आजचं मार्केट – २३ मार्च २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २३ मार्च २०२१

आज क्रूड US $ ६३.६३ प्रती बॅरल ते US $ ६४.०१ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७२.२९ ते US $१=Rs ७२.४२ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९२.११ VIX २०.४९ PCR ०.९१ होते. USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.६४ होते.
युरोपमध्ये कोरोनाची तिसरी लाट आली आहे. आणि ही लाट पूर्वीपेक्षा जास्त संसर्गजन्य आहे. USA चे सरकार US $ ३ ट्रिलियन एवढी दीर्घ मुदतीकरता गुंतवणूक करणार आहे.

आज सुप्रीम कोर्टात बँकांचे NPA जाहीर करणे, मोरॅटोरियम उठवणे या बाबत सुनावणी होती. सुप्रीम कोर्टाने सांगितले की या बाबतीत फक्त कायदेशीर बाजूचे आम्ही अवलोकन करू. पण फायनान्सियल आणि धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी कठीण परिस्थितीत सरकार आणि RBI योग्य तो निर्णय घेईल.कोर्टाने मोरॅटोरियमची मुदत वाढवायला नकार दिला.मोरॅटोरियमच्या काळातील व्याजावरचे व्याज जर आकारले / वसुली केले गेले असले तर ते बँकांना कर्जदारांना परत करायला सांगितले.जरी एखादा हप्ता भरला नसेल तरी त्याच्या व्याजावरील व्याज आकारता येणार नाही तसेच कोणत्या क्षेत्राला किती सवलत द्यायची या बाबतीतही हस्तक्षेप करायला नकार दिला. सुप्रीम कोर्टाने सांगितले की सर्व कर्जावरील व्याजावरील व्याज माफ करावे. जर वसूल केले असले तर व्याजावरचे व्याज बँकांनी परत करावे. या आधी Rs २ कोटी ( सर्व मंजूर आणि बाकी कर्ज मिळून) कर्जाची मर्यादा ठेवली होती. कोरोनाच्या साथीचा सरकारच्या करवसुली तसेच GST उत्पन्नावर परिणाम झाला आहे.

कोणत्या बँकांचे खाजगीकरण करायचे आहे या बाबतीत आज मंत्रिमंडळाचा निर्णय होऊ शकला नाही.
BEML च्या विनिवेशासाठी बर्याच कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे. या कंपन्यांनी ड्यू डिलिजन्स केल्यावर त्यांच्या कडून फायनान्सियल बीड्स मागवल्या जातील.

होळी जवळ आली आहे आणि मद्यार्क सेवन करण्यासाठी वयाची किमान मर्यादा २५ वरून २१ केली. नवीन दुकानासाठी लायसेन्स इशू केले जाणार नाही सरकारी दारूची दुकाने बंद केली जातील असा निर्णय दिल्ली राज्य सरकारने घेतला. रेस्टारंटसमध्ये मद्यार्क सर्व्ह करणाऱ्या व्यक्तीचे वय सुद्धा २१ वर्षांपेक्षा कमी असता कामा नये. राज्य सरकार मद्यार्काची किमान गुणवत्ता ठरवेल. सरकारी परवाने खाजगी लोकांना विकण्यासाठी बीड मागवेल. गोल्डमन साख या रेटिंग एजन्सीने USL चे रेटिंग वाढवले रेटिंग बाय केले आणि टार्गेट Rs ६८३ केले. या सर्व कारणांमुळे GM ब्रुअरीज, युनायटेड ब्रुअरीज, युनायटेड स्पिरिट्स, रॅडिको खेतान. ग्लोबस स्पिरिट्स असे मद्यार्काशी संबंधित शेअर्स तेजीत होते.

मारुती तिसऱ्यांदा त्यांच्या पॅसेंजर व्हेइकल्सच्या किमती वाढवण्याच्या तयारीत आहे. पण दिवसेंदिवस मारुतीचा मार्केट शेअर कमी होत आहे. ५४% वरून मार्केट शेअर ५०% पर्यंत घसरला आहे.

आज अडाणी ग्रुपचे सर्व शेअर्स तेजीत होते. अडाणी ग्रीनने स्काय पॉवर ग्लोबलकडून ५० MV सोलर ऍसेट्स अकवायर केले. अडाणी पोर्टने गंगावरम पोर्टमध्ये कंट्रोलिंग इंटरेस्ट Rs ३६०४ कोटींना घेतला. अडाणी पॉवरला MERCने अडाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई इन्फ्रा लिमिटेड यांना २५ वर्षांसाठी ट्रान्समिशन लायसेन्स दिले त्यामुळे पूर्वी पेक्षा ३३% जास्त म्हणजेच १००० MV एवढी वीज मुंबईला मिळेल. त्यामुळे विजेची वाढती मागणी पुरी होऊ शकेल.

M & M भारतीय सैन्यासाठी Rs १०५६ कोटी किमतीची १३०० आर्मर्ड टॅक्टिकल व्हेईकल्स ४ वर्षाच्या मुदतीत बनवेल. आत्मनिर्भर भारत योजनेखाली खाजगी कंपनीने डिझाईन आणि डेव्हलप केलेली ही पहिलीच आर्म्ड टॅक्टिकल व्हेइकल्स असतील.

इन्सेक्टीसाईड्स इंडिया ही कंपनी ३० मार्च रोजी आपल्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या बैठकीत शेअर बायबॅकवर विचार करेल.

सारेगम या कंपनीने Rs २० प्रती शेअर लाभांश जाहीर केला त्याची रेकोर्ड डेट ६ एप्रिल आहे.

रेलटेल या कंपनीने Rs १ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला.

भारत गॅस रिसोर्सेस लिमिटेड या BPCL च्या १००% सब्सिसीअरीच्या BPCL मधील मर्जरला बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी मंजुरी दिली.

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ ,पुड्डुचेरी, आसाम या ५ राज्यात विधानसभेसाठी निवडणुका होणार आहेत.
मी आज तुम्हाला UPL चा चार्ट देत आहे. ८ दिवसांच्या कन्सॉलिडेशन नंतर ब्रेकआऊट दिला नंतर डोजी कॅण्डल फॉर्म झाली आणि पुन्हा रॅली रिझ्युम झाली. या शेअरच्या बाबतीत बोलायचे झाल्यास एक रेंज पार केल्यानंतर कन्सॉलिडेशन होते आणि पुन्हा रॅली सुरु होते असे या चार्टमध्ये दिसते आहे.

आज BSE निर्देशांक सेन्सेक्स ५००५१ NSE निर्देशांक निफ्टी १४८१४ बँक निफ्टी ३४१८४ वर बंद झाले. BSE निर्देशांक सेन्सेक्स ४९७७१ NSE निर्देशांक १४७३६ बँक निफ्टी ३३६०३ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.