आजचं मार्केट – २५ मार्च २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २५ मार्च २०२१

आज क्रूड US $६३.११ प्रती बॅरल ते US $ ६३.७५ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७२.५९ ते US $ १= Rs ७२.६६ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९२.५८ VIX २२.७० PCR ०.७३ होते. USA १० वर्ष बॉण्ड यिल्ड १.६१ होते.
आज USA मधील ड्युरेबल गुड्सचे आकडे कमजोर आले. येलेन यांनी सांगितले की महागाईची चिंता करण्याची जरुरी नाही. पण नजीकच्या भविष्यात सरकार कर वाढवण्याची शक्यता आहे.

भारत सरकारने आता कोरोनावरील व्हॅक्सिनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे कारण भारतातच आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.

आज भारतीय मार्केट्स गॅपडाऊन उघडले आणि पडतच गेले. मध्ये थोडा सावरण्याचा प्रयत्न केला पण शेवटच्या अर्ध्या तासांत जबरदस्त प्रॉफीटबुकिंग झाले. ५ वाढणाऱ्या शेअर्स मागे ४५ शेअर्स पडत होते. ऑटो, पॉवर, रिअल्टी आणि बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रात प्रॉफिट बुकिंग झाले.

ज्युबिलण्ट फूड्सकडे डॉमिनोज पिझ्झा आणि डंकिन’ डोनट्स या दोन आंतरराष्ट्रीय ब्रॅंड्सचे फ्रॅंचाईझ राईट्स आहेत. आता ते ‘POPEYES’ हा ब्रॅंडसुद्धा त्यांच्या पोर्टफोलिओत ऍड करत आहेत. त्यांनी POPEYES हा ब्रँड भारतात आणि शेजारी देशांमध्ये ऑपरेट करणे, सबलायसेंन्स करणे यासाठी त्यांची एक्स्ल्युझिव्ह राईट्स मिळवण्यासाठी करार केला. ज्युबिलण्ट फूड्स भारत, बांगलादेश, नेपाळ, आणि भूतान या देशात POPEYES रेस्टारंटस स्थापन करून चालू करतील. POPEYES रेस्टारंटस ही USA मधील मल्टिनॅशनल हॉटेल चेन असून फ्राईड चिकन फास्ट फूड साठी प्रसिद्ध आहेत. त्यांची ३४०० रेस्टारंटस २५ देशांमध्ये आहेत. यामुळे ज्युबिलण्ट फूड्स या कंपनीची वाढ होईल.

लक्ष्मी ऑरगॅनिक केमिकल्स याचे लिस्टिंग BSE वर Rs १५६.२० आणि NSE वर Rs १५५.५० वर झाले. कंपनीने IPO मध्ये हा शेअर Rs १३० ला दिला असल्यामुळे ज्यांना शेअर्स अलॉट झाले त्यांना बऱ्यापैकी लिस्टिंग गेन झाला.

क्राफ्ट्समन ऑटोमेशन या कंपनीच्या शेअर्सचे लिस्टिंग BSE वर Rs १३५० वर आणि NSE वर Rs १३५९ वर झाले. या कंपनीचे लिस्टिंग IPO प्राईसच्या डिस्काऊंटला झाल्यामुळे लिस्टिंग गेन्स झाले नाही.

पेट्रोलियम मंत्रालयाने इथॅनॉलला स्टॅंडर्ड फ्युएल म्हणून घोषित केले. त्यामुळे सर्व साखर उत्पादक कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते. बलरामपूर चिनी. द्वारिकेश शुगर, प्राज इंडस्ट्रीज, इंडिया ग्लायकॉल इत्यादी शेअर्स तेजीत होते.

चीनमधून येणाऱ्या PVC फ्लेक्स फिल्म वर अँटी डम्पिंग ड्यूटीची मुदत वाढवण्यात आली. याचा फायदा SRF या कंपनीला होईल.

काल आपण सुएझ कालव्यात जहाज अडकल्याची बातमी ऐकली. पण हे जहाज खूप मोठे आहे. या जहाजामध्ये २ लाख टन माल भरलेला आहे. त्यामुळे सगळ्याच जहाजांचे दळणवळण ठप्प झाले आहे. आज क्रूड US $ ६३.८२ प्रती बॅरलच्या स्तरावर राहिले.

परदेशातून आयात कमी झाल्यामुळे HRC आणि फ्लॅट स्टीलच्या किमती Rs २००० ते Rs ३००० प्रती टन एवढ्या वाढल्या. त्यामुळे मार्केट पडत असतानाही टाटा स्टील, SAIL, JSW स्टील या कंपन्या मात्र तेजीत होत्या

श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स ने Rs ६ प्रती शेअर लाभांश जाहीर केला. SBI लाईफ ने Rs २.५० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

RBI ने OMO च्या माध्यमातून Rs १०००० कोटींच्या गिल्ट्सची खरेदीविक्री केली .

आज मी तुम्हाला श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स या कंपनीचा चार्ट देत आहे. या चार्ट मध्ये फॉलिंग ट्रेंड लाईन चा ब्रेक डाऊन आहे. या शेअरमध्ये प्रत्येक वेळी येणारी तेजी टिकाव धरत नाही. शेअर प्राईस वाढण्याचे प्रमाण कमी आणि पडण्याचे प्रमाण जास्त असते. लोअर टॉप लोअर बॉटम सिरीज चालू आहे त्यामुळे या शेअरमध्ये सेल ऑन रॅलीजचा ट्रेंड चालू आहे.

आज BSE निर्देशांक सेन्सेक्स ४८४४० NSE निर्देशांक निफ्टी १४३२४ बँक निफ्टी ३३००६ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

One thought on “आजचं मार्केट – २५ मार्च २०२१

  1. Rupali dharmadhikari

    आजी तुम्ही खूप छान शेअर मार्केट संदर्भात माहिती पुरवता….u r such great inspiration for me ….I m lawyer…I like your videos …I m aslo trying to learn share market nd investing money in sharemarket ….

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.