरल ते US $ ६४.३० प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७२.३७ ते US $१= Rs ७२.५१ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९१.९६ VIX २०.४९ PCR ०.८८ होते . USA चे १० वर्षे बॉण्ड्सचे यिल्ड थोडे कमी होऊन १.७० च्या जवळपास होते.

आज हळू हळू बॉण्ड यिल्ड १.६७ झाले. US $ निर्देशांक ९२.०४ पर्यंत वाढला. सध्या इराणमधून चीनला क्रूडचा पुरवठा होत आहे. भारतही आता क्रूड USA कडून खरेदी करण्याच्या विचारात आहे. कारण सौदी अरेबियाकडून खरेदी केलेल्या क्रूडपेक्षा हे क्रूड भारताला स्वस्त पडत आहे. म्हणून ओपेक+ने केलेल्या उत्पादनातील कपातीचा परिणाम टिकू शकला नाही.

शुक्रवारचा निफ्टीचा कँडलस्टिक चार्ट पाहिला तर PIERCING LINE पॅटर्न तयार झाला होता असे आढळले . वीकली चार्ट मध्ये हॅमर पॅटर्न तयार झाला होता. हे दोन्हीही पॅटर्न मंदी किंवा करेक्शन संपून तेजी आज सुरु होईल असे दर्शवतात. त्याचाच प्रत्यय आज आला.आज एक वेळ अशी होती की निफ्टी जवळजवळ १५० पाईंट पडला होता. पण नंतर मार्केट पूर्णपणे सावरले आणि तेजीत आले. सिमेंट रिऍलीटी आणि काही प्रमाणात फार्मा सेक्टरमध्ये तेजी होती.

BARBEQUE नेशन्स ( स्थापना २००६) चा IPO २४ मार्चला ओपन होऊन २६ मार्चला बंद होईल. याचा प्राईस बँड Rs ४९८ ते Rs ५०० असून मिनिमम लॉट ३० शेअर्सचा आहे. IPO मध्ये Rs १८० कोटींचा फ्रेश इशू असून Rs २७२.८७ कोटींची OFS असेल. ही एक कॅज्युअल डायनिंग चेन असून कंपनीची ७७ शहरात मिळून १४७ हॉटेल्स चालू आहेत.तसेच UAE, ओमान आणि मलेशिया या देशात सहा हॉटेल्स आहेत.कंपनी इ -डिलिव्हरी चा बिझिनेस वाढवत असून सध्या १५% बिझिनेस E -रूट द्वारे होतो. कंपनी IPO च्या प्रोसिड्सचा विनियोग कर्ज फेडण्यासाठी आणि नवीन रेस्टारंट उघडण्यासाठी करेल

प्रभात डेअरीला १३ एप्रिल २०२१ पर्यंत डीलीस्टिंगची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुदत दिली आहे. मार्च २४ ते मार्च ३१ २०२१ पर्यंत कंपनी डीलीस्टिंगसाठी Rs ६३.७७ प्रती शेअर या भावाने बाय बॅक करेल.

दिल्ली हायकोर्टाच्या सिंगल बेंचने रिलायन्स फ्युचर डिलसंबंधात सिंगापूर आर्बिट्रेशन कोर्टाचा निर्णय कायम ठेवून फ्युचर रिलायन्स डीलमध्ये पुढे कोणतीही कारवाई करण्यास फ्युचर ग्रुपला मनाई केली होती.हे आपण शुक्रवारी पाहिले होते. त्या विरोधात पुन्हा फ्युचर ग्रुपने दिल्ली हायकोर्टात अपील केल्यावर ही बाब सुप्रीम कोर्टांत पेंडिंग असल्यामुळे दिल्ली हायकोर्टाच्या सिंगल बेंचने दिलेल्या सर्व ऑर्डर्स दिल्ली हायकोर्टाच्या डिव्हिजन बेंचने रद्द केल्या आणि कोणतीही ऑर्डर पास करण्यास मनाई केली. त्यामुळे फ्युचर ग्रुपचे शेअर तेजीत होते.

सरकारने हिंदुस्थान झिंक मधील सरकारी स्टेक विकण्यासंबंधातील सुनावणी लवकर करावी असा सुप्रीम कोर्टात अर्ज केला. कारण अर्थव्यवस्थेत भांडवल गुंतवणुकीची आवश्यकता आहे.

अडाणी ग्रीन स्काय पॉवर ग्लोबल कडून त्यांच्या सबसिडीअरीतील १००% स्टेक घेणार आहे. या सबसिडीअरीचे तेलंगणामध्ये ५०MV सोलर ऍसेट्स आहेत. त्यामुळे अडाणी ग्रीनची क्षमता ३३९५ MV एवढी होईल. टोटल पोर्टफोलिओ १४८६५ MV चा होईल.

DR रेडिजच्या स्फुटनिक V या व्हॅक्सिनला इमर्जन्सी वापरासाठी या आठवड्यात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. DR रेडीजने या व्हॅक्सिनच्या फेज III ट्रायलचा.डेटा भारताकडे सुपूर्द केला. त्यामुळे DR रेडिजच्या शेअरमध्ये तेजी आली.
हॅवेल्स या कंपनीने एअरप्युरिफायर असलेला सिलिंग फॅन स्थेल्थ (STEALTH) प्यूरो एअर सिलिंग फॅन Rs १५००० किमतीला लाँच केला. ह्या फॅनमुळे थ्री स्टेज फिल्टरेशन आणि एअर प्युरिफिकेशन बेनिफिट्स मिळतील. ह्या नवीन प्रकारच्या प्रिमीयम प्रकारातील फॅनमुळे हॅवेल्सचा मार्केट शेअर वाढेल.

सिमेंटच्या विक्रीचे आकडे पाहता गेल्या १० वर्षाच्या सरासरी विक्रीपेक्षा या वर्षीच्या विक्रीचे आकडे जास्त आहेत. सरकारने नॅशनल बँक फॉर इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट स्थापन करायचे ठरवले आहे. सिमेंटचे भाव सातत्याने वाढत आहेत. रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून रिऍलीटी सेक्टरला उत्तेजन दिले जात आहे. हाऊसिंग लोनच्या व्याजाचा दर कमी झाला आहे. आणि गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर बरेच प्रोजेक्ट लाँच केले जातात. त्यामुळे आज रिऍलिटी आणि सिमेंट क्षेत्रातील शेअर्स तेजीत होते.

आज मी तुम्हाला टाटा केमिकल्सचा चार्ट देत आहे शुक्रवारच्या कँडलने गुरुवारच्या कँडलला पूर्णपणे एंगल्फ केले आहे. जर बोलिंजर बॅण्ड लागू केला तर आजची कँडल मिडपाईण्टच्यावर आहे असे दिसते.टाटा केमिकल्स निफ्टीला आउटपरफॉर्म करत आहे शुक्रवारचा हाय पाईंटही आजच्या कँडलने तोडला आहे त्यामुळे ब्रेकआऊट स्पष्टपणे दिसत आहे.

कोलगेट या कंपनीने Rs २० अंतरिम लाभांश जाहीर केला. या लाभांशासाठी ३१ मार्च २०२१ ही रेकॉर्ड डेट ठरवली आहे. ह्या अंतरिम लाभांशाचे पेमेंट १६ एप्रिल किंवा त्यानंतर केले जाईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४९७७१ NSE निर्देशांक १४७३६ बँक निफ्टी ३३६०३ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.