आजचं मार्केट – ३१ मार्च २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ३१ मार्च २०२१

आज क्रूड US $ ६४.२४ प्रती बॅरल ते US $६४.६१ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७३.१९ ते US $ १= Rs ७३.५६ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९३.२४ VIX २०.६५ PCR १.६३ होते. USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.७३ होते.

USA १० वर्षाच्या बॉण्ड्सचे यिल्ड वाढत असल्यामुळे आणि US $ मजबूत झाल्यामुळे सोने आणि चांदीत मंदी होती. आज USA ची कन्झ्युमर कॉन्फिडन्स आणि चीनमधील मॅन्युफॅक्चरिंग PMI चे चांगले आकडे यामुळे बेस मेटल्समध्ये तेजी होत
IDFC Ist बँक Rs ३००० कोटींचा QIP Rs ६०.३४ प्रती शेअर या किमतीला आणणार आहे. (QIP इशू या कॉर्पोरेट एक्शनविषयी सविस्तर माहिती माझ्या ‘मार्केट आणि मी’ या पुस्तकांत दिली आहे.)

केंद्र सरकार ४ राष्ट्रीयीकृत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये झीरो कुपन रिकॅपिटलायझेशन बॉण्ड्स द्वारे भांडवल गुंतवणार आहे. या बॉण्ड्सवर व्याज लागणार नाही. ते खालीलप्रमाणे

(१) सेंट्रल बँक Rs ४८०० कोटी (२ ) IOB Rs ४१०० कोटी (३) UCO बँक २६०० (४) बँक ऑफ इंडिया Rs ३००० कोटी. या सरकारच्या घोषणेनंतर या बँकांच्या शेअर्स मध्ये तेजी आली.

मूडीजने टाटा स्टीलचे रेटिंग Ba2 कायम ठेवून ऑउटलूक निगेटिव्हवरून स्टेबल केला. टाटा स्टीलच्या शेअरमध्ये तेजी होती.

झुआरी ऍग्रो या कंपनीच्या NPK-B GOA प्लांटमध्ये उत्पादन सुरु झाले. त्यामुळे या शेअरमध्ये तेजी होती.

GSK फार्मा या कंपनीने त्यांचे VEMGAL येथील उत्पादन युनिट HETERO लॅब या कंपनीला Rs १८० कोटींना विकले .

NHAI BOT समझोत्यानुसार HCC ( हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी) ला Rs १२६० कोटी मिळणार आहेत. यामुळे कंपनीच्या शेअरमध्ये माफक तेजी आली.

SBI ने जपान बँकेबरोबर US $१०० कोटींचे आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी लोन अग्रीमेंट केले. या लोनचा वापर सरकार निरनिराळ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टसाठी करेल.

सरकारने या वर्षी जवळजवळ सर्व उद्योगांसाठी PLI योजना जाहीर केल्या. त्यामुळे सर्व उद्योगांमध्ये उत्पादन वाढेल आणि महागाईला आळा बसेल.

सरकारने फूडप्रोसेसिंग उद्योगासाठी PLI ( प्रोडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह) योजना जाहीर केली. या योजनेमध्ये मरिन फूड, पोल्ट्री, मोझरेला चीज, मिलेट्स, ऑरगॅनिक फूड्स, रेडी तो इट, आणि रेडी टू कुक फूड, प्रोसेस्ड फ्रुट्स, भाज्या इत्यादिंचा समावेश आहे. ह्या स्कीमअंतर्गत शेती आणि संलग्न उद्योगांना उत्तेजन मिळेल. या बातमीनंतर ब्रिटानिया, ITC, नेस्ले, मेरिको, हिंदुस्थान फूड्स या शेअर्समध्ये तेजी आली.

टेलिकॉम कंपन्यांना सरकार PM वाणी या प्रोजेक्टअंतर्गत PPP तत्वावर १० लाख वाईफाई हॉटस्पॉट लावण्यासाठी सबसिडी देण्याची शक्यता आहे. याचा फायदा D-LINK, स्मार्ट लिंक, ITI, तेजस नेटवर्क्स, रेलटेल, या सारख्या कंपन्यांना होईल.

FY २२ साठी MPC ( मॉनेटरी पॉलिसी कमिटी) ची पहिली बैठक ५ एप्रिल ते ७ एप्रील २०२१ रोजी होईल. नंतरच्या बैठका २-४ जून, ४-६ ऑगस्ट, ६-८ ऑक्टोबर, ६-८ डिसेंबर २०२१ आणि ७-९ फेब्रुवारी २०२२ रोजी होतील. RBI च्या द्वैमासिक वित्तीय धोरणाच्या आधी MPC च्या बैठका होतात.

HEMMO फार्मा या कंपनीतील १००% स्टेक पिरामल फार्मा Rs ७८० कोटी अपफ्रंट पेमेंट करून खरेदी करणार आहे. यामुळे पिरामल एंटरप्रायझेस या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी आली.

IOC च्या हायड्रोजन प्रोजेक्टचे, HPCL पाइपलाइनचे आणि GAIL च्या पाइपलाइनचे खाजगीकरण केले जाईल.

निफ्टीमध्ये GAIL च्या जागी टाटा कन्झ्युमर, आणि बँक निफ्टी मधून बँक ऑफ बरोडा च्या जागी AU स्मॉल फायनान्स बँकेचा समावेश केला जाईल. इन्फोएज या कंपनीला IT निर्देशांकातून वगळून त्याच्या जागी ORACLE फायनान्सियलचा समावेश करणार.

आज FY २०२१ संपले. जरी इतर कारणांमुळे हे वर्ष क्लेशदायक झाले असले तरी मार्केटसाठी हे वित्तीय वर्ष ११ वर्षातले सगळ्यात चांगले वर्ष म्हणावे लागेल. अबसोल्यूट टर्म्स मध्ये सर्व निर्देशांकांनी चांगले रिटर्न्स दिले.

आज मी तुम्हाला TVS मोटर्सचा चार्ट देत आहे. TVS मोटर्सच्या फ्युचर्स आणि ऑप्शन मध्ये तेजी दिसत होती. डेली चार्टमध्ये बॉटमला भेट देऊन तेजीचा ट्रेंड दाखवत आहे. हा शेअर फेब्रुवारी आणि मार्चमध्ये पडत होता. हे करेक्शन आता रिव्हर्स होईल. RSI मध्येही बुलिश ट्रेंड दिसत आहे.

उद्या ऑटोविक्रीचे आकडे येतील. पाकिस्तानात साखरेची निर्यात होणार असल्यामुळे आज पडत्या मार्केटमध्येही साखर उत्पादक कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४९५०९ NSE निर्देशांक निफ्टी १४६९० बँक निफ्टी ३३३०३ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.