आजचं मार्केट – १ एप्रिल २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १ एप्रिल २०२१

आज क्रूड US $ ६३.३९ प्रती बॅरल ते US $ ६४.०५ प्रती बॅरल या दरम्यान होते. आज करन्सी मार्केट बंद असल्यामुळे रुपया US $१= ७३.११ वर स्थिर होता. US $ निर्देशांक ९३.२५ VIX २०.२७ PCR १.६६ होते.USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.७१ होते.

काल USA चे अध्यक्ष बिडेन यांनी US $२.२५ ट्रिलियनचे पॅकेज देणार आहे असे सांगितले. हे पॅकेज ८ वर्षाच्या कालावधीमध्ये खर्च केले जाणार आहे. यामुळे रोजगार आणि उत्पन्न वाढेल. या बरोबरच आयकर आणि वेल्थ टॅक्स वाढवले जातील असे सांगितले.ही गुंतवणूक करण्यासाठी टेक्नॉंलॉजीची मदत आवश्यक आहे. त्यामुळे टेक्नॉलॉजीचे शेअर्स वाढले.

आज ऑटो कंपन्यांचे विक्रीचे आकडे जाहीर झाले.हे विक्रीचे आकडे गेल्या एप्रिलच्या लहान बेसशी तुलना करता चांगले वाटतात. M & M आणि एस्कॉर्टस आणि VST टिलर्स अँड ट्रॅक्टर्स यांचे ट्रॅक्टर विक्रीचे आकडे चांगले आले. टाटा मोटर्स,आणि मारुती यांचे आणि , आयशर मोटर्सचे कमर्शियल वाहन विक्रीचे आकडे चांगले होते.

सरकार इथेनॉल उत्पादनात Rs १००० कोटींची गुंतवणूक करणार आहे. ५ नवीन प्रोजेक्ट्सना मंजुरी मिळाली. ५ कोटी लिटर जादा इथेनॉलचे उत्पादन होईल. आतापर्यंत सरकारने ४२२ प्रोजेक्ट्सना मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत सोप्या अटींवर क्षमता विस्तारासाठी कर्ज दिले जाईल. या बातमीनंतर प्राज इंडस्ट्रीज, इंडियन ग्लायकॉल आणि साखर उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली.

ऑक्टोबर २०२० ते मार्च २०२१ दरम्यान २.७८ कोटी टन साखरेचे उत्पादन झाले असे ISMA ने सांगितले.
आंध्र तेलंगाणा तामिळनाडू या राज्यात सिमेंटच्या किमती Rs १० ते Rs १५ प्रती बॅग एवढ्या वाढवल्या. मालभाडे, पॅकेजिंगचा खर्च वाढला म्हणून सिमेंटच्या किमती वाढवल्या असे कारण दिले आहे. याचा फायदा सागर सिमेंट, श्री सिमेंट, ओरिएंट सिमेंट आणि इंडिया सिमेंट या कंपन्यांना होईल.

सरकार GST लेट फी आणि पेनल्टी यासाठी AMNESTY स्कीम आणणार आहे. GST कौन्सिलची कायदेविषयक समिती याबाबतीत निर्णय घेईल.

चीन जपान, कोरिया आणि युक्रेन मधून आयात होणाऱ्या कोल्डरोल्ड नॉन अलॉय स्टील आणि रबर केमिकल्सवर अँटीडम्पिंगड्युटी बसवण्याची मागणी DGTR कडे नोसिल या कंपनीने केली आहे.

निफ्टी नेक्स्ट ५० मध्ये येस बँकेचा समावेश केला. ५१ पासून १०० पर्यंतच्या कंपन्या यात समाविष्ट असतात. येस बँकेच्या समावेशामुळे डोमेस्टिक पॅसिव्ह फंडांकडून इनफ्लो वाढेल. नेक्स्ट ५० मध्ये समावेश असल्यामुळे एस बँकेत वित्तीय सुधारणा होत आहे हे समजेल. पण येस बँकेचे NPA मात्र वाढत आहेत.

मार्च महिन्यात GST कलेक्शन १.२४ लाख कोटी झाले.

विप्रोने AMPION ही कंपनी US $ ११.७ कोटींना खरेदी केली

ल्युपिन या फार्मा क्षेत्रातील कंपनीमध्ये HDFC AMC आणि LIC यांनी स्टेक वाढवला.

मॅक्रोटेक (लोढा) चा IPO ७ एप्रिलला ओपन होऊन ९ एप्रिलला बंद होईल या IPO चा प्राईस बँड Rs ४८३ ते Rs ४८६ असून मिनिमम लॉट ३० शेअर्सचा आहे. हा IPO Rs २५०० कोटींचा आहे. ही रिअल्टी क्षेत्रातील कंपनी आहे
सध्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे काही कंपन्यांचे शेअर्स मार्केटमध्ये चालू लागले आहेत त्यामध्ये दोन कंपन्यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल (१) नॅशनल ऑक्सीजन ही इंडस्ट्रियल गॅसेस लिक्विड आणि गॅस फॉर्ममध्ये उत्पादन करते आणि पुरवठा करते.Rs ३९.३० हा भाव आहे पण गेला आठवडाभर हा शेअर तेजीत आहे. (२) लिंडे इंडिया ही MNC कंपनी आहे. इंडस्ट्रियल गॅस उत्पादन करणारी सगळ्यात मोठी कंपनी आहे . रेव्हेन्यू आणि इन्स्टालेशनची संख्या दोन्हीही बाबतीत ही कंपनी चांगली आहे. ही कंपनी आणि PRAXAIR यांचे २०१८ मध्ये मर्जर झाले.त्यामुळे इंडस्ट्रियल गॅस क्षेत्रातील ही सर्वात मोठी कंपनी झाली. या मर्जरमुळे कॉस्ट सेविंग करणे आणि प्राइसिंग पॉवर कंपनीला मिळाली. आणि मार्जिन सुधारता येणे शक्य झाले. सध्या मेडिकल ऑक्सीजनची गरज भासत असल्याने ही कंपनी हॉस्पिटल्सना सुद्धा ऑक्सीजन पुरवते. पण या बाबतीत मात्र प्राईस कंट्रोल असते. पण हा लिंडेच्या उत्पन्नाचा छोटासा भाग आहे. ही कंपनी नायट्रोजेन आणि ड्राय आईस या ही क्षेत्रात आहे. डेट फ्री कंपनी असून कॅशफ्लो चांगला आहे गेल्या पंधरा दिवसांत या कंपनीचा भाव खूप वाढला आहे. ५२ वीक लो Rs ४४९.५० आणि ५२ वीक हाय Rs १९३३ आहे.

NIIT चा टेंडर ऑफर रूटने Rs २४० प्रती शेअर भावाने शेअर बायबॅक १२ एप्रिलला ओपन होऊन २८ एप्रिलला बंद होईल.या बायबॅकसाठी Rs २३७ कोटी खर्च केला जाणार आहे.या बायबॅकची २४ फेब्रुवारी ही रेकॉर्ड डेट आहे. ५ एप्रिल २०२१ पर्यंत लेटर पाठवले जाईल.

आज मी तुम्हाला बाटाचा चार्ट देत आहे. हा शेअर मार्च २०२० ते जून २०२० पर्यंत कन्सॉलिडेट होत होता ५२ वीक DMA चा सपोर्ट घेतला आहे. करेक्शन पूर्ण झाले आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५००२९ NSE निर्देशांक निफ्टी १४८६७ बँक निफ्टी ३३८५८ वर बंद झाला.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

One thought on “आजचं मार्केट – १ एप्रिल २०२१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.