आजचं मार्केट – ३० मार्च २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ३० मार्च २०२१

आज क्रूड US $ ६४.६३ प्रती बॅरल ते US $ ६५.०५ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=७२.७९ ते US $ १= Rs ७३.३८ या दरम्यान होते. US $ इंडेक्स ९३.१० PCR १.६५ होते. USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.७६ होते.

USA मध्ये आणखी एक US $ ३ ट्रिलियनच्या पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता आहे. बॉण्ड यिल्ड वाढल्यामुळे सोने मंदीत होते. मेटल्समध्ये मात्र तेजी होती. निफ्टी ने २० DMA क्रॉस केले (निफ्टी १४७५०) फायझर आणि मोडर्ना यांच्या व्हॅक्सीन्स रिअल वर्ल्ड कंडिशन्स मध्ये सुद्धा ९०% परिणामकारक आहे.

आज मार्केटने आपल्या चालीवर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा, लॉकडाउनच्या शक्यतेचा परिणाम होऊ दिला नाही.
स्टीलच्या HRC ( हॉट रोल्ड कॉइल्स) या प्रकारात Rs ४००० प्रती टन एवढी वाढ होणार असल्यामुळे स्टील उत्पादक कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते. उदा टाटा स्टील, कल्याणी स्टील, SAIL, JSPL, JSW स्टील.

ज्या डिजिटल सेवा पुरवल्या जातात त्यावर भारत , इटली, तुर्कस्थान, UK, स्पेन, ऑस्ट्रिया टॅक्स लावतात, त्यामुळे अमेरिकन कंपन्यांच्या बाबतीत भेदभाव होतो. भारतात २०१६ पासून इक्वलायझेशन फी लावली जाते. याबाबत आता USA कारवाई करण्याची शक्यता आहे.

आज निसर्गाच्या कृपेने सुएझ कालवा मोकळा झाला. समुद्राला आलेल्या भरतीमुळे ते जहाज पुन्हा पाण्यावर चालायला लागले. पण सुएझ कालवा हा ONE WAY असल्यामुळे याचा परिणाम अजून १० ते १५ दिवस टिकेल. आणि परिणामी काही वस्तूंची टंचाई आणि वाढलेली किंमत असू शकेल. ओपेक +ची उद्या मे महिन्यातील क्रूडच्या उत्पादनावर विचार करण्यासाठी बैठक आहे.

RBI आपले द्वैमासिक वित्तीय धोरण ७ एप्रिल २०२१ रोजी जाहीर करेल. ब्रिटानिया ही कंपनी २ एप्रिल रोजी लाभांशावर विचार करेल. IRCON ही कंपनी ५ एप्रिलला बोनसवर विचार करेल.

गुजरात ऊर्जा विकास निगमसाठी टाटा पॉवर ६० MV सोलर प्रोजेक्ट डेव्हलप करेल.

VASCON इंजिनीअरिंग या कंपनीला मेडिकल कॉलेज सेट अप करण्यासाठी Rs ५१५.६० कोटींची ऑर्डर मिळाली.
भारती एअरटेल, वोडाफोन, रिलायन्स जिओ या कंपन्यांनी जानेवारी -मार्च तिमाहीसाठी AGR ड्यूजसाठी Rs ५००० कोटी वेळेवर भरले.

नजारा टेक या कंपनीचे आज BSE वर Rs १९७१ तर NSE वर Rs १९९० वर लिस्टिंग झाले. IPO मध्ये हा शेअर Rs ११०१ प्रती शेअर या किमतीला दिला होता. पण लिस्टिंग झाल्यावर हा शेअर Rs १५५० पर्यंत पडला.

‘ARCHEGOS’ हे एक फॅमिली ऑफिस म्हणून USA मध्ये रजिस्टर झालेला HEDGE फंड आहे. हे फॅमिली ऑफिस मुख्यतः श्रीमंत फॅमिलीजच्या पैशाची गुंतवणूक करते USA, चीन, कोरिया आणि जपानच्या मार्केटमध्ये शेअर्समध्ये गुंतवणूक करते. फॅमिली ऑफिसेस ही USA मधील SEC (SECURITIES AND EXCHANGE COMMISSION) या रेग्युलेटरी ऑथॉरिटीच्या कक्षेत येत नाहीत. आणि फॅमिली ऑफिसेसची बहुतेक माहिती सार्वजनिक होत नाही. गेल्या आठवड्यात या फ़ंडातर्फे अर्थसहाय्य करणाऱ्या बँकांना US $ २० बिलियनचे शेअर्स फारच कमी किमतीत( म्हणजे २/३ किमतीत विकावे लागले) या कंपन्यांमध्ये VIACOM CBSकॉर्पोरेशन, डिस्कव्हरी कम्युनिकेशन, आणि BAIDU INC, आणि TENCENT होल्डिंग्स या चिनी कंपन्यांचा समावेश होता.

या शेअर्सच्या किमती मार्केटमध्ये पडल्यावर बँकांनी HEDGE फंडाला आवश्यक ते जादा मार्जिन भरायला सांगितले. ARCHEGOS हे मार्जिन भरू न शकल्यामुळे नोमुरा, क्रेडिट SUISSE, UBS, DEUTSCHE बँक, गोल्डमन साख, आणि मॉर्गन स्टॅन्ले यांनी ARCHEGOS कडे असलेले शेअर्स विकायला सुरुवात केली. या सर्व बँकांनी हे शेअर्स पडत्या किमतिला विकल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर तोटा झाला. स्वॅप हे एक प्रकारचे डेरिव्हेटीव्ह इन्स्ट्रुमेंट असून याच्यामध्ये संस्थागत गुंतवणूकदारांमध्ये ट्रेडिंग होते.

या इंस्ट्रुमेन्टदवारा तुम्हाला ताबडतोब पैसे न गुंतवता शेअर मार्केटमध्ये मोठ्या पोझिशन्स घेता येतात. या स्वॅप मधील व्यवहाराचे पब्लिक रिपोर्टींग होत नाही. या स्वॅप मधील ट्रेडिंग बँकांकडून अर्थसहाय्य घेउन केले जाते. यालाच ‘LEVERAGE’ असे म्हणतात. स्वॅपमध्ये ट्रेडिंग करत असल्यामुळे ARCHEGOS ला पुष्कळ LEVERAGE मिळू शकले. जर शेअर्सच्या किमती पडल्या तर मार्जिन व्हॅल्यूमध्ये तूट आल्यामुळे बँक किंवा ब्रोकर ग्राहकाला जादा मार्जिन जमा करायला सांगतो. यालाच मार्जिन कॉल्स असे म्हणतात.

स्वॅप ज्या शेअर्सचे डेरिव्हेटीव्ह असतात त्या शेअर्सची किंमत कमी व्हायला लागल्यावर जर मार्जिन कॉल्स पूर्ण केले गेले नाहीत तर बँका किंवा ब्रोकर्स हे शेअर्स विकून टाकतात. मोठ्या प्रमाणावर शेअर्सची विक्री झाल्यामुळे शेअर्सची किंमत आणखी कमी होते. त्यामुळे या आंतरराष्ट्रीय बँकांना मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करावा लागू शकतो.

भारतीय मार्केट्समध्ये संस्थागत गुंतवणुकदार देशी, विदेशी लहान मोठे सर्व सेबीच्या नियमांतर्गत येतात. या गुंतवणूकदारांना एक्स्पोजर आणि LEVERAGE यासाठी मर्यादा ठरवून दिलेली असते. पण भारतातही फॅमिली ऑफिसेस कोणत्याही नियामक ऑथॉरिटीच्या नियंत्रणाखाली नाहीत. आजतरी भारतीय मार्केट्सवर या HEDGE फंडसंबंधित घटनेचा प्रभाव दिसून आला नाही.

आज मी तुम्हाला कॅडीला हेल्थकेअर या कंपनीचा चार्ट देत आहे. फ्युचर्स मध्ये लॉन्ग पोझिशन्स ऍड होत आहेत शुक्रवारचा हाय पार केला. २०० DMA च्या वर सपोर्ट घेत आहे. १९ मार्चला Rs ४०८ लो नंतर पुढच्या शुक्रवारी Rs ४१५ लो आहे. हायर हाय हायर लो ट्रेंड दिसत आहे.आज शेअरने २१ DMA पार केले

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५०१३६ NSE निर्देशांक निफ्टी १४८४५ बँक निफ्टी ३३८७५ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

One thought on “आजचं मार्केट – ३० मार्च २०२१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.