आजचं मार्केट – ५ एप्रिल २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ५ एप्रिल २०२१

आज क्रूड US $ ६३.३५ प्रती बॅरल ते US $ ६४.४८ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७३.३४ ते US $१=Rs ७३.४५ या दरम्यान होते. VIX २३.१४ PCR १.५८ होते. USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.७० होते.

आज चीन, जपान, तैवान,इटली, UK,जर्मनी,फ्रांस, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड ही मार्केट्स बंद होती. USA मधील जॉब रिपोर्ट ( ९.१६ लाख) चांगला आला.

ओपेक+ ने मे आणि जून २०२१मध्ये ३.५ लाख बॅरल्स आणि जुलैमध्ये ४.५ लाख बॅरेल्स उत्पादन वाढवायला मंजूरी दिली.
RBI च्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीची दोन दिवसांची बैठक आज सुरु झाली. बुधवार ७ एप्रिल २०२१ रोजी RBI त्यांची द्वैमासिक वित्तीय पॉलिसी जाहीर करेल.

भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. बहुतेक राज्यांमध्ये निर्बंध लागण्याची शक्यता आहे. या निर्बंधांमुळे लॉजिस्टिक्सवर आणि सप्लायचेनवर परिणाम होईल.मार्च महिन्यातील PMI ५५.४ एवढा कमी झाला तो फेब्रुवारी मध्ये ५७.५ होता. भारतामध्येही बॉण्ड यिल्ड वाढत आहे. त्यामुळे व्याजाचे दर वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः मॉल्स, थिएटर्स, सभागृहे,हॉटेल्स यांच्यावर जास्त परिणाम होईल. या सगळ्यांचे प्रतिबिंब आज मार्केटमध्ये दिसले. मार्केटमधील सेंटीमेंटमध्ये थोडा भीतीचा प्रवेश झाला. मार्केटने निफ्टी १४५०० चा स्तर सोडला म्हणून मार्केट निफ्टी ३०० पाइंटने पडले.
या सर्व कारणांमुळे मार्केट पडत राहिले. IT आणि मेटल क्षेत्रातील कंपन्यांचे चौथ्या तिमाहीचे आणि त्याचबरोबर वार्षिक निकाल चांगले येतील या अपेक्षेने IT क्षेत्रातील कंपन्यांमध्ये तेजी होती. तसेच काही बँकांनी त्यांच्या डिपॉझिट, ऍडव्हान्सेसचे आकडे जाहीर केले. पण आज बँक निफ्टीमध्ये खूपच घसरण झाली. औद्योगिक उलाढाल काही प्रमाणात कमी झाल्यामुळे बँकांवरही त्याचा प्रतिकूल परिणाम होईल.सुप्रीम कोर्टाच्या व्याजावरील व्याज परत करण्याच्या निर्णयामुळे बँकांवर Rs १८०० ते Rs २००० कोटींचा बोजा पडेल. त्यामुळे बॅंक शेअर्समध्ये मंदी आली.

हिरो मोटो या कंपनीचे विक्रीचे आकडे ( ५.५७ लाख युनिट्स) चांगले आले. TVS मोटर्सचि विक्री ३.०७ लाखयुनिट तर बजाज ऑटोचिर ३.६९ लाख युनिट झाली पण बजाज ऑटोची निर्यात कमी झाली. रॉयल एन्फिल्डच्या विक्रीतही मामुली वाढ झाली.

फेडरल बँकेच्या डिपॉझिट आणि ऍडव्हान्सेस मध्ये चांगली वाढ झाली. CASA डिपॉझिट मध्येही लक्षणीय वाढ झाली. HDFC बँकेच्याही डिपॉझिट आणि ऍडव्हान्सेसमध्ये अनुक्रमे १६.३% आणि १४% वाढ झाली.

LIC ने बाटा इंडियाचे २६ लाख शेअर्स खरेदी केले त्यामुळे आता LIC चा स्टेक ८.१५% झाला.

IRCON या रेल्वेशी संबंधित सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनीने १:१ असा बोनस जाहीर केला. तुमच्या जवळ असलेल्या एक शेअरमागे तुम्हाला १ बोनस शेअर मिळेल.

आता काही कंपन्यांच्या निकालांच्या तारखा TCS १२ एप्रिल, इन्फोसिस १४ एप्रिल , विप्रो, माईंडट्री १५ एप्रिल, HDFC बँक १७ एप्रिल, नेस्ले २० एप्रिल

आज मी तुम्हाला बर्जर पेंट्सचा चार्ट देत आहे. गेल्या तीन दिवसात हा शेअर कन्सॉलिडेशनमध्ये होता. या शेअरमध्ये मंदीचा ट्रेंड दृष्टीस पडत आहे.

आज BSE निर्देशांक सेन्सेक्स ४९१५९ NSE निर्देशांक निफ्टी १४६३७ बँक निफ्टी ३२६७८ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.