Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.
आजचं मार्केट – १3 एप्रिल २०२१
आज क्रूड US $ ६३.५५ प्रती बॅरल आणि US $ ६३.६४ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७५.०६ वर स्थिर होता. (आज करन्सी मार्केट बंद होते.) US $ निर्देशांक ९२.१० VIX २१.५४ आणि PCR १.४३ होते. USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.६६८ होते.
आज गुढी पाडवा नव वर्षांची सुरुवात या शुभ दिनी आपणा सर्वाना हे वर्ष सुखाचे समृद्धीचे यशस्वी, आरोग्यदायी, आणि आनंदाचे जावो ही शुभेच्छा आणि ईश्वरचरणी प्रार्थना.
UK मध्ये पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लॉकडाऊन बर्याच प्रमाणात शिथिल केला पण नागरिकांना सर्व नियम पाळून सावध राहण्याचे आवाहन केले.
आज DGCI ने स्पुटनिक V या व्हॅक्सिनला इमर्जन्सी वापरासाठी मंजुरी दिली.
आज DR रेड्डीज, स्ट्राइड्स फार्मा, ग्लॅन्ड फार्मा, आणि PANACEA बायोटेक यांनी RDIF बरोबर स्पुटनिक V साठी करार केला. त्यामुळे आज ह्या सर्व शेअर्समध्ये तेजी होती.
आज NEGVAC (नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन ऍडमिनिस्ट्रेशन) या सरकारी संस्थेने USFDA, UK MHRA, PMDA जपान या सारख्या परदेशी रेग्युलेटर्सनी जर एखाद्या व्हॅक्सिनला मंजुरी दिली असली तर अशा व्हॅक्सिनला भारतात मंजूरी देण्याची शिफारस केली. याचा फायदा PFIZER या कंपनीला होत असल्यामुळे हा शेअर तेजीत होता. तसेच आज सिप्लाने रेमडीसीवीर या औषधाचे उत्पादन वाढवण्याचे ठरवले.
व्हिनस रेमिडीज या कंपनीने भारतात CLOTI-XA लाँच करण्यासाठी वेस्ट फार्मा बरोबर करार केला. या बातमीनंतर या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी आली.
स्कायमेटने सांगितले की यावर्षी पाऊस समाधानकारक, पुरेसा, आणि सर्व भागात पडेल . या बातमीनंतर एस्कॉर्टस, M & M, फर्टिलायझर, शेतकी अवजारे, बीबियाणे बनवणाऱ्या कंपन्यांच्या आणि शेती क्षेत्राशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली. मार्केटने या सर्व सकारात्मक बातम्यांचा धागा पकडला आणि स्कायमेटच्या पावसाच्या अनुमानानंतर मार्केटमध्ये बऱ्यापैकी तेजी आली.
काल टी सी एस चा चौथ्या तिमाहीचा निकाल चांगला आला. उद्या इन्फोसिस आपले चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर करेल. आज IT क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.
उद्या दोन बँकांची खाजगीकरणासाठी निवड करण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक आहे. खाजगीकरणासाठी शॉर्टलिस्ट केलेल्या IOB, सेंट्रल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ इंडिया या चारही बँकांचे शेअर्स अपर सर्किटला पोहोचले.
GST वसुली FY २१ या वर्षांसाठी Rs.५ .४८ लाख कोटी एवढी झाली तर कस्टम्स कराची वसुली Rs १.०९ लाख कोटी झाली.
टाटा मोटर्स ;- JLR मधून चांगला कॅश इंफ्लो येईल आणि कॅशफ्लो ब्रेकइव्हन होईल. जग्वार चे २३४६३ आणि लँड रोव्हरच्या १२०००० युनिट्सची विक्री झाली. चीनमधील विक्री १२७% ने वाढली. त्यामुळे टाटा मोटर्सचा शेअर तेजीत होता.
ICICI लोम्बार्ड चे प्रीमियम उत्पन्न ३१% ने तर न्यू इंडिया इंशुअरंस या कंपनीचे प्रीमियम उत्पन्न २२.३%ने वाढले. त्यामुळे या शेअर्समध्ये तेजी आली.
अडाणी ग्रीनने चित्रकूटमध्ये ५० MV चा सोलर प्लान्ट सुरु केला.
L & T ने सौदी अरेबियामध्ये ३०० MV च्या सोलर प्लांटच्या निर्मितीचे काम सुरु केले.
आज मी तुम्हाला EID पॅरी या कंपनीचा चार्ट देत आहे. ही कंपनी साखर उत्पादन क्षेत्रातील असून तिच्याकडे कोरोमांडल मधील १६% ते १७% शेअर आहे.EID पॅरी हा शेअर २०० DMA चा सपोर्ट घेत आहे. मार्चमध्ये या शेअरने नवा हाय बनवला. आज या शेअरमध्ये सरासरी व्हॉल्युम पेक्षा जास्त व्हॅल्यूमने खरेदी झाली. आज स्कायमेटने पावसाचे समाधानकारक अनुमान दिले.
आज BSE निर्देशांक सेन्सेक्स ४८५४४ NSE निर्देशांक निफ्टी १४५०४ आणि निफ्टी बँक ३१७७१ वर बंद झाले.
भाग्यश्री फाटक
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!